"हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता!"

Submitted by उडन खटोला on 23 November, 2014 - 03:01

काल काही कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलो असतानाचा प्रसंग. एक बारा-तेरा वर्षांची मुलगी आईवडिलांसोबत तक्रार नोंदवायला आली होती. समाजातील सध्याच्या दुर्दैवी परिस्थितीस साजेशी अशी छेडछाडीची तक्रार. परिसरातील दोन मवाली तिची रोज क्लासला जाताना छेड काढतात अशी तक्रार तिने नोंदवली आणि पोलिसांनी ताबडतोब त्यांना पकडून आणले. आधी पोलिसांसमोर दोघांनी साळसूदपणाचा आव आणला, पण पोलिसांनी शिव्या घालायला सुरुवात केल्यावर ते दोघे भडकले आणि पोलिसांनाच शिविगाळ आणि जातीवाचक धमक्या द्यायला सुरुवात केली. राजकीय कनेक्शन वापरुन एकाला बोलावूनही घेतले, आणि मग पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांना 'भxxx बघा आता तुमची कशी xx मारतो' वगैरे धमक्या दिल्या आणि हाणामारी सुरु केली. मात्र पोलिसांनी त्या राजकीय हस्तक्षेपाला, धमक्यांना आणि हल्ल्याला न जुमानता त्यांना विविध चार्जेस लावून आत टाकले आणि 'आता तुम्ही मागं फिरुन तक्रार मागे घेऊ नका असे त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना सांगितले. तसेच त्यांना त्यांचच्या सुरक्षिततेची हमी दिली. सगळा गोंधळ आटोपल्यावर एका हवालदाराने वैतागून "हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता!" असे उद्गार काढले.
पोलीस स्टेशनमधून बाहेर आलो तेव्हा डोकं सुन्न झालं होतं. अनेक प्रश्न डोक्यात घोंघावत होते....
१. त्या मुलीला होणारा त्रास थांबण्याऐवजी उलट आता तिच्या जिवाला आणि अब्रूृला धोका वाढला तर नाही ना?
२. स्रियांचे कपडे अत्याचारांना आमंत्रण देत असते तर त्या लहानग्या मुलीन हा त्रास होण्यासाठीे असे कोणते कपडे घातले होते?
३. प्रामाणिकपणे काम करुनही शिव्या खाणार्‍या आणि दबाव सहन करणार्‍या पोलिसांचं मनोबल खच्ची कसं नाही होणार?
४. xxवर फटके बसल्यावरच असल्या भxxx जात का आठवते? आपल्या घाणेरड्या कृत्याने आपण आपल्या जातीला बट्टा लावतोयअसा विचार मनात का येत नाही?
* Edited

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीरसाहेब,

हा अनुभव नित्याचा आहे. चांगला अनुभव आला तरच काहितरी विषेश घडले असे समजायचे.

खरेच हे दुर्दैवी असले तरी सत्यपरीस्थितीच आहे..

मुलींच्या छेडखानीचे म्हणाल तर कित्येक छोट्यामोठ्या छेडखानीकडे बर्‍याच मुली पार्ट ऑफ लाईफ म्हणत दुर्लक्ष करतात.. अर्थात हे काही मैत्रीणींच्या कडूनच ऐकले आहे..

एका मर्यादेबाहेर सामान्य माणसे सिस्टीमशी नाही लढू शकत, जोपर्यंत आमूलाग्र सुधारण होत ती बदलत नाही.. तोपर्यंत उपाय एकच, एकजूट दाखवणे.. आणि तीच होऊ नये म्हणून लोकांना जातीपातीच्या नावावर विभागले जाते, या प्रकरणांना जातीय रंग दिले जातात..

दुर्दैवाने ठराविक वर्गातले लोक असले प्रकार करण्यात आघाडीवर आहेत, परत या लोकांना कायद्याचे संरक्षणही आहे ,त्याचा वापर करुन उलटी आवई उठवण्यात या लोकांचा व त्यांच्या संघटनांचा हात कुणी धरणार नाही. पण पॉलिटीकल करेक्टनेसच्या या जमान्यात यांच्या विरोधात स्पष्टपणे बोलणार कोण????

बातमी दुर्दैवी खरीच Sad

>>दुर्दैवाने ठराविक वर्गातले लोक असले प्रकार करण्यात आघाडीवर आहेत, परत या लोकांना कायद्याचे संरक्षणही आहे ,त्याचा वापर करुन उलटी आवई उठवण्यात या लोकांचा व त्यांच्या संघटनांचा हात कुणी धरणार नाही.

कोणते ठराविक वर्ग ते ? कोणत्या संघटना त्या ? Uhoh