पालकाची १५-२० पाने
कॉर्नदाणे अर्धी वाटी
मटारदाणे अर्धी वाटी
१०-१२ काजू
कांदा उभा चिरून
आले पेरभर
लसूण दोन पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
मिळाल्यास ताजे बे लीव्ह्ज
बासमती तांदूळ १.५ वाटी
किचन किंग मसाला
तेलात काजू तळून घ्या
त्याच तेलात जिरे, बे लीव्ह्ज व बारीक चिरलेले हिरवी मिरची, आले लसूण इत्यादी घालून परता
उभट चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पालकाची पाने, कॉर्न व मटारदाणे घालून किंचित वाफ काढा
मग धुतलेले तांदूळ, मीठ व ३ चमचे किचन किंग मसाला घालून शिजवून घ्या.
जरासा स्पायसी पण मस्त चवीचा स्पिनॅच कॉर्न पुलाव तयार..
नेहेमीचा स्पिनॅच पुलाव म्हटले की हिरवागार भात समोर येतो, तसा हा करायचा नाही. त्यामुळे पालक अती घ्यायचा नाहीये.
मी आत्ताच भूक लागल्यामुळे पटकन मनात येईल ते टाकून बनवला आहे. चवीला भन्नाटच झाल्याने लगेच पाकृ लिहीली. परंतू फोटो टाकण्यासारखा अजिबातच झाला नाही कारण मी आंबेमोहोर तांदूळ वापरला आहे. पुलाव म्हटल्यावर जसा लांबसडक शीतांचा भात समोर येतो तसा नाही झाला त्यामुळे नो फोटो.
चनस मला जेवायला बोलावलस तर
चनस मला जेवायला बोलावलस तर ज्यूस न घालताच कर बरका खीर शेवयाची
शुम्पी .. ओक्के आता त्या खीर
शुम्पी .. ओक्के
आता त्या खीर वरुन धागा हायजॅक झालाय .. बस्के मारेल मला..
चनस इट्स ओके! खीर शेवयाची आहे
चनस इट्स ओके! खीर शेवयाची आहे म्हणून चालतंय.. साबुदाण्याची खीर असती तर वैतागले असते.
Pages