पालकाची १५-२० पाने
कॉर्नदाणे अर्धी वाटी
मटारदाणे अर्धी वाटी
१०-१२ काजू
कांदा उभा चिरून
आले पेरभर
लसूण दोन पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
मिळाल्यास ताजे बे लीव्ह्ज
बासमती तांदूळ १.५ वाटी
किचन किंग मसाला
तेलात काजू तळून घ्या
त्याच तेलात जिरे, बे लीव्ह्ज व बारीक चिरलेले हिरवी मिरची, आले लसूण इत्यादी घालून परता
उभट चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पालकाची पाने, कॉर्न व मटारदाणे घालून किंचित वाफ काढा
मग धुतलेले तांदूळ, मीठ व ३ चमचे किचन किंग मसाला घालून शिजवून घ्या.
जरासा स्पायसी पण मस्त चवीचा स्पिनॅच कॉर्न पुलाव तयार..
नेहेमीचा स्पिनॅच पुलाव म्हटले की हिरवागार भात समोर येतो, तसा हा करायचा नाही. त्यामुळे पालक अती घ्यायचा नाहीये.
मी आत्ताच भूक लागल्यामुळे पटकन मनात येईल ते टाकून बनवला आहे. चवीला भन्नाटच झाल्याने लगेच पाकृ लिहीली. परंतू फोटो टाकण्यासारखा अजिबातच झाला नाही कारण मी आंबेमोहोर तांदूळ वापरला आहे. पुलाव म्हटल्यावर जसा लांबसडक शीतांचा भात समोर येतो तसा नाही झाला त्यामुळे नो फोटो.
छानच! आंबेमोहर चवीला
छानच! आंबेमोहर चवीला केंव्हाही छान बासमतीपेक्षा. करुन बघेन. फोटो असेल तो टाक. कसाही आला तरी बघू दे.
आंबेमोहोर तर आबेमोहोर... फोटो
आंबेमोहोर तर आबेमोहोर... फोटो टाक ना.
आलं-लसूण बारीक कापून की पेस्ट घालायची आहे?
मी शनिवारी करेन
आणि त्याबरोबर आरतीचं पम्पकिन सूप.
माझा कॉर्न पुलाव पिवळा असतो
मी बारीक चिरून घालते. पेस्ट
मी बारीक चिरून घालते. पेस्ट करायचा कंटाळा व विकतची चव नाही आवडत.
हा घ्या फोटो.. अगदीच मऊ शिजवला मी कारण मला मऊ भात म्हणजे कम्फर्ट फुड व वन डिश मील वाटतो. टेक्निकली हा पुलावाचा फोटो नाही म्हणता येणार.
काय झाले फोटोला!! मस्त आला
काय झाले फोटोला!! मस्त आला आहे. मला तो एकाचवेळी पुलाव, तमिळ लोकांचा तिखट पोंगल आणि गोड भात असे वेगवेगळे लुक्स देतो आहे
बस्के, आंबेमोहोर इथे कुठे
बस्के, आंबेमोहोर इथे कुठे मिळाला ते सांग आधी
मस्त ! आंबेमोहोर आणि
मस्त ! आंबेमोहोर आणि इंद्रायणी माझे लाडके तांदू़ळ प्रकार आहेत अगदी. नक्की करून बघेन.
बस्के, रेसिपी इंटरेस्टींग
बस्के, रेसिपी इंटरेस्टींग वाटत आहे ..
>> मी बारीक चिरून घालते. पेस्ट करायचा कंटाळा व विकतची चव नाही आवडत.
+१ तसंही पेस्ट केली तरी पाणी न घालता ती कशी स्मूथ करायची हे मला कळलेलं नाही ..
रमड, बे एरियात मिळाला अगं.
रमड, बे एरियात मिळाला अगं.
अरे वा करून बघेन एकदा.
अरे वा करून बघेन एकदा.
नेहेमीचा कॉर्न पुलाव म्हटले
नेहेमीचा कॉर्न पुलाव म्हटले की हिरवागार भात समोर येतो>> इथे कॉर्न एवजी पालक हव ना!
छान वाटतिय क्रुती !करुन खाणार
मस्त! लगेच करण्यात येईल ..
मस्त! लगेच करण्यात येईल .. स्पिनॅच नि कॉर्न दोन्ही आहेत
जमेल! मस्त आहे.
जमेल! मस्त आहे.
यातच भाताएवजी किन्वा पण घालता
यातच भाताएवजी किन्वा पण घालता येइल
प्राजक्ता, हो की. स्पिनॅच
प्राजक्ता, हो की. स्पिनॅच पुलाव हवं तिथे. बदलते. थँक्स!
किन्वा पण मस्त लागेल..
चांगला वाटतो आहे. आंबेमोहोर,
चांगला वाटतो आहे. आंबेमोहोर, बासमती दोन्ही तांदूळ आवडत नाहीत तेव्हा जास्मिन राईसचा करून बघेन.
बस्कू छान आहे गं रेस्पी!
बस्कू छान आहे गं रेस्पी!
आज केला पुलाव .. थोडसं पाणी
आज केला पुलाव .. थोडसं पाणी जास्त झालं .. पण चव मस्त!
अरे वा क्या बात है!! ती वाटीत
अरे वा क्या बात है!!
ती वाटीत शेवयाची खीर आहे का?
करुन पाहते बस्कू. सोपी आहे
करुन पाहते बस्कू. सोपी आहे रेश्पि.
ती वाटीत शेवयाची खीर आहे का?
ती वाटीत शेवयाची खीर आहे का? >> होय
चनस पुलाव छान दिसतोय ..
चनस पुलाव छान दिसतोय ..
यम्मी दिसतीय खीर.. मला उद्याच
यम्मी दिसतीय खीर.. मला उद्याच केली पाहीजे खीर आता!
शैलजा, हो अगदीच सोपी आहे रेसीपी ! पण इकडे स्पिनॅच कॉर्न पुलाव असं काही दिसलं नाही म्हणून पाकृ लिहून टाकली लगेच. नाहीतर कधी कधी मीच विसरून जाते हा असा पदार्थ मी बनवला होता.
स्पिनॅच राईस बनवला आहे ..
स्पिनॅच राईस बनवला आहे .. पाकॄ वेगळी आहे .. फोटो टाकु इथे कि वेगळा धागा काढू ?
छान ! बस्केम्याडम, आलं लसुण
छान !
बस्केम्याडम, आलं लसुण पेस्ट करण्यात वेळ जातो व कुकिंगचा मजा त्यातच किरकिरा होतो. त्यासाठी एक टीप .. भरपूर आले व लसुण विकत घ्यावे, दोघांची वेगवेगळी बारीक पेस्ट करावी, दोन मोठ्या प्लास्टीक पेपर वा फॉईलच्यामध्ये पेस्टचा पातळ थर पसरवा व कडक उन्हात तीन चार दिवस वाळवत ठेवा, कडक पापुद्रा तयार होतो, तो चुरुन त्याची पावडर करता येते, ती खुप दिवस टिकते. फक्त हवा बंद डब्यात बाहेरच ठेवा, फ्रिजरात नको ,दमट होइल.
सशल .. थँक्यु बस्के ..
सशल .. थँक्यु
बस्के .. शेवयाची खीर करायला कितीसा वेळ लागतो .. सरकारी डेझर्ट आहे ते .. काही नाही तर खीर .. व्हेरिएशनमधे फक्त वेलदोडा, ड्राय फ्रुट्स, इसेन्स , मँगो पल्प .. Naked Juice .. जे हातात मिळेल ते
टीना, वेगळी रेसीपी असेल तर
टीना, वेगळी रेसीपी असेल तर वेगळा धागा काढा.
धीरज काटकर, हे सगळं करायचा कंटाळा आहे म्हणून मी बारीक चिरणे वगैरे शॉर्टकट घेते. शिवाय चवीत बदल वाटत नसल्याने चालून जाते आहे..
चनस, नेकेड ज्यूस घालून खीर? इंटरेस्टींग आहे. नेकेड कुठला, मी फक्त प्रोटीन झोन पीते.
नेकेड कुठला >> Mighty mango..
नेकेड कुठला >> Mighty mango.. पल्प नव्हता म्हणुन ट्राय केला.. जर तुला तो ज्युस आवडत असेल तरच वापर .. मँगो नाव जरी असलं तरी मला जरा वेगळीच चव वाटली..
डीजेच्या आंब्याचा शिरा बघितल्याने ही आयडीया केली
ओह ओके. ज्यूस पीऊन बघते
ओह ओके. ज्यूस पीऊन बघते आधी.
पण ऑन सेकंड थॉट, मला शेवयाची खीर नेहेमीचीच आवडेल. असो..
वॉव , सोप्पीय रेसिपी . चनस ,
वॉव , सोप्पीय रेसिपी . चनस , तोंपासु फोटो
चनस स्वतंत्र धागा काढून ती
चनस स्वतंत्र धागा काढून ती ज्यूस-खीर प्लिज लिही.
Pages