अ‍ॅनीव्हर्सरी

Submitted by कविन on 13 November, 2014 - 01:04

ऍनिवर्सरी

१५ नोव्हेंबर २०१२

फारच वा‌ईट झालं.

हो ना! चेहरा डोळ्यासमोर येतो तिचा अगदी

नुकतच लग्नं झालेलं बिचारीचं. लग्नाचा अल्बम घे‌ऊन चढलेली म्हणे ती. अल्बम राहीला आत आणि ही बाहेर एका क्षणात

छे! कठीण झालय सगळच आजकाल

गर्दीच इतकी वाढलेय. बरं डोंबिवली ट्रेन्स सोडाव्यात ना जास्तीच्या ते नाही. मग सगळे त्या मस्टरसाठी करतायत आटापिटा पाच नंबरवरुन चढण्याचा.

नाहीतर काय? अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे देव जाणे

------------------------------------------------

१३ नोव्हेंबर २०१३

गेल्या महिन्यात परत आपल्या ट्रेनमधून कोणीतरी पडलं ना? हर्षू सांगत होती काल मला.

हो गं. ९.०३ ला वर्षभरात झालेला हा तिसरा अपघात. स्टेशन मास्तरांना जादा गाड्या सोडण्यासाठी निवेदन दे‌ऊन पण आता सहा महिने उलटून गेले. आपल्याला यांच्या मागे लागायला वेळ नसतो ना याचा फायदा घेतात सगळे.

ह्म्म! खरय गं.

तू का येत नाहीस गाडीला सकाळी?

उशीर होतो आजकाल. पण ये‌ईन उद्या नक्की. चेन्न‌ई ट्रिपचा खा‌ऊ पण घे‌ऊन ये‌ईन येताना.

खा‌ऊ विसरलीस तरी चालेल एकवेळ पण साखरपुड्याचे फोटो नक्की आण

हे!हे! हो नक्की आणेन.

-----------------------------------

१३ नोव्हेंबर २०१३

उद्या ऍनिवर्सरी आहे मॅडमची. काय मग यंग अन्ड ब्युटीफ़ूल लेडी. काय हवय गिफ्ट आपल्याला?

गेल्या महीन्यात तुला काय दिलं? तेच.. तसच.., फक्त माझ्या वयाला साजेसं हवं बस इतकच!

जशी आपली आज्ञा मॅडम!

------------------------------------------------

१४ नोव्हेंबर २०१३

विश यु अ व्हेरी हॅप्पी ऍनिवर्सरी डि‌अर. ऍन्ड हि‌अर कम्स यु‌अर प्रेझेन्ट ....

----------------

१५ नोव्हेंबर २०१३

काल नव्हतीस ना ट्रेनला तू? काल तो हर्षूचा गृप आहे ना? त्यांच्या गृपमधली एकजण अपघातात गेली. ट्रेन एकतर लेट होती. त्यात ती लटकत होती. हातात तिच्या साखरपुड्याचा अल्बम होता म्हणे. एका क्षणात काय झालं कळलच नाही. गर्दीचं प्रेशर होतं की तिला चक्कर आली काय माहीत. तिचा रॉडला पकडलेला हात सुटला आणि ती एकदम बाहेर फेकली गेली. तिचा अल्बम तसाच फ़ुटबोर्डच्या अलिकडे पडला.

फ़ारच वा‌ईट झालं गं. गेल्या एक दिड वर्षातली ही चौथी केस त्याच ट्रेनमधली.

काय उपयोग निवेदनं दे‌ऊन? अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार कोण जाणे?

--------------------------------

१३ नोव्हेंबर २०१४

उद्या तुम्हा दोघींची ऍनिव्हर्सरी ना ग? मग यंदा काय द्यायचं गिफ़्ट? नेहमीचच ना?

होऽऽ होऽऽ तेच आणि तसच. यावर्षी दोघींना गिफ़्ट..पण दोघींना मिळून एक गिफ़्ट नको हा..

जशी आपली आज्ञा मॅडम!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचुनच गरगरतंय.

मी डोंबिवलीला ट्रेनखाली गेले होते (लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये जी गॅप असते त्यातुन).
त्याची आठवण झाली.

डोंबिवली स्टेशन दिवसेंदिवस हॉरीबल होत चाल्लंय. Sad

कविन हे खरं आहे का? भयानक आहे ग.

पियू ??? काय ग ? अग काळजी घ्या ग. पियु तुला काही लागले वैगरे नाही ना??? कधी झाले हे?

पियू ??? काय ग ? अग काळजी घ्या ग. पियु तुला काही लागले वैगरे नाही ना??? कधी झाले हे?

>> काही महिन्यांपुर्वीच. फास्ट ट्रेनमध्ये चढायला इतकी गर्दी होती. मी उतरतांना मला चढणार्‍यांनी ढकलले आणि मागच्या गर्दीचे प्रेशर आणि पुढुन येणार्‍या गर्दीचे प्रेशर याचा परीणाम मी मधल्यामध्ये गॅपमधुन लोकलखाली पडले.
गर्दीतल्याच कोणीतरी मला वर ओढुन पुन्हा गाडीत घातले (खरं तर मला डोंबिवलीला उतरायचे होते). मग पुढे ठाण्याला उतरुन स्लो गाडीने पुन्हा आले डोंबिवलीला.

इन जनरलच डोंबिवली खरंच हॉरीबल आहे चढाय-उतरायला.

ह्म्म्म्म्!!

यासंदर्भात चर्चेसाठी बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगळ्या बाफवर चर्चा करायला आवडेल. इथे विषयबदल नको.

पियू, बापरे!! काळजी घे बयो..

पियू, Uhoh काळजी घे गं बाई Sad
माझ्या मनात याच सगळ्या गोष्टींमुळे नुसत्या लोकलचीच नाही तर पुर्ण रेल्वे जमातीबद्दल भिती बसलीये Sad
मला मुंबई न आवडण्याचं हे ही एक कारण (लोकल)

यासंदर्भात चर्चेसाठी बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगळ्या बाफवर चर्चा करायला आवडेल. इथे विषयबदल नको.

>> खरंय. कथा मस्त जमलीये. पण सत्यकथा वाटतेय असंख्य अनुभवांमुळे. नो फिक्शन अ‍ॅट ऑल.

अंजली_१२, घटनांच्या तारखा बघा आणि १३ नोव्हेंबर २०१४ ची तीनही वाक्यं नीट वाचा. कविताने सॉलिड काही सुचवलंय थरकाप उडवणारं.

कमीत कमी शब्दातली भयकथा आहे ही तर..>>> +१

बापरे डेंजर! कमीत कमी शब्दातली भयकथा आहे ही तर.. >>++

आणि शेवटी अगदी आजचीच तारिख असल्याने फार अस्वस्थ करुन गेली Sad

Pages