Submitted by संतोष वाटपाडे on 11 November, 2014 - 01:47
दिवसभर काबाडकष्ट करुन
काळवंडलेल्या चेहर्याला न पुसता
वांझोट्या चुलीकडे बघत बघत
भकास स्वप्ने पदरात घेणारी रात्र
उपाशीपोटीच कोसळलेली असते
दगडांच्या फ़ाटलेल्या अंथरुणावर
निर्वाणाच्या आशेनं धावत सुटणारे पाय
स्वतःची दमछाक करुन सताड पसरतात
मोकळे श्वास घेण्यासाठी
तेव्हा सारं जग ज्यांच्या खोलीत दिसावं
अशा टाचांवरच्या भेगा
अंधार गडद गडद होत असताना
हळूहळू बाहेर येऊ लागतात
पिळवटलेल्या आतड्य़ाना मोकळीक देण्यासाठी...
अंधाराचं छद्मी हसणं कानाला झोंबत असतं
तीक्ष्ण बाणांसारखं खोलवर
तेव्हा अगतिकता पसरत जाते
थरथरणार्या अशक्त कायेवर
चिंध्या झालेल्या दुलईसारखी...
रात्र व्हिवळत असते स्फ़ुंदत असते
वाट बघत असते उजेडायची
आयुष्याच्या खाणीत काम करताना
फ़ुटणारे असंख्य सुरुंग हवे असतात तीला
स्वतःचा एकटेपणा दूर करण्यासाठी.....
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथानक बरे आहे.
कथानक बरे आहे.
धन्यवाद...... उद्या
धन्यवाद...... उद्या गद्यविभागात नक्की पोश्ट करेन..