दिपोत्सव :

Submitted by शोभा१ on 7 November, 2014 - 02:31

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आमच्या गणपती मंदिरात दिपोत्सव झाला. आणि नेहमीप्रमाणे "गोरे काका" नी ह्या वर्षी मारुतीच मोठ्ठ चित्र काढलं होतं. त्यावर नंतर दिपोत्सव केला.

१) आदल्या दिवशी चित्र काढताना.

२)दिपोत्सवाची तयारी.

३)

४)दिपोत्सवाची सुरुवात.

५) दिपोत्सव.

६)दिपोत्सव :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. जागु. खरचं त्या काकांची कमाल आहे. केवळ हौसेने हे सगळं करतात.प्रचंड उत्साही आहेत. पहिल्या फोटोत चष्मा लावलेले, उभे आहेत ना? तेच ते. Happy

मस्त !

खुपच सुरेख काढले आहे पेन्टिंग + फुलांची रांगोळी आणि दिवे. पण दिवे बाजुने लावले असते तर मारुतीदेव आणखी स्पष्ट दिसले असते दिवे लागल्यावर.हे आपलं उगाच वाटलं . Happy

खुप सुंदर !
गोव्याला पण त्रिपुरारी पोर्णिमेला मोठा उत्सव असतो. ( सरकारचेच प्रयोजन असते ) त्यात बोटींच्या मॉडेल्सच्या स्पर्धा असतात. सांखळी ( सांकलेम) गावात नदीकाठी असतो हा. अजून असावा Happy