Submitted by हर्ट on 3 November, 2014 - 01:30
इतर ठिकाणी माहिती नाही पण पुण्यात खूपशा ठिकाणी इडली डोशाचे तयार सारण मिळते. मी एक दोनदा विकत आणले. पण, इडलीचा वास नासका येत होता आणि उरलेले पिठ परत वापरता आले नाही. नक्की कुठे हे पिठ चांगले मिळते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही तो नवीन बीबी काढलाय
तुम्ही तो नवीन बीबी काढलाय ना, वापरूण पाहिलेले जिन्नस तिथेच लिहिले आहे की, चितळे ह्यांचे बरं आहे पीठ चवीला.
मी एक बँगलोर इडली आटा वापरलाय, तो हि चांगलाय.
(हे तिथेच हलवा म्हणजे सगळ्यांना मिळेल.) फु. स.
बी, नागपूरला हल्दीराम,
बी, नागपूरला हल्दीराम, पुर्ती, आणि काही सुपरशॉपीज मधे छान मिळते हे ओल पीठ.. इन फ्याक्ट, ती लोकं विचारतात की पीठ आज वापरणार आहात का की उद्या... एखाद्या ग्रुह उद्योग चालवणार असेल तर बघा... मी घरा जवळ एक काकु चालवतात त्यांच्य कडुन घेते, एक तर स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच पण असत...
पुण्यातल्या स्पेन्सर्स
पुण्यातल्या स्पेन्सर्स सारख्या शॉपीजमध्ये मिळते ते ओले पीठ.
चितळे व देसाई बंधूंच्या दुकानांत मिळणारे ओले पीठ.
खरे सांगू का, हे रविवारी
खरे सांगू का, हे रविवारी अर्ध्या तासाचे काम आहे. सकाळी भिजू घालायचे. संध्याकाळी वाटून दुसृया दिवशी इडल्या करायच्या डोस्याचे पीठ फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे. बाहेरून आणायची किंवा रेडीमेड पॅकेट वापरायची गरज पडत नाही. अगदीच गडबड असेल तर गोष्ट वेगळी. पण काय तांदूळ वापरले असतील काय माहिती. घरी आपण सोना मसूरी/ अगदी बासमती पण वापरू शकतो. इडली रवा खात्रीचा असतो. माझी माबो वर वावरून आस्वपू पद्धत अगदी परफेक्ट झाली आहे रविवारी एक तास किचन मध्ये जबरदस्त फिट काम करायचे की पुढे चार दिवस आरामात हे करू कि ते करू असे जातात.
अमा ++१ माझ्या बहिणीकडच्या
अमा ++१
माझ्या बहिणीकडच्या बाईंनी सांगीतलेली आणिंमी नेहेमी वापरते अशी रेसिपी
http://deepascooking.blogspot.in/2013/09/idlidosaappe-batter.html
मला बाहेरचे पीठ वापरताना
मला बाहेरचे पीठ वापरताना पीठापेक्षा पाणी कुठले वापरले असेल याची काळजी जास्त असते. आणि मलातरी ऊडिद दाळ कमी वापरतात असेच वाटते.
जेपी'ज चे पीठ वापरले दोनदा, चांगले वाटले, पण इडली करताना सोडा टाका असे सांगितलेय त्यावर. ते मला तरी नाही आवडले. म्हणजे पीठ नीट आंबलेले नसते अस मी तरी त्याचा अर्थ काढला
इडली डोश्याचे तयार 'सारण'
इडली डोश्याचे तयार 'सारण' म्हणजे काय?
(No subject)
इडली डोश्याचे तयार 'सारण'
इडली डोश्याचे तयार 'सारण' म्हणजे काय?>>
बॅटरला मराठी शब्द मला माहिती नव्हता म्हणून मी सारण लिहिले. इथे लोक चक्क डोशाचे ओले पिठ असे लिहित आहेत ते खटकत आहे वाचायला. वाटण शब्द कसा राहील? डोशाचे वाटण? तोही योग्य नाही वाटत!!!
भज्यांसाठी भिजवलेल्या
भज्यांसाठी भिजवलेल्या पदार्थाला काय म्हणतोस बी? कणीक, सारण की भिजवलेले पीठ की अजून काही? तेच याला म्हण.
अगं मी हाच अन्वय लावून
अगं मी हाच अन्वय लावून लिहिणार होतो पण तरी थोडे चुकल्यासारखे वाटत होते. जाऊ दे.. इतके काय शब्दांचे गणित मांडत बसायचे
इथे सिंगापुरमधे डोशाला स्थानिक तमिळ जनता दोसई असे म्हणतात. मलाही आता त्याचीच सवय झाली आहे
इथे सिंगापुरमधे डोशाला
इथे सिंगापुरमधे डोशाला स्थानिक तमिळ जनता दोसई असे म्हणतात. मलाही आता त्याचीच सवय झाली आहे >>>>>>>. तुम्ही सध्या सिंगापुर ला असाल तर आताच पुण्यात कुठे मिळेल ह्या ची चौकशी ??? त्यासाठी वेगळा धागा
इतर ठिकाणी माहिती नाही पण पुण्यात खूपशा ठिकाणी इडली डोशाचे तयार सारण मिळते>>>> थोडे स्वतः वेगवेगळ्या ठिकाणचे ट्राय करुन पाहुन आम्हांला पण सांगा आता धागा उघडलाच आहे तर.अर्थात तुम्ही पुण्यात आल्यावर.
इडली डोश्याचे वाटलेले पीठ हे
इडली डोश्याचे वाटलेले पीठ हे कसे वाटते बी?
सारण म्हणजे स्टफिंग.
अंकु, मी पुण्यात येऊन जाऊन
अंकु, मी पुण्यात येऊन जाऊन असतो. म्हणून विचारले. माझी आई वृद्ध आहे आणि पुतणी कॉलेजमधे मग्न असते. मला स्वतःला इडलीचे पिठ करायला आवडेल पण नीट आंबले नाहीतर ही भीति असते. म्हणून हे सर्व.
इडली डोश्याचे वाटलेले पीठ हे कसे वाटते बी?>> हो छान आहे एक नाव असायला हवे होते ह्याला मराठीत
@वर्षा - काही ठिकाणी आपण
@वर्षा - काही ठिकाणी आपण नेलेले डाळ तांदूळ वाटून देतात. तिथे पाणी पण आपण घेवून जायचे. नेहमीच्या साठी हा उद्योग नको वाटेल पण जास्त प्रमाणावर पीठ करायचे असल्यास जायला हरकत नाही. ( कुठे मिळते ते माहित आहे पण अजून वाटून आणलेलं नाही)
इडलीचे पीठ एकदम सोपे आहे. एक
इडलीचे पीठ एकदम सोपे आहे. एक वाटी उडद डाळ आणि दोन वाटी इडली रवा हे प्रमाण. उडद डाळ वाटून त्यात रवा मिक्स करून रात्रभर ठेवायचे सक्काळी वर्ल्ड बेस्ट इडल्या. मी आजच डब्यात आणल्या होत्या. चटणीची तयारी पण मिक्सर च्या भांड्यात ठेवली की सकाळी इडल्या वाफवे परेन्त चटणी करून होते. बाहेरचे काय कधी करून ठेवले आहे व दुकानात कधीपासून पडून आहे समजत नाही.
मुंबईत तर ते कुठे वाटले असेल कोण जाणॅ असेच फीलिन्ग येते. आमच्या इथे एक नागरिक स्टोअर आहे तिथे हे वाटलेले पीठ चांगले फ्रेश दळून मिळते. किंवा कधीकधी दोसाच पार्सल आणायचा.
इडली डोश्याचे वाटलेले पीठ हे
इडली डोश्याचे वाटलेले पीठ हे कसे वाटते बी?>> हो छान आहे स्मित एक नाव असायला हवे होते ह्याला मराठीत>>>
हेच नाव आहे रे सोन्या!
अमा, मी खूप खूपदा हे प्रयोग
अमा, मी खूप खूपदा हे प्रयोग करुन पाहिले आहे. कधी पिठ उत्तमरित्या आंबते तर कधी तिथल्या तिथच राहते. मला वाटत हे इथल्या पावसाळी हवेमुळे होत असेल पण रोज ब्रेफाला तमिळ लोक इडल्या आणतातच की. मग? आणि मला ते तेलकट धिरडी प्रकार आवडत नाही. माझ्याकडे दही देखील नीट विरजत नाही. पुर्वी हे सर्व यथासांग नीट नेटक व्हायच. हल्ली साडेसातिमुळे हेही जमेनास झाल आहे. मला माझे चकीत व्हायला होते की काही स्किल्स ह्या नष्ट होत नाहीत. स्वैपाक एक!
मी डोशासाठीचे वाटताना मेथ्या
मी डोशासाठीचे वाटताना मेथ्या भिजवून देखील घालते, भन्नाट दरवळ नि चव येते. बाहेर हे कुठेच मिळणार नाही.
पण वेळेला बाहेरून एखाद्यावेळेस घ्यायला हरकत नाही असेही वाटते, शेवटी डोसे, इडली शिजवून गरम गरमच खातो ना!
माझी घरमालकिण, एक वाटी
माझी घरमालकिण, एक वाटी भातसुद्धा घालते पिठ वाटताना. आधी गरम फळफळीत भात पाण्यात टाकते आणि तेच पाणी वाटताना वापरते. ती इथली स्थानिक पद्दत आहे म्हणाली.
ओल नारळ सुद्धा घालते. काळ भाग
ओल नारळ सुद्धा घालते. काळ भाग खरडवून टाकते.
इडल्यांचे नवीन प्रकार पण
इडल्यांचे नवीन प्रकार पण पाहिलेत मी. खरे तर पारंपरिकच आहेतः
१) मंगलोरच्या एका कलीगने मला गोड इडली खायला दिली होती. त्यात तिने गुळ घातला होता.
२) मटार, कोबी आणि गाजर घालतेली इडली सुद्धा इथे केली जाते.
३) हळदीच्या वा फणसाच्या पानातली इडली सुद्धा केली जाते.
४) मिनि इडल्या सुद्धा केल्यात जातात. त्याचे साचे वेगळे.
५) कोमला विलास मधे इडलीचा उपमा मिळतो.
डोशाचे तर अगणित प्रकार आहेत.
पीठ फार आंबले तरच डोसे तेल
पीठ फार आंबले तरच डोसे तेल पितात. नाहीतर अगदी कमी तेल लागते नॉन स्टिक वर तर नाही घातले तरी चालते. हैद्राबादेकडे चिरंजीवी चा फेवरिट असा स्टीम्ड दोसा मिळतो. उपमा घातलेला एम एल ए दोशा, आप्पम पेसरटू चिले तांदुळाचे घावने, रवादोसा असे विविध प्रकार आहेत जे पूर्ण घरीच करता येणे शक्य आहे.
गरम भाताने पीठ आंबायला मदत होते.
आमच्याकडे पुण्याचे एक म्हातारे काका भेटायला आले होते त्यांना इडल्या घरी केल्या आहेत हे सांगितल्यावर फार आस्चर्य वाटले. ते बिचारे पुण्यात राहूनही पार्सलच आणत. बायको धड खायला देत नसे. देव देवात अडकलेली असे. तेव्हा मला फारच वाइट वाटले होते. इट्स अ स्मॉल थिंग रिअली.
पूर्वी हैद्राबाद कडे मोलकरणी रुब्बुगुंड्यावर असे पीठ रुबवून (वाटून) देत असत. घरातच रुब्बुगुंडा बनवलेला असे दगडी. पुढे ग्राइंडर आले. दिवस बदलले तश्या पद्धती बदलत आहेत.
इथे अजूनही तमिळ लोक भारतातून
इथे अजूनही तमिळ लोक भारतातून तो इडलीचा दगडी खलबत्ता घेऊन येतात. केवढा मोठा असतो तो.
अमा तुम्हाला तेलुगु येते का बोलायला?
मस्त माहिती देताहात. धन्यवाद. अजुन लिहा ना प्लीज.
यु नो अमा.. आपल्याला ज्या
यु नो अमा.. आपल्याला ज्या गोष्टी क्षुल्लक आहेत.. ज्या जमतात त्या इतरांना मैलाचा दगड असू शकतात
बी, बाहेरून विक आणलेले पीठ
बी, बाहेरून विक आणलेले पीठ बरेचदा आंबलेले नसते. उलट त्यात सोडा घालतात. त्यामुळे ते जरा जपूनच. शिवाय त्यात उडीद डाळीचे प्रमाण फार कमी असते.
घरच्या घरी इडली डोश्याचे पीठ करणे फारसे कठीण नाही. आयत्यावेळी करता येत नाही आणि आधीपासून तयारी करून ठेवावी लागते हे मान्य. पण जर वेट ग्राईंडर असेल तर तासभर पीठ वाटत राहतें आपल्याला लक्ष पण द्यावे लागत नाही. मिक्सरमध्ये पीठ वाटत असशील तर भराभरा हाय स्पीडवर मिक्सर फिरवल्याने त्याचं भांडं आणि पीठ गरम होत असेल तर असे पीठ आंबणार नाही. म्हणून मिक्सर कमी स्पीडवर थोड्या थोड्या वेळानं फिरवायचा.
पीठ वाटून झालं की रात्रभर घट्ट झाकून ठेवून आंबवायचं आणि लगेच फ्रीझमध्ये ठेवायचं, नंतर आपल्याला हवं तेवढं बाहेर काढून घ्यायचं आणि तितकंच रूम टेम्पला आणून वापरायचं. पीठ उरलंच तर आधीच्या पीठात मिक्स कराय्चं नाही.
डोश्याला पीठ आंबलेले नसेल तर फारसा त्रास होत नाही. डोश्याच्याच पीठाचे गुंडपंगले उर्फ आप्पे पण करता येतात. त्याच पीठाच्या इडल्यासुद्धा होउ शकतात.
नॉनस्टिकच्या तव्यावर डोसा आरामत सुटून येतो. इडलीला जर इडल्या फुगत नाहीत असं वाटलं तर सरळ ढोकळा स्टँडला तेच पीठ लावून वाफवायचं आणि मग त्याचा इडली उपमा करायचा. तेही जमलं तर त्याच पीठाचे डोसा उत्तप्प करायचे. हाकानाका.
बी, मुंबईत चेंबूरला, दादरला
बी, मुंबईत चेंबूरला, दादरला अनेक ठिकाणी आपल्यासमोरच वाटत असतात. त्यातलेच ताजे पिठ पिशवीत देतात. पण त्याचे इडली, डोसे दुसर्या दिवशी करायचे असतात. लगेच करायचे असेल तर वेगळे देतात.
पण आमच्याकडे कधी आणत नाहीत. थोड्याच प्रमाणात करायचे असल्याने घरीच वाटतो आम्ही.
बाहेरचा ब्रेड चालतो तर इडलीचे
बाहेरचा ब्रेड चालतो तर इडलीचे पीठ का नाही?
डीविनिता, आमच्याकडे
डीविनिता, आमच्याकडे आठवड्यातून एकदा इडली/ डोसा/उत्तप्पा/गुंडपंगला असा प्रकार असतो. महिन्याला चार किलो डोसाराईस लागतो.
ब्रेड आणला तर महिन्यातून एकदा.
म्हणून ब्रेड बाहेरचा चालतो, इडली डोश्याचे पीठ नाही
अय्यो वनिता, नन्दिनीने कारण
अय्यो वनिता, नन्दिनीने कारण दिलेय की. ते बरोबरच आहे. थोडे कष्ट लागतील पण बाहेर १ किलो पीठ ३० ते ५० रुपये या दरात असते. त्याच्यात २० ते ३० च इडल्या होतात, पण तेच तेवढे घरी भिजवले की किती होतील अन्दाज बान्ध की गो.:फिदी::दिवा:
Pages