दिपावली शुभेच्छा

Submitted by प्रभा on 30 October, 2014 - 07:15

दिवाळी-शुभेच्छा---दिवाळी नंतर,
कारण भारत- जपान मधील अंतर.
दिवाळीलाच पोचलो जपानला,
बॅग मात्र दिल्ली एअर-पोर्टला.
प्रतिक्षेत उजाड्ली ता. २४-२५,
मिळतील ना बॅग-- जीव कासावीस.
अखेर एअर-इंडियाच विमान,
घेवुन आल सामान.
मनाची संपली घालमेल,
आता'' ऑल इज वेल..

उगवत्या सुर्याचा देश,
भिन्न भाषा-. भिन्न वेश.
अशा टोकिओ शहरात ,
मुलाचा निवास.
आनंदाची दिवाळी,
नातींचा सहवास
प्रकाशित पणत्यानी,
उजळला आसमंत,नाहिसा अंधार.
दु;खाला दुर सारुन,
उघडो सुख- सम्रुद्धीच दार.
हीच हार्दिक शुभेच्छा.
शुभ दिपावली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users