मला मुलगीच हवी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 06:24

मला मुलगीच हवी ..

......

सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे.
हो, त्याकाळी जेव्हा मला एक साधी गर्लफ्रेंडही नव्हती, (वा किमान होत्या त्या मैत्रीणींबाबत सिरीअस तरी नव्हतो) तेव्हाही कॉलेजमधील मित्रांशी चर्चा करताना, वा एकांतात बसून स्वत:च्या भविष्याचा विचार करताना मला असेच वाटायचे की येस्स, मला मुलगाच झाला पाहिजे.

......

एक काळ होता, (अर्थात आजही जिथे सुशिक्षितपणा किंबहुना त्यापेक्षाही सुसंस्कृतपणा आला नाही तिथे तो काळ अजूनही आहेच)

असो, तर एक काळ होता जेव्हा प्रत्येक मातापित्यांची अशी इच्छा असायची, आपले होणारे संतान, हि दुसर्‍याचे घर प्रकाशाने उजळवणारी ज्योती नसून एखादा आपल्याच अंगणात टिमटिमणारा दिपक असावा, आपल्या वंशाचा दिवा असावा. आणि या विचारामागे प्रामुख्याने आणि ढोबळमानाने खालील कारणे असायची :-

१) मुलगा म्हातारपणाची काठी असतो.

२) मुलगी लग्न करून सासरी जाते.

३) मुलगा हुंडा घेऊन येतो, तर मुलीला हुंडा द्यावा लागतो.

४) मुलगा घराण्याचा वारस असतो, तर आपला जमीन-जुमला जावयाला देण्याऐवजी मुलाकडेच जावा.

५) मुलगा आपला वंश आणि आपले नाव पुढच्या पिढीत नेतो.

६) मुलीची अब्रू जपणे हि एक जबाबदारी असते.

वगैरे वगैरे

.......

तर या कारणांची आजच्या जमान्यात साधारण अश्या प्रकारे वाट लागली आहे.

१) मुलगा म्हातारपणाची काठी मानले तरी तोच कधी लाठी मारून वृद्धाश्रमात हाकलवेल किंवा जबाबदारी घेण्यास नकार देईल हे सांगता येत नाही. जिथे दोन किंवा अधिक मुले असतात तिथे प्रॉपर्टीचे वाटे पडताना आपला हक्क कोणीही सोडत नाही, मात्र म्हातारपणी आईवडीलांचा सांभाळ करण्याचा कर्तव्य निभावायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करण्याची शक्यता असते. (आठवा चित्रपट बागबान) किंवा हल्ली पेंन्शन प्लॅन आणि त्याच्या ‘ना सर झुका है कभी, ना सर झुकायेंगे कभी" वगैरे जाहीराती यामुळेच बघायला मिळतात. थोडक्यात आपल्या म्हातारपणाची सोय आपली आपणच करायची आहे हा विचार रुजतोय.

२) मुलगी लग्न करून सासरी गेली तरी हल्लीच्या काळात ती कमावती आणि स्वतंत्र विचारांची असल्याने लग्नानंतरही ती आपल्या मातापित्यांच्या प्रती आपली जबाबदारी उचलू शकते. एकवेळ तिचा नवरा त्याच्या आईवडिलांना म्हणजे तिच्या सासू-सासर्‍यांना सोडून स्वतंत्र राहत असेल, पण मुलगी मात्र माहेरच्यांशी असलेली आपली नाळ कधीच तोडत नाही.

३) हुंडा वगैरे प्रकार हल्ली फारसे उरले नाहीयेत. लग्नाचा खर्चही बरेच ठिकाणी अर्धा अर्धा उचलला जातो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण हे याला पोषकच आहे.

४) आपल्यापाठी आपली प्रॉपर्टी मुलगा आणि सून उपभोगतेय की मुलगी आणि जावई याचा आता कोणी फारसा विचार करत नाही, कारण मुळात प्रॉपर्टी अशी काही सोडूनच जायची नसते. आपण उभारलेला उद्योगधंदा कोणाच्या हाती सोपवून जायचा असेल तर तो आजच्या जमान्यात मुलीही सुशिक्षित असल्याने त्यांच्याही हाती सोपवून जाता येतो. तसेच मुलगा नालायक निघाला तर नाईलाज होण्यापेक्षा कर्तबगार जावई शोधण्याचा पर्याय तरी आपल्या हातात उपलब्ध राहतो.

५) आपले नाव पुढच्या पिढीत जावे, आणि आपला वंश वाढावा या मरणोत्तर खुळचट आणि मनाला खोटा खोटा दिलासा देणार्‍या कल्पनांमधून बहुतांश समाज बाहेर आलाय. आपण मेल्यानंतरही आपले फेसबूक अकाऊंट या जगात तसेच राहणार आणि आपले नाव गूगलसर्च केल्यास ते सापडणार हे आजच्या पिढीला पुरेसे आहे.

६) या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाच्या जोडीनेच, याच समाजाच्या एका हिश्श्यात वाढीस लागलेली विकृत मानसिकता पाहता दुर्दैवाने शिशू वयात मुलांचा सांभाळ हे सुद्धा मुलींइतकेच जबाबदारीचे काम झाले आहे.

वगैरे वगैरे

.......

असो, तर मी देखील या बदललेल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचा भाग आणि तश्याच आधुनिक विचारांचा असलो, तरीही मला मात्र मुलगाच हवा होता. यामागे कुठलेही संकुचित विचार नसून मला माझ्या मुलामध्ये स्वत:ला बघायचे होते. आयुष्यात मला जे आजवर बनता आले नाही, वा पुढेही बनता येणार नाही, ते माझ्या मुलाने बनावे अशी माझी सुप्त इच्छा होती. अर्थात, कोणतीही जबरदस्ती नाही, तर त्याच्या मर्जीनेच. मला आयुष्यात जी मौजमजा करता आली नाही ती त्याने करावी आणि मी त्यात मला बघावे. अगदी डिडीएलजेमधील अनुपम खेर सारखे मला माझ्या मुलाला सांगायचे होते, "मैने तो अपनी सारी जिंदगी ऐसेही यहा वहा टुक्कार पोस्ट डालने मे बिता दी बेटा, लेकीन तू जी ले अपने मर्जी की झिंदगी, मै समझूंगा मैने अपनी जिंदगी जी ली" .. आणि एवढेच नव्हे तर मला माझ्या मुलाचे नाव ‘आर्यन’ ठेवायचे आहे, असेही मी त्यावेळीच फायनल केले होते. मला माझा मुलगा माझा बेस्ट बडी म्हणून तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला होता..

वगैरे वगैरे

.......

पण आज ३० ऑक्टोबर २०१४ उजाडता उजाडता ... मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!
आता याची कारणे काही अश्याप्रकारे,

१) आजवर मला माझ्या आईने मोठ्या लाडात वाढवले. मला काहीही काम करू न देता सारे काही आयते दिले. अगदी च् म्हटले की चहाचा कप हातात. जिथे आई कमी पडली तिथे ती कसर ताई माई अक्कांनी पुर्ण केली. बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार. मॉरल ऑफ द स्टोरी - ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते आणि पुरुषांची ऐश मौज मजा सारे काही होते. खास करून माझ्यासारख्या आळशी पुरुषांची जरा जास्तच.

२) स्वत: मुलगा असल्याने आणि आसपासचे मुलांचे जग पाहिल्याच्या अनुभवावरून सांगू शकतो, मुलगा एका ठराविक वयाचा झाला की तो त्याच्या समवयीन मित्रमंडळींमध्येच जास्त रमतो आणि एका वयानंतर तर जेवायला आणि झोपायलाच घरी येतो. मुलीसाठी मात्र तिचे कुटुंब हे सुद्धा तिचे एक मित्रमंडळच असते, किंबहुना सर्वात आवडीचे असे. साधी पिकनिक काढायची म्हटले तरी मुलगा आपल्या मित्रांबरोबर जाणे पसंद करेन, पण मुलगी मात्र फॅमिली पिकनिकलाच पहिले प्राधान्य देईल. फेसबूकावरही मुलांपेक्षा मुलींचेच सहकुटुंब पिकनिकला गेलेल्याचे फोटो जास्त अपलोड होताना दिसतात हा याचा पुरावाही म्हणू शकता.

३) मला स्वत:ला नटण्याची, नीटनेटके राहण्याची आणि छान छान फोटो काढण्याची, काढून घेण्याची जरा जास्तच आवड आहे. हि आवड मुलापेक्षा मुलीबरोबर जास्त चांगल्या प्रकारे जपता येईल असे मला वाटते कारण मुलांच्या तुलनेत मुलीला विविध प्रकारचे ड्रेसेस आणि अलंकारांनी छानपैकी नटवता येते.

४) वडील आणि मुलाचे नाते हे जरासे कॉम्प्लिकेटेड असते. ते योग्य प्रकारे जमले तर ठिक अन्यथा समजे उलगडेपर्यंय आयुष्यातील एक काळ निघून जातो. पण मुलगी हि लहानपणापासूनच अगदी शेवटपर्यंत, सहजगत्या आणि नैसर्गिकरीत्या, वडिलांशी भावनिकरीत्या खूप चांगली जोडली जाते, वडिलांची लाडकी लेक होते.

वगैरे वगैरे

.........

अर्थात हि माझे मते आहेत. माझ्या अनुभवांवरून आणि त्या अनुभवांच्या आकलनावरून बनवली आहे. बहुतांश बाबतीत, बहुतांश जणांनी, एकमत व्हायला हरकत नसावी. तरीही न पटल्यास, धागा चर्चेला खुला आहे. चॉईस इझ युअर्स, पण मला मात्र बाबा मुलगीच हवी Happy

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्ड्या चा पासवर्ड त्याचा मालक विसरलाय म्हणे Wink

चेसुगु हे त्यांपैकी कोणीच नाहीत.
हे ऑर्कुट किंग आहेत आणि यांचे ऑर्कुट बाह्य संबंध म्हणजे माबोच फक्त Wink

<<ऐकूणातच महान आहे हे.>>> +१११११११
<<स्वाती हे प्रकरण तोंडदेखलं मॉर्डन दिसतंञ. सगळॅ स्पेक जुने बाबा आदमच्या काळातलं दिसतं. नुस्ताच पालथा, वाजणारा घडा.>> +११ खरच . काय हे ? असोच Happy

पण एक मात्र आहे ऋन्मेष चा धागा बघितला कि वाचला जातोच . दुर्लक्ष केल जात नाही. एकदम फ्रेश व्हायला होत धागा आणि प्रतिसाद वाचल्यावर . तेवढीच बोअर झाल्यावर टुकटुकी Happy

रीया आणि स्पार्टाकस आपण यांच्याविषयीच विधान करत आहात का?
http://www.maayboli.com/node/49690

Satish Deopurkar
09822784961

हे तर अतिशय ज्येष्ठ नागरिक आहेत असे दिसते. त्यांनी दिलेला संपर्क क्रमांक ट्रूकॉलरवर तपासून पाहिला आणि त्यांचे नाव देखील फेसबुकवर टाकून प्रोफाईल तपासले असता दिसणार्‍या छायाचित्रांवरून त्यांचे वय फारच जास्त असल्याचे जाणवते.

त्यांच्या गझलांखाली असलेल्या प्रतिक्रिया वाचल्यावर त्यांचे वय पाहता त्यांच्यासोबत मायबोली वर घडलेला प्रकार (त्यांची त्यात चूक नसेल / असेल तरीही) खेदजनक वाटतो. असे कुणाही सदस्यासोबत होऊ नये हीच ईच्छा.

रीया,

<< चेसुगु हे त्यांपैकी कोणीच नाहीत. >>

आता यात तुम्ही मला कशाला ओढताय?

<<हे ऑर्कुट किंग आहेत आणि यांचे ऑर्कुट बाह्य संबंध म्हणजे माबोच फक्त>>

स्वतःच्या संपुर्ण नावाने मी अनेक ठिकाणी सभासद आहे. इतर नावांनी कुठेच नाही.

अहो चेतन,रिया तुम्हाला उद्देशुन सान्गतेय की ऋन्मेष फेसबुकावर तुम्ही लिहीलेल्या पैकी नाहीये. ती तुम्ही या पैकी कुणी नाही असे नाही सान्गत आहे.

रीया,चेसुगु च्या पुढे एक स्वल्पविराम काढ. नाहीतर या वाक्याचा अर्थं बदलतो.

women without her man is nothing

या वाक्यात विरामचिह्नांच्या जागा बदलल्या तर अर्थं बदलतो हे प्रसिद्ध उदाहरण वाचलंच असशील.

आणि हो, चेसुगु न लिहिता सरळ पूर्ण नाव लिही(कितीही वेळ लागला तरी चालेल.). त्यांना शॉर्टफॉर्म आवडत नाही.

धन्यवाद रश्मी आणि डॉ. साती,

<< रीया,चेसुगु च्या पुढे एक स्वल्पविराम काढ. नाहीतर या वाक्याचा अर्थं बदलतो. >>

अगदी, अगदी. या स्वल्पविरामाच्या अभावामुळे रीया माझ्यासोबत नसून माझ्याविषयी बोलताहेत असाच माझा गैरसमज झाला.

<< आणि हो, चेसुगु न लिहिता सरळ पूर्ण नाव लिही(कितीही वेळ लागला तरी चालेल.). त्यांना शॉर्टफॉर्म आवडत नाही. >>

यू आर राईट वन्स अगेन, वेळ तरी का लागेल म्हणा, सरळ कॉपी पेस्ट करावे की. पूर्ण नाव न लिहीता चेतन लिहीलं तरी चालेल त्यातही तीनच अक्षरं आहेत की नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव यातलं प्रत्येकी पहिलं अक्षरी घेण्यापेक्षा ते चांगलंच की...

रीया, गैरसमजाबद्दल दिलगीर आहे.

रुन्मेष, अंडया आणि तुमचा_अभिषेक हे आयडी सिमिलर विचारांचे आहेत. त्यांचा बोलवता धनी एक आहे की नाही हे मात्र माहीत नाही. निदान त्यांनी तरी 'मीच तो' असं मान्य केलेलं नाही.
सो वेगवेगळे लोक असू शकतील Happy

ऋन्मेष हा आयडी किरण (आणि त्यांचेही बरेच डुआय) यांचा असावा असा बर्‍याच दिवसांपासूनच डाऊट आहे.

काही मुद्दे पटले नसले तरी एकंदरीत लेख आवडला. सध्याच्या स्त्रीभ्रूण हत्या होण्याच्या काळात एखादी व्यक्ती मुलगी व्हावी अशी आशा करते हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
>>>>
धन्यवाद पगारे,
पण तरीही, 'मुलगी व्हावी अशी अपेक्षा असणे', निव्वळ इतकीच बाब कौतुकास्पद व्हावी हे एका अर्थी आपले समाजाचे दुर्दैवच आहे. म्हणून आपला आदर राखून सांगतो हे कौतुक नकोच.
मुलगीच का व्हावी याबाबत योग्य ती कारणे असणेही तितकेच गरजेचे आहे, मी माझ्या मनाशी प्रामाणिक राहून ती दिली आहेतच, ती कोणाला पटली नाहीत तरी त्यांच्याही वैयक्तिक मताचा आदर आहेच, पण अर्थातच त्यावर माझेही मत व्यक्त करू इच्छितो.

...
जगातला कोणताही स्वयंपाकी आईच्या हातच्या जेवणाची सर देऊ शकत नाही. >>>>>
>> अत्यन्त घातक विचारसरणी . आईनेच कायम स्वयंपाकघरात(च) राबले पाहिजे याचे हे ग्लोरिफिकेशन.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आईच्या हातचे जेवण हा वाक्यप्रचार या जगात मीच सर्वप्रथम शोधला की काय आणि त्याला कशाची सर नाही वगैरे शोध मीच लावला की काय अशी शंका आली मला हे वाचून. पुराणकाळापासून कित्येकांनी किंबहुना सर्वांनीच हे मान्य केले असेल. त्यामुळे तथाकथित ग्लोरिफिकेशन करण्याचा बहुमान मला नको. इथे मी नक्कीच जाओ पैले उस आदमी की साईन लेके आओ असे म्हणू शकतो. Happy

(तळटीप - याच धर्तीवर "श्यामची आई" या सानेगुरूजींच्या पुस्तकावरही आक्षेप घेता येईल. श्यामची आईच का? श्यामचे बाबा का नाही? मुलांना संस्कार लावायचे काम आईचेच आहे म्हणत स्त्रीला ‘चूल आणि मूल’ यांमध्येच अडकवण्याचा हा प्रकार नाही वाटत?)

असो, यात स्वयंपाकघरात(च) राबले पाहिजे यातला राबले हा शब्द किंचित खटकला. एखादी स्त्री आपल्या मुलांसाठी स्वयंपाकघरात काहीतरी करते तेव्हा तिला पोरांना काहीतरी करून खायला घालायचा आनंद नक्कीच मिळत असावा. यात राबल्यासारखे कोण्या स्त्रीला वाटत असेल तर त्याला तशीच पार्श्वभूमी असावी, म्हणजे इच्छेच्या विरुद्ध स्वयंपाकघरात बंदिस्त करत तेच आणि तेच करायला लावणे वगैरे. म्हणून यातल्या स्वयंपाकघरात(च) मधील "च" वर मी तरी नक्कीच आक्षेप घेईन कारण माझ्या बाबतीत तरी माझी आई नोकरी करणारी आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.

वर एकाने म्हटले,
>>>>आणि समजा त्या स्त्रिया सकाळी ८ ते रात्री ८ काम करणार्‍या , स्वयपाकी ठेवून आयते खाणार्‍या असतील तर मग येइल का हो घरपण ? स्वतःलाच विचारा हे !!
>>>>>>>>
हे विचारले मी स्वत:ला आणि मला उत्तर मिळाले ते असे,
माया, ममता, वात्सल्य वगैरे (शब्दकोष माझा कमी आहे, भावना लक्षात घ्या) हे निसर्गानेच स्त्रीला बहाल केलेल्या देणग्या आहेत आणि त्या तिच्याबरोबर जगाच्या अंतापर्यंत राहणार हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे बाकी सर्व गुण-अवगुण कॉन्स्टंट ठेवले तर यांच्या जीवावर मुलगा-मुलगी मध्ये एक मुलगीच घराला घरपण जास्त योग्य प्रकारे आणू शकते.
आणि म्हणून मला मुलगीच हवी Happy

अरे बाबा ऋन्मेष, श्यामची आई कश्शाला वाचतोस अजून? जरा जाऊन तो "जाने तू या जाने ना" बघून ये. तो इम्रान खान आणि रत्ना शाह कसे मस्त टर्न लावून सैपाक करतात. मग लगोलग पोहे टाक आणि तुझी नोकरी करणारी आई कशी अभिमानाने बिल्डींग मध्ये मिरवेल!!

सीमंतिनी,
अहो पण मला काही पदार्थच बनवता येतात. जसे की प्लेन मॅगी, रेडीमेड सूप, अंड्याचे हाल्फफ्राय, अंड्याचेच फुल्लफ्राय, आईने कांदा कापून दिला तर अंड्याची भुर्जी, ब्रेडटोस्ट वगैरे यांसारखे स्नॅक्स तसेच ताक, कॉफी सारखी पेये बनवता येतात.
अर्थात याउपर काही बनवायला शिकलो आणि आईला किंवा घरच्यांना बनवून खाऊ घातले तरी तो त्यांच्यावरच अत्याचार असेल.

साधे चहाचे घ्यायचे झाल्यास, आई हजारदा माप सांगते, बरेचदा काय किती घ्यायचे हे मी तिलाच दाखवून ठरवतो, अगदी गॅस बंद कधी करायचा हे पण तिलाच विचारतो तरी ती चव येत नाही. मग कसे होणार ..

म्हणून एखादा पदार्थ उदाहरणार्थ पोहेच माझ्यापेक्षा माझी आई दहापटीने चांगली बनवत असेल तर तिचा त्रास वाचवायला मी तो बनवून तिच्यासह इतरांना तो खायचा त्रास देण्यापेक्षा त्यासाठी लागणारे कच्चे पोहे, कांदा, लिंबू वगैरे मार्केटमधून आणून देण्याचे काम मी करून, जमल्यास नेहमीप्रमाणेच ताट-वाटी-पाणी घेऊन त्या पद्धतीने आईचा (आणि सर्व खाणार्‍यांचाही) त्रास वाचवणे योग्य ना.

तरी या उपर वर सांगितलेले जे पदार्थ मला जमतात (भले खूपच साधी आणि छोटी लिस्ट असेल पण), त्यातील काही जसे की मॅगी, सूप, ताक, कॉफी वगैरे आमच्या घरात एक्कूण एक वेळी सर्वांसाठी मीच करतो. याउपर मी तिला पुर्ण जेवणातून आराम बाहेरून ऑर्डर करूनच देऊ शकतो. इति लेखनसीमा! तुर्तास! शुभरात्री Happy

अर्थात याउपर काही बनवायला शिकलो आणि आईला किंवा घरच्यांना बनवून खाऊ घातले तरी तो त्यांच्यावरच अत्याचार असेल.

साधे चहाचे घ्यायचे झाल्यास, आई हजारदा माप सांगते, बरेचदा काय किती घ्यायचे हे मी तिलाच दाखवून ठरवतो, अगदी गॅस बंद कधी करायचा हे पण तिलाच विचारतो तरी ती चव येत नाही. मग कसे होणार ..

>>>>>> लाडातच आले की लाडोबा Lol
कुऋ, महान आहेस! एवढा मोठा घोडा झालास तरी अजून स्वयंपाक येत नाही अन ते कौतुकाने सांगतोस कसला इथे ?!! Happy

वरची पोस्ट आवडली. आता कसं! विचार करुन लिहिताय हे गरजेचं त्यासाठी जवळपास शंभर पोस्ट पडाव्या लागल्या . घरी मदत करताय ते ठिक ,त्यासाठी अधिक हा उत्तम लेख http://www.maayboli.com/node/50462 परत एकदा नजरेखालुन घाला अगदी सगळ्याच गोष्टी नव्हे पण काही गोष्टी तुम्ही करुच शकता.
घरच्यांवर अत्याचार असला तरी प्रयत्न चालु ठेवा. आहारशास्त्र पाककॄतीमधे तुमचा एखादी (चांगली )रेसिपी आली तर स्वागतच आहे. Happy Happy
शुभरात्री

<<लाडातच आले की लाडोबा>>खरच.लाडू लाडू दिसतोय आईचा. लाडू लाडू तुला किती पेढे वाढू Happy
ऋन्मेऽऽष तुझ्या गर्ल्फ्रेड ला माहिती आहे ना तुला किती काय आणि काय काय करता येत ते ?
मग तुझा संसार सुखाचा होईल आणि तुला मुलगीच होईल Happy

सिरीयसली म हा न आहेस!! अरे मुलगी हवीच असे मत असेल तर ते निदान योग्य कारणासाठी ते मत ठेव की - "सध्या समाजात मुलगी वाढवताना अनेक समस्यांना पालकांना सामोरे जावे लागते. त्या समस्या मी योग्य प्रकारे हाताळू शकेन आणि मुलीला वाढायला योग्य वातावरण देवू शकेन." अशा पद्धतीच काही लिही की...

रश्मी, तुझा प्रश्न जाम जेन्युईन आहे! Happy

अर्र असे नको - हेतू प्रामाणिकपणे मांडायचा धीटपणा आहे त्याच्याकडे तो कायम राहावाच. पण हेतू चांगला कुठला, वाईट कुठला हे समजण्याचा विवेक मिळावा एवढीच शुभेच्छा!

त्यांनी स्वतःच स्वतःला आळशी म्हटलंय ना? म्हणजे विवेक आहेच की.
बाकी तो परिच्छेद वाचताना मला श्रीबाळाची आठवण आली. आता हे श्रीबाळ आपल्याला अपत्यच नको असा विचार (लग्नानंतर) आपल्या बायकोला सांगतोय, याचं कारण आजकालची परिस्थिती टाइप, सामाजिकच नाही, अगदी वैश्विक इ. (नक्की कारण लक्षात राहिलं नाही ते बरंच झालं. पण त्याला पर्यावरणाबिरणाची फार चिंता आहे, त्याच्याशीच संबंधित होतं. तर विश्वाची चिंता कररून आपल्याला मूलच नको म्हणणारा श्रीबाळ. आणि आता मुलीला वाढवताना, समाजासमोर आदर्श घालून द्यायची जबाबदारी ऋन्मेऽऽषवर.

<< आता हे श्रीबाळ आपल्याला अपत्यच नको असा विचार (लग्नानंतर) आपल्या बायकोला सांगतोय, >>
अरेच्चा! म्हणून याची बायको आईआज्जींची प्रायवसी भंग करतेय का रात्रीची?

अरे मुलगी हवीच असे मत असेल तर ते निदान योग्य कारणासाठी ते मत ठेव की - "सध्या समाजात मुलगी वाढवताना अनेक समस्यांना पालकांना सामोरे जावे लागते. त्या समस्या मी योग्य प्रकारे हाताळू शकेन आणि मुलीला वाढायला योग्य वातावरण देवू शकेन." अशा पद्धतीच काही लिही की...
>>>>>
अरे तुम्ही जे म्हणत आहात त्याची कल्पना मला आहेच आणि ती जबाबदारी घ्यायचा विश्वास आहेच. अर्थात अनुभव येईल तेव्हाच ती जबाबदारी नेमकी काय किती हे समजेल. पण जेवढे आजच्या तारखेला माहीत आहे त्यानुसार तरी ठामपणे येस्स म्हणू शकतो.
जर मला त्या समस्यांना पाठ दाखवायची असती तर मला मुलगी नकोच म्हणत हा लेख कधी जन्मलाच नसता. त्यामुळे ते आहेच आणि माझा लेख त्याच्यानंतर सुरू होतोय. Happy

मैत्रेयी,
मी घोडा झालो असे आपल्याला वाटत असले तरी आईसाठी मी अजून गाढवच आहे. त्यामुळे थोडे लाड करून घ्यायचा हक्क आहे Happy

सुजा,
येस्स माहीत आहेच माझ्या ग’फ्रेंडला सारे. त्याचबरोबर तिला माझे इतर गुणही माहीत आहेच, जे मी सारेच इथे सांगत नाही इतकेच. त्यामुळे इथे कोणालाही कितीही शंका आली तर त्यांच्या जीवावर आमचा संसार सुखाचाच होणार Happy

ऋन्मेऽऽष नक्कीच तुझा संसार सुखाचा होईल. काही म्हणा मुलीच्या जबाबदारीचा अनुभव घेण्यासाठी तरी तुला मुलगीच होणार गड्या ( का आईच्या गाढवा ? Happy अर्थात हलकेच घेणे )

पण काही म्हण ह ऋन्मेऽऽष तुझ्या पुढच्या धाग्याची वाट बघतेय. निदान मी तरी Happy

ऋन्मेष हा आयडी किरण (आणि त्यांचेही बरेच डुआय) यांचा असावा असा बर्‍याच दिवसांपासूनच डाऊट आहे.
>>
No you are wrong!
He is not Kiran Happy

सध्या रुन्मेष ला 'मुलगी हवी' या एका विषयावरच विचार करु दयावा. त्यात तो याचा त्याचा डू आय आहे किंवा कसे यावरची चर्चा थांबवावी. किती तो त्याला त्रास द्यायचा? आय डी संदर्भात चर्चा करण्यासाठी वेगळा बाफ उघडण्यात येइल.

वत्सला,
त्यांना तो वाद घालू द्या.

लहानपणी वर्तमानपत्राच्या पुरवणीत आणि मोठे झाल्यावर व्हॉटसअ‍ॅपवर मी एक बोधकथा वाचली होती. एक राजा पंडीताच्या मुलाला रोजच एक सोन्याचे नाणे आणि एक चांदीचे नाणे द्यायचा. आणि तो मुलगा मुर्खपणाने सोन्याचे नाणे सोडून चांदीचे नाणे उचलायचा. पंडिताने जेव्हा आपल्या मुलाला तो असे मुर्खासारखे का वागतोस असे विचारले तेव्हा तो म्हणाला जेव्हा मी सोन्याचे नाणे उचलेन तेव्हा हा खेळ खल्लास!

बस्स त्याच प्रमाणे इथे जे ड्यू आयडीच्या चर्चेअंतर्गत हजारो नावे घेत आहेत त्यापैकी अमुक तमुक आयडी माझाच किंवा अमुकतमुक मी नाहीच असे म्हणत प्रत्युत्तर करायला सुरुवात करेन तेव्हा हा खेळ खल्लास! आणि मला हा खेळ असाच चालू हवाय. आणि याची कारणे तीन. पण मी ती सांगणार नाही, अन्यथा पुन्हा हा खेळ खल्लास! Happy

आम्हाला ती कारणे म्हाईत आहेत Proud
सध्या आमच्याकडे फुकट घालवायलावेळ आहे म्ह्णून घालवतोय. नंतर आम्हाला काम आलं की तसंही कोण विचारणारेय तुम्हाला? Wink
काय अनुतै? Wink

Pages