Interstellar - ख्रिस्तोफर नोलेनचा नवा चित्रपट

Submitted by मामी on 14 October, 2014 - 00:16

स्पॉइलर अॅलर्ट! स्पॉइलर अॅलर्ट!! स्पॉइलर अॅलर्ट!!!

सिनेमा अजून रिलिज झालाच नाही तर स्पॉइलर अॅलर्ट देण्याची काय गरज? असा प्रश्न तुम्हाला पडला तर हिंपुटी होण्याचे कारण नाही. स्पॉइलर अ‍ॅलर्ट देण्याचे कारण आहे ते जाणून घ्या....

मी ख्रोस्तोफर नोलेन नाही हे तुमच्यातल्या बहुतेक जणांना ठाऊक असेलच. त्यामुळे नोलेनसाहेब सिनेमात नक्की काय काय दाखवणार हे मला माहित नाही. पण तरीही आणि त्यामुळे या स्पॉइलर अॅलर्ट ची गरज आहे. कारण सिनेमा बघण्याआधी काही व्यक्तींना त्याबद्दलचं काहीच वाचायला आवडत नाही. कोर्‍या पाटीवरच अक्षरं उमटवायला आवडतात. तर त्यांनी कृपया या धाग्याकडे वळू नये. म्हणजे अॅक्च्युअली हे वाचत असाल तर वळलेले आहातच. पण मग पुढे जाऊ नका. घुमजाव .... एक..दो..एक..दो..एक..दो....

********************************************************************************************************

तर, ५ नोव्हेंबरला ख्रिस्तोफर नोलेनचा हा नवा सिनेमा - Interstellar - येऊ घातलाय. नोलेनच्या टोपीतली पिसं पाहिली तर हे नवे पिसही किती चमकदार असेल याची कल्पना करता येईल.

विज्ञानात वर्महोल (wormhole) ची संकल्पना मांडली गेली आहे. अंतरीक्षप्रवासातील महाप्रचंड अंतरे कापण्यासाठी जो मानवी आवाक्याबाहेरचा वेळ लागतो तो कमी करण्यासाठी असे बोगदे अस्तित्वात असू शकतील अशी एक शक्यता वर्तवली गेली आहे. वर्महोलच्या एका टोकानं निघालं की शॉर्टकटनं जगड्व्याळ पसरलेल्या अंतरीक्षातील काळाच्या दुसर्‍या कोणत्यातरी बिंदूला बाहेर निघता येईल अशी ढोबळ कल्पना आहे. ही वर्महोलची कल्पना हा Interstellar चा मुख्य गाभा.

या चित्रपटाची मूळ संकल्पना निर्माती लिडिया ओब्स्ट आणि भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ किप थॉर्न यांची आहे. या दोघांनी हा मूळ ढाचा २००६ सालीच बांधला होता. त्यानंतर २००७ साली ख्रिस्तोफरचा भाऊ जोनाथन नोलनने चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिण्यास सुरूवात केली. चित्रपट दिग्दर्शक म्हणून सर्वात आधी स्टिव्हन स्पिलबर्गचा विचार होता. मात्र पुढची काही वर्षे निव्वळ कथाबांधणीतच गेली. काही घडामोडी झाल्या आणि....

आणि जानेवारी २०१३ ला ख्रिस्तोफर नोलेन या चित्रपटाच्या टीममध्ये दाखल झाला - दिग्दर्शक म्हणून!!!

जोनाथननं लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये ख्रोस्तोफरनं काही बदल केले. जोनाथननं भविष्यातील हताश, हरलेलं जग मांडलं होतं. पृथ्वीवरची सगळी साधनसंपत्ती संपून गेली आहे आणि मानवाची जगण्याची शेवटची धडपड सुरू आहे अशा खिन्न पार्श्वभूमीवर चित्रपट बेतला आहे. ती पार्श्वभूमी तशीच ठेऊन पुढच्या कथेत काही बदल ख्रोस्तोफरनं केले. म्हणजे चित्रपटाची कथा ही या दोन बंधूंनी मिळून बांधली आहे.

या भविष्यकालीन जगातील जगण्याच्या सगळ्या आशाच आटून गेल्या आहेत. सर्व देशांतील सरकारे आणि अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत. अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचा भयानक तुडवडा आहे आणि मानवाची जगण्यासाठीची शेवटची धडपड सुरू आहे. अशा या विदारक आणि उद्विग्न करून सोडणार्‍या काळोख्या पार्श्वभूमीवर अचानक एक क्षीण प्रकाशकिरण दिसतो. अंतराळात वर्महोल आहे ही बातमी नासाला लागते.

खरंतर नासा ही अमेरीकेतील अंतराळ संशोधन करणारी संस्थाही जवळजवळ बंदच पडली आहे. पण अचानक त्याचवेळी अंतराळात कुठेतरी स्पेसटाईममध्ये एक भगदाड पडतं आणि ही बातमी (उरल्यासुरल्या) नासाला लागते. काहीजण मिळून एक शोधमोहीम आखतात आणि मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या आणि जोखमीच्या मोहिमेचा प्रारंभ होतो. या वर्महोलद्वारे जाऊन दुसर्‍या एखाद्या आकाशगंगेतील ग्रहावर मानवी वस्तीस सुरूवात करता येईल काय शोध घेण्यास ही टीम निघते.

अन् सुरू होते शेवटची निर्णायक लढाई!
मानवजातीला अंधार्‍या गर्तेतून ओढून पुन्हा एकदा उज्ज्वल भविष्य दाखवण्याची धडपड!!
काळाविरुद्ध काळाचाच उपयोग करून जीवन जिंकण्याची जीवघेणी लढाई!!!

*********************************************************************************************************

सिनेमातील स्टारकास्ट आहे : Matthew McConaughey, Anne Hathaway, Jessica Chastain, Michael Caine, Bill Irwin वगैरे.

मॅथ्यू आणि अ‍ॅनी यांची स्टारकास्ट कितपत योग्य आहे याची मला जरा शंका आहे. आणि ते चित्रपट पाहूनच कळेल. पण इन्सेप्शनमधला लिओनार्डो विसरू म्हणता विसरला जात नाही हे सत्य आहे. ऐकूणच इन्सेपशनचा जबरदस्त इंपॅक्ट हा सिनेमा कितपत घालवू शकेल हे बघायचंय. I am keeping my fingers crossed.

सिनेमाची ट्रेलर्स इथे बघता येतील :
http://www.youtube.com/results?search_query=interstellar+trailers

संदर्भ :
विकीपिडीया आणि या चित्रपटाविषयक इतर साईटस.

महत्त्वाची सुचना :
हा सिनेमा आयमॅक्स थिएटरात बघायला मिळाल्यास सोनेपे सुहागा अनुभव ठरेल. ते जमवाच मंडळी!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी....

तुमच्या लेखातील ख्रिस्तोफर नोलनविषयी लिहिले गेलेले "...नवे पिसही किती चमकदार असेल..." हे वाक्य त्या विलक्षण प्रतिभेच्या दिग्दर्शकाविषयी सर्व काही सांगून जाते....आणि ते किती योग्य आहे ते केवळ पाहाण्यासाठी त्याच्या चित्रपटांची यादी जरी समोर आणली तर आज नोलन हे नाव हॉलिवूडच्या क्षेत्रात काय मोलाचे ठरत आहे याची कल्पना येऊ शकते.

"इंटरस्टेलर" विषयी खूप वाचले आहेच. ट्रेलर्सवरून कदाचित "२००४ स्पेस ओडेसी...." धर्तीचा चित्रपट असण्याची शक्यता दर्शक वर्तवेल पण जेव्हा नोलनसारखा दिग्दर्शक स्पेस हा विषय हाती घेतो त्यावेळी निश्चित उत्सुकता वाटून राहते त्याच्या हाताळणीची. मेमेन्टो आणि इन्सेप्शनच्या वेळी मला वाटले होते की नोलन दिग्दर्शनाचा ऑस्कर पुतळा घेणार. पण त्यावेळी ते हुकले असले तरी त्याची कर्तबगारी इतकी बहरत चालली आहे की तोही दिवस दूर नाही.

"इंटरस्टेलर" चा नायक मॅथ्यू मॅककोनी (असाच उच्चार ऐकला होता त्याच्या नावाचा ऑस्कर वितरणावेळी) याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त केला आहेच. नोलनसमवेत या चित्रपटात त्याला पाहाणे एक आनंदाची घटना सिद्ध होईल.

फार आनंद झाला या लेखामुळे.

मेमेन्टो आणि इन्सेप्शनच्या वेळी मला वाटले होते की नोलन दिग्दर्शनाचा ऑस्कर पुतळा घेणार. पण त्यावेळी ते हुकले असले तरी त्याची कर्तबगारी इतकी बहरत चालली आहे की तोही दिवस दूर नाही. >>> आमेन! Happy

मामी, मस्तं लिहिलंय!

आयमॅक्समध्येच बघणार. थ्री डी असता तर आणखी मजा!

मामी, मस्त लिहिलंय.
स्पॉइलर स्पॉइलर करून वाचू नये असा विचार मनात आला, पण अर्थात राहवलं नाही. बघण्याच्या प्रतिक्षेत.

>>"इंटरस्टेलर" चा नायक मॅथ्यू मॅककोनी (असाच उच्चार ऐकला होता त्याच्या नावाचा ऑस्कर वितरणावेळी) <<
मॅथ्यु मॅकानहे असा उच्चार आहे.

मेमेन्टो आणि इन्सेप्शनच्या वेळी मला वाटले होते की नोलन दिग्दर्शनाचा ऑस्कर पुतळा घेणार. पण त्यावेळी ते हुकले असले तरी त्याची कर्तबगारी इतकी बहरत चालली आहे की तोही दिवस दूर नाही. >> सायन्स फिक्शन कैक आले आणि कैक गेले, ऑस्कर कमिटी ह्या चित्रपटांच्या भव्यतेने दिपून न जाता अजूनही चित्रपटाच्या ईतर मुल्यांना जास्त वेटेज देते जे खूप चांगले आहे.
आजही गॉडफादर किंवा शॉशँक रिडेंप्शन ( Sad ) , फॉरेस्ट गम्प, सारखे सिनेमे अवतार, ईन्सेप्शन, ग्राविटीच्या शी ऑस्कर साठीच्या रेसमध्ये असतील तर अवतार, ईन्सेप्शन, ग्राविटीसाठी २०% लोकंही मत देणार नाहीत.
पुरस्काराचा ईतिहास बघता टायटॅनिक आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज ह्या लिमिटेड ग्राफिक कंटेंट असल्येल्या चित्रपटांनाच आजवर यश मिळाले आहे.
कमिटीचा अजून एक आवडता विषय म्हणजे 'युद्ध', ढिगाने युद्धावरचे सिनेमे सापडतील ऑस्कर मिळालेले.
ग्लॅडिएटर, ब्रेवहार्ट पासून ते शिंडलर्स लिस्ट ते हर्ट लॉकर असंख्य.

सेविंग प्रायवेट रायन सोडून शेक्स्पिअयर ईन लव Uhoh . ऑस्कर डिझास्टर्स ची एक लिस्ट केली पाहिजे.

मान्य आहे नोलॅन चे व्हित्रपट वेगळे, मेंदुला अपील करणारे, (देवाने रोहित शेट्टी आणि साजिद खान लोकांच्या ८०% मेंदुचा भाग कमी करून तो नॉलॅनला दिला असवा) भव्यदिव्य आणि प्रेक्षणीय असतातच (मीही त्याचा खूप मोठा चाहता आहेच) पण ऑस्कर? - अवघड आहे. त्यासाठी नोलॅनला माणसांच्या जगात यावं लागेल.

तर्काच्या पातळ्या ताणणारे,उलटसुलट करणारे दिद्गर्शक म्हणून मला 'नोलन' आणि 'वाचोस्की ब्रदर्स'(?) हे दोन्हीही आवडतात. वाचोस्कींच्या 'क्लाऊड अटलस' ला ऑस्कर नाही मिळालं तेंव्हा मला काहीसं वाईट वाटलं होतं. नोलनच्या Interstellar प्रमाणेच भविष्यकाळ तपासणारा वाचोस्की ब्रदर्स चा Jupiter Ascending हा सायन्स फिक्शन पुढच्या वर्षीच्या सहा फेब्रूवारीला रिलीज होतो आहे. त्याचीही वाट पाहूया...

उत्कृष्ट अनुभव. Inception एवढा १००% ठसा नसेल पण ९०% नक्कीच. Happy Watch 'Interstellar'... in iMAX! Nolan stands out again. We are fortunate we have directors like Nolan. I have been ruminating over the movie (different layers of the story, scientific phenomena intertwined with emotions and human relationship), countering the plot and finding plotholes since yesterday even in sleep. What more can one expect from a movie!

Inception एवढा १००% ठसा नसेल पण ९०% नक्कीच. >>>>> अनुमोदन राहूल... Inception इतका भारी नव्हता.. पण वेगळा कॉन्सेप्ट, open to interpretation, भारी इफेक्ट्स हे सगळे नोलनपटाचे पैलू होतेच..
नोलन सारख्याने world is ending वाली sci-fi मुव्ही का करावी ? हे ट्रेलर पाहून मला वाटलं होतं ते काही प्रमाणात दुर झालं.. Happy Imax मधे must watch !

काल पाह्यला. आवडला. पण किप थॉर्नच्या मनात असलेलं बरचसं विज्ञान काढून त्या जागी मेलोड्रामा भरला आहे Sad
किप थॉर्न आधीपासून यात सहभागी असल्याने आम्हा कॅलटेकवासियांच्या अपेक्शा बहुदा जास्तच वाढल्या होत्या.

आत्ताच अजून जास्त न लिहीता जास्त लोकांनी पाह्यल्यावर योग्य चिरफाड करु या ...

ऑ राईट, ऑ राईट, ऑराईट! Happy

पराग - iMax मध्ये Sound Mixing थोडे गंडल्यासारखे वाटले का? मला नाही वाटले, पण हा issue लोकांनी नोंदवला आहे. काही गोष्टी नीट ऐकू आल्या नाहीत. उदा. नको, स्पॉयलर!

aschig - तुझे विश्लेषण वाचायला नक्कीच आवडेल आणि किपबद्दलही!

काल पाह्यला. आवडला. पण किप थॉर्नच्या मनात असलेलं बरचसं विज्ञान काढून त्या जागी मेलोड्रामा भरला आहे >> +१.

पण मजा आली बघायला start to finish.शेवट नोलानचा नाही वाटला.

काही गोष्टी नीट ऐकू आल्या नाहीत >>> नाही मला ते आयमॅक्सच्या साऊंड सेटींग्जमुळे झालं असं नाही वाटलं.. Matthew McConaughey चं डिक्शनच काही ठिकाणी गंडलय की काय असं वाटलं पण तस मला कधीकधी मेरिल स्ट्रीपच्या बाबतीतही वाटतं.. सो ही कमेंट फार लक्ष देण्यासारखी नाही.. Happy

मी काल पाहिला
शेवटची ४०-५० मिनिटे जबरदस्त
इमोशनल्+साय फाय तडका

ब्लॅक होल चे चित्रण क्लासच !

आवडला ...

Sound Mixing >>> मला IMAX मधे नाही पाहता आला unfortunately. पण मला काही गडबड नाही वाटली.

aschig - तुझे विश्लेषण वाचायला नक्कीच आवडेल आणि किपबद्दलही! >>> +१