Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15
तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.
अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्यांबद्दल.
- अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
- डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
- भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
- लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
- काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
- वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
- शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
- नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
- वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
- वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
- सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
- फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
- सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
- गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
- बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
- अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
- पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
- वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
- अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
- आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
- इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
- जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना
अज्ञात चेहरे:-
- हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
- माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
- देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
- ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
- पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्योंकि... मधली ती गौरी
क्योंकि... मधली ती गौरी प्रधान. तिने हितेन तेजवानीशी लग्न केलं.
आता सध्या कुठल्याशा सीरियल मध्ये आईचं काम करतेय.
ओ हां गौरी प्रधान..
ओ हां गौरी प्रधान..
ती अचिंत कौर पण दिसत नाही
ती अचिंत कौर पण दिसत नाही कुठे... तसच सायामध्ये तिने जिच्या बेस्ट फ्रेंडच काम केल होत ती मानसी जोशी पण दिसत नाही
मुग्धा गोडसे?
मुग्धा गोडसे?
अचिंत कौर टु स्टेटस मधे
अचिंत कौर टु स्टेटस मधे शिप्रामासी.
बनवाबनवी मधला अशोक,
बनवाबनवी मधला अशोक, लश्मीकांत आणि सचिन यांच्या बरोबर एक चवथा नायक होता ? तो फार चांगला होता अस नाही. पण आलाच नाही पुढे.
<बनवाबनवी मधला अशोक,
<बनवाबनवी मधला अशोक, लश्मीकांत आणि सचिन यांच्या बरोबर एक चवथा नायक होता ? तो फार चांगला होता अस नाही. पण आलाच नाही पुढे.>
सिद्धार्थ रे. व्ही. शांताराम यांचा नातू. 'वंश', 'बाजीगर' अशा हिंदी सिनेम्यांत होता. दहा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं.
सर्व प्रतिसादक वाचकांचे आभार.
सर्व प्रतिसादक वाचकांचे आभार. बरीच उपयुक्त माहिती मिळाली.
@ मुग्धटली
आता शीतल क्षीरसागर करिता का रे दुरावाचे काही भाग तरी नक्की पाहणार.
गौरी प्रधान स्पेशल स्क्वाड मध्ये पण होतीच ना.
ममता कुलकर्णी विषयी खरंच एकापाठोपाठ एक बरेच धक्के. अर्थात तिचा गुंडगिरीचा पिंड आधीपासूनच होता त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन सोबत लग्न हे नैसर्गिकच म्हणावे लागेल.
@ कविता१९७८
अभिनव चतुर्वेदीचं पडद्यावरचं दर्शन फारच सुखद. सौदागर मध्ये बघितल्याचं आठवलं. पनाह बघितला नाहीये. गोविंदाच्या बाझ चित्रपटात देखील बघितल्याचंही आता आठवलं.
निल्सन यांचं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ती सारा खान वेगळी. ती टिप्पीकल बायकी चाकोरीबद्ध भूमिकांमध्ये रमणारी. मी म्हणतोय ती वेगळी, तिच्या भूमिका नक्कीच वेगळ्या आहेत. ढूंढ लेंगी मंझिल हमे मध्ये ती विदेशातून परतलेली आर्किटेक्ट जी नंतर खासदार होते, पेबॅक मध्येही आर्किटेक्ट जिला विदेशात जाऊन फार मोठा पुल बनवायचा असतो तर टोटल सियप्पा मधली भांडकुदळ स्त्री जी आपल्या कंजूष नवर्याचा सारा पैसा उधळते.
@ चिनूक्स
मुग्धा चिटणीस व सिद्धार्थ रे यांच्याविषयी जाणून फार दु:ख झालं.
वंदना पंडित यांच्याकरिता आता मुक्ता पुन्हा बघितला जाईल.
नाटके सहसा बघण्यात येत नाहीत, कारण त्यांचे फारच मोजके खेळ असतात. नंदिनी जोग यांच्या नाटकांची नावे सांगु शकता का? ऑनलाईन / सीडीच्या माध्यमांतून पाहता येतील.
यादीवर नजर टाकली तर असे दिसून येतेय की लवलीन मिश्रा सर्व ऑफ बीट चित्रपटांमधूनच कामे करीत असतात. असो. यादीतले चित्रपट मिळवून नक्कीच पाहिले जातील.
@ बाजिंदा & जेम्स बॉन्ड |
फारच मार्मिक प्रतिक्रिया.
@ भरत मयेकर
चन्ना रुपारेल ला बलदेवराज व रवि चोप्रांच्या महाभारतात रुक्मिणीच्या भूमिकेत पाहिल्याचं स्मरतंय. तसेच ती विधिलिखीत या मराठी चित्रपटात आणि स्वाभिमान या हिंदी मालिकेत देखील होती.
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. तसेच इतरांनी नमूद केलेल्या हरवलेल्या चेहर्यांविषयीही त्यांना माहिती मिळावी ही शुभेच्छा.
मानसी जोशी रॉय (मिसेस रोहित
मानसी जोशी रॉय (मिसेस रोहित रॉय) आता आई आणि चित्रपटनिर्मातीच्या भूमिकेत आहे. तिने क्कुस्सुमची रिप्लेसमेंटही केली होती. अचिंत कौरनेही बालाजीच्या एका (किंवा अधिक) मालिकेत रिप्लेसमेंट केली होती. मला नक्की आठवत नाही, पण मंदिरा बेदीची प्लास्टिक सर्जरी होऊन अचिंत कौर झाली होती बहुतेक क्योंकि मध्ये.
पण याही गोष्टी जुन्या झाल्या.
<< मंदिरा बेदीची प्लास्टिक
<< मंदिरा बेदीची प्लास्टिक सर्जरी होऊन अचिंत कौर झाली होती >>
खरंच हाईट आहे. [मंदिरा बेदीपेक्षा अंचित कौर बरीच उंच आहे.]
प्रेमासठि झुकले खाली धरणीवर
प्रेमासठि झुकले खाली धरणीवर आकाश प्रेमासाठि जन्म घेतसे दुनियेचा विश्वास्......गण्यामधिल हिरो...परत कुठेच दिसला नाहि.........
दूरदर्शनच्या कशिश नावाच्या
दूरदर्शनच्या कशिश नावाच्या धारावाहिकेतून आपली छाप सोडणारी मालविका तिवारी पण नंतर फारशी चमकली नाही..
मालविका तिवारी रिश्ते
मालविका तिवारी रिश्ते नावाच्या मालिकेतील एका भागात आणि नंतर चमत्कार चित्रपटात उर्मिला मातोंडकरच्या आईच्या भूमिकेत होती.
ईल्यु इल्यु मधील देवानंद
ईल्यु इल्यु मधील देवानंद सारखा भासणारा विवेक मशरूम गायब झालेला, हल्लीच त्याला एका मालिकेत पाहिले तर बघवला नाही अक्षर्शा
प्रेमासठि झुकले खाली धरणीवर
प्रेमासठि झुकले खाली धरणीवर आकाश प्रेमासाठि जन्म घेतसे दुनियेचा विश्वास्......गण्यामधिल हिरो...परत कुठेच दिसला नाहि........
हा चित्रपट मी पाहिलाय, नव आठवत नाहीय पण अशोक सराफची दुहेरी भुमिका आहे. याचे निर्माते तेव्हा मराठी चित्रस्रुष्टीतले एक मोठे नाव होते आणि गाण्यातला हिरो त्या निर्मात्याचा मुलगा की नातु होता. अभिनयाच्या बाजुने पुरती बोंब होती. केवळ हौस म्हणुन तो या एका चित्रपटात चमकला एवढेच. त्याला बाहेर कोण विचारणार?
गुल गुलशन गुलफाम मधली रेश्मा तेव्हा खुपच गाजलेली. मालिका संपल्यावर लगेचच तिचा विवाह पण झाला असे तेव्हा पेपरात वाचलेले. काल या धाग्यामुळॅ आठवण आली, नेटवर शोधले पण मालिकेच्या कास्टींगमध्ये तिचे नावही सापडले नाही.
कुणाला फिरदौस दादी आठवतेय?
कुणाला फिरदौस दादी आठवतेय? तीदेखील नंतर दिसली नाही. मला फार आवडाअय्ची.
Fairdaus dadI appeared in
Fairdaus dadI appeared in cid. That marathi movie might be khichdi. The actor has to be producer's son.
<<कुणाला फिरदौस दादी
<<कुणाला फिरदौस दादी आठवतेय?>>
यह गुलिस्तान हमारा या मालिकेत गिरीश कर्नाड ची मुलगी. यात ती आपल्या वडिलांना तिचा एकटेपणा जावा म्हणून एक मुलगा (म्हणजे तिला भाऊ) दत्तक घ्यायला लावते. दत्तक घेण्याकरिता निवडलेला मुलगा स्वत:बरोबर अजून एका मुलाला घेण्याचा आग्रह करतो. अशा प्रकारे घरात दोन बाहेरचे येतात. या गोष्टीला फिरदौसची आत्या, अर्थात गिरीश कर्नाडची बहीण दीपा श्रीराम लागू यांचा सक्त विरोध असतो. शेवटी कळतं की त्या स्वतः दत्तक असतात. त्यांचे अतिशय लाड झालेले असतात तुलनेने त्यांचे बंधू गिरीश कर्नाड यांच्यावर अन्याय झालेला असतो. अशी गत या मुलीची (फिरदौस दादी) यांची होऊ नये म्हणून त्या धडपड करीत असतात.
मालिका आणि फिरदौस दोन्ही आवडले. तिचे दोघेही दत्तक भाऊ देखील छानच होते.
फिरदौस दादी नंतर दूरदर्शनवरील "आनेवाला पल" या दुपारच्या मालिकेत होती, पण नंतर तिला श्वेता तिवारीने रिप्लेस केले. माय फ्रेन्ड गणेशा का अशाच कुठल्या तरी बालचित्रपटात तिने शिक्षिकेची भूमिका केल्याचे देखील आठवते. अर्थात तिच्या योग्यते इतके तिला भरभरून काम मिळाले नाही.
वर एका प्रतिसादकाने उल्लेख केला आहे की अंगप्रदर्शन न केल्यामुळे कदाचित गायत्री जोशी या अभिनेत्रीची कारकीर्द संपली. बहुदा याच कारणाने फिरदौस दादी, कार्तिकादेवी राणे यांसारख्या अनेक अभिनेत्री पडद्याआड गेल्या असाव्यात.
फिरदौस ही झी टिव्हीवर गाजलेली
फिरदौस ही झी टिव्हीवर गाजलेली मालिका " बनेगी अपनी बात " मधे होती
सिध्दार्थ रे चे निधन झाले?
सिध्दार्थ रे चे निधन झाले? अरे बाप रे. फार काही वय नसावं. इतका ठोकळा असूनही त्याला हिंदी, मराठीत कामं मिळायची हे विशेष. अरमान कोहलीच्या अतिशय टुकार जानी दुश्मन सिनेमातही तो दिसला होता.
अचिंत कौर नाहीशी वगैरे
अचिंत कौर नाहीशी वगैरे नव्हतीच झाली. तिच्या त्या स्टायलिश डॉमिनेटिंग बाईच्या टिपिकल भूमिका असतात, तसे रोल्स भरपूर असतात हल्लीच्या सिरियल्स मधे. आताही झीच्या जमाईराजा मधे लीड रोलच आहे तिचा- सासूचा.
ग्रेसी सिंग- त्या चार
ग्रेसी सिंग- त्या चार मुलींच्या (वडील सुधीर पांडे) सिरियलनंतर तिला ब्रेक मिळून लगानमध्ये आली, मुन्नाभाई एमबीबीएसनंतर गायबच झाली. कोणत्या मालिकेत वगैरे येते का?
ग्रेसी सिंग अरमानमध्ये अनिल
ग्रेसी सिंग अरमानमध्ये अनिल कपूरची नायिका होती. वजह नावाच्या एका सुमारपटात खलनायिका देखील होती. गंगाजलमध्ये अजय देवगणची नायिका इथे होती. बरीच कामे मिळालीत की तिला.
हे पाहा:-
http://en.wikipedia.org/wiki/Gracy_Singh
http://www.imdb.com/name/nm0961737/
लगान आणि मुन्नाभाई मध्ये लीड
लगान आणि मुन्नाभाई मध्ये लीड रोल होता म्हणून लक्षात राहिली. बाकीचे पिक्चर बारक्या सारक्या कामांमुळे माहित्/लक्षात नाहीत.
मस्त सिरिअल होती बनेगी अपनी
मस्त सिरिअल होती बनेगी अपनी बात ! फिरदौस मस्त होती .
ममता कुलकर्णी अजून गायब आहे ना . नम्रता शिरोडकर ,मीनाक्षी शेषाद्री पण गायब झाल्या.
फिरदौस दादी मस्त आहे. मलाही
फिरदौस दादी मस्त आहे. मलाही फार आवडायची. रेणुका शहाणे मोठी बहीण, ही धाकटी आणि आलोक नाथ वडील ( नंतर ते मरतात ) अशी एक सिरियल होती त्यात तिला पाहिल्याचं पटकन आठवलं.
नम्रता शिरोडकरने तेलगु सुपरस्टार महेशबाबूशी लग्न केले आहे.
मीनाक्षी शेषाद्री इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न करुन प्लेनो, टेक्सस इथे राहते आणि तिथे नृत्य शिकवते
जुन्या आठवणींना उजाळा
जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हा सुंदर प्रयत्न. दूरदर्शनच्या जमान्यातील कित्येक कलाकारांनी त्या त्या मालिकेच्या दरम्यान मनावर निश्चित भुरळ घातलेली असते....त्या कलाकाराने सादर केलेली भूमिका हा घरातील सर्वाच्याच चर्चेचा विषय असायचा....विशेषतः रविवार हा सर्वच घटकांचा सुट्टीचा दिवस असल्याने कित्येक मालिका एकत्रितरित्या पाहायला मिळायच्या आणि चर्चाही त्या अनुषंगाने व्हायची.
अशा अनेक कलाकारांविषयी या लेखात अनेकांनी खूप छान लिहिलेले वाचायला मिळाले. या निमित्ताने मलाही एका अभिनेत्रीविषयी इथे लिहावे वाटते आहे.....पूनम रेहानी....१९८८-८९ मध्ये (म्हणजे आज जवळपास २५ वर्षे पूर्ण होत आली) दूरदर्शनवर एक मालिका आली होती...."फिर वही तलाश". खेडेगावातील एक युवक उच्च शिक्षणासाठी दिल्लीत आला आहे आणि तिथे त्याची मैत्री जमते पद्मा नामक दिल्लीतीलच एका मुलीशी....तिची मैत्रीण असते शबनम....जी अतिशय बोलकी असते....आणि तिच्या स्वभावाच्या अगदी विरूद्ध म्हणजे पद्मा. पण दोघीत मैत्री अतूट अशीच. शबनम आपल्या मैत्रिणीची राजेशसोबत भेट घालून देते....तो मूळचा लाजरा आणि आर्थिक बाजूही कमकुवत असल्याने शहरातील पद्माशी मैत्री करायला तयार नाही....पण ती सांभाळून घेते.... कथानक पुढे जाते.
पद्माचे काम करणारी अभिनेत्री पूनम रेहानी आणि शबनमचे काम करणारी नीलिमा आझमी या दोघींनी फिर वही तलाश अप्रतिमरित्या रंगविला होता.....मात्र ह्या एकमेव मालिकेनंतर पूनम रेहानी अचानक गायब झाली. नंतर एका अशाच चर्चेत समजले की ती आता पूनम सरिन झाली असून नवी दिल्लीतच आपल्या संसारात मग्न आहे.
फिरदौस दादी 'अस्तित्व एक
फिरदौस दादी 'अस्तित्व एक प्रेम कहानी' मधेही होती मेन लीडची धाकटी बहिण होती.
अशीच एक गयबलेली नटी अनु
अशीच एक गयबलेली नटी अनु अगरवाल. युट्युब वर तलाश नावाच्या प्रोग्राम मधे तिचा अॅक्सीडेंट झाल्याचे कळले.
चांगली लिस्ट आहे. अनेक पूर्वी
चांगली लिस्ट आहे. अनेक पूर्वी बघितलेले कलाकार आठवले.
नीलिमा आजमी, की नीलिमा अजीम? ही का ती?
http://en.wikipedia.org/wiki/Neelima_Azeem
ग्रेसी सिंग ची नंतर चित्रपटांची निवड चुकली असावी. शर्त - द चॅलेंज मधे तुषार कपूर बरोबर होती. अमिताभ व अनिल कपूरच्या त्या 'अरमान' मधेही होती.
Pages