घटस्फोटीत आईवडील आणि लग्न …….

Submitted by आईची_लेक on 11 October, 2014 - 01:15

लग्न ठरवताना काय आवश्यक असतं ,
व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी
माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला
आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला .
ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत .
पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे .
आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली
पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत ,
आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून
ब्राम्हण कुटुंबात वाढली म्हणून नकार मिळतो ,
मला एक कळत नाही लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय .......

लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या
गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?

ती एक छान गाणारी ,सुगरण ,घरातल्या आणि घराबाहेरील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी
दिसायला सुंदर अशी मुलगी आहे ,आणि मुख्य म्हणजे खूप समंजस आहे

आधी पसंती होते पण पण कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली कि नकार येतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस अपेक्षित असेल तर ही अपेक्षा फारच भयंकर आहे>>हो आहे.

माझ्या मुलिची एक मैत्रिण आहे.मराठा समाजाची इन्फोसिस मध्ये जॉब करते
काहिकारणाने लग्न जमत नव्हते खुप वैतागली होती ऑफिसकडुन ऑनसाईट us ला जायला लागले आता ती परत यायला तयार नाही इथे आली की सगळे लग्नाविषयी विचारतात म्हणुन ती यायच टाळते.

ज्यांची काही कौटुंबिक समस्या नसते ते लोक इम्प्रेस करायला खोट वागत नाहीत का ?

स्वच्छ कौटुंबिक पार्श्वभूमी असण म्हणजे सेफ गेम
आणि ह्या मुलीशी लग्न करणे म्हणजे रिस्क
असे निष्कर्ष का काढले जातात ?

जे लोक सेफ गेम खेळतात ते कधी फसत नाहीत का ?
सामाजिकदृष्ट्या ज्यांच्या घरात काही प्रॉब्लेम नसतात ती सगळीच मुल मुली नाती व्यवस्थित सांभाळू शकतात का ?त्यांच्यात स्वभावात ,वर्तनात काही दोष नसतात का ?

आणि हिच्याशी लग्न केल कि प्रपंचात काहीतरी समस्या येणारच , हि मुलगी नाती सांभाळू शकणार नाही
हिसुद्धा घटस्फोट घेणार
असे का समजतात सगळे ?

मुळात ह्या सगळ्या परिस्थितीमधे तिचा काय दोष आहे ?

एक प्रश्न

तुम्ही मिठाईच्या दुकानात गेलात. तुम्हाला मिठाई घ्यायची आहे. समोर शेकडो प्रकारच्या मिठाया आहेत, पण दुकानदार तुम्हाला एकाचीही चव दाखवायला तयार नाही. किंवा अशी पद्धतच आहे की ती नाही बघता येत.

तर तुम्ही ती मिठाई घेताना काय निकष लावाल?

(आणि हो, तुमच्या उदाहरणात मुलगी असली तरी मी मुलगा-मुलगी कोणीही असेल या जागी असे समजून मुद्दे मांडतोय हा.)

मनाली, तुझे सगळे प्रश्न बरोबर आहेत.
पण याची उत्तरे कोणाकडुन अपेक्षित आहेत तुला?
ऑनर किलिंग च्या एक दोन बातम्या रोज पेपरात असतात. दरवर्षी वैलेंटाइन डे राडा होतो.
मुलिंच्या कपड्यावरुन किती वादळ उठवले जाते.

प्रश्न कोणाला विचारायचे ?

मुलगी म्हणजे मिठाई का?
>>
हा हा, असा प्रश्न येणारच असे वाटल्याने मुलगा-मुलगी कोणीही अशी टीप टाकली, तरीही आला Happy

असो,
मिठाईला मिठाईच समजून प्रश्नाचे उत्तर शोधायचा विचार तर करा Happy

अवांतर - मिठाई हा एक गोड पदार्थ आहे Happy

लग्नसंस्था म्हणजे दुकान आहे का ?:राग:
तुमच हे मिठाई च उदाहरण मला अजिबात पटलेलं नाही
व्यक्ती आणि वस्तू एकाच पारड्यात तोलताय का तुम्ही ? Angry

पण तरीही तुमच्या प्रश्नच उत्तर देते
कधी कधी वरून खूप चांगली दिसणारी गोष्ट आतून खराब निघते , आणि एखादी साधीशी भासणारी वस्तू प्रत्यक्षात खूप चांगली निघते

लग्नसंस्था म्हणजे दुकान आहे का ?
>>
साधारणपणे हो.

कधी कधी वरून खूप चांगली दिसणारी गोष्ट आतून खराब निघते , आणि एखादी साधीशी भासणारी वस्तू प्रत्यक्षात खूप चांगली निघते
>>>
यातल्या कधीकधी मध्ये उत्तर दडलेय Happy

ऋन्मेऽऽष
मला माहितीये तुला शब्दांचे खेळ करायला खूप आवडत
आणि स्वतःच बरोबर सिद्ध करायचं

पण प्लीज इथे तुझ्याशी शाब्दिक युद्ध करण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये
कारण हा TRP धागा नाहीये माझ्यासाठी

तसंही तुझ्या प्रतिक्रियांचा एकूण सूर हाच आहे कि लोकांचा दृष्टीकोन बरोबर आहे
त्यामुळे प्लीज स्वतःचच खर सिद्ध करायला दुसरा एखादा धागा शोध

ऋन्मेऽऽष,
एका प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर दे.
थोड्यावेळासाठी तुझ्या gf ला बाजुला ठेव व सांग की हे प्रपोजल तुझ्यासाठी असते व तुला प्रथमदर्शी मुलगी पसंद आहे तर तु काय करशिल?रुप- गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी पाहशिल?
आणि मनाली सारख्या तिच्या एका मैत्रिणींने तुला तिच्या विषयी खुप चांगले सांगितले आहे जिच्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे तर.......
तुझा निर्णय काय असेल? का असेल?

<<<मनाली, तुझे सगळे प्रश्न बरोबर आहेत.
पण याची उत्तरे कोणाकडुन अपेक्षित आहेत तुला?
ऑनर किलिंग च्या एक दोन बातम्या रोज पेपरात असतात. दरवर्षी वैलेंटाइन डे राडा होतो.
मुलिंच्या कपड्यावरुन किती वादळ उठवले जाते.

प्रश्न कोणाला विचारायचे ?>>>

उत्तर सगळ्यांकडूनच अपेक्षित आहेत
आपण सगळे पुढारलेले ,वैचरिक दृष्ट्या प्रगल्भ झाले आहोत
एकविसाव्या शतकात आहोत

पण खरच समाज बदललाय का ?
कि लोकांच फक्त राहणीमान बदलतंय पण विचारसरणी मात्र अजून तशीच आहे पारंपारिक ,बुरसटलेली
हा समाज खर्या अर्थाने प्रगल्भ होणारच नाहीये का कधी ?

पण खरच समाज बदललाय का ?
कि लोकांच फक्त राहणीमान बदलतंय पण विचारसरणी मात्र अजून तशीच आहे पारंपारिक ,बुरसटलेली
हा समाज खर्या अर्थाने प्रगल्भ होणारच नाहीये का कधी ?>>>>>>>उत्तर सोप्प नाही.
धर्म राजकारण बाजुला ठेऊन विचार व्हायला हवा.

काही लोकांना समाज बदललेला हवा काहिंना नको.
पण आशावादी असायला हरकत नाही कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे.:)

Sad मूळात ती मुलगी "बघून" "ठरवून" लग्न करायला निघाली आणि मग समाज "बुरसटलेला" म्हणायचे !

माझ्या मते तरी एका भेटीत पसंती ही अतिशय बुरसटलेली रूढी आहे. बुरसटलेला मार्ग अवलंबला तर बुरसटलेलेच लोक तर भेटणार. व्हॉट्स सरप्राईजिंग यू?? प्रेमात आंधळे होवून लग्न करण्यात जितका धोका आहे तितकाच धोका एका भेटीत लग्न ठरवण्यात आहे. आईचा प्रेमविवाह तुटला म्हणून मुलीला "बघून" लग्न करायचे आहे का?

<<आईचा प्रेमविवाह तुटला म्हणून मुलीला "बघून" लग्न करायचे आहे का?>>

बहुधा हेच कारण असाव …
आणि प्रत्येकाचा प्रेमविवाह होईलच अस नाही ना

आणि अरेंज मॅरेज मधे एका भेटीत निर्णय झालाच पाहिजे अस तर नाही ना
ठरवून झालेल्या लग्नात दोन तीन भेटीनंतर एकमेकांशी चर्चा करून सुद्धा निर्णय होऊ शकतो

बापरे सीमंतिनी,
'बघून लग्नं करणे' या प्रकाराला पारंपारिक म्हणू शकतो पण बुरसटलेले का बरं?
भारताततरी प्रत्येक जण प्रेमात पडून, स्वतःच स्वतः ठरवून लग्न करणे शक्य आहेच असे नाही.

बघून लग्न करणे बुरसटलेलं नाही गं ! एका भेटीत पसंती हा प्रकार बुरसटलेला वाटतो. मुलीने स्वतःच आधी सांगायला हवे की मी चार-सहा महिने ओळख झाल्याशिवाय निर्णय देणार नाही.

चांगली चार-सहा महिने ओळख हवी, स्वाती२ ने साथसाथ बद्द्ल लिहीले ते एकदम पटले. तिथे वेगवेगळ्या उपक्रमात ओळख होते म्ह्णे. नुसते भेटण्यात माणूस मस म्हणेल मी बाईला बरोबरीने वागवतो इ आणि उपक्रमात (सोबत वागताना) लक्षात येईल की बंदा बंडल मार रहा है.

मनाली, ओके. माझ्याशी चर्चा थांबवण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेच Happy

सकुरा,
किती जर तर जोडत आहात. जर अरेंज मॅरेजमध्येही एखादी मुलगी पहिल्याच भेटीत एखाद्या मुलग्याला फारच आवडली आणि त्या भावना एक्विवॅलंट टू लव्ह असतील तर तो बाकीचा विचार का करेल?

माझा मुद्दा असा आहे की याची शक्यता फार क्वचित आहे, मग तसे फारच आवडली नसताना या गोष्टीवरून कोणी नकार दिला तर त्यासाठी तयार राहावे. लगेच त्याला चूक की बरोबर ठरवू नये. उलट मी माझ्या पहिल्याच पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे अश्या केसेस मध्ये मग आपल्यावर प्रेम करणारा आणि त्या प्रेमापोटी इतर कुठल्याही गोष्टी नजरे आड करणारा जोडीदार भेटण्याची शक्यता जास्त असते.

आणि हो, माझ्या गर्लफ्रेंडला बाजूला नका हो ठेऊ. तिच्यावरच्या प्रेमामुळेच मी हा मुद्दा ठामपणे लिहू शकतोय. आमच्या दोघांचे स्थळ एकमेकांना अरेंज मॅरेज म्हणू आले असते तर आम्ही दोघांनी एकमेकांना हजारवेळा नकार दिला असता. कारण रंगरूप आवडीनिवडी आचारविचार जातपात प्रांतप्रदेश शिष्टाचार स्वभाव या सर्वच बाबतीत आम्ही कुठेही कागदावर एकमेकांना अनुरूप नाही आहोत. इनफॅक्ट दोन टोके आहोत. पहिल्याच भेटीत आम्ही दोघांनी एकमेकांवर काट मारली असती. पण प्रेम म्हणजे काय असेल तर ती मैत्री आणि एकमेकांशी अफलातून जुळलेली केमिस्ट्री. यापुढे सारेच काही दुय्यम ठरते. आपल्याला आयुष्य त्या व्यक्तीबरोबरच काढायचे आहे हे ठरले की बस्स ठरले.

नेमके हेच अरेंज मॅरेजमध्ये होत नाही. पण अर्थात प्रेम सर्वांच्या नशीबात लिहिलेले नसते. इथे प्रेम म्हणजे अफेअर नाही जे आजकाल प्रत्येकाची चार चारही होतात, तर आयुष्यभराचा जोडीदार भेटला असे वाटणार्या प्रेमाबद्दल बोलतोय. ज्यांच्या नशीबी हे येत नाही त्यांना लग्नासाठी अरेंज मॅरेजवरच अवलंबून राहावे लागते. पण मग अरेंजमॅरेजचे फायदे तोटे स्विकारायची मनाची तयारी केलीच पाहिजे.

अजून एक मुद्दा, अरेंज मॅरेजमध्ये मुलगा किंवा मुलगी फक्त आपणच बघत नसतो तर आपल्याबरोबर आपले आईवडीलही बघत असतात. त्यामुळे जरी आपल्याला पटकन कोणी आवडले तरी ती आवड मनात आणखी रुजायच्या आधीच आपल्या कुटुंबीयांपैकी कोणीही तो मुद्दा उचलत रिस्क नको म्हणून त्या नावावर काट मारू शकते. आणि अश्यावेळी ते आईवडीलही आपल्या जागी बरोबरच असतात.

एका ओळिच्या उत्तराला एवढी मोठ्ठी पोस्ट.
मनाली चे बरोबर आहे शब्दांचे खेळ.

अश्या गोष्टी ज्यांना मुली आहेत किंवा लग्नाच्या वयाच्या ज्यांना मुली आहेत
त्यांनाच याच्या झळा कळु जाणे.असो....

गुण जुळवणे या तंत्रावर अनेकांचा विश्वास नसतो. तस असायला काहीच हरकत नाही. एकाच थेअरी वर विश्वास असावा असा आग्रह कुणी धरणार नाही. पण पर्यायी शास्त्रीय पध्दत सुध्दा माझ्या मते उपलब्ध नाही. केवळ जुन आणि पुरोगामी म्हणुन झोडण्याची हौस भागवायची असेल तर वेगळी गोष्ट आहे.

ह्या केस मध्ये पारंपारिक लग्नाच्या दृष्टीने २ प्रश्न आहेत.
१. आई वडिलांचा आंतरजातीय विवाह - घटस्फोट न होता सुखी संसार केलेल्या आंतरजातीय दाम्पत्यांच्या मुलांना देखील लग्न जमवताना थोडा प्रोब्लेम होतो. आपल्या जातीत एवढी मुले / मुली आहेत ना? मग कशाला वेगळ्या संस्कारात वाढलेला मुलगा / मुलगी हवे आहेत? असा विचार सर्वसासाधारणपणे केला जातो.
२. आई वडिलांचा घटस्फोट - अजूनही घटस्फोटित आई वडिलांच्या मुलांची मानसिकता कशी असेल आणि ते जुळवून घेऊ शकतील कि नाही ही भीती लोकांना वाटत राहते.

तुमच्या मैत्रिणीच्या मुलीच्या केस मध्ये वरच्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत.

लग्न ही आयुष्यभराची गाठ असते. ठरवून लग्न करताना २-३ भेटींमध्ये मुलाला/मुलीला आपण समजून घेऊ शकू की नाही ही भीती असते. समजूतदारी, स्वभाव वगैरे २-३ भेटीत ओळखू येतीलच ह्याची खात्री वाटत नाही. त्यामुळे सरधोपट मार्ग स्वीकारण्यावर शक्यतोवर भर असतो. ते एक जनरलायझेशन असते. बर्याच वेळा असे जनरलायझेशन चूक असते, तरीही त्या क्षणी तो मार्ग स्वीकारला जातो. ही मानसिकता चूक की बरोबर ही विवंचना मी करत नाही. फक्त ती असते, ही गोष्ट खरी आहे.

ह्या मुलीच्या केस मध्ये थोडा संयम बाळगा. हल्ली जात-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारे बरेच लोक आहेत. किंबहुना ह्यात अडकून पडलेल्या लोकांशी तिचे जमत नाहीये हे भाग्यच समजा. तिला मानसिक-वैचारिक दृष्ट्या सुयोग्य जोडीदार नक्की मिळेल. शक्य असल्यास एखाद्या मध्यस्थाच्या माध्यमातून लग्न जमवायचे पहा. मध्यस्थ दोन्ही बाजूंना ओळखत असतो, त्यामुळे काम सोपे होते.

आणि घरातल्या गेल्या काही वर्षांत झालेल्या ३-४ लग्नांच्या अनुभवातून एक गोष्ट कळली आहे. की रूढार्थाने सगळे 'योग्य' असून देखील हल्ली लग्न जमायला थोडा उशीर लागतो आहे. २-३ वर्ष तर सहज जातात. ह्याचे कारण म्हणजे दोन्ही बाजूंच्या वाढलेल्या अपेक्षा आणि रोहिणी/ अनुरूप वगैरे मंडळांमुळे जवळपास सगळ्या महाराष्ट्रातली / बाहेरची स्थळे एका क्लिक सरशी उपलब्ध असणे. त्यामुळे हे नको तर पुढे बघू अशी वृत्ती. एवढेच सांगेन, की संयम बाळगा, लग्न जमेल. शुभेच्छा.

मनाली,
आई वडीलांचे आंतरजातीय लग्न झाल्याने खरे तर फार फरक पडू नये. आमच्याकडे बरीच लग्ने आंतरजातीय-प्रांतीय, नवर्‍यापेक्षा बायको मोठी वगैरे आहेत. मुलांच्या लग्नात अडचण आली नाही. अर्थात जात-प्रांत अशी अट नव्हती.
माझे स्वतःचे अ‍ॅरेंज मॅरेज. माझे आणि नवर्‍याचे मूळ कुटुंब पारंपारिक चौकोनी, मात्र एक्सटेंडेड फॅमिलीत अपारंपारिक कुटुंबं आहेत. मुलीला भाऊ असावा अशा अटी असलेल्या काळात एक्सटेंडेड फॅमिली अपारंपारीक असणे देखील भुवया उंचावणारे होते. पण ठीकच झाले. योग्य जोडीदार मिळाला. दोन्ही पार्टीजना अपारंपारिक कुटुंब हे नाविन्याची बाब नसल्याने काही वाटले नाही. पुढे घडलेल्या घटना पहाता झाले ते उत्तम झाले. माझ्या लग्नानंतर माझ्या जवळच्या नात्यात जेव्हा घटस्फोट झाले तेव्हा सासरी त्याचा बाऊ केला गेला नाही. ओळखीच्या लोकांना एक्सशी मैत्रीचे संबंध असणे देखील विचित्र वाटते. तेव्हा प्रत्येकाचा कंफर्ट झोन वेगवेगळा असणार.
तुमच्या मैत्रीणीला देखील पारंपारीक चौकटीबाहेर विचार असणारा जोडीदार नक्की मिळेल. मात्र सगळ्या गोष्टी सुरवातीलाच क्लिअर करा. पालकांचा आंतरजातीय विवाह-घट्स्फोट या बाबी नंतर सांगीतल्याने आपोआप निगेटिव रंग चढतो, बॅगेजचा विचार होतो. तुमच्या कडून या बाबींबद्दल सहजता नसेल तर समोरच्या पार्टीकडून सहजपणे स्विकारण्याची अपेक्षा कशी करता येइल. तुमच्या मैत्रीणीला शुभेच्छा!

मनाली तुम्ही हा धागा गेल्या वर्षी काढलात आणि तेव्हाच तुम्हाला वर कोणीतरी साथ साथ ची कल्पना सुचवलेली. तुमची मैत्रिण अजुन गेली नाही का तिथे ?

आपले लग्न आपणच जमवणे हे कितीही शहाणपणाचे वाटले तरी ते तितके सोपे नाहीय. सगळ्यांनाच असे लग्न जमवणे जमत नाही आणि विषय शेवटी दोघांछ्या घरच्यांपर्यंत जातोच. असे लग्न जमावले आणि नंतर घरच्यांनी नाही म्हटले तर काय? केवळ जात वेग्ळी आहे म्हणुन प्रेमविवाहाला विरोध करणारे आजही आहेत, आणि असा बिरोध कुठल्याही कारणाने मोडुन काढण्याची तयारी नसल्याने प्रेमाला नाईलाजाने गुडबाय करणारेही आहेत.

भारतात लग्न जमवणे हा एकुणच एक मोठा झोल आहे. बाहेरुन जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे ते नाहीय. .लग्ने जमवताना एकमेकंकडे आजही लोक संशयाने पाहतात. त्यात कोणाच्या घरची परिस्थिती वर लिहिल्याप्रमाणे असेल आणि प्रेमलग्नाला घरच्यांचा पाठिंबा नसेल तर हमखास मुलीला भलभलते ऐकुन घ्यावे लागते. माणसे कितिही शिकली सवरली तरी विचारांचा कोतेपणा जात नाही आणि भारतात तो अजुन १०० बर्षे तरी जाणर नाही हेमावैम.

Pages