पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत. त्यानंतर ऑफिशिअली रिटायर व्हायचेच आहे. पण कितीतरी गोष्टी करता येतात. आवडीचे शिक्षण, छंद, भटकंती,
संसाराच्या, नोकरीच्या धावपळीत राहून गेलेले बरेच काही आता आरामात करता येते.
बदलत्या जीवनमानानुसार व चांगल्या आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमुळे आता खर्या अर्थाने ज्येना होण्यास पंचाहत्तरी तरी गाठावी लागते. खुद्द पुण्यनगरीतच ह्याहूनही पुढचे कितीतरी विद्वान, हसरे अॅक्टिव ज्येना आहेत. जगभरातच जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.
व्यवस्थित प्लॅनिन्ग केल्यास, आरोग्य, अर्थ आणि भावनिकद्र्ष्ट्या अतिशय छान, आनंदी जीवन,
वयाच्या पन्नास ते पंचाहत्तर ह्या कालखंडात जगणे शक्य आहे.
पहिला गोल साठीपर्यंत पोहोचणे हा असावा. त्यासाठी आरोग्याचे तसेच पैशाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. तसेच मुलांच्या जीवनात मायक्रो मॅनेजमेंट न करता आपला रोल आता कन्सल्टंट/ ऑकेजनल हेल्पर असा राहणार आहे हे उमजून घेउन आपले स्वतःचे जीवन कसे जास्त एन्रिच करता येइल या संबंधाने चर्चेसाठी हा बाफ उघडला आहे.
सगळ्याच पोस्ट सुंदर. मस्त
सगळ्याच पोस्ट सुंदर. मस्त आहे हा धागा. वाचायला मजा येतेयच पण विचार प्रवर्तन ही होतेय. काय करायला हवय आणि काय नको हे आपोआपच कळतयं ह्या धाग्यामुळे.
सगळ्याच पोस्ट सुंदर. मस्त
सगळ्याच पोस्ट सुंदर. मस्त आहे हा धागा. वाचायला मजा येतेयच पण विचार प्रवर्तन ही होतेय. काय करायला हवय आणि काय नको हे आपोआपच कळतयं ह्या धाग्यामुळे.
देवकीताई तुमच्या आईंसारखी
देवकीताई तुमच्या आईंसारखी माणसं मला खूप आवडतात..आनंदयात्री..स्वतः मजेत राहतात..दुसर्यांनाही त्यांच्यामुळे प्रसन्न वाटतं
वाचनीय धागा .. बुवा, छान
वाचनीय धागा ..
बुवा, छान लिहीत आहात (पन्नाशीबद्दल नाही .. पण जे लिहीलं आहेत त्याबद्दल म्हणतेय मी ..)
अमांचा दिसण्याबद्दलचा मुद्दा नीट समजून घेतला जात नाहीये किंवा मला तो अशा प्रकारे समजत आहे .. एकूण सगळी पोस्ट वाचली तर आता "I give a dman about what I do or how I look" असं सुचवायंचं आहे अमांनां असं वाटलं ..
सोशल प्रोटोकॉल की ऐसी की तैसी .. आणि तसंच रहावं कायम ..
आपण अमुकतमुक वयाचे झालोत असे
आपण अमुकतमुक वयाचे झालोत असे विचार मनात येऊ लागणे म्हणजेच म्हातारपण .. मग ते ऐन पस्तीशीतही येऊ शकते वा साठीलाही आपण त्याला सहज चकवू शकतो .. आपली पन्नाशी म्हणजे आपली पोरे वीसबावीस वर्षांची झाली असणार यापुढे विचार करण्यात फारसा अर्थ नाही
इथे मध्येच कुठेतरी डेटींग बद्दल चर्चा झालेली, मी तर बोलतो डेटींग शेटींग फ्लर्टींग शर्टींग (जर वयात आल्यापासून करायची सवय असेल तर) बिनधास्त करावी .. अभी तो मै जवान हू फीलिंग येण्यासाठी यापेक्षा बेस्ट उपाय नाही
- पन्नाशीची पन्नाशी गाठलेला ऋन्मेष
आमचा एक प्रश्न आहे की शारिरिक
आमचा एक प्रश्न आहे की शारिरिक वयाने पन्नाशी ओलांडली तरी काहींची मानसिक व बौद्धिक वये ही कमी किंवा जास्त असतात. शिवाय निसर्गाने प्रत्येकाला प्रकृती काही समान दिली नाही. आपली प्रकृती आपल्या हाती ही संकल्पना कितपत बरोबर आहे हीच मला शंका आहे. परवा डॉ ह वि सरदेसाईंचे भाषण ऐकायचा योग आला. त्यांच्या मते जवळपास ८५ टक्के आजार हे सायकोसोमॅटीक आहेत. आहार॑ विहार हे अत्यंत महत्वाचे आहेत.
देवकीताई तुमच्या आईंसारखी
देवकीताई तुमच्या आईंसारखी माणसं मला खूप आवडतात..आनंदयात्री..स्वतः मजेत राहतात..दुसर्यांनाही त्यांच्यामुळे प्रसन्न वाटतं स्मित
>>>
+१११११११११११११११११११११११
सर्व टिपणे एकदमच वाचली मजा
सर्व टिपणे एकदमच वाचली मजा येतेय वाचायला.
वाचतेय. सगल्यांचेच प्रतिसाद
वाचतेय. सगल्यांचेच प्रतिसाद छान आहेत. बरेच सल्ले अनुभव स्वत:चे ,आईवडीलांचे साबासाबूंचे शेअर केलेत. अमांनी सध्या त्या ज्या मा नसिक आंदोलनातून जाताहेत हे खूप छान मांडलयं अमापण ही स्टेज उत्तम प्रकारे पार करतील. खूप शुभेच्छा!
इब्लिस म्हणतायत त्याप्रमाणे
इब्लिस म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी पॉईंट आउट केलेले अमांचे मुद्दे मलाही किंचीत निगेटिव्ह वाटले. (पोस्ट चांगली असली तरीही). ते तसे असू नये म्हणून स्वतःला सतत समजावत रहावं.>>
मला सुद्धा अमाची पोष्ट आवडली पण सर्व मुद्दे खूप नकारात्मक वाटतात. अमा तुम्ही खरच रोज ६ सुर्यनमस्कार घाला आणि प्राणायाम करा. मी अनुलोम विलोम प्राणायाचे सकाळ संध्याकाळ पाच पाच आवर्तने करतो. जी उर्जा शक्ती मिळते आणि मानसिक शांतता मिळते ना ती इतर कशापासूनच मिळणार नाही.
प्रत्येकाचा जगण्याचा अनुभव
प्रत्येकाचा जगण्याचा अनुभव वेगळा. अगदी त्यातले समान साचे लक्षात घेऊनही . तरीपण पन्नाशी पार केल्यावर ''आता काय नवीन' असं न वाटता अरे, आताच तर वेळ आहे जे जे राहून गेलेले आहे ते करायची असं प्रकर्षाने वाटतं .थोडे मोकळेही झालेले असतो आपण बंधनातून. झाले नसलो तर होऊ शकतो बहुधा.
जुनी ओळख जुन्या कपड्यांसारखी नीट बासनात ठेवून द्यायची .जी आपली passion तिच्यासाठी आता प्रत्येक श्वास.. 'एकाच या जन्मी पुन्हा फिरुनी नवी जन्मेन मी 'म्हणत.
प्रत्येक दिवस इतका नव्या आणि अनंत शक्यतांनी बहरलेला..
भारतीताई , सुरेख व संतुलित
भारतीताई , सुरेख व संतुलित पोस्ट . छान लिहिलेस
अमा , इब्लिस खूप छान लिहिले
अमा , इब्लिस खूप छान लिहिले आहे .
जुनी ओळख जुन्या कपड्यांसारखी नीट बासनात ठेवून द्यायची .जी आपली passion तिच्यासाठी आता प्रत्येक श्वास.. 'एकाच या जन्मी पुन्हा फिरुनी नवी जन्मेन मी 'म्हणत.>> +१००००
अरे, आताच तर वेळ आहे जे जे
अरे, आताच तर वेळ आहे जे जे राहून गेलेले आहे ते करायची असं प्रकर्षाने वाटतं>>>. भारती मस्त प्रतिसाद.
आपण ज्येष्ठ नागरिक झालो अस
आपण ज्येष्ठ नागरिक झालो अस माणण म्हणजे चआपल्या मनाला कमकुवत करणे अस मी मानतो. कशाला उगाच जगाला सांगत बसायच !आजचा दिवस माझा आहे आणि हाती आलेला प्रत्येक क्षण फक्त मला भरभरून जगायचा आहे .जग काय म्हणेल याचा विचार मी का करावा. आलेला प्रत्येक क्षण आनंदात जगायचा की दुखांत हे ज्याच्या त्याच्या हाती आहे .त्यासाठी फक्त तुम्हाला जगता यायला हव वयाचा प्रश्न येतोच कोठे?फक्त तुम्हाला बालकाच मन असावे लागते आणिमग पहा वय विसरल जात की नाही ते?
hiii sorry posting from phone
hiii sorry posting from phone. i do care about how i look. lost about 15 kg. taking care of hair and skin. Lost few more people close to me and learnt a few things from that loss. Having fun on the way while taking meds, stumbling now and then, marching on with retirement in sight. Living with a distilled purer version of myself.
करा रे महत्म्यानो डेटिंग
करा रे महत्म्यानो डेटिंग चॅटिंग चीटिंग. आणि पुडचे बरेच काही अमहला फक्त स्पयसी खऱ्या स्तोरीज टाका खराखुरा आनंद मिळेल .... बाकी अचाट अनुभव नक्की शेअर करा म्हणजे तेवढाच लहानांना DIY Dummies ... For enjoyment ....
पन्नाशीपूर्वी किंवा ५०-५१
पन्नाशीपूर्वी किंवा ५०-५१ व्या वर्षी निवृत्त झालेलं कुणी आहे का इथे? कसं वाटलं तुम्हाला तेव्हा आणि आता?
मिपा वर एक लेख होता. त्यात
मिपा वर एक लेख होता. त्यात एक माणूस झाला होता रि टायर. मी जे वाचन करते त्या नुसार बेबी बुमर जनरेशन, चे लोक आता ६४ परेन्त तरी नक्की काम करतात. जमेल ते व असेल तो जॉब एक्स्टेंड करतात. रीलर्न री टूल करायचा प्रयत्न करतात.
आता मिलेनिअल जनरेशन. निदान भारतातली तरी २६ ते ३८ वयातले १३ % लोक जॉबलेस आहेत. मग त्यांच्या आईबाबांना आहेत त्या नोकर्या चालू ठेवायला हव्यात ना. आर्थिक मंदी सर्वांनाच चावते आहे.
पन्नाशीपूर्वी किंवा ५०-५१
पन्नाशीपूर्वी किंवा ५०-५१ व्या वर्षी निवृत्त झालेलं कुणी आहे का इथे? कसं वाटलं तुम्हाला तेव्हा आणि आता?>>>>>मी 2007 साली घेतली. 45 व्या वर्षी 23 वर्षे नोकरी करुन पेन्शनपात्र झालो. मग निवांत जगण्यासाठी घेतली. तेव्हाही काही वाटल नाही व आत्ताही नाही. पण एक निरिक्षण आहे की सुरवातीला उत्साह असतो नंतर तुम्ही आळशी बनता.नंतर मी कुठलेही अर्थार्जन केले नाही.तसा मी अल्पसंतुष्टी आहे.त्यामुळे गरजही वाटली नाही.
मी सुद्धा बरोबर वीस वर्ष
मी सुद्धा बरोबर वीस वर्ष सर्व्हिस पुर्ण होताच सेहेचाळीसाव्या वर्षी निवृत्ती घेतली होती. घरच्यांपेक्षा नातेवाईकांना जास्त दु:ख झाले. मुले शिक्षण पूर्ण होऊन मार्गी लागल्याने कोणतीही जबाबदारी नाही. खूप मजा येते unplanned दिवस घालवण्यात. बरोबरीचे अजून नोकरी, धावपळ करतात हे बघून फार मजा वाटते त्या लोकांची.
मला तर जमेल तितके वर्श काम
मला तर जमेल तितके वर्श काम करायचेच आहे. घरी बोअर होते. फक्त जरा आरामाचे शेडुल हवे. किंवा स्केज्युल. सध्या फार धावपळ होते. घरकाम व जॉब मिळून. वीकांताला मस्त झोपा काढतो. गुरफटुन घेउन पुस्तके वाचतो मर्यादित खादाडी करतो.
काम नसेल तर मला असुरक्षित वाट्टॅ . आसॅ का बरे असावे.
रिटायर व्हाव?, का होउ नये, का
रिटायर व्हाव?, का होउ नये, का तिसरच काही तरी वेगळ करण्याचा प्रयत्न करावा, का आराम करावा - यावर उत्तर लवकरच काढावे लागणार आहे.
कमी दगदग. ओके पैसे, आपल्या
कमी दगदग. ओके पैसे, आपल्या अनुभवाचा फायदा होइल असे काम. ही त्रिसुत्री आहे. वेळ पण नीट घालवावा.
प्लस हेल्थ इन्सुअरन्स चेक करून घ्या. ७५ परेन्त अॅक्टिव्ह मग ९० परेन्त वृद्धापकाळ असे धरून गणित घाला.
मला तर जमेल तितके वर्श काम
मला तर जमेल तितके वर्श काम करायचेच आहे. घरी बोअर होते. फक्त जरा आरामाचे शेडुल हवे. >>>> अमा, माझी एक कझन अमेरिकेत रहाते, ६१ वर्षांची आहे.पण ती अशाच विचाराने काम करत आहे.मजा म्हणजे ती आता जिथे काम करते तिथे ६ महिने काम आणि ६ महिने रजा अशी मजा आहे.ह्या ६ महिन्याच्या रजेमधे ती काय भटकते त्याला तोड नाही.यावेळी ऐन उन्हाळ्यात महिनाभर भारतात आली होती.डेहराडून ,मसुरी,अहमदाबाद,गोवा,बेळगाव,पुणे इतके मला ठाऊक आहे आणि मुंबैतले सासर-माहेर सर्व नातलगांच्या भेटीगाठी घेऊन परत गेली.तिथून परत ती,मेक्सिको का कुठेतरी गेली.जाम एनर्जेटीक आहे.
हे इतके पाल्हाळ लावले कारण जितकं तुम्हाला होईल तितके दिवस काम करा.ऑफीसला जात असतो त्यावेळी बरेच फ्रेश रहातो.
50 वर्ष म्हणजे काही जास्त वय
50 वर्ष म्हणजे काही जास्त वय नाही .
आहार,विहार,आणि positive विचार असतील तर माणूस शरीराने आणि मनाने सुद्धा निरोगी राहतो .
>>काम नसेल तर मला असुरक्षित
>>काम नसेल तर मला असुरक्षित वाट्टॅ . आसॅ का बरे असावे.>> अगदी मनातले बोललात. मलाही हाच्च अनुभव आहे. I wish to work till I drop.
व्यक्ती स्वातंत्र्याचे स्तोम,
व्यक्ती स्वातंत्र्याचे स्तोम, स्वयकेंद्रित जीवन जगण्याची सवय त्या मुळे आता च्या काळात ज्येष्ठ नागरिक ना एकटेपणा जाणवतो.
आणि तशी उदाहरण पाश्चिमात्य देशात जास्त असतील कारण हे सर्व प्रकार तिकडेच पाहिले सुरू झाले .
भारतीय समाज व्यवस्था आणि कुटुंब पद्धती मध्ये एकटेपणा ला थारा नव्हता .
पण आपण सुद्धा त्यांच्याच मार्गाने
जात आहोत
मला ही रिटायर झाल्यावर
मला ही रिटायर झाल्यावर रिकामपण येईल, आपण आळशी, निष्क्रिय होऊ असच वाटायचं . बसली होती ती चाकोरी सोडायला मी तयार नव्हते . त्यामुळे मी vrs वैगेरे न घेता शेवट पर्यंत नोकरी केली.
पण रिटायर झाल्यावर घरी माझा वेळ मस्तच जातो आहे. घरकाम, वाचन, क्राफ्ट, शिवणकाम, quilting ,थोडंसं लिखाण ह्यात सोशल सर्कल फार नसताना ही माझा वेळ छान जात आहे. आता कोणाला मदत वैगेरे हवी असेल तर मी ती करू शकते. हे ही समाधान आहे. नोकरीत असताना कायम रजेचा प्रश्न म्हणून ते शक्य होत नसे. आता गावाला वैगेरे ही मी खूप दिवस जाऊन राहू शकते. मुख्य म्हणजे नोकरीत असताना वेळेशी जी मारामारी असे ती सम्पली आहे. थोडा निवांतपणा मिळू लागला आहे. एकंदरीत रिटायरमेंट नंतरच आयुष्य ही खूप छान वाटत आहे ज्याची रिटायरमेंटच्या आधी मी कल्पना केली नव्हती. मी नोकरी करत होते ह्याचा ही विसर पडलाय
ज्यांना work till you drop अस वाटतय त्यांच्या साठी हे लिहिलं आहे. प्रत्येकालाच काही तरी आवड, छंद असतो जो फक्त स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही रिटायरमेंट नंतरच जोपासू शकता.
तर ह्या बाजू ने ही विचार करून बघा. माझे अनुभवाचे बोल आहेत.
मनीमोहोर मला पैसे कमवत नसू तर
मनीमोहोर मला पैसे कमवत नसू तर असुरक्षित वाटते. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे मी तसे लिहीले कीwork till you drop बाकी फारसे छंदही नाहीत त्यामुळे काम करीत रहाणेच बरे वाटते.
Pages