पितृपक्ष - इतिहासाच एक पान
इतिहास आवडतो अस वाटणारे तुरळकच. शाळेत, माध्यमिक स्तरापर्यंत हा विषय अनिवार्य असायचा. त्या लढाया, तह, राज्य विस्तारासाठी,सूड घेण्यासाठी आणि भरीला त्यांचे तपशील! त्यात रस नसायचा म्हणून स्मरणशक्तिला ताण. मुलानी बापाचा खून करून राजा व्हायच असा क्रम म्हणे अनेक राजघराण्यात घडला. चांगल्या गोष्ती लक्षात ठेवा ही वडिलधार्यांची शिकवण मनात दृढ होतीच. . निरस गोष्टी लक्षात तरि कशाला ठेवायच्या?
केवळ वर्तमानात गुंतून रहायच म्हटल तरि वेळ अपुरा पडायचा. भूगोलाचेही तसेच. पिकांची नांव मास्तर सांगायचे- गहू,तांदूळ,ज्वारी,बाजरी,कोदो,कुटकी वगैरे;त्यांनी तरि ती कधि पाहिली होती कि नाही ही शंकाच आहे आम्ही पण गहू, डाळ,तांदूळ च्या ओघात तीही लिहून टाकायचो! त्या वयात भविष्यकाळ फक्त जोतिशांच्या कक्षेतला एवढीच कल्पना होती. विषय आभ्यासक्रमात म्हणून घोकमपट्टी करायची उत्तरात चूक कधि दिसलीच नाही हे आश्चर्य! नंतरच्या यत्तेत हे विषयच गळून गेले आणि त्याच समाधान मिळाल. काळ सरकत गेला आणि वर्तमानही बदलत गेला. मागे बघून पाहिल नाही आणि इतिहास दिसला-घडला-उलगडला असं क्वचितच निमित्तमात्र जाणवल ते सहली निमित्त राजवाडे,किल्ले बघायचा योग आला तेव्हां. मार्गदर्शकानी संगितल आणि कादंबरिच्या उत्सुकतेनी कानावर पडल तेव्हां ! त्या त्या काळात शिक्षकांनी किंवा अन्य कुणि नेल नाही म्हणून अनुभवल नाही. रुपेरी पडद्यावर कधि दिसल पण काल्पनिक चित्र खरं कशावरून ही शंका कायम होतीच.
लहानपणि घरात हॉल आणि इतर खोल्यांमधे भिंतींवर ऒळीनी अनेक फोटो लावलेले कौटुंबिक ग्रुप फोटो होते. बसलेल्यांच्या ओळीत फेटे-पगडी, काळी टोपी, सदरा-कोट-धोतर,अंगरखा-बंडी अशा जुन्या पद्धतीच्या पेहरावात पुरुष, लाल लुगड्याचा पदर डोक्यावर आणि काळाटिळा कपाळावर अशी आजि-पणजी टाईप अनोळखी मंडळी होती मागे उभ्यांच्या ओळीत नऊवारी नेसलेल्या -नटलेल्या स्त्रिया- त्यांचे ठळक दागिने,चापूनचोपुन गजरा माळलेले अंबाडे, सर्वात पुढे सतरंजीवर मांडी घालून किंवा वज्रासनात दाटिदाटिनी बसलेली बालमंडळी आठवतात. बर्याच मुलांच्या डोक्यावर जिगाच नक्षिकाम असलेली लाल टोपी, अंगात पिढ्यांन्पिढ्या चालत आलेला कोट किंवा बंडी तर रंगिबेरंगी,सळसळीत परकर-पोलक्यात नट्टापट्टा-वेणिफणि करून मुली दिसत.
काही काळांतरानी, मुंज,व्रतबंध,विवाह अशा प्रसंगी दूरून आलेल्या काही पाहुण्यांचे चेहरे त्या फोटॊंमधे दिसल्याची अस्पष्ट जाणीव झाल्याच स्मरते. अशा एका वेळी घरात "कुलवृत्तांताची प्रत" कुणीतरी वडिलांना दिली होती. थोडा वेळ चाळायला मिळाली. आपल नांव पाहून छान वाटल. दोन गोष्टि ठळकपणे जाणवल्या - खापर पणजोबांच किंवा आजोबांच नांव नातवाला तर संमांतर आजि-पणजींची नांव नंतरच्या पिढीत मुली-सुना-नातींना दिलेली. नांवांचा तुटवडा कि आपुलकी-कौटुंबिक जिव्हाळ्याचा पुरावा हे लक्षात आलं नाही. दुसरी गोष्ट- कुटुंबातील स्त्रियांना पुरुषांइतके प्राधान्य न दिल्यामुळे तपशील जवळपास शून्य होता; वंषाचा दिवा होता पण खाली अंधार !
काळाच्या उदरात ती माणस -ते फोटो गडप्प झालेत पण स्वतःच्या कार्किर्दीत असंख्य फोटो संग्रही गोळा झाले कां कुणास ठाऊक "त्या" मार्गानी हे जाऊ नयेत अस वाटू लागल आहे.त्या काळी फोटो अपओड करण्याच तंत्र ज्ञात नव्हत- आज आहे.कुलवृत्तांत अद्यावत करण्याचे प्रयत्न निरंतर व्हावे. नवीन पिढिला जुन्या मंडळींची ओळख करून द्यावी आणि त्यांनी महत्व जाणून ती करून घ्यावी अस वाटत. ते घडण्या-घडवण्याची संस्कार क्षमता येईल कशी हा खरा प्रश्न आहे
संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भात एक आख्यायिका स्मरते; गावकर्यांनी त्यांना वाळित टाकले असता त्यांनी आयोजित श्राद्धाला गावकरी हेटाळणी करण्यासाठी आले. काय पाहिल त्यांनी? त्या सर्वांचे पित्र जेवणावळींच्या पंक्तित तृप्त झालेले पाहून ते खजील झाले.
अशाच एखाद्या पंक्तीत आपण केव्हांतरि असणार !
पितृपक्ष - इतिहासाच एक पान
Submitted by bnlele on 8 October, 2014 - 04:22
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान... !
छान... !
योग्य जागी कस पोस्ट करता
योग्य जागी कस पोस्ट करता य्रील हे तंत्र कळत / जमत नाही. कुणी सांगितल पाहिजे म्हणजे वाचकांपर्यंत पोचता यीईल.
अरे .. तू मला सांगितलंस पोस्ट
अरे .. तू मला सांगितलंस पोस्ट करायला म्हणून मी ही केलाय.. आता तो डीलिट करून टाकते..
अजून काहितरि घोळ आहे म्हणून
अजून काहितरि घोळ आहे म्हणून एवढ्यात डिलीट करू नकॊ.
मला एक गोष्ट कळत नाही जर
मला एक गोष्ट कळत नाही जर आत्मा नवीन जन्म घेत असेल तर प्रत्येक जीव हा कुणाचा ना कुणाचा पितर असेलच ना? म्हणजे आपण सजीव हयात असताना कुणाचे ना कुणाचे तरी पितर असणार ना. त्यांनी आपले स्मरण केले की आपला आत्मा तिथे जाऊन पोहचतो का?