Submitted by हर्ट on 6 October, 2014 - 10:53
मला एक मदत हवी आहे त्वरित. धन्यवाद.
मोबाईलमधे जी कॉल हिस्टरी असते ना.. कुणाचे फोन आलेत, कुणाला केलेत आणि कुणाचे मिस झालेत तर ती यादी प्रिपेड आणो पोस्टपेडसाठी वेगवेगळी असते का? जर ह्या यादीतून एखादा फोन डीलीट झाला असेल तर (म्हणजे फोन नंबर डिलीट झाला असे म्हणत नाही तर यादीतून फक्त डीलीट झाला असेल तर ) तो परत त्या यादीत आणता येतो का? कसे?
आणखी एक, आपल्या मोबाईलला दोन प्रकारच्या मेमरीज असतात. एक जी फोनच्या आत असते आणि दुसरी जी फोनमधे टाकलेली असते. ही दुसरी मेमेरी बाहेर काढता येते. तशी ही पहिली मेमेरी बाहेर काढता येते का?
जेंव्हा आपण एखादा फोटो ब्लुटुथद्वारे आपल्या फोनमधे डाऊनलोड करते आणि जर हा फोटो आपण डीलीट केला तर तो परत मिळू शकतो का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणाचे फोन आलेत, कुणाला केलेत
कुणाचे फोन आलेत, कुणाला केलेत आणि कुणाचे मिस झालेत तर ती यादी प्रिपेड आणो पोस्टपेडसाठी वेगवेगळी असते का? जर ह्या यादीतून एखादा फोन डीलीट झाला असेल तर (म्हणजे फोन नंबर डिलीट झाला असे म्हणत नाही तर यादीतून फक्त डीलीट झाला असेल तर ) तो परत त्या यादीत आणता येतो का? >>> नाही
आपल्या मोबाईलला दोन प्रकारच्या मेमरीज असतात. एक जी फोनच्या आत असते आणि दुसरी जी फोनमधे टाकलेली असते. ही दुसरी मेमेरी बाहेर काढता येते. तशी ही पहिली मेमेरी बाहेर काढता येते का? >> नाही
डाऊनलोड करते आणि जर हा फोटो आपण डीलीट केला तर तो परत मिळू शकतो का? >> नाही
>> जर ह्या यादीतून एखादा फोन
>> जर ह्या यादीतून एखादा फोन डीलीट झाला असेल तर तो परत त्या यादीत आणता येतो का?
नाही
>> तशी ही पहिली मेमेरी बाहेर काढता येते का?
नाही
>> जर हा फोटो आपण डीलीट केला तर तो परत मिळू शकतो का?
नाही
>> जर ह्या यादीतून एखादा फोन
>> जर ह्या यादीतून एखादा फोन डीलीट झाला असेल तर तो परत त्या यादीत आणता येतो का?
नक्की काय करायचं आहे? तो नंबर कुठला आहे याची माहिती हवी असेल तर सेल्फोन कंपनीच्या डिटेल्ड स्टेटमेंट मधुन मिळु शकेल.
>> जर हा फोटो आपण डीलीट केला तर तो परत मिळू शकतो का?
कुठला फोन आहे त्यावर (आणि त्याच्या सेटींग्वर) अवलंबुन. आय्फोनवर हि सोय आहे...
>> जर ह्या यादीतून एखादा फोन
>> जर ह्या यादीतून एखादा फोन डीलीट झाला असेल तर तो परत त्या यादीत आणता येतो का?
होय.
त्या माणसाला पुन्हा मिस कॉल देण्यास सांगावे.
>> तशी ही पहिली मेमेरी बाहेर काढता येते का?
होय.
फिजिकल स्वरूपात काढण्यासाठी फोन उघडावा लागेल. फोनचे मॉडेल सांगितलेत तर स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगतो. मेमरी चिप बाहेर काढता येईल. सोपा मार्ग म्हणजे फोनला नारळ समजता येईल.
'अॅक्सेस' करायची असेल तर यूएसबी केबलने कॉम्प्युटरला जोडा, इंटर्नल मेमरीचा यूजर अॅक्सेसिबल भाग पहाता येईल.
फोन रूट केलात, तर संपूर्ण मेमरी पहाता येईल.
>> जर हा फोटो आपण डीलीट केला तर तो परत मिळू शकतो का?
होय.
ब्लूटूथवरून पुन्हा एकदा सेण्ड करावा.
अनडिलिट करण्यासाठी सॉफ्टवेअर्स आहेत. डेटा किती महत्वाचा त्यानुसार बजेट किती ते सांगा, मार्ग सुचवतो.
http://www.android-recovery-t
http://www.android-recovery-transfer.com/recover-android-photos.html
सर्वांचे धन्यवाद. इब्लिस,
सर्वांचे धन्यवाद.
इब्लिस, डाटा खूप महत्त्वाचा आहे.
मी रुट करुन पाहिले पण माझ्याकडून रुट यशस्वी झाले नाही,
फोन सॅमसंगचा आहे अॅन्डॉईड.
तो फोटो परत पाठवता आला असता तर ते आधीच नसते केले का.
माझ्याकडे फोटो अनडीलीट करण्याचे एक उत्तम टुल आहे पण मुळात आधी मेमेरी हाताशी लागायला हवी ना? फोन पीसीला जोडला की फोनची ड्रीईव दिसत नाही.
मी तुम्हाला एक मेसेज लिहित आहे. तो प्लीज वाचावा. मी नंतर लिहिन तुम्हाला.
रूट यशस्वी झाले नाही? ब्रिक
रूट यशस्वी झाले नाही? ब्रिक केलाय का फोन?
ब्रिक नाही केला. मला आता
ब्रिक नाही केला. मला आता नेमके आठवत नाही. मी सबंध आठ दिवस पीसी आणि फोनवर होतो. इतके काही काही करुन पाहिले की मलाच आता आठवत नाही की मी काय काय केले. मला एक गोष्ट लक्षात आली की फोनची आतली मेमरी ही एन. टी. एफ. एस. सिस्टम दाखवते आणि जी मेमरी काढता येते ती फॅट मधे दाखवते.
तुम्ही पुण्यात आहात का?
बी, तुमच्या फोनच्या
बी, तुमच्या फोनच्या मॉडेलनुसार योग्य ते काईज डाऊनलोड करा अन त्यातून फोन पहा. आतली मेमरी अॅक्सेस होईल.
मी पुण्यात नाही.
एन. टी. एफ. एस. सिस्टम दाखवते
एन. टी. एफ. एस. सिस्टम दाखवते >> ऑ??? एनटीएफेस मायक्रोसॉफ्टची सिस्टीम आहे, ती अँड्रॉइड मधे कशी येईल?
एन. टी. एफ. एस. आणि फॅट हे
एन. टी. एफ. एस. आणि फॅट हे दोन पार्टिशन्सचे प्रकार आहेत.