Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ती फॉर्च्युन सोयाबीन
मला ती फॉर्च्युन सोयाबीन ऑईलची जाहीरात खूप आवडते. झी मराठीवर नेहेमी लागते. हॉस्टेलाईट मुलगा तिथल्याच लोकल मैत्रीणीसोबत तिच्या आईच्या हातचा स्वयंपाक खायला जातो. आणि कळतं कि रोज त्याला आवडत असतो तो स्वयंपाक तिचे बाबा करत असतात. त्यात विशेष काय आहे हे मला नक्की सांगता येणार नाही. पण ते आजोबा.. "अरे उमेश.. पुरी खातोस का?" असं मिश्किलपणे विचारतात आणि तोपण हावरटपणाने "हो.. खातो की" असं म्हणतो तेव्हा मला प्रत्येक वेळी हसु येतंच.
ती कार्टूनिस्ट ची जाहिरात खूप
ती कार्टूनिस्ट ची जाहिरात खूप आवडली
लिंक बद्दल धन्यु 
स्टार प्लस ची विराट कोहली,
स्टार प्लस ची विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि महेन्द्रसिंग धोनी यांची जाहिरात आवडली.
आपापल्या जर्सीवर आईचं नाव लिहून त्यावर "माझं आडनाव (वडिलांनी दिलेलं) एवढीच माझी ओळख का रहावी, आईचं नाव सुद्धा माझी ओळख बनू शकते" असं स्पष्टीकरण कोहली करतो. मस्त वाटली जाहिरात.
एक ऑलिव्हिया की अशाच
एक ऑलिव्हिया की अशाच कुठल्यातरी ब्युटी क्रीमची जाहिरात आहे. त्यातली मॉडेल कसली भयाण आहे. गरिबांची मानसी नाईक !!
गरिबांची मानसी नाईक !!>>> मला
गरिबांची मानसी नाईक !!>>> मला मुळात मानसी नाईकच गरिब वाटते
गरिबांची मानसी नाईक !!>>> मला
गरिबांची मानसी नाईक !!>>> मला मुळात मानसी नाईकच गरिब वाटते डोळा मारा >>>>>
मीही हेच लिहिणार होते. मानसी नाईक स्वतः काही कमी भयाण नाही.
हा भयाण शब्दाचा अपमान आहे.
हा भयाण शब्दाचा अपमान आहे.
मराठीतली ऐश्वर्या राय ना ती?
मराठीतली ऐश्वर्या राय ना ती?
मराठीतली ऐश्वर्या राय ना
मराठीतली ऐश्वर्या राय ना ती?>>> गरिबांची मानसी नाईक >>>>गरिबान्ची ऐश्वर्या राय आहे ती.
गरिबांची मानसी नाईक !!>>> मला
गरिबांची मानसी नाईक !!>>> मला मुळात मानसी नाईकच गरिब वाटते
>>> गरिबांची मानसी नाईक असं म्हणून मी मानसी नाईकचा भयाणपणाच अधोरेखित केलाय
म्हणजे गरीबांची सुद्धा
म्हणजे गरीबांची सुद्धा ऐश्वर्या राय नाही तर गरीबांचीही मानसी नाईक...म्हणजे एकदमच डाऊन!
गुड डे ची दीपिका पदुकोन ची
गुड डे ची दीपिका पदुकोन ची जाहिरात आवडली, ऍमेझॉन च्या पण हल्ली जाहिराती छान आहेत.
सध्या आवडलेली जाहिरात. गुगल
सध्या आवडलेली जाहिरात. गुगल पिक्सल फोन ची छोट्या मुलीची.
बॅकग्राउंडला Paak & tUnE-yArDs चं “Water Fountain.” हे गाणं.
क्यूट मुलगी + कॅची गाणं !
सध्या अॅमेझॉनच्या जाहिराती
सध्या अॅमेझॉनच्या जाहिराती केवळ कोंकना सेनमुळे आवडतात.... "अरेऽ...वो...ब... यलो सारी है ना..."... किती सहज वावर असतो तिचा!
पण झरिना वहाबच्या उच्चारांची मजा वाटते - जिब एमेझॉन पे मिले छे किरोड से भी जिदा प्रूडक्ट्स ...
मेक माय ट्रिप च्या आलिया
मेक माय ट्रिप च्या आलिया-रणवीर या जोडीच्या दोन जाहिराती पाहिल्या आणि दोन्ही आवडल्या.
पहिली.. तीलवाला फुलवाला , कलरफुल कपड्यातला रणवीर आणि तोंड मुरडत बोलणारी आलिया.
दुसरी.. फोनवर बुकिंग कॅन्सल करता येतं सांगणारा जिग्नेस (रणवीर) आणि हे समजताच त्यावर भन्नाट एक्स्प्रेशन्स देणारी आलिया.
छोट्याश्याच जाहिराती, पण दोघांचेही एक्स्प्रेशन्स आणि टायमिंग अफाट !
झी मराठी एच डी ची जाहीरात
झी मराठी एच डी ची जाहीरात भिकारात भिकार आहे.
सिल्क ओरिओची अॅड मस्तच आहे
सिल्क ओरिओची अॅड मस्तच आहे , हाताला फ्रॅक्चरची . त्या मुलाचे एक्स्प्रेशन छानच आहेत .
`मै तेरी मा हुं, दोस्त नहीं '
`मै तेरी मा हुं, दोस्त नहीं ' असं काहीतरी असणार्या (ऑल आउट च्या) अॅड मधे आई झालेली डिंपल आहे का?
तुम्ही प्लिज लिंका देणार का
तुम्ही प्लिज लिंका देणार का या जाहिरातींच्या?

रीया, शोधलं की सापडतंच https:
रीया, शोधलं की सापडतंच
https://www.youtube.com/watch?v=CjQJ_lYdsdo
मेक माय ट्रिप च्या
मेक माय ट्रिप च्या लिंक्सः
https://www.youtube.com/watch?v=WFZCsjd2c2s
https://www.youtube.com/watch?v=zuI0JDq3TQw
गुगल पिक्सल फोन ची लिंकः
https://www.youtube.com/watch?v=5lv89JZcrmI
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=779KwjAYTeQ
भावना गोवेकर,,खरंच डोळे भरुन आले.
एक मोबाईल फोन ची जाहिरात येत
एक मोबाईल फोन ची जाहिरात येत आहे एक कपल मुलगी ऍडॉप्ट करतात आणि नवरा फोटो काढतो मागील अनाथाश्रमाच्या बोर्डाला ब्लर करून.
https://youtu.be/wwv7JgJpMY4
https://youtu.be/wwv7JgJpMY4
आलिया भट फ्रुटीची जाहिरात आवडली.
हा त्रीवागो वाला कोण आहे? आणि
हा त्रीवागो वाला कोण आहे? आणि बजाज फायनान्स
या दोन्ही कंपन्यांनी आपली जाहिरात करण्यासाठी जे मार्ग अवलंबले आहेत त्यामुळे जाहिरात करण्यामागचा जो मूळ उद्देश असतो त्याच्या बरोब्बर उलट परिणाम होत आहे. सातत्याने तो annoying मनुष्य बघून त्रीवागो वर एकदाही जायची इच्छा होत नाही. आणि वेळीअवेळी सतत येणारे बजाज फायनान्सच्या फोन कॉल्स मुळे भविष्यात गरज पडली तरीही बजाज फायनान्स कडून कर्ज घ्यायची कदापि इच्छा होणार नाही.
हा त्रीवागो वाला कोण आहे >>
हा त्रीवागो वाला कोण आहे >> त्यांचाच CFO ki CEO आहे तो
बाकी बजाज फायनान्स साठी खरेच ते खूप त्रास देतात
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=779KwjAYTeQ
भावना गोवेकर,,खरंच डोळे भरुन आले.>>> +११११११
पण सुरवातीच्या दीड मिनिटभर ती 'Samsung' ची जाहिरात न वाटता 'Maruti Eeco' गाडीची जाहिरात वाटते.
वेळीअवेळी सतत येणारे बजाज फायनान्सच्या फोन कॉल्स मुळे भविष्यात गरज पडली तरीही बजाज फायनान्स कडून कर्ज घ्यायची कदापि इच्छा होणार नाही.>>>>
खरंच घेऊ नका. त्यानेच अशांना अद्दल घडेल.
असे कॉल्स टाळण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदणी करा. त्यासाठी आपल्या मोबाईल क्रमांकावरून 'START 0' असा मेसेज '1909' या क्रमांकावर पाठवा. नोंदणी होण्यास ७ दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतरही कॉल सुरूच राहिले तर 1909 या क्रमांकावर फोन करून तक्रार दाखल करा.
लक्षात ठेवा, आपला भ्रमणध्वनी संच (मोबाईल ) ही आपली वैयक्तिक मालमत्ता आहे. आपल्या इच्छेविरुद्ध / परवानगीशिवाय त्यावर जाहिरातींचे संदेश पाठवण्याचा / कॉल करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
आपल्या सिरीयल्स मधेही असतं की
.
>> असे कॉल्स टाळण्यासाठी आपला
>> असे कॉल्स टाळण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदणी करा.
ते कलेले आहेच तरीही त्यांचे वेळीअवेळी त्यांचे रोबोटीक फोन यायचेच. रेकॉर्ड केलेले. आणि ते सुद्धा वेगवेगळ्या नंबर वरून. एक ब्लॉकर आहे मल्टीपल कॉल ब्लॉक करणारा तो लावला. तरीही उपयोग नाही. शेवटी वैतागून त्यांच्या साईटवर जाऊन जे काही इमेल्स दिसले तिकडे कायदेशीर कारवाई करण्याची इमेल लिहिली. मग त्यांच्या एका ऑफिसरचा फोन आला. डीएनडी लावूनही तुमचे फोन येतातच कसे वगैरे खूप बोललो. मग फोन बंद झाले.
पण मला एक कळत नाही आपल्या जाहिरातबाजीचा ग्राहकावर नकारात्मक परिणाम होत आहे हे त्यांना कळत कसे नसेल.
आलिया भट फ्रुटीची>>>
आलिया भट फ्रुटीची>>>
Composed by Amit Trivedi as per Google
Pages