आम्ही स्वतंत्र आहोत ????
का हा माणसातला सैतान जागा होतो
का मग हा सैतान आई- बहिनीना त्रास देतो?
कधी जन्मदाताच तिला मारून फेकतो कधी पैशांसाठी विकतो ...
काल स्त्री-भ्रूण- हत्या तर आज बलात्कार
अशा या जगात तीनं का? आणि काय म्हणून जगायचं?
स्त्रियांनी स्वतःच्या संरक्षणासाठी किती लढायचं ?
माहेरी परक्याच धन म्हणून संभाळल जात
सासरी पायाखालची धूळ म्हणून राबवल जात
का? का ? इतके दुःख सहन करावे लागतात स्त्रीला
का पावलो-पावली अत्याचार सहन करावा लागतो तिला
सुनेला मारहाण केल तरी तीला सासरीच राहव लागत
पण जावयाला कुणी काही बोलल,
मग तीच माहेरपणच बंद केल जात
मुलगी , बहिण , मैत्रीण, या नात्यांसाठी तिला क्षणक्षण झुराव लागत
कपाळावरच कुंकू आणि मंगळसुत्रासाठी जणू रोबोर्टच बनाव लागत
स्वतंत्र ? अहो स्वतंत्र? म्हणतो ना आपण आपल्या देशाला
मग का?? आजही स्त्रीला पारतंत्र्यात जगाव लागतय?
घरातून कामासाठी बाहेर पडणारया स्त्रीला नाक्यावर छेडल जात
कधी पायदळी तुडवलं जात
जनावरावर पण इतके अत्याचार होत नसतील ओ
तितके अत्याचार तिच्यावर केल जात...
प्रत्येक बाबतीत तिला कमीपणा दाखवला जातो
स्त्री म्हणजे अबला हे समीकरण तिच्या समोर मांडलं जात
काही घरात आज हि बायकोला कोणताही निर्णय घेण्यापासून रोखल जात
"ए आई तुला काही कळत नाही ग" म्हणून चार माणसात टोकल जात
अपहरण बलात्कार, सामुहिक बलात्कार, केल जातो
भर बाजारात एका मुलीला, एका आईला, एका बहिणीला उघड केल जात
आजूबाजूला जमलेला समाज मग डोळे बंद करून घेतो
आम्ही काहीच पाहिलं नाही अस बोलायला मोकळा होतो
बिचारी कळवळत असते
मला वाचवा मला वाचवा म्हणून रडत असते
मदतीचा हात मागत असते
पण.... कुणीही तीला मदत करत नाही...
माणूस माणूसच असते ना ओ ती
पण... पण मदतीच्या वेळी तिला का????? का कुणीच ओळखत नाही
आज स्त्रीला आरक्षणाची नाही संरक्षणाची गरज आहे.
त्यासाठी कुणी महान व्यक्ती नको....
तुमच्यासारख्याचआणि तुम्च्यातल्याच
सामान्य जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे ....
तेव्हाच आणि तेव्हाच आम्ही मुली म्हणू शकतो..... आम्ही स्वतंत्र आहोत.
कविता गोरे