Submitted by सुशांत खुरसाले on 23 September, 2014 - 02:24
आशेचा वारा नाही, इच्छांचे वादळ नाही
या डोहामध्ये आता कुठलीही खळबळ नाही
दिवसाच्या गर्भामधला हा प्रकाश फसवा दिसतो
अन् रात्रीच्या डोळ्यांना उरलेले काजळ नाही
खंबीर कुणी ठरवावे, मी भरीव नाही इतका
फुंकून सूर उमटावे इतकाही पोकळ नाही
त्याच्या शब्दांची वाचा गेलेली आहे मित्रा
ते झाड असे की ज्याच्या पानांची सळसळ नाही
नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही
तुमच्याच स्मृतींच्या दारी मी ठिबकत आहे नुसता
पण माझ्यापर्यंत माझा आलेला ओघळ नाही
--सुशांत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर... अनेक शेर, अनेक
खूप सुंदर... अनेक शेर, अनेक ओळी आवडल्या....
तुमची वन ऑफ द बेस्ट वाटते ही मला...
नात्याला गांभिर्याचा संसर्ग
नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही
अफलातून !
या गझलेसाठी सलाम !
धन्यवाद !
आनंदयात्री , सुप्रियाताई, खूप
आनंदयात्री , सुप्रियाताई, खूप खूप आभार !
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही<<< जबरदस्त ओळ
सुंदर गझल
शेवटच्या ओळीत 'माझ्यापर्यंत' ह्या शब्दात एक मात्रा वाढत आहे.
अभिनंदन!
मतला आवडला.. अनेक ओळी
मतला आवडला.. अनेक ओळी सुन्दर आहेत.
सगळे शेर आवडले माझ्यापरेंत
सगळे शेर आवडले
माझ्यापरेंत असा काहीसा उच्चारही मी करत असल्याने अडखळलो नाही
शुभेच्छा
बेफिजी , डॉक्टरसाहेब, वैवकु
बेफिजी , डॉक्टरसाहेब, वैवकु ..thanx a lot !
'माझ्यापर्यंत' बाबत विचार करतो .
सुंदर गझल सुशांत!! धन्यवाद
सुंदर गझल सुशांत!! धन्यवाद
फुंकून सूर उमटावे इतका मी
फुंकून सूर उमटावे इतका मी पोकळ नाही -- क्या बात है!!
गझल फार आवडली!!
बढिया गझल, सुशांत अनेक
बढिया गझल, सुशांत
अनेक शुभेच्छा.
नात्याला गांभिर्याचा संसर्ग
नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही
अफलातून !
या गझलेसाठी सलाम
वा वा वा
खूपच छान रचना.
खूपच छान रचना.
खूप सुंदर
खूप सुंदर
दिवसाच्या गर्भामधला हा प्रकाश
दिवसाच्या गर्भामधला हा प्रकाश फसवा दिसतो
अन् रात्रीच्या डोळ्यांना उरलेले काजळ नाही
अतिशय सुंदर गझल... काजळ पोकळ,
अतिशय सुंदर गझल... काजळ पोकळ, ओघळ फ़ार आवडले..
फुंकून सूर उमटावे इतका मी पोकळ नाही >> ’मी’ च्या जागी ’ही’ घालून वाचले...
’मी’ च्या जागी ’ही’ <<
’मी’ च्या जागी ’ही’ << मिल्याशेठ +१
मलाही हाच बदल सुचलेला पण म्हटलं सारखं सारखं काही न् काही सांगीतलेलं बरं नाही म्हणून सांगीतलं नाही . पण हा बदल सुधारणा घडवेल हे नक्की . पटल्यास अवश्य करावा .
खूप खूप आभार सर्वांचे
खूप खूप आभार सर्वांचे ..
मिल्याभाऊ , बदल आवडला . करतोय. धन्स ..:)
नात्याला गांभिर्याचा संसर्ग
नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही
मस्त !
खूप सुंदर .
खूप सुंदर .
धन्स रसप ,भारतीताई ..
धन्स रसप ,भारतीताई ..
खूप सुंदर.
खूप सुंदर.
'अवखळ' हा सर्वात विशेष वाटला.
'अवखळ' हा सर्वात विशेष वाटला.
क्या बात है
क्या बात है सुशांतराव....तुमच्या शेरांना खरचं वेगळं कोंदण असत राव..
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
गझल फार आवडली!! >>> +9999
गझल फार आवडली!! >>> +9999
मस्त !! फारच छान !!
मस्त !! फारच छान !!
नात्याला गांभिर्याचा संसर्ग
नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही
अप्रतिम शेर,
अतिशय सुंदर गझल
सुशान्त, अत्यन्त सुन्दर गज़ल
सुशान्त, अत्यन्त सुन्दर गज़ल!!
' माझ्यापातुर' कसे वाटते?