Submitted by कविता केयुर on 22 September, 2014 - 02:47
समुद्रावर गेले तर
लाटांनीच दिली
तू असल्याची वर्दी
वाळूत चालताना या
पावलांनीही ओळखली
तुझ्या पावलांची सोबत
दूरवर चालणारी …
हातांनीही जाणला तो स्पर्श
गुंफलेल्या तुझ्या हातांचा
इतक्यात वाऱ्याने हलकेच
सांगितला तुझा निरोप
तेव्हाच समजल मला,
तुझ्या नसण्यातही
होत तुझच असण …
प्रत्येक आठवणीत होती
तू तिथेच असल्याची खूण
ओठातील हसण्यात
श्वासातील जगण्यात
कधी असूनही नि:शब्द
कधी नसूनही भासणारं
होत तुझच असण …
मग डोळ्यांत,श्वासात, मनांत
भरले मी नीळे रंग
अन् स्वप्नात परतले
घेऊन सोबत तुझं असण
तर तू इथेच होतास…
तेव्हाच पटलं,
त्या सात पावलांनीच
व्यापल होत आपण
एकमेकांच 'अस्तित्व '
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा