बरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.
तर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.
विषय असा कि, तुम्ही तुमच्या मुलाला / मुलीला शाळेत घालताना नेमका काय विचार केलात? ( the decision making process).
१) तुम्हाल शाळेकडुन काय अपेक्षा होत्या?
२) त्या अपेक्षा तुम्ही निवडलेली शाळा पुर्ण करेल असे तुम्हाला का वाटले? (नेमका काय सर्वे केलात?)
३) तुम्ही निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा पुर्ण झाल्या का? किती प्रमाणात? कि पुर्ण अपेक्षाभंग झाला? आणि झाला तर त्यावर तुम्ही काय उपाय केलात?
४) आता अपेक्षा व्यतिरिक्त तुम्ही नेमका कोणता कन्व्हिनियन्स बघितला?
५) प्रवेश घ्यायच्या अगोदर तेथील मॅनेजमेंट / स्टाफ यांच्याशी बोललात का?
६) समजा ३-४ शाळांची निवड करुन त्याची प्रायोरिटी ठरवली असेल तर निवड करण्याचे निकष आणि प्रायोरिटी ठरवण्याचे निकष कोणते होते? ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला? )
७) दुसर्या लोकांना तुम्ही या प्रोसेस मध्ये कशी मदत केलीत किंवा त्यांच्याकडुन घेतलीत?
या फक्त काहि रुपरेषा आहेत. याव्यतिरिक्त काहि गोष्टी असतील तर त्याही जरुर नमुद कराव्यात.
धन्यवाद
हर्मायनी आणि सगळेच,
हर्मायनी आणि सगळेच, प्रतिसादाला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
दिनेश, अगदी नक्कीच
हर्पेन, लिहिण्याबद्दल विशेष असं काही सध्या तरी डोक्यात नाही. खुप मोठा आवाका असलेला विषय आहे, जरी मी एक मुख्य पालक असले तरी त्यातले मुद्दे मला नीटपणे मांडता येतील की नाही याबद्दल साशंक आहे.
शाळाव्यवस्थेचे तोटे नको होते म्हणुन होम स्कुलिंग सुरू केलं, हे सांगतानाच हेही नमूद करायला हवं की शाळेचे फायदेही आम्हाला आपसुकच नाकारावे लागले आहेत. उदा. ग्रुप अॅक्टिव्हिटीज. खेळांच्या स्पर्धा, स्नेहसंमेलने, एन्.सी.सी./स्काऊट सारख्या सुविधा, अगदी युनिफॉर्मसुद्धा. यातला स्पर्धेचा मुद्दा नको असला तरी त्यातून एक महत्वाची सांघिक भावना तयार होते, ती निदान दहावीपर्यंत तरी आमच्या मुलांना अनुभवता येणार नाही. दहावीनंतर ही मुले पुन्हा मुख्य धारेतच येणारेत तेव्हा यातल्या काही बाबींची उणीव कॉलेजमधे भरून निघू शकते. तरीही काही मिळवताना काही गमवावे लागते हे मान्य करावेच लागेल.
हर्मायनी, ही मुले दहावीला बाहेरून बसणारेत आणि त्यानंतर इतर मुलांप्रमाणेच त्यांचे पुढचे शिक्षण होणार आहे. माझ्या काही मैत्रिणींच्या मुली दहावी होऊन आता कॉलेजला गेल्या आहेत आणि अकरा वर्षात एकपण दिवस शाळेला न जाताही सरासरी ७२ ते ८३% अशी त्यांची दहावीची टक्केवारी आहे. आमच्यासाठी आणि एकंदरच ही टक्केवारी समाधानकारक आहे. दहावीपर्यंत त्यांचा कलही ब-यापैकी पक्का झालेला असल्याने त्यांना त्या त्या स्पेशलायझेशनला जाणे सोयीचे पडले.
साती म्हणते तो मुद्दा अगदी खरा आहे, ही मोठी जबाबदारी आहे, संपुर्ण डेडिकेशन लागणारी, पालकांसाठी अगदी डिमांडिंग आहे. पालकांकडे मुख्य मनाची तयारी, वेळ, एनर्जी आवश्यक, बाकीच्या गोष्टी मग आपोआप होतात.
सई, अकरा वर्षे अजिबात शाळेत न
सई, अकरा वर्षे अजिबात शाळेत न गेल्यावर एकदम अकरावीला कॉलेजमधे गेल्यावर त्यांना काही प्रॉब्लेम्स आले का? होम स्कुलिंगवाले तुम्ही अधे मधे एकत्र भेटता का? घरीच शिकवायचं असल्याने मागे पडण्याचा (कंटाळा आलाय आज नको शिकायला-शिकवायला इ. मुळे) धोका जास्त असु शकतो, त्याकरता तुम्ही काय करता.. एकुणच तुम्ही वर्षभराचं प्लॅनिंग कसं करता?
सई, एक लेखच लिही ना! आमच्या
सई, एक लेखच लिही ना!
आमच्या शंका दूर होतील.
बाकी काल तुला प्रश्नं विचारल्यावर जरा गुगललं तर महाराष्ट्राततरी एक्सटर्नल स्टुडंट म्हणून बसायचा ऑप्शन दहावी बारावीच्या मुलांना आहे हे कळले.
http://homeschoolers.in/boards-and-homeschoolers/
या दुव्यावर बरीच माहिती सापडली.
अर्थात मला होम स्कूलिंग मुलांचं सर्व सामाजिक स्तरात सहज मिसळणे होत नाही म्हणून आवडत नाही.
पण एकंदर ही कल्पना फार आवडते.
एक मध्यम मार्ग सध्या असा सुचतोय की शाळेतला अभ्यास शाळेवरच सोडून द्यावा.
घरी मुलाच्या आवडीचे विषय शिकवावे.
पण त्यालाही बराच वेळ जवळ असणे गरजेचे आहे.
आणि शाळेचा गृहपाठ जरा जास्तच वेळ चालतो.
साती, मुलं नववीत पहिल्यांदाच
साती, मुलं नववीत पहिल्यांदाच नापास होतात. त्यातली बहुसंख्य नववीच्या वर्गात आणखी एक वर्ष काढण्यापेक्षा प्रायव्हेट एसेसी( एक्स्टर्नलसाठी क्लासेसनी काढलेला शब्द). अकरावीत नापास झालेली मुलंही हे करतात.
सई, तू जे फायदे म्हणालीस
सई, तू जे फायदे म्हणालीस त्यात अजून काही -
शाळेचे दिवस म्हंटले की मित्र मैत्रिणींबरोबर केलेली मजा - शिस्तीत राहून केलेले प्रँक्स , शिक्षकांना दिलेला त्रास , एकमेकांना वाचवणं, उगाचं पीटीचा तास झाला तरी इकडे तिकडे करणं हे सगळं आणि अजून बरचं काही ही मुलं मिस करतील असं वाटलं.
अभ्यास / शिक्षण चांगलं मिळेल, स्पर्धा नसेल हे तर आहेचं पण ही सगळी मजा - शिस्तीत राहून बेशिस्त वागणं - ते नक्कीचं मिस करतीलं.
अवांतर - मी आणि एक मैत्रिण क्लास टीचरना इतका त्रास द्यायचो , की दहावी झाल्यावर त्यांनी तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजला आहात ना, हा प्रश्ण सगळ्यात आधी विचारला होता
हो मला माहित्येय. १७ नंबर
हो मला माहित्येय.
१७ नंबर फॉर्म वाल्या कित्येक मुलांचा मी अकरावीत गेल्यावर अभ्यास करून घेतलाय.
मयेकर, तुम्ही लिहिलिये तशी
मयेकर, तुम्ही लिहिलिये तशी /त्या प्रकारची एक शाळा इथे आहे. माझ्या पुतण्याच्या अॅडमिशनसाठी दिर-जाऊ त्या शाळेला भेट देवून आले होते. पण शाळा आणि घरामध्ये जास्तित जास्त ५ किमी अंतर असलेलं चालत होतं. आणि ती शाळा आमच्य घरापासून २०+ किमी अंतरावर आहे. शाळेच्या जवळपास रहायला जाणं /घर विकत्/भाड्याने घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं म्हणून पुतण्याला तिथे प्रवेश दिला नाही. आयामच्या वेळी पण तिच परिस्थिती असल्याने आम्ही तिथे प्रवेशासाठी अर्ज केला नव्हता.
मिराम्बिका नाव आहे त्या शाळेचं. पूर्वी ती शाळा ७-८ पर्यंत होती. (सध्याची स्थिती माहित नाही). त्यामूळे ९-१० साठी तिथल्य विद्यार्थ्यांना दुसर्या नेहेमीच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागे. त्यावेली किमान एखादं वर्ष मुलांसाठी खूप अवघड जाई असं वाचण्यात आलं आहे. याचं कारण या शाळेत एकावेळी ८-१० मुलांच्या ग्रूपला घोळक्यत बसवून त्यांच्या आवडीचा विषय समजावला जातो. सेल्फ स्तडीवर, प्रोजेक्ट्स वर भर दिला जातो. प्रोजेक्ट्स मुलंच निवडतात. १०-१५ मिनीटांनी मुलं ब्रेक घेवून दुसरं काही करू शकतात. ही पद्धत मुलांसाठी चांगली असली तरी नंतर जर नेहेमीच्या सिस्टिममध्ये जायचं असेल तर त्यांना त्या प्रेशरची सवय नसल्याने त्रास होतो.
होमस्कुलींग च्या ऑप्शनचा आम्ही विचारही केला नव्हता. दोघांना इतका वेळ देता येईलच याची खात्री नाहीये. आणि सोबत दुसरी काही मुलं आणि पालक असते तर विचार करू शकलो असतो कदाचीत.
सध्याच्या शाळांमध्ये त्यातल्या त्यात बरी शाळा / कमी प्रेशर असणारी शाळा शोधणे एवढं आम्ही करू शकतो.
सध्याच्या शाळेचे प्लस पॉइंट्स
सध्याच्या शाळेचे प्लस पॉइंट्स :
१.शाळेला मोठ्ठं मैदान आहे. खेळाचे शिक्षक (टेटे, व्हॉलिबॉल, क्रिकेट) चांगले आहेत.
२.खेळाशिवाय संगीत, वाद्य, चित्रकला, नाटक, नॄत्य इ साठी सुद्धा भरपूर वेळ दिला जातो. पहिली-दुसरीमध्ये मुलांना वेगवेगळ्या क्लबमध्ये जायची संधी मिळते. त्यातल्या ज्या विषयात मुलांना गती आहे /आवड आहे त्या विषयाच्या क्लबमध्ये पुढे बारावी पर्यंत पुर्णवेळ मेंबरशीप मिळते.
३. गृहपाठ अजूनतरी जास्तित जास्त १-२ पानं दिवसाला इतकाच मिळतो.बर्याच वेळा गृहपाठामध्ये काहीही लिखाणकाम नसतं.
४. फी इंटरनॅशनल शाळांच्या फी इतकी भरमसाठ नाहीये. (तरीही आम्हाला जास्तच वाटते म्हणा) सध्या दिल्लीमध्ये असलेल्या शाळांच्या फी ग्रूपमध्ये सगळ्यात कमी फी वाल्या शाळांमध्ये आहे आमची शाळा.
५. मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन या तिन्ही गटातले मुलं आहेत मुलाच्या वर्गात.
६. शाळेला स्कुलबस आहे. व्हॅनमध्ये कोंबून मुलाला शा़ळेत पाठवायची गरज नाही.स्कुलबस मध्ये मेल्/फिमेल अटेंडंट असतात. ड्रयव्हर्स, अटेंडंट्स् आणि इतर शिक्षकेतर कर्मचारीवर्ग खूप चांगला आहे.
शाळेचे मला न आवडणारे पॉइंट्सः
१. परिक्षा घेतल्या जातात. पहिलीपासून एका सत्रात प्रत्येक विषयाच्या दोन युनीट टेस्ट, दोन फॉरमॅटिव्ह असेसमेंट्स (यात तोंडी परिक्षा, वाचनाची परिक्षा, कोडी, प्रोजेक्ट्स इ. प्रकार असतात) आणि एक सत्र परिक्षा असते. सत्र परिक्षेचा अभ्यासक्रम बराच जास्त असतो. या सगळ्या परिक्षांना ग्रेड न देता मार्क दिले जातात.
२. वर्गात जरा जास्तच लिखाण काम केलं जातं. विषयाच्या अनुशंगाने येणार्या (पुस्तका बाहेरच्या) बर्याच इतर बाबी मुलांना शिकवल्या जात नाहीत.
३. दुसरी-तिसरीनंतर प्रेशर अजून वाढत जाईल असं इतर पालकांचं म्हणणं आहे. सगळेच पालक मुलांना अभ्यासाठी भयानक प्रेशराइज करतात. अगदी पहिलीच्या परिक्षेसाठी सुट्टी घेणार्या आणि इतर अॅक्टिव्हीटीज बंद करणार्या माता माझ्या ओळखीत आहेत.
४. इतर पालकांचा कोणत्याही नव्या प्रयोगाला विरोध असतो.
५. जंक फुड, वेगवेगळ्या वस्तू यांचं पिअर प्रेशर मुलांवर असतं. (आयामच्या वर्गातल्या ४-५ मुलांकडे स्वतःचा टेब आहे म्हणे. ५०-६०% मुलं शाळेतून जेवण मिळत असतानासुद्धा कँटिनमधून खाऊ घेण्यासाठी आठवड्यातून ३-४ वेळा पैसे आणतात. पुढच्या वर्षीपासून डब्बा घेवून जावा लागेल. बहूतांशी मुलांच्या डब्ब्यांमध्ये छोले-पुरी. आलु-पुरी, फ्रेंच फ्राइज, बर्गर्स, पास्ता, मॅगी असले पदार्थ असतात असं वरच्या वर्गातल्या पालकांकडून ऐकलं आहे.)
प्राजक्ता, या प्रकारच्या मजा
प्राजक्ता, या प्रकारच्या मजा मिस होण्याच्या मुद्द्याशी मी फारशी सहमत नाही. ही मुलं करतात ती मजा शाळेत जाणा-या मुलांच्या कल्पनेपलिकडची आहे.
चिमुरी आणि साती, ही मुले फक्त शाळेचे काही ठरावीक तास शाळेत जात नाहीत, एरवी कायमच इतर मुलांसारखीच जगाच्या संपर्कात असतात. उलट शाळेत जाणा-या मुलांपेक्षा खुप जास्त प्रमाणात ही मुलं समाजाशी कनेक्टेड असतात. एक्स्पोजर खुप जास्त, त्यामुळे आत्मविश्वासही जास्त, कोणताही गंड निर्माण झालेला नसल्यामुळे, दडपण असे कसले नसल्यामुळे कुणाशीही संवाद साधू शकतात. बाकी कॉलेजात गेल्यावर काही अडचणी आल्या असतील तर शाळेतून बाहेर पडलेल्यांना येतात तशाच जुजबी.
आम्ही अजून तरी कोणताही अभ्यासक्रम फॉलो करत नाही, सातवीला परिक्षा द्यावी लागेल तेव्हा पहिल्यांदा अभ्यासक्रमाची तयारी करून घेऊ. तीच बाब दहावीला बसतानाही, SSC बोर्डाची तयारी. त्यामुळे मागे पडू वगैरे ताण नाही. चार भिंतीतली कंपार्टमेंट वाईज विषय विभागणी इथे नाही, प्रात्यक्षिकांवर भर असल्यामुळे विषयांचे आकलन जास्त होते. मग अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणी येत नाहीत.
आपण बोलतोय हे सगळं तसं दहावीपर्यंतच मर्यादित आहे, आपलं खरं आयुष्य तर त्यानंतरच सुरू होतं. ते जगण्याची मुलांची सर्व पातळ्यांवरची तयारी तोवर करून घेणे महत्वाचे. कुणी शाळेत घालून, कुणी शाळेत न घालता ते करतं, बाकी प्रक्रियेत यापलिकडे फारसा फरक नाही. सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या महत्वानुसार ठरतील.
आम्ही अजून तरी कोणताही
आम्ही अजून तरी कोणताही अभ्यासक्रम फॉलो करत नाही, सातवीला परिक्षा द्यावी लागेल तेव्हा पहिल्यांदा अभ्यासक्रमाची तयारी करून घेऊ.>>>>>>>> मे बी मला प्रश्न नीट विचारता आला नाहिये.. गणिताचं उदाहरण घेतलं तर, प्रत्येक टप्पा समजल्यानंतर तुम्ही पुढचं शिकवाल हे मान्य. पण तरिही जर १५व्या वर्षी १०वी ची परिक्षा द्यायचीत तर किमान ठरावीक टप्प्यापर्यंत तरी एका वर्षात शिकवुन्/शिकुन झालं पाहिजे असं नसतं का? जनरलायझेशन जाउ दे, तुम्ही आत्तापर्यंत मुलाला कसं शिकवलय हे डिटेलमधे सांगु शकाल का? प्रचंड कुतुहल आहे.. म्हनजे दिवसभर प्रॅक्टीकल ज्ञान मिळत असतंच. पण जेव्हा थियरी शिकवण्याची वेळ येते तेव्हा ते कसं शिकवता? दिवसभराचं काही रुटिन असं फिक्स केलय का? की मुलांच्या अन तुमच्या सोयीने अन तरिही काही ठरावीक प्लॅन करुन शिकवता तर तो प्लॅन कसा डिसाइड केलाय? सॉरी खुपच विस्कळीत प्रश्न आहे...
मुलं कधी शाळेत जायचा हट्ट करत नाहीत का? आपल्याकडे जनरली भेटल्यावर कोणिही मुलांना विचारतं काय मग कितवीत, कोणत्या शाळेत? अश्या वेळी मुलांची काय रिअॅक्शन असते?
अल्पना, खुप छान लिहिते आहेस.
अल्पना, खुप छान लिहिते आहेस. बरीच माहिती मिळतेय तुझ्या पोस्टसमधून.
चिमुरी
सॉरी कशाला गं! तुझी उत्सुकता समजू शकते. मी आत्ताच सातीला लिहिल्याप्रमाणे वेगळा लेख लिहून त्यावरच्या शंकांना उत्तरे देता येण्याइतका वेळ सध्या काढू शकणार नाही. त्यामुळे असंच थोडं थोडं लिहिते. तू पुण्यात असशील तर थोडा वेळ काढून प्रत्यक्ष ये, मैत्रिणीही आणखी नीट बोलू शकतील तुझ्याशी.
मुलं सहजपणे सांगतात आम्ही अभ्यासाच्या शाळेत जात नाही म्हणुन
त्यांना सगळ्या रिअॅक्शन्सची जाम सवय झालीये अगं.
मुलांना नक्कीच रुटीन आहे, पण ते मुलांनीच ठरवलेलं आहे. माझा मुलगा आत्ता दुसरीच्या लेव्हलला आहे, आत्ता अंकओळख आणि बेसिक बेरिज-वजाबाकी सुरू आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पातळी सुरू आहे. तू म्हणतेस तसंच साधारण पाचवीच्या लेव्हलपासून त्यांचीही पुढची आणखी थोडीथोडी तयारी सुरू होईल आणि प्रमाण हळूहळू वाढत जाईल. ही मुलं त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार ती गणितं सोडवत पुढे जातात. त्यात त्यांच्या इयत्तेच्या पुढचीही गणितं असू शकतील. प्रत्येक मुलाच्या आवडी-कुवतीनुसार भर देण्याचे विषयही नंतर वेगळे होत जातील. सातवीच्या परिक्षा कोणत्याही पालिकेच्या शाळेत प्रवेश घेऊन देता येते. दहावीला बसताना सातवी उत्तीर्ण प्रमाणपत्र हा निकष आहे.
ओक्के.. धन्यवाद सई... नक्कीच
ओक्के.. धन्यवाद सई... नक्कीच भेटेन कधितरी.. पुण्यातच असते मी... लिहित रहा असच.. मिही काही सुचलं की विचारत जाईनच
http://www.mirambika.org/ ही
http://www.mirambika.org/ ही मई वर लिहिलेल्या मिराम्बिका शाळेची वेबसाइट.
http://blog.buzzintown.com/2010/06/mirambika-school-vs-vasant-valley-sch... ही ब्लॉगपोस्ट मिराम्बिका मधून नंतर दुसर्या शाळेत शिकलेल्या एका विद्यार्थिनीने लिहिलीये.
http://www.ipi.org.in/texts/others/anjum-fip-edu.php
लेकीसाठी शाळा निवडताना आमचे
लेकीसाठी शाळा निवडताना आमचे प्रमुख निकष होते
सुदैवाने अशाच शाळेत प्रवेश मिळाला. शाळा नावाजलेली असल्याने बाकी फारशी चॉकशी केली नाही. Pre-primary मधे आवडलेल्या गोष्टी
तिच्या Primary & High school बद्दल नंतर लिहिते.
अल्पना , मस्तच. लिंक बघतो.
अल्पना , मस्तच. लिंक बघतो.
शाळांची माहिती देताना हरकत
शाळांची माहिती देताना हरकत नसेल तर शाळेचे नाव पण सांगत जा ना प्लीज
जंक फुड, वेगवेगळ्या वस्तू
जंक फुड, वेगवेगळ्या वस्तू यांचं पिअर प्रेशर मुलांवर असतं. >>> हा मुद्दा मला बराच महत्वाचा वाटतो. ह्यामुळेच शाळेत येणारी इतर मुलं कोणत्या आर्थिक गटातील आहेत ह्याचा विचार मी करते. त्यानुसार पिअर प्रेशरमधे फरक पडू शकतो असे वाटते.
बाकी छान चर्चा सुरू आहे. मी सुद्धा मुलीसाठी शाळा निवडण्याच्या प्रोसेस मधे आहे. त्यामुळे ह्या चर्चेचा उपयोग होईल.
होम-स्कूलिंग करणारे पालक खरचं ग्रेट आहेत. पण हा धागा शाळा निवडण्याशी संबंधित असल्याने होम-स्कूलिंगची चर्चा दुसरीकडे केली तर?
तुमची रास्त शंका माझ्याही
तुमची रास्त शंका माझ्याही डोक्यात आली होती सोहा.
इथे लिहिण्यापूर्वी धागाकर्त्याची त्यासाठी परवानगी घेतलेली होती आणि मी लिहिल्यामुळे पुढे येत गेलेल्या प्रतिसादांनाही उत्तरे देत जावे लागले. ही चर्चा मी इथे थांबवत आहे. धन्यवाद.
खुप छान धागा ़ ़ ईथ े शाळांची
खुप छान धागा ़ ़ ईथ े शाळांची नावे दिलेली चालणार नाहित का ? मला काहि शाळांबद्दल पालकांचे मत हवे होते ़ त्या शाळांतुन माझ्या ओळखीचे कोणी नाहिये ़माझी मुलगी ३.५ वर्षाची आहे व तिची एडमिशन डिसेंबर मधेये सुरु होईल ़
इनोची, कोणत्या शहरात आणि
इनोची, कोणत्या शहरात आणि कोणती शाळा बघत आहात तुम्ही ?
प्राजकता शिरीन मी पुण्यात
प्राजकता शिरीन मी पुण्यात रहाते ़़़़ ़४/५शाळा शाॅर्टलिस्ट केल्या आहेत ़़ ़ एक विखे पाटिल आहे पण तिथे लाॅटरि सिस्टिम ने एडमिशन देतात दुसरी विब्गयोर बाणेर आहे ़़ संस्कृती म्हणुन आहे पण ती घरापासुन लांब आहे
माझ्या मुलासाठी खेळ गटामध्ये
माझ्या मुलासाठी खेळ गटामध्ये admission घ्यायची आहे. आम्ही गोळ्वलकर आणि अभिनव (मराठी माध्यम ) मधे गेले होतो. दोन्हीही शाळा बर्या वाटल्या.
कुठल्या शाळेचा अभिप्राय जास्त चान्गला आहे? प्रवेश लगेच घ्यायचा आहे. पुण्यामध्ये आम्ही नवीन आहोत. त्यामुळे समजत नाहिये.
दीपाकुल - मराठी माध्यमात
दीपाकुल - मराठी माध्यमात घालणार असाल तर एकदा 'अक्षरनंदन' शाळेला जरूर भेट देऊन या.
दीपाकुल, मी गोळवलकर शाळा हा
दीपाकुल, मी गोळवलकर शाळा हा पर्याय योग्य असल्याचे सांगू शकतो.
आमच्याकडे आमच्या पोरांच्या
आमच्याकडे आमच्या पोरांच्या नशीबाने "ज्ञानप्रबोधिनी" उपलब्ध होती. व त्यांच्या सुसंस्काराबाबतच्या सगळ्या अटी/शर्ती वगैरे आम्हाला मान्य होत्या तसेच पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीप्रमाणे इकडील शाळेत विशिष्ट गुणवत्तेचा/मार्कांचा/हुषारीचा वगैरे निकष नसल्याने आमचे मुलांना सहज प्रवेश मिळाला. तसेच पालकांनी म्हणजे मी गीतेचा अध्याय पाठ म्हणून दाखविणे काहिच अवघड नव्हते.
त्यामुळे तेथूनच मराठी माध्यमातुन मुलांना १०वी पर्यंत शिकवले (शाळेने).
जर ही शाळा इकडे नसतीच तर कोणतीही मराठी माध्यमाची व देणग्या वगैरे न घेणारी शाळा निवडली असती. खाजगी शाळा उपलब्ध नसत्या तर झेडपी/कॉर्पोरेशनच्या शाळेत मुलांना घातले असते.
ज्ञानप्रबोधिनी ही शाळा मराठी
ज्ञानप्रबोधिनी ही शाळा मराठी माध्यमाची नाहीये ना ? सीबीएससी अभ्यासक्रम आहे ना ?
ते निगडीच्या "ज्ञानप्रबोधिनी"
ते निगडीच्या "ज्ञानप्रबोधिनी" शाळेबद्द्ल बोलत आहेत बहुदा.
मंजूषा, हो, निगडीची
मंजूषा, हो, निगडीची ज्ञानप्रबोधिनी.
नुकतेच सरकारने पहिलीत घालायचे
नुकतेच सरकारने पहिलीत घालायचे वय ६ वर्षे केले आहे. म्हणजे मुलाला प्ले ग्रूप मध्ये कितव्या वर्षी घालावे? सध्या १.५ पुर्ण झाल्यावर घेताहेत. मला शक्य तितक्या उशिरा घालायचय.
पहिलीला १ एप्रिल ला (किंवा १
पहिलीला १ एप्रिल ला (किंवा १ जुन ला) ६ पूर्ण.
म्हणजे ५ पूर्ण ला सीनियर केजी
४ पूर्ण ला ज्युनियर
३ पूर्ण ला नर्सरी
२ पूर्ण ला प्ले ग्रुप (हे सर्व १ एप्रिल ला पूर्ण वय धरुन)
अर्थात शाळाशाळांचे बदलते गणित आहे.
Pages