भंडारदरा......//

Submitted by जय@ on 18 September, 2014 - 06:49

20140914_101952_0.jpgभंडारदरा......
या १३/१४ सप्टेंबर २०१४ मी हि भंडारदराला जाऊन आलो. खरच पावसाळ्यात भंडारदरा म्हणजे स्वर्गच भासतो. MTDC,यश रिसॉर्ट आणि आनंदवन मध्ये बुकिंग मिळालेच नाही आणि खूप महाग हि होते. मग माझ्या एका मित्राकडून भंडारदरयातील एका गाईडचा नंबर मिळाला आणि त्याने आमची रहाण्याची सोय सुंदर निवास, चिचोंडी येथे केली. हा एक रिटायर पोलिस अधिकार्याचा बंगाल आहे. रहाण्याची सोय छान झाली. तळमजल्यावर ते राहतात आणि 1st फ्लोवर वरील दोन रूम आम्हाला दिल्या होत्या आम्ही एकूण दहा लोक होतो. दोन दिवसात रंधाफोल, अमृतेश्वर मंदिर , घाटघर वीज प्रकल्प एवढेच पाहू शकलो पण भंडारदरयातून निघताना ३/४ दिवस रहाण्यासाठी परत येऊ हा निश्चय करूनच निघालो. जिप्सी आणि अनिश्काने दिलेलेल्या मायबोलीवरील माहितीचा फारच उपयोग झाला धन्यवाद.......
IMG_0029.JPGIMG_0035.JPGIMG_0072.JPGIMG_0077.JPGIMG_0096.JPGIMG_0119.JPGIMG_0123.JPGDSCN2610.JPGDSCN2561.JPGDSCN2534.JPGDSCN2499.JPGDSCN2492.JPGDSCN2449.JPGDSCN2419.JPG20140913_164929_0.jpg20140914_103514_0.jpg20140914_104352_0.jpg20140914_112838_0.jpgDSCN2451.JPGIMG_0130.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

गाईडचा किंवा बंगल्याचा फोन नं. देणे शक्य असेल तर जरु द्या..

दिनेशदा.. शेवटून पाचवा फोटो रंधा फॉलचा आहे.

इंद्रा, मी साधारण २००२ च्या आसपास बघितला होता. खुपच उंचावरून कोसळत होता आणि आम्ही पावसाळ्यात नव्हे तर थंडीत गेलो होतो.

(गाईडचा किंवा बंगल्याचा फोन नं. देणे शक्य असेल तर जरु द्या..)
इंद्रधनुष्य , श्री.चंद्रकांत बांगर, सुंदर निवास , चिचोंडी , भंडारदरा मो.नंबर- ९४२२८५५८४३ , ९६९९८९१६२२

जय, विकिपिडीयावर पण रंधा फॉल्सची उंची १७० फूट दाखवताहेत. मी बघितला होता त्यावेळी तेवढा होता. शिवाय त्याच्याखाली भले मोठे रांजण होते. त्या रांजणात गेल्यास परत वर यायची शक्यता फार कमी असे सांगत असत.

मला वाटतं नदीत पाणी भरल्याने तेवढी उंची दिसत नाही, या फोटोत.

दिनेश दा , नदीत पाणी भरल्याने तेवढी उंची दिसत नाही, या फोटोत.
मला हि असेच वाटते. गाईडने तरी आम्हाला हाच रंधा फॉल असे सांगितले होते .

जय@ मस्त फोटोज... रंधा फॉलचा २९/१०/२००९ रोजी घेतलेला फोटो शेअर करत आहे... (उंची कळावी म्हणुन)...

Randha Fall.jpg

मस्त फोटोज जय Happy

भंडारदरा भटकंती खुप वेळ झाली पण रंधा फॉल्स बघायचा राहिलाय Happy

कॉन्टॅक्ट डिटेल्सबद्द्ल धन्यवाद Happy

जिप्सी , तू सांगितलेला विहीगाव धबधबा पहायचा होता पण राहिला......आम्ही पालघर वरून येताना वाडा-मलवाडा रोड ने आलो. हा रोड ही खूप छान आहे.
( मस्त फोटोज )आपण तर आमचे प्रेरणास्थान..............