Submitted by गण्या. on 17 September, 2014 - 11:46
नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांमधे भाजपची पीछेहाट झाली. ३३ विधानसभा आणि ३ लोकसभा क्षेत्रात झालेल्या या निवडणुकांमध्ये मोदींची लाट दिसली नाही. याची कारणे आणि त्याचे होणारे परिणाम या विषयीचे हितगूज इथे करूयात.
http://blogs.wsj.com/indiarealtime/2014/09/16/modis-bjp-fares-poorly-in-...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महाराष्ट्रातल्या जागावाटपावर
महाराष्ट्रातल्या जागावाटपावर परिणाम होईल असं वाटतं. गेल्या काही दिवसांत भाजपचं आक्रमक रूप सेनेला पहायला मिळालं. दोन महीन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीतल्या यशावर विसंबून राहू नका, ते फसवं आहे असे उद्गार काढले होते. राज ठाकरे यांनी या निवडणुकीचं विश्लेषण होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. जर पोटनिवडणुकांमधे उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधे तेच यश दिसून आलं असतं तर सर्वांची तोंडं बंद झाली असती. आता मात्र लोकसभेच्या यशाचं विश्लेषण नव्याने करायला सुरूवात झालेली आहे. त्यावरच जागावाटप होईल. भाजपला आता पडती भूमिका घ्यावी लागेल का ?
<<भाजपला आता पडती भूमिका
<<भाजपला आता पडती भूमिका घ्यावी लागेल का ?>>
घ्यावी तर लागेल अणि सत्तेसाठी युती करावी लागेल कारण कॉग्रेस प्रमाणे शिवसेना हि सुध्दा खेड्या पाड्यात रुजलेली आहे जेवढी भाजप पोचलेली नाहि. पण ते आता काळच ठरवील काय होतय ते. आणि सत्ता परि वर्तन गरजेचे आहे. कारण कॉग्रेस ला वचक बसला पाहिजे आणि नेक्ष्ट टाइम पुन्हा आघाडी.. म्हणजे युतीला पण वाटता नये कि आम्हीच राजे. नाहितर १५ वर्षात पहिल्या ५ वर्ष काम... नंतर १० वर्ष लोकांना ग्रुहित धरुन आपलीच सत्ता येणार मग काहिहि बोला आनि कितिहि खा.. त्यामुळे युती झालि पाहिजे आणि कॉग्रेस आणि युतित चढाओढ राहिलि पाहिजे.. तरच ह्यांच्या भांडनात लोकांचा फायदा होनार... नाहितर आहे ते सुरुच राहनार..
भारतातील मतदार सुज्ञ आहे
भारतातील मतदार सुज्ञ आहे (होतोय) याचेच हे प्रतीक आहे !! कीप ईट अप लोक्स !!
आणि सत्ता परि वर्तन गरजेचे
आणि सत्ता परि वर्तन गरजेचे आहे. >>>
ही बातमी वाचुन तर नक्किच परिवर्तन गरजेच आहे
ग्रामीण भागातील एखाद्या मंगल कार्यालयात स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, स्कोडा, इनोव्हा आणि बीएमडब्ल्यू अशा गाड्या मोठ्या संख्येने उभ्या असतील, तर तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा सुरू आहे, असे निश्चित समजावे.
लोकसभेच्या यशात
लोकसभेच्या यशात काँग्रेसबद्दलची नाराजी हा फॅक्टर महत्वाचा होता. ती कोण एण्कॅश करू शकतं याचं उत्तर मिळालं आहे. खरं तर भाजपला संधी मिळालेली आहे. उत्तर प्रदेश मधे एकदा नाही चारदा सत्ता येऊन गेलेली आहे तिथे त्यांना विकास आणता आलेला नव्हता. मग लोकसभेला विकासाच्या आश्वासनाला जनता भाळण्याचं कारण काय ? जर लाट होती तर चार महीन्यात ओसरली की मग आश्वासनांचा फोलपणा कळून आला ?
उत्तर प्रदेशात इव्हीएम मशीन्स कलेक्टरच्या घरी सापडण्याचे प्रकार घडले. आपच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. फेसबुक वर निकालाची टक्केवारी आणि निकाल जुळत नसल्याच्या पोस्टस फिरत होत्या. पण जोपर्यंत ठोस पुरावे नाहीत तोपर्यंत अशा तक्रारींची किंमत शून्य. तरी देखील ८० पैकी ७२ जागा जिंकल्यावर भिवया वर गेल्या होत्या आणि आताच्या निकालाने त्या पुन्हा गेल्या.
महाराष्ट्रात पंधरा वर्षे असलेले सरकार आहे. त्याचा कारभार चांगला नाही हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही. पंधरा वर्षात तुंबलेली कामे आचारसंहीता तोंडावर आल्यावर निकाली काढणारे सरकार पुन्हा निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. पण भाजप सेनेचा कारभार तरी काय वेगळा होता ? काहीही असो, जर या सरकारला मत द्यायचे नसेल तर लोकांपुढे पर्याय कुठला आहे ? भाजपा सेना वेगवेगळे लढले तरी देखील निवडून येतील अशी स्थिती सध्या आहे. विरोधकांसाठी वातावरण चांगले आहे. म्हणूनच युती तुटू दिली जाणार नाही. प्रश्न उरतो तो भाजपची खरी ताकद किती याचा.
कोनिही येवो.. सगळेच सारखे..
कोनिही येवो.. सगळेच सारखे.. लोकसभेत हार झाल्याचि पाहुन जसे पटापट निर्ण्य घेतले गेले ते पाहुन लक्षात येते कि भिति सगळ्यांच असते आणि ती असलीच पाहिजे.. आणि भिती निर्माण करायची तर सत्ता परीवर्तण गरजेचे.. आणि महत्वाचे..
दोन आठवड्याचा राज्याभाऊ
दोन आठवड्याचा राज्याभाऊ
संमि, तु काय स्वतःला इथला
संमि,
तु काय स्वतःला इथला फाउंडर समजतोस काय ?
हे बर आहे, निवडणुकीच्या आधी
हे बर आहे, निवडणुकीच्या आधी हेच काँग्रेजी लोक म्हणत होते, मोदि लाट वगैरे काही नाही. मात्र देशभर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने काही जागा गमावल्यावर याच लोकांना लोकसभेतील निवडणुकी दरम्यान लाट होती आणि ती ओसरुही लागल्याचे स्वप्न पडु लागली आहेत. दुट्टपी काँग्रेजी.
यावेळी फक्त ३० टक्के मतदान
यावेळी फक्त ३० टक्के मतदान झाले आहे.यु.पी.तर अजुन कमी असेल. त्यात भाजपाने लव्ह जीहाद सारख्या फालतु मुद्याला प्रमुख स्थान दिले प्रचारात. महागाई काही कमी होत नाही. सामान्य लोकांना FDI, growth rate etc. गोष्टीत रस नसतो. त्यामुळे हा निकाल धक्कादायक नाही.
निवडणुकीच्या आधी हेच काँग्रेजी लोक म्हणत होते, मोदि लाट वगैरे काही नाही.>> कोणता पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्याची लाट आहे हे निवडणुकीच्या आधी म्हणेल.
भाजप मोदी आणि राहुल गांधी
भाजप मोदी आणि राहुल गांधी ह्या दोघाच्या प्रचाराशिवाय जिंकु शकत नाही.
विदाऊट नमो बिजेपी ईज झिरो,
विदाऊट नमो बिजेपी ईज झिरो, विदाऊट रागा काँग्रेस प्रुव्ड टु बी हिरो !!
मात्र देशभर झालेल्या
मात्र देशभर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने काही जागा गमावल्यावर याच लोकांना लोकसभेतील निवडणुकी दरम्यान लाट होती आणि ती ओसरुही लागल्याचे स्वप्न पडु लागली आहेत. दुट्टपी काँग्रेजी.
------ भाजपाला लाट होती असे मान्य होते, तर आता पोट निवडणुक निकाला नन्तर लाट ओसरु लागली आहे हे मान्य आहे का?
प्रत्येक भाजपेयी हा मोदींच्या
प्रत्येक भाजपेयी हा मोदींच्या क्षमतेचा नसतो. तसंच प्रत्येक भाजपचा टीकाकार हा काँग्रेसी नसतो. बुद्धी शार्पन करून जमिनीवर यावे आणि मुद्यांवर लक्ष केंद्रीत करावे ही नम्र विनंती.
http://www.loksatta.com/mumba
http://www.loksatta.com/mumbai-news/bjp-steps-back-against-shiv-sena-on-...
पोटनिवडणुकांच्या निकालाचा हा झटका
अरेरे किती दयनिय अवस्था झालेय
अरेरे किती दयनिय अवस्था झालेय खांग्रेसची, पोटनिवडणुकीतील निकालातील विजयावर जल्लोष करण्याची वेळ आलेय ह्यांच्यावर.
विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल आश्चर्यकारक असतील, लोकसभा पोटनिवडणुकीतील निकाल जैसेथे च आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी देशात प्रथमच इतकी गंभीर चर्चा सुरू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. १९४७ नंतरच्या कोणत्याही पोटनिवडणुकीच्या निकालाची इतकी चर्चा झाली नसेल किंवा त्या निकालाच्या आधारे मोदिंची जादु संपली, लाट ओसरली असे म्हणणार्या लोकांची किव वाटते.
(No subject)
अमित शहा यांनी महाराष्ट्रात
अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन मोदींच्या करीष्म्यावर अवलंबून राहू नका. कामाला लागा असा संदेश दिला. तीन महीन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात लोकसभेचं यश फसवं होतं, त्याची पुनरावृत्ती होईल या भ्रमात राहू नका असा संदेश दिला होता. हे दोघेही कोंग्रेसी असल्याचं माहीत नव्हतं. भाजपाच्या यशाचं विश्लेषण आवडलं नाही की तो काँग्रेसी (शिवीसमान शब्द) या शोधाबद्दल लाख लाख आभार.
(No subject)