Submitted by कविता केयुर on 15 September, 2014 - 05:08
कधी नि:शब्द , कधी हळवी
डोळ्यातून बोलणारी , सहवासात खुलणारी
मनाला सांधणारी ,
बरोबर चालणारी.. दूर क्षितिजापर्यंत
तू …
कधी चांदण्यात हरवणारी,
कधी पावसात बरसणारी,
जणू सावलीसारखी भासणारी,
तर कधी नात्यांच्या पलीकडची
तू …
आयुष्याच्या अनेक रंगात रंगणारी,
कधी समजावणारी,
अन् कधी सावरणारी,
नि:स्वार्थ शब्दात सामावणारी
तू …
तिन्ही सांजा ओढ लावणारी,
रितेपण संपवणारी,
अगदी हवीहवीशी वाटणारी,
आयुष्यभराची तू … एक सोबत
अथ पासून इति पर्यंतची …तू एक सोबत !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
Thank you...
Thank you...