साहित्यः
उरलेला भात
बेसिल पाने
ओरेगानो, थाईम
चिली फ्लेक्स
चविपुरते मीठ
केच-अप
ब्रेड
चीज क्युब
कृती:
भात हाताने मोकळा करुन घ्यावा. त्यात केच-अप व इतर हर्ब्स तसेच बेसिल्ची पाने चिरुन घालावी. ब्रेड मिक्सर्मधुन बारिक करुन घ्यावा व या मिश्रणात बाईंडिंगपुरता घालावा. सगळ्या मिश्रणाचा गोळा मळून छोट्या पार्या कराव्या.
एका चीजक्युबचे समान ८ तुकडे करुन प्रत्येक तुकडा एका पारीत घालून बंद करावा. हे गोळे हवे असल्यास अंड्यात व ब्रेड्क्रम्ब्स किंवा रव्यात घोळवून किंवा नुस्तेच डीप-फ्राय करावे.
स्रोतः
काल सहज टीव्ही लावला तर फूड फूड वर 'बेसिल' वर आधारित पाककृती चालू होत्या. त्यात पाहिलेली एक रेसिपी म्हणजे Arancini. नविनच नाव होतं माझ्यासाठी तर म्हंटलं बघुया तरी काय आहे ते. मूळ पाककृती मध्ये टोमॅटो-बेस्ड रिसिटो बनवून मग बाकीची कृती केली होती. पण मला आदल्या दिवशीचा भात संपवायसाठी काहितरी नविन आयडिया मिळाली.
डीप-फ्राय?? हम्म!!!
डीप-फ्राय?? हम्म!!!
फोटो?
फोटो?
my favourite mazi rixa....
my favourite
mazi rixa....
http://www.maayboli.com/node/42616 baked deshi version