मराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव 'मायबोली.कॉम'ने सर्वप्रथम ऑनलाईन स्वरूपात सुरु केला. ह्या उत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते! गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पडद्यामागील अनेक जणांचा हातभार लागला. त्यांच्या योगदानाशिवाय उत्सव पार पडणे शक्य नव्हते. त्यामुळे मंडळी घरचीच असली तरीही त्यांचे आभार मानण्यासाठी हा आभारप्रदर्शनाचा गोड कार्यक्रम.
सर्वप्रथम गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा आणि उपक्रमांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार. सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हा उत्सव पार पडणे शक्य नव्हते. 'असाच उत्साह कायम राहू दे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ दे' हीच गणरायाचरणी प्रार्थना!
आम्हां सर्वांना यंदाच्या गणेशोत्सव मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच उत्सवादरम्यान वेळोवेळी तांत्रिक मदत केल्याबद्दल अॅडमिन आणि वेबमास्तर ह्यांचे आभार. प्रताधिकार तसेच इतर कायदेशीर बाबींबद्दल लागेल ती मदत केल्याबद्दल चिनूक्सचे आभार.
गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम सादर करून गणेशोत्सवाची रंगत वाढवल्याबद्दल खालील मायबोलीकरांचे संयोजक मंडळातर्फे विशेष आभार!
- गणेश प्रतिष्ठापनेवरील श्र्लोक गायन : कौस्तुभ परांजपे (रैना यांच्या विनंतीवरुन, त्यामुळे रैना यांचे ही आभार!)
- गणेश प्रतिष्ठापना व इतर प्रकाशचित्रे- इंद्रधनुष्य आणि जिप्सी
- गणेशाचे जलरंगातील चित्र : अजय पाटील
- ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन ह्याबद्दलचे लेखन : शशांक पुरंदरे
- गायन- ओंकार देशमुख
- वादन- केदार देशमुख (तबला), ओंकार दिवाण (सिंथेसायजर)
- बाप्पा माझ्या मनातला -फोटो फीचर : अनन्या
- विजया बाई आणि आपण : चिनूक्स
- आसनम् समर्पयामि : नीधप
- क्वीलिंगचा बाप्पा : प्राजक्ता शिरीन
ह्याचबरोबर :
- जाहिराती, चित्रफलक साहाय्य ह्याकरिता नीलू, नील वेदक आणि कविन ह्यांचे आभार.
- पाककृती स्पर्धा हा मायबोली गणेशोत्सवातला अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी अतिशय जवळचा भाग. स्पर्धा ठरवताना नियमांमध्ये कसल्याही त्रुटी राहू नयेत ह्यासाठी यंदा आम्ही नियमांचा अंतिम मसुदा मंडाळाबाहेरील व्यक्तींकडून तपासून घेण्याचे ठरवले होते. ह्या कामात मदत केल्याबद्दल तसेच काही महत्त्वाच्या सुचवण्या केल्याबद्दल मायबोलीकर मृण्ययी ह्यांचे आभार.
- बालचमूंच्या उत्साही सहभागाचं खास आकर्षण असलेली चित्रं नीलू यांनी काढून दिली तसेच बच्चेकंपनीचं कौतुक करण्यासाठी दिलेली प्रशस्तिपत्रके तयार करण्यासाठी मायबोलीकर पेरू आणि कविन या सर्वांचे आभार.
सरते शेवटी विशेष आभार मानावेसे वाटतात ते 'सुरक्षेचा श्रीगणेशा' ह्या कार्यक्रमाची चित्रे काढून देण्यार्या गार्गी दत्ता ह्यांचे. ही संकल्पना सर्वात पहिली पक्की झाली असली तरी गणेशोत्सव तोंडावर आला तरी आम्हाला त्यासाठी समर्पक चित्रे काढून मिळेनात. अगदी अचानक चैतन्य दीक्षित यांच्या या सहकारी मैत्रिणीने मदतीची तयारी दर्शवली! गंमत म्हणजे, ती स्वतः बंगाली असल्याने तिला मजकूर, त्यातली मजा स्वतः वाचून समजत नव्हती. चैतन्य यांनी ती कामगिरी पार पाडली व योग्य अर्थच्छ्टा समजावून अतिशय समर्पक अशी सुंदर चित्रे आपल्या सर्वांसमोर मांडली. याबद्दल गार्गी यांचे आभार मानले असता -"भगवान के काम के लिए 'थँक्स' बोलके मुझे पाप मत लगाओ!" असं गोड उत्तर मिळाल्यावर आम्ही काय बोलणार! कोणतंही काम पूर्ण करताना हजारो अनाम हात त्यापाठी कसे लागलेले असतात याची प्रचिती इथे आली.
यंदाच्या गणेशोत्सव संयोजन मंडळात आम्ही सगळे अगदी योगायोगाने आलो. स्वयंसेवकांअभावी यंदा मायबोलीचा गणेशोत्सव होऊ शकणार नाही हे वाचताच मागचा पुढचा विचार न करता आम्ही सर्वांनी पाऊल पुढे टाकले. हातात अत्यंत कमी वेळ शिवाय प्रत्येकाला अनेक व्यवधानं - कुणाच्या शिफ्ट्स, तर कुणाच्या घरी बाळराजांचं आगमन, कुणाला अचानक ऑनसाईट व्हिजिट तर कुणाच्या घरी उद्भवलेलं संकट! परंतु मायबोली आणि व्हॉट्स अॅप यांच्या माध्यमातून हातात हात धरुन हा उपक्रम व्यवस्थितपणे पार पाडायचा प्रत्येकाने निश्चयच केला होता . कमी वेळात पण सर्वसमावेशक असे खेळ आणि स्पर्धा निवडणे, त्यांची जाहीरात करुन ते यशस्वीपणे अंमलात आणणे सोपे नव्हतेच. उत्सव सुरू झाल्यावर प्रत्येक उपक्रमाचं, स्पर्धेचं, संयोजनाचं मायबोलीकरांनी केलेलं कौतुक वाचताना मिळणारं समाधान शब्दांपलीकडचं आहे. नेमून दिलेला 'मुख्य संयोजक' आणि 'सल्लागार' नसतानाही गोष्टी पार पडलेल्या पाहून मायबोलीवरची मंडळे 'सेल्फ सफिशंट' किंवा 'स्वयंपूर्ण' होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत असं म्हणावसं वाटतं.
मायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते. मायबोलीवरचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मायबोलीकरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. यंदा गणेशोत्सव संयोजन मंडळासाठीच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद आल्याने उत्सव रद्द होतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे सर्व मायबोलीकरांना, विशेषतः नवीन मंडळींना, संयोजन मंडळातर्फे आवाहन की अश्या मंडळामध्ये नक्की भाग घ्या कारण हा अतिशय आनंददायी अनुभव असतो.
गणेशोत्सवाच्या संयोजनात काही त्रुटी राहून गेल्या असल्याची नम्र जाणीव आम्हाला आहे. तर त्याबद्दल तसेच तुम्हाला काय आवडलं,काय नाही, अजून काय करणं शक्य होतं ह्याबद्दलची आपली मते ह्या धाग्यावर नक्की मांडा. आगामी मंडळांना ह्या सूचनांचा निश्चित उपयोग होईल. स्पर्धांचे विजेते निवडण्यासाठी मतदानाची सोय लवकरच उपलब्ध करून देऊ. आपापल्या आवडत्या प्रवेशिकांना नक्की मत द्या.
अनेक उपक्रमांवर लोकांनी ही कल्पना कुणाची? असं विचारलं आहे. तेव्हा आम्ही सांगू इच्छितो की सर्व उपक्रम हे संपूर्ण संयोजक मंडळाच्या शब्दशः 'अहोरात्र' केलेल्या मेहनतीचं फलित आहे.
कसं जमेल, कसं होईल करता करता आता 'कार्यालय' आवरायची वेळ आली की आवंढा येतोच. गाठीशी आलेले अनेक नवे अनुभव, नवीन शिकलेल्या अनेक गोष्टी, मनभर आनंद आणि किंचित चुटपूट लागली की निरोपाची वेळ येते.
निरोप घेता घेता, आपण मायबोलीतर्फे आजवर जिथे जिथे असा आनंद पसरवला आहे त्या संस्थांची नावे गुंफून मायबोलीकर उदयन... यांनी हा अक्षर गणेश तयार केला आहे ज्यात रंग भरलेत नीलू यांनी. काही क्षणांसाठी का होईना मायबोलीने तिथे हसू फुलवले तोच आनंद आशीर्वादाच्या रूपात आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहील. गणपती बाप्पा मोरया!
धन्यवाद!
- २०१४ गणेशोत्सव संयोजन मंडळ
(आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया, स्नेहश्री)
संस्थांची नावे-
अस्तित्व, भागिरथ, मैत्री, सावली, शबरी, सुमति, स्नेहालय, स्नेहाधार, आदिनाथ, सुपंथ, लोकबिरादरी, वनवासी, ग्रीन अम्ब्रेला, मनोहर, एकलव्य, प्रगती.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१४ मधल्या स्पर्धासाठी मतदान सुरु झालेलं आहे. खालील दुव्यावर तुम्ही आपले मत नोंदवू शकता.
आता कशाला शिजायची बात
http://www.maayboli.com/node/50769
मलाही कोतबो
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
वा! सुंदर आभारप्रदर्शन.
वा! सुंदर आभारप्रदर्शन. यंदाच्या गणेशोत्सवामधली अनेक कल्पना अभिनव आणि वेगळ्या हटके होत्या. त्यामध्ये कुठेही "कमी वेळात उरकून टाकल्याचा भाव" नव्हता हे सर्वात महत्त्वाचे.
ठो उपमा हा खेळ "भयंकर सुंदर" होता. झब्बूखेळामधल्या खाद्यपदार्थाच्या अंताक्षरीने फार मजा आणली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरक्षेचे मंत्र अफलातून होते, चित्रं सुंदर होती आणि समर्पक होती. (धन्यवाद, चैतन्य आणि गार्गी)
गणपतीमध्ये घरापासून लांब असूनदेखील ऑनलाईन गणेशोत्सवाने भरभरून आनंद दिला. त्यासाठी सर्वांनाच धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या.
अनेक कल्पक उपक्रमांमुळे उत्सव
अनेक कल्पक उपक्रमांमुळे उत्सव फार छान साजरा झाला, संयोजक. तुम्हा सर्वांचं कौतुक आणि अनेक आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर गणेशोत्सव.. स्पर्धा आणि
सुंदर गणेशोत्सव.. स्पर्धा आणि उपक्रम फारच जबरी होते यंदा.. आणि जबरीच डोकॅलिटी वापरली सगळ्यांनी..
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...
मायबोलीच्या गणेशोत्सव
मायबोलीच्या गणेशोत्सव उपक्रमाशी संबंधित आणि संयोजक मंडळातील सर्वांचंच अगदी मनापासून कौतुक!
'सुरक्षेचा श्रीगणेशा' ही कल्पना अतिशय सुंदर होती. चित्रकाराच्या ओळखीबद्दल मी अतिशय उत्सुक होते. हा उपक्रम हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य!
पुन्हा एकदा, सर्व संयोजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप.
सर्व संयोजक ज्या तळमळीने संयोजक मोडात शिरले होते त्याला तोड नाही.
ही तक्रार अजिबात नाही, पण नोंदवावंसं मात्र जरूर वाटतं. यंदा गणेशोत्सवाच्या काही जाहिराती आक्रमक वाटल्या. सादर होणार्या उपक्रमांविषयी काहीही कल्पना नसताना 'तुमची डाळ शिजणार नाही' हा नकारात्मक सूर खटकला. एकच जाहिरात एकाच बाफवर (पहिली जाहिरात असतानाही) चार-चार वेळा टाकण्याचं प्रयोजन लक्षात आले नाही. शिवाय दिवाळी अंकाची जाहिरात आल्यावर तत्परतेने लगेचच्याच पोस्टीत गणेशोत्सवाची जाहिरात टाकणे हेही समजले नाही. हे मुद्दाम केलं असेल असं अजिबात म्हणायचे नाही, संयोजकांचं तसं इन्टेन्शन नसेल याची खात्री आहेच, पण एका त्रयस्थ नजरेने पाहताना हे जाणवलं हे लिहावंसं वाटलं. गणेशोत्सव आणि दिवाळी अंक हे दोन्ही मायबोलीचेच उपक्रम आहेत, दोन्हींच्या वेळा बघता हे एकमेकांत पाय अडकवनूच येणार, त्यामुळे दोन संयोजक मंडळांच्यात स्पर्धा नसावी.
खर्रच खूप मजा आली, आभासी जगात
खर्रच खूप मजा आली, आभासी जगात आहोत असे वाटले नाही.
वरच्या सगळ्या प्रतिसादांना +
वरच्या सगळ्या प्रतिसादांना + १
संयोजकांचं खूप कौतुक आणि धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान झाले संयोजन ! सर्वांनीच
छान झाले संयोजन !
सर्वांनीच खुप मेहनत घेतली, कौतूक करावे तेवढे थोडेच.
संयोजक मंडळातील सर्वांचंच
संयोजक मंडळातील सर्वांचंच अभिनंदन. खूप मेहनत घेतलीत तुम्ही सार्यांनी आणि उत्सव यशस्वी करून दाखवलात.
माझा मायबोलीवरचा हा पहिलाच गणेशोत्सव, पण ऋन्मेष यांच्या म्हणण्याप्रमाणे आभासी जगात अहोत असे मुळीच वाटले नाही, लहान मुलांसाठीचे उपक्रम लेकानेही एंजॉय केले.
सुरक्षेचे मंत्र, ठो उपमा हे तर अफलातून उपक्रम होते. पण झब्बू खेळांतील ६४ कलांची ओळख, पंचमहाभूते, गाडी बुला रही है, खाद्ययात्रा आणि चंद्र दर्शन हे सारेच उपक्रम केवळ आनंददायी होते.
पा.कृती स्पर्धेच्या नियमांनुसार बनवलेल्या अनेकानेक नाविन्यपूर्ण पा.कृ. वाचायला मिळाल्या. कोतबो ने खो खो हसवले.
अगदी लहानपणी कॉलनीतील गणपतीबाप्पासमोर १० दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत, त्यांत भाग घेणे, त्याची मजा लुटणे हे सारे कैक वर्षांनी पुन्हा अनुभवावयास मिळाले.
बालपणातील गणेशोत्सवाची आठवण ताजी करून दिल्याबद्दल समस्त मायबोली प्रशासन, संयोजन मंडळ व समस्त मायबोलीकरांचे मनः पूर्वक आभार !
खुपच कल्पक आणि कौतुकास्पद
खुपच कल्पक आणि कौतुकास्पद उपक्रम राबलेत संयोजक !!!
प्रत्येक उपक्रमा मागची तुमची मेहनत अगदी दिसून येत होती ..
तुमचे खुप आभार !
संस्थांची नावे गुंफून गणपती चे केलेले रेखाटन पण सुबक ..
उपक्रम अतिशय उत्तम पार
उपक्रम अतिशय उत्तम पार पाडल्याबद्दल संयोजक मंडळाचं अभिनंदन.
अरे काय लाजवताय आभार मानून.
अरे काय लाजवताय आभार मानून. उलट फोटोशाॅप बिटोशाॅप येत नसताना मी जाहीराती करायला मदत करते म्हंटलं आणि तुम्ही सगळ्यांनीच त्यावर संस्कार करत मिळून पूर्ण केलं म्हणून ममं म्हणायला माझा हातभार लागला.
त्यानिमित्ताने मी पाॅवर पाॅईंटचा नीट वापर करायला शिकले
सगळी धावपळ जवळून बघता आली, बरच काही शिकता आलं म्हणून मीच खरं तर आभार मानायला हवेत
ठो उपमा कोतबो पाकृ झब्बू सगळ्यातच मजा आली
छान. अभिनंदन.
छान. अभिनंदन.
आशूडी, उदयन.., चैतन्य
आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया आणि स्नेहश्री, संयोजकांअभावी इतक्या वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव रद्द होण्याच्या बेतात असताना तुम्ही सगळे अगदी ऐनेवेळी धावून आलात आणि गणेशोत्सव उत्तम पार पाडलात!
कुठलाही उपक्रम घाईघाईत उरकलेला वाटला नाही. खाद्यपदार्थ स्पर्धा, फोटोझब्बू, छोट्यांचा चित्रं रंगवा उपक्रम यांसारखे जुने लोकप्रिय उपक्रम राबवत असताना ठो उपमा आणि सुरक्षेचे मंत्र या नव्या कल्पना लोकप्रिय केल्या.
तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतूक आणि धन्यवाद!
पहिल्या दिवशीच मुड ऑफ होता
पहिल्या दिवशीच मुड ऑफ होता माझा कारण कुठेच गणपतीला जाणार नव्हते.. पण चैतन्य यांच्या श्लोकनेच प्रसन्न सुरुवात केली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावर्षी अजिबातच भाग घेता आला नाही .. तरी खुप धम्माल आली..सगळेच उपक्रम आवडले
धन्यवाद संयोजक मंडळ नि मायबोली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२०१४ गणेशोत्सव संयोजन
२०१४ गणेशोत्सव संयोजन मंडळातील सर्व संचालकांचे मन:पूर्वक आभार. रोजच्यारोज जणू काही प्रतिसादांचा पाऊसच पडत चालला असतानाही सर्व घडामोडीवर (स्वत:ची कामेधामे सांभाळून, प्रसंगी दुर्लक्ष करूनही असेल) आपुलकीने लक्ष देऊन या मंडळींनी यंदाचा गणेशोत्सव बहुगुणी केला.
या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
यावेळी सहभाग होता त्यामुळे
यावेळी सहभाग होता त्यामुळे आणखी मज्ज्जा आली .
पुढच्या वेळी आणखी काही उपक्रमात सामिल व्हायचा मानस आहे
स्वस्ति, पुढच्या वेळेला
स्वस्ति, पुढच्या वेळेला संयोजनात सहभागी व्हा
जास्त मजा येते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला नव्हतं वाटलं की मी हे वाक्य कधी लिहीन पण पुन्हा संयोजन करायला आवडेल
यावर्षी खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. त्यांचा पर्सनल लाईफ मधे फायदा होईला सुरुवात झालीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रत्येक संयोजकाकडुन त्यांच्याही नकळत खुप गोष्टी शिकले. यावर्षी संयोजनाने मला काय शिकवलं असेल तर पेशन्स! माझ्या मधली ही कमतरता ओव्हरकम करण्याची सुरुवात या संयोजनाने करुन दिली.
प्रत्येक संयोजकाला पर्सनली थँक्स!
प्रत्येक उपक्रम, स्पर्धा, खेळ यशस्वी होण्यात आम्हा संयोजकांबरोबरच सगळ्याच मायबोलीकरांचा वाटा आहे त्याबद्दल तुमचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या वर्षी मी काही न ठरवता संयोजनात आले त्या मागे गणरायाचाच हात असावा याची खात्री आहे.
मला ही संधी दिली त्याबद्दल अॅडमिन यांचे आभार.
ही पोस्ट संयोजक म्हणून न लिहिता रीया म्हणुन लिहितेय
हे सगळं बोलले नसते तर रुखरुख राहुन गेली असती ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना पुन्हा एकदा मनापासून
सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंद्रधनुष्य यांचे नाव नजरचुकीने लिहायचे राहून गेले होते ते लिहीले आहे.
@मंजूडी, तुमच्या सूचनांचं स्वागत आहेच तरीही काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. दिवाळी अंक आणि गणेशोत्सव दोन्ही मंडळात कुठलीही स्पर्धा असण्याचं कारण नाही. ते दोन वेगळे उपक्रम आहेत. कालावधी एकच येत असल्याने दोन्हींच्या जाहिराती एकदम दिसू लागतात. बातमी फलकांवर जाहिराती कशा दिसतायत यापेक्षा कार्यकर्त्यांची उपलब्धता आणि जाहिरातीच्या वाचकवर्गाची वेळ साधणे याला प्राधान्य आहे. त्यामुळे दिवाळी अंक व गणेशोत्सव यांच्या जाहिराती एकाखाली एक दिसल्या तर तो नाईलाज समजावा. तसेच पुन्हा पुन्हा मायबोली चाळत बसण्यापेक्षा वर आलेल्या बाफांवरच जाहिरात टाकणे सोयीचे होते. काहीवेळा चुकून पुन्हा पुन्हा जाहिराती टाकल्या गेल्या जे नंतर सुधारण्यात आले. मायबोलीकर अशा किरकोळ गोष्टी समजून घेतील अशी अपेक्षा आहे. शेवटचा मुद्दा, नकारात्मक सूर हेच त्या जाहिरातीचे वैशिष्ट्य होते असे समजले तर खटकणार नाही, कारण ते फक्त उत्सुकता वाढवण्यासाठी होते जे साध्य झाले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान पार पडला कार्यक्रम, सर्व
छान पार पडला कार्यक्रम, सर्व संबंधितांचे अभिनंदन !! गार्गी दत्ता यांचेही खास कौतुक ! त्यांची चित्रे खूप आवडली !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी खाद्य झब्बू अणि कशाला शिजायची बात हे कार्यक्रम मला सर्वात आवडले!
अभिनंदन मंडळ मस्त झाला
अभिनंदन मंडळ
मस्त झाला गणेशोत्सव. तुम्हा सर्वांचे कौतुक आणि धन्यवाद.
सुरक्षेबद्दल दिलेल्या सर्व टिप्स आवडल्या. पाककृती स्पर्धेची कल्पना आवडली. झब्बूसाठी निवडलेले सगळे विषय मस्त होते. आणि हे तुमचे मनोगत व आभार प्रदर्शन म्हणजे आयसिंग ऑन द केक.
आणि हो हा अक्षर गणेश, त्यामागची कल्पना अतिशय भारी आहे.
संयोजक आणि भाग घेतलेल्या
संयोजक आणि भाग घेतलेल्या माबोकरांचं अभिनंदन आणि कौतुक आणि गार्गी यांनाही धन्यवाद .
अभिनंदन मंडळी. धमाल आली
अभिनंदन मंडळी. धमाल आली गणेशोत्सवात. सगळेच उपक्रम कल्पक, नावीन्यपूर्ण होते. माझे दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे राहून गेले पण ती कसर ठो देऊन भरून काढता आली.
संयोजकांचा वावर मंडपात आणि मंडपाबाहेरही सतत जाणवत होता आणि तो अगदी प्रसन्न होता.
यंदाची पाककृती स्पर्धाही आगळीवेगळी होती.यानिमित्ताने अनेक नव्या पाक-कला-कृती पाहायला मिळाल्या यत काही जुन्याच पाककृती नव्याने पाहिल्यावर करून पाहाव्याश्या वाटल्या. नियम काटेकोरपणे शब्दांत बसवणे कठीण असते तरीही हवे तिथे लगेच स्पष्टीकरण दिले गेले.
संयोजकांचे पुनश्च अभिनंदन.
ता.क. ठो उपमासाठी मूळ कथा कोणी लिहिली होती हे सांगितलेले माझ्या नजरेतून सुटलेय का?
विजयाबाई आणि सुरक्षेचा
विजयाबाई आणि सुरक्षेचा श्रीगणेशा आवडले.
दिवाळीच्या वेळीसुद्धा अशी सुरक्षा सिरीज करता येईल.
भरतदादा आणि सगळेच : ठो उपमा
भरतदादा आणि सगळेच :![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठो उपमा या कल्पनेचा उगम फारएंड यांच्या लेखातून झाला. त्यावरुन खेळ तयार करायची कल्पना आशूडीची. कथेचे ५०% लेखन आशूडी आणि ५०% मी व स्नेहश्री यांनी केले. इतर संयोजकांचाही यातल्या अनेक कामात मोठा वाटा होताच
मस्त झाला गणेशोत्सव. संयोजक
मस्त झाला गणेशोत्सव. संयोजक मंडळाने भरपूर मेहनत घेतलेली कळत होती.
या वेळचा गणेशोत्सव खर्या
या वेळचा गणेशोत्सव खर्या अर्थाने संयोजक मंडळाची कसोटी पाहणारा होता. ऊशिरा झालेली घोषणा , हाती ऊपलब्ध असणारा कमी वेळ , एकमेकांना अनोळखी यावर मात करुन हा उपक्रम यशस्वी करणे हे मोठे आव्हान होते. आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगावस वाटतय की हो यावेळच संयोजक मंडळ त्यात बर्याच प्रमाणात यशस्वी ठरलेल आहे.
कामाला सुरुवात केली तेव्हा पाटी कोरी होती. पण एक मात्र होत ज्या तडफेन आम्ही काम सुरु केल ती तडफ आम्ही शेवटपर्यत कायम ठेवली. कोणीही माग हटल नाही. हे श्रेय सर्व संयोजकांच आहे. यातही बर्याच अडचणी आल्या. पण त्यांनाही आम्ही धीराने तोंड दिलं. हळूहळू त्याला आकार येऊ लागला. ऊपक्रम , स्पर्धा साकार झाले. त्यांच दृश्य रुप तुम्हा सर्वासमोर आहेच.
आमच्या या धडपडीला तुम्ही मायबोलीकरांनीही ऊत्तम साथ दिलित. पाककृती स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद खरच सुखावून गेलाय. तीच गोष्ट सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, इतर ऊपक्रम व कोतबोचीही. रंगात / गणोबा हे ऊपक्रम बच्चेकंपनीने यशस्वी केले.महत्वाच म्हण्जे हे सर्व कोणत्याही वादाविना यशस्वीपणे पार पडलं. संयोजक म्हणून आमच्या धडपडीची मायबोलीकरांनी दिलेली ही मोलाची पावती आहे. सर्व मायबोलीकरांचे मनापासून आभार !
वैयक्तिकरित्या मला पराग , आशूडी , चैतन्य , गजानन यांच्याकडून खूप शिकायला मिळालं ( प्रत्यक्ष गजानन मंडळात असल्याने बाप्पांनी त्यांचा सहभाग नोंदवला होताच
). रीया, ऊदय, स्नेहश्री यांचाही सहभाग मोलाचा आहे.
थोड्याच कालावधित आम्ही सर्व संयोजक एकमेकांचे मित्र बनलो. हे मैत्र असच राहाव अस मनापासून वाटतं.
या ऊपक्रमात संयोजक म्हणून काम करायची जबाब्दारी दिल्याबद्द्ल मायबोली अॅडमिन यांचे आभार.
मायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते. मायबोलीवरचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मायबोलीकरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. यंदा गणेशोत्सव संयोजन मंडळासाठीच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद आल्याने उत्सव रद्द होतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे सर्व मायबोलीकरांना, विशेषतः नवीन मंडळींना, संयोजन मंडळातर्फे आवाहन की अश्या मंडळामध्ये नक्की भाग घ्या कारण हा अतिशय आनंददायी अनुभव असतो. +११११११११
लोकहो, पुढिल गणेशोत्सव असाही दणक्यात साजरा होऊ देत ही त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना.
बहुत काय लिहिणे. इति लेखनसीमा
गणपती बाप्पा मोरया !!
समारोप आणि आभारप्रदर्शन
समारोप आणि आभारप्रदर्शन मनाला भिडणारे.. पडद्यामागचे कलाकर कोण आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. ते लिहील्याबद्दल मनापासून आभार.
नेहमीची व्यवधानं संभाळून ही गणेशोत्सव अतिशय सुंदर रित्या साजरा केल्याबद्दल संयोजक मंडळाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
यावेळी मी प्रथमच श्री
यावेळी मी प्रथमच श्री गणेशोत्सवाचा आनंद लुटला. स्पर्धेतहि भाग घेण्याच धाडस केल. संयोजकाची कल्पकता व मेहनत वाखाण्ण्यासारखीच. आम्हालाहि खुप शिकायला मिळाल.. धन्यवाद.
Pages