अननस - अर्धे,
लहान टरबूज- अर्धे,
पुदिना -१०-१२ पाने
लिंबू, साखर, चाट मसाला, मीठ - चवीनुसार
तयार पेय:- साधा सोडा छोटी बाटली (५०० ml)
१ टरबूज आणि अननसाचे बारीक तुकडे करा.
२. त्यातले निम्मे बाजूला काढून ठेवा.
३ पुदिना बारीक चिरा.
४.लिंबाचा रस काढून त्यात साखर मिसळा. मिश्रण घट्ट वाटत असल्यास त्यात थोडे पाणी टाका. चवीनुसार मीठ,चाट मसाला टाका.
५. आता टरबूज, अननसाचे तुकडे मिक्सर मधून प्रत्येकी क्रश करा.
६. तयार फळांचा पल्प बर्फाच्या साच्यात सेट करायला फ्रिजर मध्ये ठेवा.
७. चिरलेला पुदिना थोड्या पाण्यात मिक्स करुन तोदेखील बर्फाच्या साच्यात सेट करायला फ्रिजर मध्ये ठेवा.
८. फळांचे पल्प सेट झाल्यावर आता निम्मे काढून ठेवलेले फळांचे तुकडे व फ्रिजर मधील पल्प हे एकत्र करा. टरबूज, अननस प्रत्येकी मिक्सर मधून थोडे क्रश करा.
९. लिंबाचा रस आणि फ्रिजर मध्ये सेट झालेल पुदिना हे मिक्सर मधून थोडे क्रश करा.
१०. आता एका उभट ग्लास घ्या.
११. त्यात प्रथम अननसाचे क्रश मिश्रणाचा थर द्या.
१२. आता त्यावर टरबूजाच्या मिश्रणाचा थर द्या.
१३. सगळ्यात वर पुदिन्याचा थर द्या.
१४. तयार झालेल्या थरांवर आता एका बाजुने सावकाश सोडा टाका.
१५.सजावटीसाठी एक लिंबाची फोड खोचा/पुदिन्याची एक-दोन पाने ठेवा.
आपल्या आवडीची फळे घेवून वेगवेगळी रंगसंगती आणि चवीत बदल करु शकतो.
खुपच सुंदर दिसतंय..........
खुपच सुंदर दिसतंय..........
..
..
Pages