आता कशाला शिजायची बात - संपदा - कलिंगड सॅलड.

Submitted by संपदा on 7 September, 2014 - 02:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. कलिंगडाच्या फोडी - १ वाटीभर.

२. आईसबर्ग सॅलड - कापलेली पाने - १ वाटीभर.

३. फेटा चीज - १/२ वाटीभर.

४. पुदिन्याची पाने - १० - १२ पाने , बारीक चिरून.

५. अक्रोड - १/४ वाटीभर.

५. मीठ, मिरपूड - चवीनुसार.

६. ऑलिव्ह ऑईल - २ मोठे चमचे.

७. लिंबूरस - १ मोठा चमचा.

८. मध - १ लहान चमचा.

क्रमवार पाककृती: 

१. कलिंगड कापून त्याचे छोटे तुकडे करावेत.

२. आईसबर्ग सॅलडची पाने काढून धुवून बारीक चिरून घ्यावीत.

३. फेटा चीज हाताने चुरून छोटे तुकडे करून घ्यावेत.

४. अक्रोडाचे छोटे तुकडे करून घ्यावेत.

५. पुदिन्याची पाने धुवून बारीक चिरून घ्यावीत.

६. एका छोट्या वाटीत ऑलिव्ह ऑईल, लिंबूरस, मध, मिरेपूड आणि थोडेसे मीठ ( फेटा चीजमध्ये मीठ असतेच, त्यामुळे आवश्यकता असेल तरच मीठ घालावे. ) एकत्र करून घ्यावे.

७. सर्व पदार्थ एकत्र करून सॅलड मिक्स करा.

८. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खा.

DSC_0032_a.jpgDSC_0035_a.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जण.
अधिक टिपा: 

१. फेटा चीज न मिळाल्यास पनीरसुद्धा वापरता येईल. हवे असल्यास पनीर हिरव्या चटणीत मॅरिनेट करून ग्रील करून घालता येईल.

२. नॉनव्हेज खवय्यांना ह्यात ग्रील्ड चिकनचे उभे तुकडे करून घालता येतील.

३. लिंबूरसाऐवजी ( आवडत असल्यास ) बाल्सामिक व्हिनेगर वापरू शकता.

४. मध नको असल्यास कॅरॅमलाईज्ड अक्रोडाचे तुकडे घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
नेटवरील विविध रेसिपीज व स्वप्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिवार निषेध!! कलिंगडाचा मोसम संपल्यावर असं कायतरी तोंपासु इथे टाकल्याबद्दल Uhoh
पुढच्या उन्हाळ्यासाठी रेस्पि नोट करून ठेवली जात आहे.

मस्त

हो. मला हे सॅलड सॉलिड आवडतं. फेटाबरोबरच थोडं पार्मेझानही कापट्या काढून टाकायचं.

मस्त आहे हे सॅलड! यात कलिंगडाचे लहान लहान स्कूप्सही मस्त लागतील फोडींऐवजी... Happy

मस्त .. आवडलं सॅलॅड .. आईसबर्ग सॅलॅड ची पानं म्हणजे आईसबर्ग लेट्ट्युस च ना?

फोटो पाहून थंडगाऽर वाटलं.
फोटो अजून मोठ्या आकारात बघायला छान वाटतील.