ओये… किथ्थे…
पेहचाणा???
याद शाद है के भूल ही गये हमको….
नाहीच ना ओळखलंत? कसं ओळखाल?? पूर्वी आमचं नाव घेतल्याशिवाय एक दिवस जायचा नाही तुमचा आणि आज विसरून पण गेलात? कमाल करता!!
मी संता... संता-बंता वाला संता… ओये तुमचा favourite संता सिंग यार…
काय सांगू ओ, हल्ली दिवस फार वाईट आलेत. आता कसलं favourite आणि कसलं काय म्हणा. कुण्णी कुण्णी म्हणून बघत नाही आमच्याकडे. आहे भरण्यात दिवस संपतो आणि उसासे टाकण्यात रात्र… का काय विचारताय? तुम्हाला ठाऊक नाही?? तुम्हा सर्वांमुळे तर झालाय हे सगळं आणि तुम्हाला माहित नाही???
हल्ली एक नवा विनोद आमच्या नावावर खपेल तर शप्पथ. आठवा कि तुम्हीच, आमच्या नावाने शेवटचा joke forward केलात त्याला किती दिवस झाले? आठवा आठवा…. आठवा महिना सुद्धा संपला पण आम्हा संता-बंता वर एक्क भी नवा joke नाही आला ह्या नव्या वर्षात. तुमच्या मायबोलीच्या भाषेत TRP का काय म्हणतात तो कमी झाला आमचा… कमी कसला, संपलाच कि हो पार. हायो रब्बा, असाही दिवस पाहावा लागेल, कभी सपणे में भी नही सोच्चा था जी… :'(
आणि ह्या सगळ्याला कारण कोण? तर ती काल आलेली टिचभर मुलगी. ती कोण कुठची आलिया आलीया पासून.. आपलं हे… आलिया आल्यापासून तुम्ही सगळे पार विसरूनच गेलात कि मला. इतने सारे सालों का याराना अपना.. असा विसरायचा असतो का? एका TV show मध्ये २-४ फुटकळ उत्तरं दिली तिने, एवढंच तिचं कर्तृत्व. त्या जीवावर माझी जागा देऊन टाकली तुम्ही तिला? क्यो? किस ख़ुशी में??
अहो खऱ्या आयुष्यात असे नमुने तर कितीतरी सापडतील आजूबाजूला. आपले राजकारणी बघा, कधी कुठे कुणाला काय आणि कसं बोलतील काहीही नेम नाही. पण कुणीही स्वत:ची लोकसभेची सीट सोडून आमची सीट बळकावायला कध्धी आले नाहीत… मग ते कुणीकडचे शहजादे का असेनात. फार लांब कशाला जाताय, त्याच show मध्ये तिच्याच शेजारी बसून तो वरूण नाही का तितकाच मठ्ठासारखा उत्तरं देत होता. पण तरी त्याची हिम्मत सुद्धा नाही झाली हो असला अभद्र विचार करायची. हे असलं पाप मनात देखील आलं नसेल त्याच्या. ओ जी… वड्डा सोणा मुंडा!
पण ही आलिया. कानामागून आली आणि तिखट झाली. बरेच महिने बघतोय आम्ही, जिकडे जावं तिकडे आपला तिचाच बोलबाला. facebook म्हणू नका, whatsapp म्हणू नका, प्रत्येक विनोदामध्ये ही आहेच. आमचे विनोद सरळ सरळ ढापले की तिने. उत्तरेकडच्या दोन गोष्टी अढळ आहेत अशी खात्री होती आमची, एक तो ध्रुवतारा आणि दुसरे आम्ही संताबंता… 'विनोद सम्राट' म्हणून मोठ्या कष्टाने मिळवलेली आम्ही पदवी… धक्का मारके गिरा दिया बंदी ने हमे, आणि आमच्या खुर्ची वर ठाण मांडून बसून राहिली आहे आता.
अहो उद्या पनवेलच्या त्या नवीन एअरपोर्ट ला 'आलियाक्रुझ' म्हणून नाव देऊन मोकळे होतील आणि तुम्ही तमाशा बघत बसून रहाल नुसते. आमच्या बिचाऱ्या बंताने जायचं कुठे मग? करा की हो तुम्ही काहीतरी. तुमच्या गणपती बाप्पाला साकडं का काय म्हणतात ते घाला लवकर.
आमचे सिद्धूपाजी बोलून गेले आहेत, Nobody travels on the road to success without a puncture or two. म्हणून एवढे दिवस गप्प बसलो होतो. पण आता बास झालं. गणपती बाप्पाला सांगा जरा कि हे पंक्चर लवकर काढ आता. आलियाला तिचं काम करू द्या और हमको हमारा. जिंदगीभर तेरी आरती उतारेंगे जी हम…
मस्त जमलंय
मस्त जमलंय
मनी, पहली बॉल पे ही
मनी, पहली बॉल पे ही सिक्सर..... मस्त लिहील आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकच नंबर अवल ताई वॉज सुपर
एकच नंबर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अवल ताई वॉज सुपर डुपर करेक्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लै पोटेंशिअल हाय ताई तुमच्याकडे
पुन्हा पुन्हा वाचलं मी
आलीया बाबत +१११११११११११११
अरे, सही सही लिहिलयस ग
अरे,
सही सही लिहिलयस ग ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अगदीच आलिया भोगासी म्हणायचे
अगदीच आलिया भोगासी म्हणायचे कारण नाही बरे संता! ती आलिया कोण हे आम्हाला क्षणभर आठवून पाहावे लागले. तेंव्हा तुम्ही खचू नका!
कितनी भी बार मायबोली की फिदी स्मायली आप के उप्पर से ओवाळ के टाकेंगे तो भी कमीच है.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अहो उद्या पनवेलच्या त्या नवीन
अहो उद्या पनवेलच्या त्या नवीन एअरपोर्ट ला 'आलियाक्रुझ' म्हणून नाव देऊन मोकळे होतील आणि तुम्ही तमाशा बघत बसून रहाल नुसते. >>>> बेस्ट!!! हाहाहाहा .... सांताक्रूझ तुमचेच राहील आलीयाक्रुझ येतील आणि जातील.
सही गजानन .. शेवटची ओळ
सही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गजानन .. शेवटची ओळ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मनूडे, संताला सुद्धा कोतबो
मनूडे, संताला सुद्धा कोतबो असेल अस स्वप्नात सुद्धा वाटल नव्हते. भन्नाट कल्पना . तुसी ग्रेट हो. संता पाजीकि खमै हो. ____/\_____
अहो उद्या पनवेलच्या त्या नवीन एअरपोर्ट ला 'आलियाक्रुझ' म्हणून नाव देऊन मोकळे होतील >>>>>> आलियाक्रुझ
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गजानन, कितनी भी बार मायबोली
गजानन,
कितनी भी बार मायबोली की फिदी स्मायली आप के उप्पर से ओवाळ के टाकेंगे तो भी कमीच है. >>> हे सही होतं![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्तय
छान जमलयं. आलिया गेलीया...
छान जमलयं.
आलिया गेलीया... संता धाडी निरोप...
आलीयाक्रुझ <<< हाहाहा
आलीयाक्रुझ <<< हाहाहा
अरे, थँक्स सर्वांना.. कितनी
अरे, थँक्स सर्वांना..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कितनी भी बार मायबोली की फिदी स्मायली आप के उप्पर से ओवाळ के टाकेंगे तो भी कमीच है.>>>> गजाभौ
ओये सांता पाप्पे....ते
ओये सांता पाप्पे....ते म्हणतात ना... 'आलीया' भोगासी, असावे सादर...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय
मस्तय
हे फारच भारी सिलेक्शन आहे
हे फारच भारी सिलेक्शन आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झकास निवड आणि लेखनही
झकास निवड आणि लेखनही
मस्तच जमलाय कोतबो. आवडला.
मस्तच जमलाय कोतबो. आवडला.
हे सर्वात भारीये. मस्तच
हे सर्वात भारीये. मस्तच जमलंय.
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय
मस्तय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सहीये बाप्पाकडॅ साकडे घाला
सहीये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाप्पाकडॅ साकडे घाला आता.. आलिया गेलिया हाती धाडी निरोप
मने षटकार मने तू लिही(त रहा)
मने षटकार
मने तू लिही(त रहा) (मने तू गा चालीवर)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तच आहे
मस्तच आहे
मस्त... अशा आलिया गेलिया
मस्त... अशा आलिया गेलिया कितीतरी असतील.. संताबंतादा जब्ब्बाब नै !
मने, मस्त धमाल आली
मने,
मस्त धमाल आली वाचताना...
इतक्या उशीरा वाचलं मी एवढं चांगलं लिखाण....:)
मस्तच ग मने
मस्तच ग मने
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मने मस्त ग!
मने मस्त ग!
अरे आज वाचल हे. मस्तच जमून
अरे आज वाचल हे.
मस्तच जमून आलय
.
अभिनंदन manee !
अभिनंदन manee !
Pages