सुक्या मेव्याच्या बर्याच पाककृती स्पर्धेसाठी आल्या आहेत. सगळ्याच पाककृती मस्त आहेत, करायलाही सोप्या आहेत.
'आशिबा' जाहिर झाल्यावर नियम वाचल्याक्षणी ही पाककृती डोळ्यांसमोर आली. फोटोबिटो काढण्याचा खटाटोप करत गणपतीच्या आधी उत्साहाने केली. त्याच उत्साहात इथेही देते आहे.
बघा, आवडतात का आमचे पॉवरपॅक!
लागणारे जिन्नस:
काजू - १५-२०
बदाम - १५-२०
अक्रोड - ८-१०
पिस्ते - १०-१२
सुक्या अंजिराच्या चकत्या - ४-५
बेदाणे - १०-१२
जर्दाळू - ५-६
खजूर - ५-६
केशर-वेलची सिरप - अर्धा चमचा
१. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते ड्रायफ्रूट स्लायसरवर किसून घ्या.
२. खजूराच्या बिया काढून साफ करून घ्या. सुके अंजीर, बेदाणे, जर्दाळू आणि खजूर सुरीने बारीक कापून घ्या.
३. सगळं प्रकरण एकत्र करून त्यात केशर-वेलची सिरप घालून कालवा.
४. आवडत्या आकारात पॉवरपॅक बनवा आणि रोज एक खा.
लहान मुलांसाठी, बाळंतिणींसाठी हा साखरविरहीत खास पदार्थ आहे. मधुमेहींनाही कधीतरी तोंडात टाकायला चालू शकेल.
आमची आजी खजूर, अंजीर वगैरे जरा तुपावर परतून घेते. ते आजीच्या हातचं खायला चांगलं लागतं. आम्ही केलं की पॉवरपॅक खाताना तूप तोंडात येतं, जे आवडत नाही, म्हणून शोधून काढलेला हा शॉर्टकट आहे.
सुका मेवा घेताना चांगला खुटखुटीत असावा. मऊ पडलेला/ सादळलेला/ खवट झालेला नको.
अंजीर/ खजूर/ केशर सिरप यातल्या ओलाव्यामुळे पॉवरपॅक नीट वळले जातात. पण वळले जात नसतील तर जरा तुपाचा हात लावून वळा.
स्लाईसरवर काप करणं किती सहज
स्लाईसरवर काप करणं किती सहज होतं ?>> एकदम सहज होतं अगो. थोड्या सुक्यामेव्याचे कापही पुष्कळ होतात. सढळ हाताने सुकामेवा पेरल्यासारखा वाटतो शिवाय तो स्लाईसर अतिधारदार नाहीये आणि पिस्त्यासारखा बारका पदार्थही सहज किसता येतो. नीरजाही हौशीने त्यावर काप करून देते.
पॉवरपॅक एकदम जबरी आहे मंजुडी!
पॉवरपॅक एकदम जबरी आहे मंजुडी!
वॉव.. खूपच आवडला
वॉव.. खूपच आवडला पॉवरपॅक..किसणे कटकटीचे नाहीये वाचून बरं वाटलं.. ट्राय करणार नक्की..
मस्त आहे. नेहेमी खायला छान
मस्त आहे. नेहेमी खायला छान
Pages