१) सुके खोबरे- २ वाट्या
२) खारिक पूड- पाऊण वाटी
३) खडीसाखर- थोडी खलून- अर्धी वाटी (ओबडधोबड लागली पाहिजे)
४) बिया काढून चिरलेला खजूर- एक वाटी
५) खसखस- पाव वाटी
६) पातळ केलेले साजूक तूप- पाव वाटी
वाटी- नेहेमीची आमटीची. साधारण माप १२५ ग्रॅम्स
गणपती बाप्पाचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा आणि दर वर्षी उकडीच्या मोदकांप्रमाणे साधारणपणे एकदाच केलेला पारंपरिक नैवेद्य म्हणजे 'पंचखाद्य'. या पंचखाद्याचे घटक म्हणजे खोबरं, खारीक, खसखस, खडीसाखर आणि खिसमिस.
या घटकांमधून खिसमिस वगळून त्याऐवजी त्यात अजून एका 'ख'ची भर घातली- ती म्हणजे खजूर.
वर दिलेले सर्व पदार्थ एकत्र करायचे आणि पातळ केलेले तूप ओतत (!), मिश्रण एकत्र करत लाडू वळायचे! लाडू रव्या-बेसनाच्या लाडवांपेक्षा जरा छोटेच बांधायचे.
या लाडूंमधले सर्व घटक पौष्टिक आहेत आणि तत्काळ ऊर्जा देणारेही आहेत. म्हणून यांचं नाव- 'हाय फाईव्ह'
माझ्या लेकाने त्यांचं नामकरण 'ख-लाडू' असेही केले आहे
१) तूप अंदाजे घालायचे आहे. लाडू वळताना सुक्या खोबर्याला तेल सुटत जाते, त्यामुळे कमी-जास्त लागू शकते.
२) सुगरण लेव्हल तीन आणि त्यापुढे असाल, तर लाडू वळताना मध्ये एक खडीसाखरेचा खडा ठेवून मग लाडू बांधावा. लाडू खाताना ही सर्प्राईज खडीसाखर लाडूचा गोडवा वाढवते आणि खवय्यांचा आनंदही.
<<< सुगरण लेव्हल तीन आणि
<<< सुगरण लेव्हल तीन आणि त्यापुढे असाल, तर >>

मस्त !
मस्त !
सुगरण लेव्हल तीन आणि त्यापुढे
सुगरण लेव्हल तीन आणि त्यापुढे असाल, तर
मस्त रेसिपी.
हाय फाइव्ह हे नाव वाचून वाटलं
हाय फाइव्ह हे नाव वाचून वाटलं नव्हतं पंचखाद्य असेल म्हणून.
मस्त पा. कृ.
सुगरण लेव्हल तीन...>>> आवडलं
फोटु? बोलाफुलाला गाठ. मस्त
फोटु?
बोलाफुलाला गाठ.
मस्त दिसताहेत.
धन्यवाद लोकहो! फोटोही टाकला
धन्यवाद लोकहो!
फोटोही टाकला आहे आता.
मस्त दिसतायेत लाडू. ख-लाडू
मस्त दिसतायेत लाडू. ख-लाडू नाव जास्त आवडलं
<<सुगरण लेव्हल तीन...>>
मी कटाप.
मस्त.
मस्त.
मस्त लागतात हे लाडु! सुगरण
मस्त लागतात हे लाडु!
सुगरण लेवल ३>>>
सुगरण लेव्हल तीन>>>>> हे लय
सुगरण लेव्हल तीन>>>>> हे लय आवडल!!
सुगरण लेव्हल तीन हा फंडाच
सुगरण लेव्हल तीन हा फंडाच भारी आहे.. पण सोप्पी कृती असूनही लेव्हल थ्री म्हणजे जास्त नाही का वाटत???
>>>पण सोप्पी कृती असूनही
>>>पण सोप्पी कृती असूनही लेव्हल थ्री म्हणजे जास्त नाही का वाटत
टोटल किती लेव्हल डीफाईन केल्या आहेत ते कुठे माहितेय
सुगरणीच्या लायनीतच नाही मी ,
सुगरणीच्या लायनीतच नाही मी , त्यामुळे खडीसाखरे ची आयडीया क्ञान्सल. पण बाकी हाय फाइव्ह ,गर्दीतल्या लोकाना जमणेबल आहे.
खेळून आल्याबर द्यायला छान आहे.
पण गर्दीत का करायचे लाडू
पण गर्दीत का करायचे लाडू इन्ना?
आपण सुगरण लेवल वजा 3 म्हणून खडीसाखर नाकातल्या चमकीसारखी वर टोचून लावणार.
मस्तं आहे रेसिपी
मस्तं आहे रेसिपी
सुगरण लेवल पण भारीच
सुगरण लेवल पण भारीच
मस्तच आहे हे, आम्हा
मस्तच आहे हे, आम्हा पळपुट्यांना पण छान आहेत जवळ बाळगायला
हिम्या, लाडू सोपे आहेत, पण
हिम्या, लाडू सोपे आहेत, पण खडीसाखर बरोब्बर मध्ये आली पाहिजे, ह्यासाठी सुगरण लेव्हल तीन अॅन्ड अप!
येस, इन्ना, भूकलाडू कॅटॅगरी आहेत हे लाडू.
हर्पेन- तुमच्यासारख्या हाय इन्टेन्सिटी व्यायाम करणार्यांसाठी तर हे लाडू एकदम योग्य होतील. एकदा चाखून बघाच.
धन्यवाद लोकहो!
या लाडूचे अजून एक नामकरण- राकेश रोशन लाडू
कारण ओळखेल काय कोणी?
वा वा ! जबरी फोटो . तोंपासू
वा वा ! जबरी फोटो . तोंपासू अगदी
या लाडूचे अजून एक नामकरण- राकेश रोशन लाडू . कारण ओळखेल काय कोणी? >>>>>>> त्याला असलेल्या ट्कलासारखे गोल आणि चकच़कीत दिसत आहेत म्ह्णुन काय ?
(ऊत्तर बरोबर असल्यास त्यातले दोन लाडू बक्षीस म्हणून देणे हि णम्र विनंती
)
त्याला असलेल्या ट्कलासारखे
त्याला असलेल्या ट्कलासारखे गोल आणि चकच़कीत दिसत आहेत म्ह्णुन काय ? >>>


नहीऽऽऽऽ!!!!!!!!!!!!
तरीही या उत्तराबद्दल तुला बक्षिस देईन मी जाई!
थाक्यू पौ तै. अजून एक
थाक्यू पौ तै.
अजून एक प्रयत्न ;- रा रा च्या चित्रपटात हाय फाईव्ह शब्द वापरला गेलेला आहे काय ? मे बि कहो ना प्यार है मध्ये ?
हाय फाईव्ह बरंच कॉमन आहे जाई.
हाय फाईव्ह बरंच कॉमन आहे जाई. रा रोचा कॉपीराईट नाही त्यावर
एकदम सोपं आहे खरंतर.
उत्तर उद्या याच वेळी याच ठिकाणी देण्यात येईल
भारीय रेसिपी .. सुगरण लेव्हल
भारीय रेसिपी ..
सुगरण लेव्हल तीन अॅन्ड अप >>
ओक्केज !
ओक्केज !
<<< उत्तर उद्या याच वेळी याच
<<< उत्तर उद्या याच वेळी याच ठिकाणी देण्यात येईल फिदीफिदी
ह्याला म्हणतात आपल्या रेसिपीचा टीआरपी वाढवणे
ऑन सीरियस नोट राकेश रोशनचे सिनेमे "क" ने सुरू होतात तसे ह्यातले घटक "ख" ने असा बादरायण संबंध ;).
हो संपदा, इंग्लिश मिडीयममध्ये
हो संपदा, इंग्लिश मिडीयममध्ये 'ख' K नेच सुरु होतो. तेच उत्तर असेल.
मस्तं आहे रेसिपी सुगरण लेव्हल
मस्तं आहे रेसिपी
सुगरण लेव्हल ३
घरी लगेच्च लाडू बनवण्यास
घरी लगेच्च लाडू बनवण्यास सांगण्यात आले आहे व उद्या लडाखला जाताना बरोबर घेऊन जाणार आहे. अगदी योग्य वेळेवर ही पाककृती इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
Mast! Ekadam healthy Ladoola
Mast! Ekadam healthy
Ladoola khali pop stick laun mulana ladoo-pops mhanun dyayache
aani jara naughty addition - melted chocolate madhe dip karayache 
खुपच मस्त पोर्णिमा. चान
खुपच मस्त पोर्णिमा. चान झालेत.
Pages