मायबोलीवर स्पर्धा जाहीर झाल्यापासूनच डोक्यात नकळतच विचार चक्र सुरु झाले आणि त्यातून निर्माण झालेला स्पर्धेच्या नियमात बसणारा हा गोड पदार्थ- बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू )
साहित्य:
बदाम, काजू , डेअरी व्हईट दूध पावडर, दूध प्रत्येकी अर्धी वाटी,
डेसिकेटेड कोकोनट एक वाटी ,
वेलची पावडर स्वादासाठी
पिठी साखर गरजेनुसार,
रंगासाठी बीटचा अर्क २ चहाचे चमचे ( बीट किसून ते पाण्यात कुस्करल की जे लाल पाणी मिळते ते. मी कोणताही कृत्रिम रंग वापरत नाही म्हणून मला ही कसरत करावी लागली. आपण तो वापरत असाल तर बाजारचा गुलाबी किंवा दुसरा कोणताही आवडता रंग वापरू शकता. केशर वापरलं तर लाडू केशरी रंगाचे होतील किंवा कोणताही रंग न वापरता पांढरे ही चांगले दिसतील )
प्रथम अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ला बीटचा अर्क अगदी थोडा थोडा हाताने चोळून डे. को . गुलाबी करून घ्यावा आणि पंख्याखाली तो १५ / २० मिनीटे वाळण्यासाठी ठेवावा. ( विकतचा रंग वापरणार असाल तर ही स्टेप स्किप करा )
बदाम पाण्यात १०-१५ मिनीटं भिजत घालावेत आणि नंतर त्याची साल काढून ते ही पंख्याखाली १५-२० मिनीट कोरडे होण्यासाठी ठेवावेत. ( हे तुम्ही चार सहा दिवस आधी ही करू शकता किंवा सोललेले बदाम बाजारात आयते मिळतात ते ही वापरू शकता. )
नंतर का़जू, बदाम यांची मिक्सर मध्ये पूड करावी ( साधारण दाण्याच्या कूटा इतकी बारीक / भरड करावी. )
साखर ही मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यावी.
एका ताटलीत ही पूड, उरलेला डे. को. ( अर्धी वाटी ) , दूध पावडर , वेलची पावडर आणि लागेल तशी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. दुधाचा हात लावून लावून ( दूध एकदम घालू नये लागेल तसा दुधाचा हात लावावा ) मिश्रण लाडू वळता येतील इतपत मॉईस्ट ( मराठी योग्य शब्द सुचत नाहीये.) करावे आणि मग त्याचे लाडू वळावेत.
नंतर हे लाडू दूधात बूडवून किवा ब्रशने दूध लावून (डे. को. च आवरण लाडवांवर चिकटण्यासाठी ) मग गुलाबी डे. को. मध्ये घोळवावेत.
अशा प्रकारे गणरायाच्या प्रसादासाठी काजू, बदामाचे गुलाबी लाडू तयार.
हा फोटो मी केलेल्या लाडवांचा
From mayboli
आणि हा जवळून
From mayboli
१) हे लाडू झटपट होतात. चवीला छान लागतातच शिवाय पोटभरीचे ही आहेत.
२) साखर चव घेऊनच घालावी कारण डेअरी व्हाईट दू. पा. थोडीशी गोड असतेच. त्यामुळे साखर जास्त लागत नाही.
३) यावर चेरी लावली तर खूप सुंदर दिसते. चेरी चालेल की नाही स्पर्धेसाठी याबाबत साशंक असल्याने मी लावलेली नाही. तसेच मधोमध कापून दोन भाग करून प्लेट मध्ये ठेवलेले लाडू ही फार सुंदर दिसतात.
४) लाडू करताना फार मोठे करू नयेत कारण नारळाच्या किसाच्या कोटिंगने ते फायनली आणखी थोडे मोठे होतात.
५) वरील साहित्याचे साधारण आकाराचे आठ लाडू झाले.
६) गणपतीच्या दिवसात विकतच्या मिठाईच्या ( खव्याच्या ) क्वालिटी बाबत मनात शंका येते म्हणून गणपतीचा प्रसाद म्हणून करायला छान आहेत. मुलांना खाऊ म्हणून, चहाला कोणी पाहुणे येणार असतील तर गोड म्हणून ही देता येतील.
७) बीट न वापरता केशर किंवा रंग वापरला तर उपासाला ही चालतील.
भारीचे आणि फोटो तर केवळ
भारीचे आणि फोटो तर केवळ स्लर्पऽ........
फार मस्त दिसतायत लाडू
फार मस्त दिसतायत लाडू
वा खुप छान लाडू हेमाताई..
वा खुप छान लाडू हेमाताई..
भारी आहे, बनाका नावही सही.
भारी आहे,
बनाका नावही सही. पेटंट घ्या नावासकट>>>>अगदी अगदी!
Where is the link of terms
Where is the link of terms and conditions
e kasali mast aahe ga
e kasali mast aahe ga recipie!!
मस्त.. माझीही बुद्धी
मस्त.. माझीही बुद्धी भेळेच्या पलिकडे चालली नसती.
बनाका ऐवजी बकाना (बकाणा) लाडू पण मजेशीर वाटेल
रंग काय सुरेख आलाय
रंग काय सुरेख आलाय लाडवांचा...
अप्रतीम......
मस्त ! रंग एकदम भुरळ घालणारा
मस्त ! रंग एकदम भुरळ घालणारा आहे.
एकूण सगळंच प्रेझेंटेशन मस्त. लाडवांचा रंग आणि खालच्या द्रोणांचा रंग एकदम पर्फेक्ट जोडी जमली आहे !
नावाचं पेटंट घ्याच.
अंजू, जिज्ञासा, वर्षु ,
अंजू, जिज्ञासा, वर्षु , प्राजक्ता, शशांक, अनुश्री, कांचन, देवकी, स्वाती, नीधप, सृष्टी सगळ्यांना धन्यवाद.
खरं तर मला ही पहिल्यांदा भेळच सुचली होती पण नीट वाचल्या अटी आणि नियम तेंव्हा लक्षात आले की भेळ करणं श़क्य नाही कारण तयार पदार्थ एकच वापरु शकतो. कुरमुरे वापरले तर फरसाण, शेव नाही वापरु श़कणार . मग कशी होणार भेळ ? म्हणून भेळ रद्द केली नाहीतर मी सुद्धा भेळच योजली होती.
संमि, ही घे लिंक अटी आणि नियमांची
http://www.maayboli.com/node/50401
मिर्ची धन्यवाद. मलाही केले
मिर्ची धन्यवाद. मलाही केले तेव्हा रंग खूप आवडला होता पण गुलाबी रंगामुळे आत काय आहे याचा अंदाजच येत नव्हता. तो यावा म्हणून फोटो काढताना बाजूने काजू, बदाम यांची सजावट केली
प्रसादाला छान मेनु आहे.
प्रसादाला छान मेनु आहे.
भारी.
भारी.
वा!मनीमोहोर,मस्त लाडु.रंग
वा!मनीमोहोर,मस्त लाडु.रंग अप्रतिम ,पटकन् होणारेआणि शाही लाडु.तुझ्या सौंदर्यद्रुष्टीला सलाम!अगदी बघत रहावे असे लाडु झालेत.खायला तर बहार येईल.
मस्त, भारी पा. कृ. आणि
मस्त, भारी पा. कृ. आणि करायलाही सोपी, म्हणजे बिघडण्याची शक्यता अगदी नगण्य दिसतेय, म्हणून आवडली.
आहाहा!! केवळ अप्रतिम दिसतायत
आहाहा!! केवळ अप्रतिम दिसतायत लाडू..
देवीका, तृप्ती, आशिका सई,
देवीका, तृप्ती, आशिका सई, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
मीरा, तुझा शाही शब्द विशेष आवडला.
सगळ्यांनी करुन बघा लाडू आणि फोटो टाका इथे .
वॉव.गुलाबी रंग काय भारी आलाय
वॉव.गुलाबी रंग काय भारी आलाय ताई, तों.पा. सु
हेमा ताई, काय सुरेख पा.क्रु
हेमा ताई, काय सुरेख पा.क्रु दिलीत... खुप खुप आभार... ती सुद्धा गणपतींच्या दिवसात.. सगळे साहित्य घरी आहे
अगदी बिट सुद्या, त्यामुळे आवर्जुन करण्यात येईल...
नाव पण खुप मजेशीर आहे....:)
व्वा! चविष्ट आणि कलर्फुल!
व्वा! चविष्ट आणि कलर्फुल!
मनीमोहोर, बनाका लाडू भारी
मनीमोहोर, बनाका लाडू भारी दिसत आहेत.
मस्त आहे ही रेसिपी
मस्त आहे ही रेसिपी
मस्त !
मस्त !
पलक, सायली, मानुषी, आरती,
पलक, सायली, मानुषी, आरती, कविन, रावी, तुम्हाला सगळ्याना माझी रेसिपी आवडली म्हणुन मनापासून खूप खूप धन्यवाद.
सही दिसत आहेत लाडू!
सही दिसत आहेत लाडू!
नाव मस्त आहे. लाडु पण छान
नाव मस्त आहे. लाडु पण छान दिसताहेत.
अभिनंदन मनीमोहोर !
अभिनंदन मनीमोहोर !
अभिनंदन ताई........
अभिनंदन ताई........
अभिनंदन
अभिनंदन
हेमाताई दुहेरी अभिनंदन.
हेमाताई दुहेरी अभिनंदन.
Pages