मायबोलीवर स्पर्धा जाहीर झाल्यापासूनच डोक्यात नकळतच विचार चक्र सुरु झाले आणि त्यातून निर्माण झालेला स्पर्धेच्या नियमात बसणारा हा गोड पदार्थ- बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू )
साहित्य:
बदाम, काजू , डेअरी व्हईट दूध पावडर, दूध प्रत्येकी अर्धी वाटी,
डेसिकेटेड कोकोनट एक वाटी ,
वेलची पावडर स्वादासाठी
पिठी साखर गरजेनुसार,
रंगासाठी बीटचा अर्क २ चहाचे चमचे ( बीट किसून ते पाण्यात कुस्करल की जे लाल पाणी मिळते ते. मी कोणताही कृत्रिम रंग वापरत नाही म्हणून मला ही कसरत करावी लागली. आपण तो वापरत असाल तर बाजारचा गुलाबी किंवा दुसरा कोणताही आवडता रंग वापरू शकता. केशर वापरलं तर लाडू केशरी रंगाचे होतील किंवा कोणताही रंग न वापरता पांढरे ही चांगले दिसतील )
प्रथम अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ला बीटचा अर्क अगदी थोडा थोडा हाताने चोळून डे. को . गुलाबी करून घ्यावा आणि पंख्याखाली तो १५ / २० मिनीटे वाळण्यासाठी ठेवावा. ( विकतचा रंग वापरणार असाल तर ही स्टेप स्किप करा )
बदाम पाण्यात १०-१५ मिनीटं भिजत घालावेत आणि नंतर त्याची साल काढून ते ही पंख्याखाली १५-२० मिनीट कोरडे होण्यासाठी ठेवावेत. ( हे तुम्ही चार सहा दिवस आधी ही करू शकता किंवा सोललेले बदाम बाजारात आयते मिळतात ते ही वापरू शकता. )
नंतर का़जू, बदाम यांची मिक्सर मध्ये पूड करावी ( साधारण दाण्याच्या कूटा इतकी बारीक / भरड करावी. )
साखर ही मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यावी.
एका ताटलीत ही पूड, उरलेला डे. को. ( अर्धी वाटी ) , दूध पावडर , वेलची पावडर आणि लागेल तशी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. दुधाचा हात लावून लावून ( दूध एकदम घालू नये लागेल तसा दुधाचा हात लावावा ) मिश्रण लाडू वळता येतील इतपत मॉईस्ट ( मराठी योग्य शब्द सुचत नाहीये.) करावे आणि मग त्याचे लाडू वळावेत.
नंतर हे लाडू दूधात बूडवून किवा ब्रशने दूध लावून (डे. को. च आवरण लाडवांवर चिकटण्यासाठी ) मग गुलाबी डे. को. मध्ये घोळवावेत.
अशा प्रकारे गणरायाच्या प्रसादासाठी काजू, बदामाचे गुलाबी लाडू तयार.
हा फोटो मी केलेल्या लाडवांचा
From mayboli
आणि हा जवळून
From mayboli
१) हे लाडू झटपट होतात. चवीला छान लागतातच शिवाय पोटभरीचे ही आहेत.
२) साखर चव घेऊनच घालावी कारण डेअरी व्हाईट दू. पा. थोडीशी गोड असतेच. त्यामुळे साखर जास्त लागत नाही.
३) यावर चेरी लावली तर खूप सुंदर दिसते. चेरी चालेल की नाही स्पर्धेसाठी याबाबत साशंक असल्याने मी लावलेली नाही. तसेच मधोमध कापून दोन भाग करून प्लेट मध्ये ठेवलेले लाडू ही फार सुंदर दिसतात.
४) लाडू करताना फार मोठे करू नयेत कारण नारळाच्या किसाच्या कोटिंगने ते फायनली आणखी थोडे मोठे होतात.
५) वरील साहित्याचे साधारण आकाराचे आठ लाडू झाले.
६) गणपतीच्या दिवसात विकतच्या मिठाईच्या ( खव्याच्या ) क्वालिटी बाबत मनात शंका येते म्हणून गणपतीचा प्रसाद म्हणून करायला छान आहेत. मुलांना खाऊ म्हणून, चहाला कोणी पाहुणे येणार असतील तर गोड म्हणून ही देता येतील.
७) बीट न वापरता केशर किंवा रंग वापरला तर उपासाला ही चालतील.
छानच आहेत लाडू. मस्त दिसताहेत
छानच आहेत लाडू. मस्त दिसताहेत चवीलाही छानच लागतील. ( मॉईस्ट = ओलसर )
किती मस्त प्रकार आहे. भारी
किती मस्त प्रकार आहे. भारी कल्पना. बीटाचा रंग मस्त दिसतोय. वापरण्याची आयडियाही छान आहे. पिस्ता पावडरही वापरली तर लाडू कापल्यावर छानच दिसतील ना?
बनाका नावही लै झ्याक!
या उपक्रमात खरंतर काय करता येईल याबद्दल माझी झेप भेळेच्या पुढे जाईना. पण आत एकसे एक डोकॅलिटी बघायला मिळणार तर! आम्ही वाचू आणि कोणी बोलावलं तर खायला जाऊ. भेळ करणार्यांनीही बोलावायला हरकत नाही.
धन्यवाद दिनेश दा. मॉईस्ट ला
धन्यवाद दिनेश दा. मॉईस्ट ला योग्य शब्द दिलात
मामी, धन्यवाद !! करुन बघ आता किंवा खायला कधी ही येऊ शकतेस कारण हे लाडू करणं अगदीच सोप्प आहे.
सेव्ह करण्याच्या आधी मी साशंक होते ही पाकृ " आहार आणि पाककॄती " मध्ये जाईल की " आता कशाला शिजायची बात मध्ये " ? पण झालं बाई बरोबर.
या उपक्रमात खरंतर काय करता
या उपक्रमात खरंतर काय करता येईल याबद्दल माझी झेप भेळेच्या पुढे जाईना. >> माझी तर भेळेपर्यंत पण नाही. पाणी सरबत एवढेच डोक्यात येत होते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त!! लाडू तोपांसू!
मस्त!!
लाडू तोपांसू!
मस्त लाडू. बनाका नाव फारच
मस्त लाडू.
बनाका नाव फारच आवडलं!!!!
वॉव. रंग काय सुरेख आलाय
वॉव. रंग काय सुरेख आलाय लाडवांचा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बनाका चा बकाना(णा) भरायला मजा येईल
सही दिसताहेत. तोंपासु.
सही दिसताहेत. तोंपासु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं!
मस्तं!
छान
छान
मस्तच! लवकरच करून बघते.
मस्तच! लवकरच करून बघते.
सगळ्यांना धन्यवाद. बनाका चा
सगळ्यांना धन्यवाद.
बनाका चा बकाना(णा) भरायला मजा येईल डोळा मारा >> प्रिंसेस, हे खूप आवडलं
मनीमोहोर, ही रेसिपी देऊन
मनीमोहोर, ही रेसिपी देऊन तुम्ही एका दिवशीच्या प्रसादाचा प्रश्न सोडवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. रंग सुरेख आणि कृती सोपी. त्यामुळे दोन फायदे प्रसादाने बाप्पा आणि खाणारे खुष आणि न बिघडता काहीतरी जमले म्हणजे माझ्यासारख्या किचन ढ लोकांना जरा स्वतःबद्दल कॉन्फिडन्स येणार.
अजुन नव्या रेसिपीजची वाट बघतेय.
बनाका नाव आवडलंच! कसले सुंदर
बनाका नाव आवडलंच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसले सुंदर दिसतायेत ते लाडू.. बाप्पा एकदम खुश!
बनाका नाव आवडलंच व पाक्रुही.
बनाका नाव आवडलंच व पाक्रुही.
लाडू मस्त दिस्तायत..
लाडू मस्त दिस्तायत..
भारी आहे, इथे लोक्स काय गोंधळ
भारी आहे, इथे लोक्स काय गोंधळ घालणार हि उत्सुकता होतीच.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बनाका नावही सही. पेटंट घ्या नावासकट
प्रिंसेस, हे लाडू म्हणजे
प्रिंसेस, हे लाडू म्हणजे खरोखरच कमी कष्टात भरपूर फळ देणारे आहेत. तरूण मुलीना करायला बेस्ट.
आमच्याकडे खूप आवडले घरच्यांना.
रीया, मंजू, चैत्राली, ॠन्मेष धन्यवाद.
मनीमोहीर, लाडू छानच ! मी असे
मनीमोहीर, लाडू छानच !
मी असे लाडू condensed milk वापरून करायची . काही वर्षांपूर्वी देवळात प्रसादाकरता ठेवले होते .
खूप लोकांसाठी पटकन होणारे लाडू आहेत .
वा वा !मास्टर शेफचा श्रीगणेशा
वा वा !मास्टर शेफचा श्रीगणेशा बनाकाने
तोंपासू आहेत लाडुज ! सोपेही आहेत
मस्त आहेत बनाका .. नाव नि
मस्त आहेत बनाका .. नाव नि लाडु दोन्ही आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कातील. एकदम मार डाला असे झाले
कातील. एकदम मार डाला असे झाले फोटो बघून.
बनाका लाडूमाला आवडली.
काय सुरेख रंग आलाय! फार आवडले
काय सुरेख रंग आलाय! फार आवडले हे बनाका लाडू.
बिट ज्युस रंगासाठी वापरायची
बिट ज्युस रंगासाठी वापरायची कल्पना आवडली. सुंदर रंग आला आहे. त्याची चव येत नाही ना पदार्थाला?
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन्विता , जाई , चनस , रुनी
अन्विता , जाई , चनस , रुनी पॅाटर , स्वाती , स्वाती आंबोळे मनापासून धन्यवाद.
अदिति , बीटचा वास किंवा चव जराही येत नाही. त्याचा रंग खूप डार्क असल्याने अगदी थोड़ा पुरतो.
हेमाताई, सॉलिड आहेत हे लाडू.
हेमाताई, सॉलिड आहेत हे लाडू. मस्त कलरफुल. ते कृत्रिम कलर वापरायला मलापण आवडत नाही. हा बीट कलर मस्तच.
फारच भारी दिसतायत लाडू! आणि
फारच भारी दिसतायत लाडू! आणि नाव पण एकदम हटके..पाकृ स्पर्धेचे नाव सार्थ करणारी पाककृती!
मस्त आयडिया आहे लाडवांची..
मस्त आयडिया आहे लाडवांची.. सुंदर दिस्ताहेत..
आणी नाव तर येक्दम युनिक !!!
मस्त मस्त! फोटो ही मस्त
मस्त मस्त! फोटो ही मस्त आलाय!
मिश्रण लाडू वळता येतील इतपत मॉईस्ट ( मराठी योग्य शब्द सुचत नाहीये.) >> ओलसर!
Pages