BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे
अधिवेशन गीत स्पर्धा
हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.
गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.
विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी / promotionसाठी वापरले जाईल
प्रवेशिका spardha@bmm2015.org या पत्त्यावर पाठवावी. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत सप्टेंबर ३०, २०१४ आहे.
उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाचे वस्त्र विणले गेले आहे ते इथे राहत असलेल्या अनेक पिढ्यांच्या धाग्यांनी. जे ६० व ७० च्या दशकात अमेरिकेत स्थलांतरित झाले ती पहिली पिढी. नोकरीच्या / शिक्षणाच्या निमित्ताने, तुलनेने अलीकडे अमेरिकेत आलेली दुसरी पिढी, तसेच इथे जन्मलेल्या व वाढलेल्या मुलांची तिसरी पिढी. या मराठी समाजाच्या कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढ्यांच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या, विचार करण्याची, व्यक्त होण्याची रीतही वेगळी. पण या सर्वांना एकत्र जोडणारी नाळ आहे मराठी संस्कृतीची! या अधिवेशनात या पिढ्यांमधला संवाद वाढेल आणि त्याचबरोबर प्रत्येक पिढीला हे अधिवेशन आपले वाटेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. हे अधिवेशन म्हणजे या तीन पिढ्यांच्या कर्तृत्वाचा उत्सव, या पिढ्यांनी सातासमुद्रापार जपलेल्या मराठी संस्कृतीचा उत्सव! त्यामुळेच २०१५च्या अधिवेशन समितीने - “मैत्र पिढ्यांचे” ही संकल्पना या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.