Submitted by हर्ट on 26 August, 2014 - 12:08
गुळाच्या वेगवेगळ्या जाती/प्रकारांबद्दल इथे कुणी माहिती लिहू शकेल का? मी गोव्याला म्हापशाला एक काळाकुट्ट रंगाचा गुळ पाहिला. हा गुळ औषधी असतो असे त्या आजीबाई सांगत होत्या. आणि हा गुळ त्रिकोणी आकाराचा होता. सगळ्या कडा धारदार होत्या. मी थोडा विकत घेतला आणि मला तो फार आवडला. नंतर वाटत राहिले अजून आणायचा असता.
दोन प्रकारचे ऊस असताना ना? एक जांभळा आणि एक हिरवा. आणि दोन्ही प्रकारच्या उसापासून वेगळा म्हणजे वेगळ्या चवीचा गुळ तयार होतो.
पाम तरु पासून सुद्धा गुळ बनवतात. इथे मलेशियाहून हा गुळ विकायला येतो. खूपच चवदार लागतो. मला खरे तर साखरेपेक्षा गुळाचेच पदार्थ आवडतात. गुळाचे अनारसे, पोळ्या, पुर्या, थालिपिठ, गुळपोळी, गुळाचे लाडू - सगळेच मेनू आवडीचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे डोंबिवलीत गुळाचे दोनच
इथे डोंबिवलीत गुळाचे दोनच प्रकार बघितले आहेत. एक सेंद्रिय गुळ जो काळपट लालसर असतो आणि एक पांढरट पिवळसर. मी सेंद्रिय गुळच आणते कारण तो केमिकल विरहित असतो.
माझ्या नवऱ्याला पण गुळाचे पदार्थ जास्त आवडतात अगदी बुंदी किंवा मोतीचूर लाडू पण गुळाचा जास्त आवडतो.
मला खरे तर साखरेपेक्षा
मला खरे तर साखरेपेक्षा गुळाचेच पदार्थ आवडतात. >>>> हो .ते मस्तच लागतात.
गुळाचे अनारसे, पोळ्या, पुर्या, थालिपिठ, गुळपोळी, गुळाचे लाडू - सगळेच मेनू आवडीचे.>>> का अशी आठवण करताय बी,इथे 'वजन कमी करुया' धागा जोरात चाललाय ना!
देवकी, वजन कमी करायला सोपा
देवकी, वजन कमी करायला सोपा उपाय आहे तो म्हणजे शरिराची चांगलीच झीज होऊ ध्यायची. तुम्ही बघा आपल्याकडे राब राब राबणारे मजुर कसे दिसतात. त्यांच्या शरिराची अशी काही झीज होते की त्यांच्या अंगावर मास दिसतच नाही. कमी खाऊन वा खाण्यापिण्यात बदल करुन वजन कमी होत ह्यावर माझातरी विश्वास नाही. असे कमी झालेले वजन परत वाढते. त्यामुळे झालेला बदल दीर्घकाळ टिकत नाही. अशा वजन कमी करण्याच्या पद्धतीवर नको तेवढा वेळ जातो तात्पर्य- शरिर झिजवा वजन घसरवा!!!!
म्हापसा मार्केटात मिळणारा
म्हापसा मार्केटात मिळणारा त्रिकोणी आकाराचा गूळ हा उसाचा गूळ नसतो. तो माडाचा गूळ. त्याची चव उसाच्या गुळापेक्षा कमी गोड आणि खमंग असते.
दोदोलमधे वापरतात तो.
धन्यवाद नीधप. छान माहिती
धन्यवाद नीधप. छान माहिती दिलीस. लिन्कबद्दल धन्यवाद.
दोन प्रकारचे ऊस असताना ना?
दोन प्रकारचे ऊस असताना ना? >>>> उसाच्या वेगवेगळ्या जाती असतात पण त्यामुळे गुळाच्या प्रकारात काही फरक पडत नसावा. तो कसा बनवातात व बनवताना कशाचा वापर करतात त्यावर गुळाचे प्रकार अवलंबून असतात.
माडाचा गूळ, सौदागर मधली नुतन बनवते, तोच ना?
माझी आज्जी पुरणपोळ्यांसोबत
माझी आज्जी पुरणपोळ्यांसोबत खायला नुसत्या दुधा ऐवजी नारळाच्या घट्ट दुधात गोडवा येईल इतपत गुळ घालुन ते ना दु आटवायची..त्यात वेलची केशर वगैरे घालुन पु पो बरोबर अस्सं ऑस्सम लागायचं की काय सांगु.....हाच एक्स्पेरिमेंट मॉम ने साखर घालुन केला होता पण त्या खमंगपणाची सर त्याला नव्हतीच....
अनिश्का. कशाला आठवण करुन
अनिश्का.:राग: कशाला आठवण करुन देतेस गोडाची, इथे वजन किलो किलोने वाढतय.:अरेरे:
रश्मी धागाच गोड आहे मी तरी
रश्मी धागाच गोड आहे मी तरी काय करु??? ( असही प्रेगनन्सी मधे गोड खावस वाटत नाहीय मला त्यामुळे मला चालतय.....तु बघ नुसतं...आणि मनातल्य मनात जळ..म्हणजे त्याने तरी थोडीशी साईझ कमी होइल )
किडिंग....हलके घे हं.....नाहीतर ३ किलो वाढतील
माझी आज्जी पुरणपोळ्यांसोबत
माझी आज्जी पुरणपोळ्यांसोबत खायला नुसत्या दुधा ऐवजी नारळाच्या घट्ट दुधात गोडवा येईल इतपत गुळ घालुन ते ना दु आटवायची>>>> ते ना दु म्हणजे काय?
असही प्रेगनन्सी मधे >> अभिनंदन!!!! गुळासारखं गोड बाळ येईल आता घरात
अरे अभिनन्दन. गोडाच्या बाबतीत
अरे अभिनन्दन.:स्मित: गोडाच्या बाबतीत मी ढिलीच आहे.:फिदी: वजनाची चिन्ता दिवाळी होईस्तोपर्यन्त करायची नाही.:डोमा:
काळा गुळ उत्तम.
बी ना दु - नारळाचं दुध... बी
बी ना दु - नारळाचं दुध...
बी आणि रश्मी थँक्यु
हा हा .. काही दिवसांनी हेच
हा हा .. काही दिवसांनी हेच वाक्य असे लिहिल्या जाईल = का दि हे वा अ लि जा
हाहाहा....
हाहाहा....
खजुरापासुन ही गुळ
खजुरापासुन ही गुळ बनवतात.बंगाली लोकांच्या रासवडा च्या रेसिपि मधे त्याचा पाक करतात.
<< माडाचा गूळ, सौदागर मधली
<< माडाचा गूळ, सौदागर मधली नुतन बनवते, तोच ना?>> तो गूळ << खजुरापासुन ही गुळ बनवतात.बंगाली लोकांच्या .....>> हा असावा !
खजूराचा गूळ घालून तांदळाची
खजूराचा गूळ घालून तांदळाची खीर करतात बंगाली लोक. स्लर्प!!!
तो गूळ घालून मिष्टी दोई, रोशगुल्ले (ह्याला काही तरी वेगळे नाव आहे बहुतेक) अशा मिठाया बनवतात. भारी लागतात त्या.
या धाग्याच्या शेजारी 'Pretty
या धाग्याच्या शेजारी 'Pretty plus size' च्या जाहिराती का येताहेत...
कळले वाटते त्यांना...
रोशगुल्ले (ह्याला काही तरी
रोशगुल्ले (ह्याला काही तरी वेगळे नाव आहे बहुतेक)>>>>>>> गुरेर कोदोम???
Khajurachya jhadapasun jo gul
Khajurachya jhadapasun jo gul banato tya gulala nolen gud mhnatat.
गुळाच्या धाग्यावर इतकेच लोक
गुळाच्या धाग्यावर इतकेच लोक आले?
उरलेल्याना गुळाची चव नाही का ?
गुळाच्या धाग्यावर इतकेच लोक
गुळाच्या धाग्यावर इतकेच लोक आले <<<<< मुंग्या,मुंगे,मुंगळे वगैरे आले..
माडाचा गुळ? पुण्यात कुठे
माडाचा गुळ? पुण्यात कुठे मिळतो हो ? सांगा ना प्लीज
सेंद्रिय गुळ व इतर सेंद्रिय
सेंद्रिय गुळ व इतर सेंद्रिय उत्पादने मिळण्याचे पुण्यातील ठिकाण.
निरामय पंचगव्य व सेंद्रिय उत्पादन विक्री केंद्र.
१२७५, डेक्कन जिमखाना, गरवारे पुलाजवळ,
डायमंड वॉच कंपनीच्या मागे, हॉटेल मोतीमहल व हॉटेल सितार जवळ
पुणे ४११ ००४.
फोन :- ९८२२३३२६१६.
अन्जू कुठल्या कंपनीचा
अन्जू कुठल्या कंपनीचा सेंद्रिय गुळ मिळतो? मुंबईत केमिकल विरहीत मिळतो पण त्यावर सेंद्रिय असे लिहिलेले नसते.
गोष्टीगावाचे.
गोष्टीगावाचे.:हाहा:
केशर, आत्ता मी आणलाय त्याचे
केशर, आत्ता मी आणलाय त्याचे नाव 'सुपर देशी गुळ' असं आहे, महाराष्ट्रातीलच आहे. पण गुजराथमधलापण मिळतो, नाव विसरले. डोंबिवलीला पण काही ठिकाणीच मिळतो सेंद्रिय गुळ, सरसकट सगळ्या दुकानात नाही मिळत.
केशर, गुजराथच्या एका गुळाचे
केशर, गुजराथच्या एका गुळाचे नाव बहुतेक 'केशर' आहे.
धन्यवद टिडिके |
धन्यवद टिडिके |
थँक्स अन्जू मी "केशर छाप"
थँक्स अन्जू मी "केशर छाप" देशी गुळ (R. R. AGRO Product) वापरते. तो रु. ६०/- किलोने मिळतो. हा गुळ पण काही ठराविक दुकानांमध्येच मिळतो.
मी बघते सेंद्रिय गुळ कुठे मिळतो का मुंबईत.
Pages