मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - चंद्रकला" ६ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:53

गणपती बाप्पा मोरया!

सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो सगळेच काढतात. पण चंद्राचे फोटो त्यामानाने कमीच!
गणपती व चंद्राचा पुराणातला संबंध सर्वांना ठाऊक आहेच. गणेशाने ज्या चंद्राला आपला डावा दात फेकून मारला, त्यालाच नंतर उ:शापही दिला. तेव्हापासूनच चतुर्थी आणि चंद्रोदयाचं समीकरण तयार झालं असं म्हणतात.
साहित्यातल्या ठोकळेबाज उपमांमध्ये प्रेयसीला/नायिकेला चंद्राची उपमा दिलेली आढळते. चंद्र आहेच तसा सुंदर, मनमोहक. अशा चंद्राचं अनुपम सौंदर्य तुम्ही कॅमेर्‍याने टिपलंय कधी? दाखवा बरं मग ते सौंदर्य सगळ्या मायबोलीकरांना!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. दिलेल्या प्रकाशचित्रामध्ये चंद्राबरोबर इतर गोष्टी आल्या तरी चालतील पण शक्यतो 'चंद्र' हा त्या प्रकाशचित्राचा मुख्य विषय हवा.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-
chandra kala.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी, exhaust pipe मधून उगवणारा चंद्र मस्तय

कंसराज, स्विमींग पूल वाला फोटो या झब्बूमधला बेस्ट ठरावा. Exif देउ शकशील का त्याचे?

स्वाती, झकास, तुमचे फोटो पण मस्तच.

Pages