Submitted by बेफ़िकीर on 22 August, 2014 - 13:19
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
का प्रपातासारखी ती आज कोसळली तिथे
ज्या क्षणाला जायला ती घ्यायची कित्येक क्षण
हेच अभ्यासायचे राहून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण
तेवढे सोडून सारे साजरे केलेत मी
श्रावणापासून येथे जे सुरू होतात सण
सोबतीला ठेव मित्रा चारचौघांना तुझ्या
एकटा पाहून हल्ली गाठते आहे मरण
का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण
तू कसा बघतोस ह्यावर जग कसे आहे ठरे
छान ते होईल नक्की, फक्त त्याला छान म्हण
आसवांचे पूर अन् ताटातुटीची वादळे
सोसतो अद्याप येथे मी तुझे पर्यावरण
पोचलो आहे इथे कोणामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण
काळज्या झाकून सार्या गाजतो आहे इथे
'बेफिकिर' हे नांव माझे फक्त आहे आवरण
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला खास, मक्ता प्रामाणिक
मतला खास, मक्ता प्रामाणिक !
का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण...आह् !
पोचलो आहे इथे कोणामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण....क्या बात !
आवडली गझल
धन्यवाद !
मतला ,शरण, मरण , पर्यावरण ,
मतला ,शरण, मरण , पर्यावरण , विस्मरण , मक्ता ...अतिशय आवडले .
थोडक्यात ,
गझल प्रचंड आवडली .
अप्रतिम सर. मतला, मक्ता विशेष
अप्रतिम सर.
मतला, मक्ता विशेष आवडले सर!
धन्यवाद
सुंदर गझल
सुंदर गझल
हेच अभ्यासायचे राहून गेले
हेच अभ्यासायचे राहून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण
सुरेख…
का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण
हा हि आवडला….
काळज्या झाकून सार्या गाजतो आहे इथे
'बेफिकिर' हे नांव माझे फक्त आहे आवरण…
व्वा…
या गझलेत शब्द रचनेतली सहजता आणि खयालातले वजन या गोष्टी प्रभावीपणे balance झाल्या आहेत.
शुभेच्छा.
वा, सुरेखच ..
वा, सुरेखच ..
भले... आवडलीच गझल,
भले... आवडलीच गझल, बेफिकिर.
मतला सुरेख, मक्ताही. पण तिचे क्षण, धरण आणि साला (विस्मरण) खास आवडले, शेर.
जन्मतो गर्दीत आपण......संपतो
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
नेहमीचाच पण सहज आलाय.
पोचलो आहे इथे कोणामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण
वा. छान आणि मक्ता ही आवडले.
गझल आवडली. काही युनिव्हर्सल
गझल आवडली.
काही युनिव्हर्सल ट्रुथ्स शेराच्या स्वरूपात आलेली आहेत.
पॅराडाईम शिफ्ट ही संकल्पना आणि महात्मा गांधी(बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड) प्रकर्षाने आठवले.
आसवांचे पूर अन् ताटातुटीची
आसवांचे पूर अन् ताटातुटीची वादळे
सोसतो अद्याप येथे मी तुझे पर्यावरण
व्वा!
का प्रपातासारखी ती आज कोसळली
का प्रपातासारखी ती आज कोसळली तिथे
ज्या क्षणाला जायला ती घ्यायची कित्येक क्षण
संपूर्ण गझल खूप आवडली.
आवडली गझल!
आवडली गझल!
जन्मतो गर्दीत आपण......संपतो
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण ..लयभारी!!
सुंदर गझल!!
भूषणः संपतो गर्दीत पण हा
भूषणः
संपतो गर्दीत पण हा वेगळा विचार विचारात पाडणारा आहे.
माझे अगोदरचे मत नेहमीचे तितके बरोबर नाही.
तुझी गझल मला आवडते त्याचे एक कारण ती तुझी असते.
धन्यवाद.
समीर...विदिपा +१
समीर...विदिपा +१
गझल छानच जमलेय... मला आवडलेले
गझल छानच जमलेय...
मला आवडलेले खास शेर...
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
सोबतीला ठेव मित्रा चारचौघांना तुझ्या
एकटा पाहून हल्ली गाठते आहे मरण
तू कसा बघतोस ह्यावर जग कसे आहे ठरे
छान ते होईल नक्की, फक्त त्याला छान म्हण
काळज्या झाकून सार्या गाजतो आहे इथे
'बेफिकिर' हे नांव माझे फक्त आहे आवरण
गझल गेयही आहे...विविध तर्हेने गायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात येतंय की..कोणत्या ना कोणत्या गाजलेल्या हिंदी गाण्याची ती चाल असावी...त्यामुळे मला एक प्रश्न पडतोय..त्याचे उत्तर मिळेल का भूषणराव?
हे वृत्त खूप जास्त हाताळलं गेलंय का आजवरच्या शायरांकडून...विशेषत: हिंदी गझल/गीतकारांकडून?
>>>गझल गेयही आहे...विविध
>>>गझल गेयही आहे...विविध तर्हेने गायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात येतंय की..कोणत्या ना कोणत्या गाजलेल्या हिंदी गाण्याची ती चाल असावी...त्यामुळे मला एक प्रश्न पडतोय..त्याचे उत्तर मिळेल का भूषणराव?
हे वृत्त खूप जास्त हाताळलं गेलंय का आजवरच्या शायरांकडून...विशेषत: हिंदी गझल/गीतकारांकडून?<<<
प्रमोदराव,
गेय प्रत्येकच गझल असते
कारण प्रत्येक गझल वृत्तबद्ध असते. तुम्हाला गेय म्हणायचे नसून गायनानुकुल म्हणायचे आहे असे मला नक्की वाटत आहे. म्हणजे असे की गेय असली तरी गझलेचा आशय हा ती गझल गाण्यास अनुकुल असेलच असे नाही. ह्या गझलेचा आशय व शब्दरचना गायनानुकुल आहेत (विस्मरण हा शेर सोडून).
होय हे वृत्त खूप अधिक योजले जाते. मात्र ते मराठीत अधिक योजले जाते. (जसे, गुंतुनी गुंत्यात सार्या). हिंदी, उर्दूत हे वृत्त योजले जातेच पण इतर काही वृत्ते अधिक योजली जातात.
बरोबर...गायनानुकुल...हा शब्द
बरोबर...गायनानुकुल...हा शब्द जास्त योग्य आहे.
कोणतीही कविता/गझल वाचतांना , त्यातली नैसर्गिक चाल आपोआप उलगडत जाते... माझ्या डोक्यात...ही गझल वाचतांना जी चाल सहजपणे उलगडली ती माहितीतल्या एका हिंदी गीताच्या वळणाची वाटली...म्हणून ’मुद्दाम चाल’वण्याच्या हेतूने वेगळ्या पद्धतीने तिच्याकडे जितक्यांदा पाहिले..आणि ज्या चाली मनात आल्या..त्याही हिंदीतल्या कोणत्या तरी गीताशी साम्य दाखवणार्या होत्या... मात्र एकही चाल मराठी वळणाची नाही सुचली.
मी तीन वेगवेगळ्या तालात गाऊन पाहिले...पण सगळ्या हिंदी गीतांच्या चालीच डोकावतात त्यातून.
स्वतंत्र आणि वेगळी चाल जर नाही सुचली तर मी ती कविता/गझल ध्वमु करत नाही...त्यामुळे ही गझल मला आवडूनही गाता येत नाहीये ह्याबद्दल थोडं वाईट वाटतंय.
हेच जर विडंबन असतं तर मात्र मूळ गीताच्या चालीत गायला संकोच नसता वाटला.
बेफ़िकीर, खुप सुंदर गझल. मतला
बेफ़िकीर, खुप सुंदर गझल.
मतला आणि मक्ता तो बहोत खुब.
पोचलो आहे इथे कोणामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण हा शेर खासच.
शेरांमधली सहजता अप्रतिम!
शेरांमधली सहजता अप्रतिम!
हं.. असं काहीतरी लिवा. उगाच
हं.. असं काहीतरी लिवा. उगाच भांडखोर गद्य लिवण्यापेक्षा.
दॅवकाका,
शुक्रतारा मन्द वारा ..
त्या फुलांच्या गंधकोशी
भोगले जे दुख त्याला.
या चालीत म्हणुन बघा.
हे देवप्रिया / कालगंगा वृत्त
खरंच की! धन्यवाद संमि!
खरंच की! धन्यवाद संमि!
वाह वाह..आवडली गझल बेफी!
वाह वाह..आवडली गझल बेफी!
बेफिकिरजी
बेफिकिरजी ......................तुमचा मेंदू पळवून न्यायचा विचार आहे मनात.... कसा पळवून न्यावा यावर तुमचं मत जाणावं म्हणतोय....