अमिरखान काल सकाळ वृतपत्राने जमविलेल्या तरुणाईशी संपर्क साधत बोलला की " स्वप्नांशी तडजोड करु नका" पण स्वप्न कशाची पहा म्हणजे यशस्वी होतील याचे मार्गदर्शन कोण करणार ?
माझ्या ओळखीचा एक तरुण आहे. लहानपणी अत्यंत साधा, कमी बोलणारा, हुड पणा नाही, क्रिडा विषयाशी संपर्क नाही. अचानक त्याने मिलीट्रीत जायचे स्वप्न पाहिले. का पाहिले याचे उत्तर त्याला ही देता येणार नाही. लेखी आणि शारिरीक परिक्षा पास होऊनही मुलाखतीत फेल झाला. कारण सैनीकी पेशाची मानसिकता तयार झालेली नव्हती.
दुसर्या उदाहरणात एका मध्यम वयाच्या मराठी माणसाने आपले व्ही आर एस चे पैसे गुंतवुन ऑइल डेपो ( खाद्य तेल ) एजन्सी घेतली. शेजारी एक राजस्थानी व्यापारी होता जो किराणा विकत होता. लोक तेल याच्याकडुन घ्यायचे पण किराणा राजस्थानी माणसाकडुन घ्यायचे कारण याचे तेल स्वस्त होते.
राजस्थानी माणसाने तेच तेल आणखी स्वस्त भावात विकायला सुरावात केल्यावर मराठी माणुस तो स्टॉक आणी दुकान राजस्थानी माणसाला विकुन बसला. कारण मानसिकता नाही.
स्वप्ने पहायला हरकत नसावी. तडजोड पण करु नये. पण आपली शारिरीक आणखी मानसीक कुवत अजमावण्यासाठी अनेक मार्ग असतात. ते अजमावयला हवे. वरील उदाहरणात तो मुलगा कधीच एन.सी.सीत गेला नाही. तिथे गेला असता आणि तो मार्ग त्याला आवडला असता तर नक्कीच त्याची मानसिकता तयार होऊन ती मुलाखतीत दिसली असती.
आपले स्वप्न काय आहे हे पहाताना माझा नैसर्गीक कल कोणत्या दिशेला आहे आणि त्यात अनेक दिशा असतील त्यातली कोणती दिशा अजमावयला माझे नैसर्गीक कौशल्य मला साथ देईल याचा विचार दुर्दैवाने सांगीतला जात नाही असे माझे मत आहे. स्वप्न पहायची नेमकी वेळ कोणती ? हे ही मार्ग दर्शन हवे. ही प्रत्येकाची वेगळी असेल पण तो टप्पा तर माहित हवा ?
तरुणाईने सुध्दा अपरिपक्व विचारांचा किती पाठपुरावा करायचा याचा विचार करायला हवा.
कोनी अमिरखानला सिरियसली घेत
कोनी अमिरखानला सिरियसली घेत असेल असे नाही. क्रेझ आहे. पहायला जातात ऐकायला नाही.