Submitted by अमित M. on 19 August, 2014 - 04:58
हा धागा बराच वेळा चाळला आहे, पण इथे सर्व चांगल्या आणि वाचायलाच हव्यात अशा पुस्तांची समग्र यादी कुठेच दिसली नाही. अशी यादी माबो वर आहे का? किंवा कुणाकडे असेल तर कृपया मला संपर्कातून पाठवाल का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येकाची वाचनाची आवड सहसा
प्रत्येकाची वाचनाची आवड सहसा इतकी वेगळी असते की सर्वसमावेशक वाचनीय यादी करणे कठीण आहे. मी वाचलेले पुस्तक १ आणि २, तसंच वाचनकट्टा, अजिबात न वाचवलेली पुस्तके असे धागे वाचून तुम्हीच तुमच्यापुरती करा ना.
आणि तुझी यादी करून झाली की
आणि तुझी यादी करून झाली की इथे टाक.
आयला !! ये तो मेरेपेइच कुद
आयला !! ये तो मेरेपेइच कुद रहेल्ले तुम लोग.

ठीके डन ! मी कामाला लागतो
वरदा हार्पेन thanks for the motivational response
अमित M, मी खुप वर्षा पुर्वी
अमित M, मी खुप वर्षा पुर्वी बनवलि होति. नंतर अपडेट नाहि केलि. बघा तुम्हाला उपयोगि पडते का?
https://docs.google.com/spreadsheet/ccc?key=0AvMRDb6BU70kck5VbTh1bFg4RVF...
सतिश अनेक धन्यवाद ! हि लिस्ट
सतिश अनेक धन्यवाद ! हि लिस्ट नक्किच उपयोगि आहे
सतीश लिंकबद्दल धन्यवाद , त्या
सतीश लिंकबद्दल धन्यवाद , त्या लिस्ट्मधले फक्त एक पुस्तक वाचले आहे, पुढच्या १०-१५ वर्षात १० -१५ नक्कीच वाचेन ( काय आहे वाचनाची फार आवड आहे ना म्हणून)
वरदा +१००० मी मागे एक यादी
वरदा +१०००
मी मागे एक यादी बनवली होती... वाचनीय असेच नाही, पण कुणी तरी आवर्जून सांगितलेले आणि अर्थात माझ्या आवडत्या लेखकांची जमतील तितकी सगळी पुस्तके या यादीत टिपत गेले. गेले २ वर्षे अजिबात अपडेट वगैरे नाही केलेली, तेव्हा बघा.
अम्या, लेका, हम्लोगा तेरेपे
अम्या, लेका, हम्लोगा तेरेपे कुदेवुदे नहीय्ये रे! मै तो तेरी पसंद आजमाने की कोशिश कर्राहथा....
मला वाचनाचा भस्म्या जडल्या प्रमाणे हाती येईल ते वाचत असतो (सध्या 'वाचत असे' असेच म्हणावे लागेल, पण ते एक असो).
त्यात एक अजून म्हणजे आपल्या मराठी सारस्वताच्या वेलीवर
वपु-पुलं यांच्यासारख्या लोकप्रिय लेखकांपासून सुशि-कदमांसारख्या लोकप्रिय लेखकांची,
यगोजोशी-साने गुरुजींसारख्या बाळबोध लिहीणार्यांपासून ते अवजड व दुर्बोध लिखाणाचा शिक्का कपाळी मिरवणार्या व नीट वाचल्याशिवाय न कळणार्या खानोलकर-ग्रेस यांच्यासारख्या लेखकांची,
इरावती-दुर्गांपासून राचिंढेर्यांपर्यंत संशोधक लेखकांची, अवचटादी कार्यकर्ते लेखकांची
गौरी-सानीया, कविता-मेघना,यांसारख्या व्यक्तीवादी लेखिकांची
दांडेकर-माडगूळकर-पेंडसे यांसारख्या प्रादेशिक असा टिळा मिरवणार्या लेखकांपासून गौरी देशपांडे-अनंत सामंतांसारख्या जागतिक पार्श्वभुमीवर लिहिणार्या लेखकांची
एक वेगळेच सकस, अस्सल लिखाण करणार्या तेंडुलकर, जीए कुलकर्णींची,
अशी नानाविध प्रकारची (तरी विस्तारभयास्तव वरच्या यादीतून बरीच फुले वगळली आहेत) वेगेवेगळी साहित्यपुष्पे उमललेली असताना त्यातल्या कुठल्या फुलांचे झेले तुला रचायला आवडेल ते आपोआप कसे कळावे...
तुझी आवड साधारणपणे कळली म्हणजे त्यानुसार बाकीची पुस्तके तुला सुचवायला बरे.
dhaaraa Thanks
dhaaraa Thanks
धारा थँक्स! मस्त यादी आहे.
धारा थँक्स! मस्त यादी आहे. फॉर्मॅटही आवडला. मी पण वापरू का इफ यू डाँट माईंड.
धारा, मस्त यादी आणि format पण
धारा, मस्त यादी आणि format पण आवडला! एक सुचवू का? पहिला column freeze केला तर त्याच लेखकाची बाकीची पुस्तकं बघणं अजून सोप्पं जाईल
धारा, यादी भारी. आता तुझी
धारा, यादी भारी. आता तुझी यादी घेऊन मी माझी यादी बनवते
वापरा की... माझ्या चिकाटीचा
वापरा की... माझ्या चिकाटीचा काही तरी उपयोग झाला म्हणायचा... नवर्याला ह्या बाफची लिंक देते आता.
जिज्ञासा, करते. मला या यादी बनवण्यावरून घरातल्यांनी (सगळ्यांना वाचनाची प्र चं ड आवड आहे तरी) भयंकर चिडवलंय... तेव्हा सुचलंच नाही. धन्यवाद.
धारा, नाटकांमधे तेंडुलकर,
धारा, नाटकांमधे तेंडुलकर, आळेकर आणि एलकुंचवार अॅड कर. या त्रयींशिवाय मराठी नाटकांची यादी अपूर्ण
गडकरींची नाटके भाषेसाठी वाचायला मजा येते.
धारा, यादी आणि फॉर्मॅट दोन्ही
धारा, यादी आणि फॉर्मॅट दोन्ही आवडलं.
सही यादी आहे, धारा.
सही यादी आहे, धारा.
हर्पेन .. बस कर यार ..अब
हर्पेन .. बस कर यार ..अब रुलायेगा क्या
धारा तू कमाल आहेस अग ! एकदम व्यवस्थित बनवली आहेस
माझ्याकडे जी लिस्ट आहे तीपण बरीच जुनी आहे. त्यामध्ये मी इकडून तिकडून आईकलेली आणि अंतर्जालावर सर्च करून मिळवलेली बरीच नाव आहेत. एक काम करतो एक consolidated लिस्ट बनवून इथेच टाकतो नंतर
I want books list based on
I want books list based on character either historical or mythological. There are books on shri Ram, Krishna, Ashwathama but searching for specific character is difficult. Is there any list or thread which gives such information please provide link. I want marathi books only.
मला फक्त विनोदी लिखाण वाचायला
मला फक्त विनोदी लिखाण वाचायला आवडेल. तसे पु.ल., गंगाधर गाडगीळ, शंकर पाटील, द. मा. मिरासदार वगैरे बरेच वाचले. दीपा गोवारीकर नि मंगला गोडबोले यांची पुस्तके मिळाली तर बघतो. पण आणखी कुणि विनोदी लेखक, पुस्तके आहेत का?
दुसरा विषय म्हणजे सायन्स फिक्शन. जयंत नारळीकरांचे एकच पुस्तक वाचले. तशी इतरांची पुस्तके आहेत का?
इतिहास, राजकारण, समाजकारण, तत्वज्ञान, (वपुर्झा), चरित्रे यात अजिबात गम्य नाही. (बरेच वाचले आहे तसे).
काही माहिती मिळाली तर आभारी होईन.
झक्की सुबोध जावडेकर यांचा एक
झक्की सुबोध जावडेकर यांचा एक कथासंग्रह मध्यंतरी वाचलेला. नाव नाही आठवत. फ्युचुरीस्तिक साय-फाय कथा होत्या.
झक्की तुम्हाला मराठी पुस्तकेच
झक्की तुम्हाला मराठी पुस्तकेच हवी आहेत असे समजून लिहितो.
बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी: http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5178389186893274840?BookNa...
निषाणी डावा अंगठा
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4983391151575579250?BookNa...
झक्की, जयंत नारळीकरांची आणखी
झक्की, जयंत नारळीकरांची आणखी काही पुस्तकं (व्हायरस, वामन परत न आला, प्रेषित) आहेत माझ्याकडे. मंगला गोडबोलेंचं खुणेची जागा हे एकमेव पुस्तक आहे. हलक्याफुलक्या पुस्तकांमध्ये फडणिस गॅलरी आहे. तुम्हाला हवी असतील तर पत्ता पाठवा. पुस्तकं पोस्टानं पाठवते.
अमित, यादि कि याद दिला रहा है
अमित, यादि कि याद दिला रहा है यह बंदा...
वाचण्यासारखी पुस्तक बरीच
वाचण्यासारखी पुस्तक बरीच असतात . पण सगळीच विकत घेवून वाचण परवडत नाही आणि लिब्ररित हि मिळत नाहीत . तेव्हा मा बो वर पुस्तकं exchange करता येतील का ? कात्रज एरियात कोणी पुस्तक वाले मा बो कर राहतात का ?
कुठल्या तरी मिस इंडियाच्या
कुठल्या तरी मिस इंडियाच्या आईने एक पुस्तक लिहिलं होतं मुलीच्या स्पर्धेविषयी आणि एकंदरीतच तयारी विषयी. नाव मुळीच आठवत नाहीये. खूप वर्षांपूर्वी नाशिकला परशुराम सायखेडकर नाट्यगृहाशेजारी एक पुस्तक प्रदर्शन भरायचं तिथे चाळल्याचं आठवत आहे. कोणाला माहीत असल्यास प्लीज सांगा. फार काही ग्रेट असेल पुस्तक असा माझा दावा नाही पण खूप मनात घोळतयं तर वाचून टाकावं असा हेतु !
अहाहा !! रम्य त्या आठवणी माझ्या कित्येक उन्हाळी सुट्ट्या ह्या पुस्तक प्रदर्शनाने सत्कारणी लावल्यात !!