कुकी कप

Submitted by मृणाल साळवी on 18 August, 2014 - 16:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

मैदा - २ १/४ कप
बटर - १/२ कप
साधी साखर - १/२ कप
ब्राउन शुगर - १/२ कप
अंडे - १
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
चॉकलेट चिप्स - १/२ कप
कुकिंग चॉकलेट - १/२ कप
मिठ १ चिमटी
बेकिंग ग्लास मोल्ड
दुध

क्रमवार पाककृती: 

१. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे.

c1

२. साखर चांगली फेटल्यावर त्यात एक अंडे टाकुन परत फेटुन घ्यावे.

c2

३. त्यामधे मैदा, मिठ व चॉकलेट चिप्स टाकुन चमच्याने एकत्र करावे. आता हे पीठ १-२ तास फ्रिज मधे ठेवावे.

c3

४. तो पर्यंत ग्लास मोल्डला बटर लावुन घ्यावे.

c4

५. फ्रिजमधुन पीठ बाहेर काढुन, ते ग्लास मोल्डमधे निट पसरुन घ्यावे. आतमधील कुकी कप जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको.

c5

६. ओव्ह्न १८० degree celcius ला preheat करुन घ्यावा. त्यामधे ग्लास मोल्ड ठेवुन १५-२० मिनिटे बेक करुन घ्यावे.
७. ग्लास मोल्ड बाह्रेर काढुन पुर्ण गार होवुन द्यावे. गार झाल्यावर कुकी कप अलगदपणे मोल्ड मधुन बाहेर काढावे.

c6c7

८. Microwave मधे कुकिंग चॉकलेट मेल्ट करुन घ्यावे.
९. गार झालेल्या कपास आतुन मेल्टेड चॉकलेट लावुन घ्यावे व परत फ्रिज मधे १/२ तास ठेवुन द्यावे.

c8

१०. कुकी कप गार दुध / चॉकलेट मिल्कशेक / आईसक्रिम सोबत serve करावे.

c9c10

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार भारी !
फोटोही अतिशय सुंदर.
मृणाल, तुमच्या रेसिपीज आणि फोटोज म्हणजे अगदी ट्रीट असते. एखादं प्रोफेशनल इंग्लिश मासिक चाळतोय असं वाटतं Happy

हायला! जबरी प्रकरण आहे हे. फोटो कसले खतरा आलेत. मी नक्की नक्की करणार. पण त्याकरता ये मोल्ड्स मुझे दे दे ठाकूर!

Thank you so much. Happy

मामी तिथे असते तर नक्की दिले असते. पण तुम्ही आपला नेहमीचा कॉफीचा मगही वापरु शकता. त्याला आतुन बटर लावुन घ्यायचे आणि बॅटर लावायचे. असे केलेले कप सुद्धा छान दिसतात.

मामी तिथे असते तर नक्की दिले असते. >>> Happy

पण तुम्ही आपला नेहमीचा कॉफीचा मगही वापरु शकता. त्याला आतुन बटर लावुन घ्यायचे आणि बॅटर लावायचे. असे केलेले कप सुद्धा छान दिसतात. >>> धन्यवाद.

वॉव मस्तच Happy
खुपच सुरेख आणि टेम्पिंग दिसताहेत.

चिल्लर पार्टी किती खुष होइल >>++
हा असा प्रकार मी कधी केलाच तर स्वतःविषयीच इतका आदर वाटेल >>> ++ ( मला जमला तर Wink )

Pages