कुकी कप

Submitted by मृणाल साळवी on 18 August, 2014 - 16:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

मैदा - २ १/४ कप
बटर - १/२ कप
साधी साखर - १/२ कप
ब्राउन शुगर - १/२ कप
अंडे - १
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
चॉकलेट चिप्स - १/२ कप
कुकिंग चॉकलेट - १/२ कप
मिठ १ चिमटी
बेकिंग ग्लास मोल्ड
दुध

क्रमवार पाककृती: 

१. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे.

c1

२. साखर चांगली फेटल्यावर त्यात एक अंडे टाकुन परत फेटुन घ्यावे.

c2

३. त्यामधे मैदा, मिठ व चॉकलेट चिप्स टाकुन चमच्याने एकत्र करावे. आता हे पीठ १-२ तास फ्रिज मधे ठेवावे.

c3

४. तो पर्यंत ग्लास मोल्डला बटर लावुन घ्यावे.

c4

५. फ्रिजमधुन पीठ बाहेर काढुन, ते ग्लास मोल्डमधे निट पसरुन घ्यावे. आतमधील कुकी कप जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको.

c5

६. ओव्ह्न १८० degree celcius ला preheat करुन घ्यावा. त्यामधे ग्लास मोल्ड ठेवुन १५-२० मिनिटे बेक करुन घ्यावे.
७. ग्लास मोल्ड बाह्रेर काढुन पुर्ण गार होवुन द्यावे. गार झाल्यावर कुकी कप अलगदपणे मोल्ड मधुन बाहेर काढावे.

c6c7

८. Microwave मधे कुकिंग चॉकलेट मेल्ट करुन घ्यावे.
९. गार झालेल्या कपास आतुन मेल्टेड चॉकलेट लावुन घ्यावे व परत फ्रिज मधे १/२ तास ठेवुन द्यावे.

c8

१०. कुकी कप गार दुध / चॉकलेट मिल्कशेक / आईसक्रिम सोबत serve करावे.

c9c10

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!! हे करून बघायची हिंमत करावी का? खूपच टेम्प्टींग आहे. + १
अजून ट्री केक करुन बघायचा आहे त्यात अजून एका रेसिपीची भर पडली. Happy
मृणाल खूप खूप धन्यवाद इतक्या वेगळ्या रेसिपी शेअर केल्या बद्दल.

स्गळ्यांना थँक्स. Happy

पोर्णिमा - नाही. पाय क्रस्ट वेगळा असतो. तो एवढा गोड नसतो. त्याचे प्रमाण आणि बनवायची पद्धतही वेगळी असते. नेक्स्ट पाकृ पायची टाकायचा प्रयत्न करते. Happy

टीना - ५-६ दिवस नक्कीच टिकतील. जर आतुन चॉकलेट नाही लावले, तर हवाबंद डब्यात जास्त दिवसही टिकु शकतात.

भन्नाट आहे. मी काही करायला जाणार नाही कारण एवढी खटपट करायची माझी औकातच नाही. पण कुणी केले तर प्लीज मला खायला बोलवा.

नेक्स्ट पाकृ पायची टाकायचा प्रयत्न करते. स्मित>> प्लीज! स्पेशल रिक्वेस्ट समज Happy

तू पाय क्रस्टची कृती टाकलीस आणि मला ती झेपण्यासारखी असेल तर नक्की करून तुला फोटो पाठवेन गुरुदक्षिणा म्हणून! शिवाय, तुझे 'पाय' कुठे आहेत वगैरे कोट्यांचा बोनसही तुला मिळेलच Proud

Pages