आमचे येथे श्रीकृपेकरून ओटीजी घेणे आहे.
बेकिंग : केक्स, कुकीज, ब्रेड इ. करण्याचा मानस आहे.
ज्यांच्या नावाच्या स्पेलिंगचे आणि उच्चाराचे लांबचेही नाते असेल असे वाटत नाही अशा व्हेज डिशेस करण्याची शक्यता कमी आहे, कारण त्या केल्या तर खाव्याही लागतील.
नॉनव्हेज खात नाही. करणारही नाही.
Deep frying करायचे पदार्थही ओटीजीमध्ये करता येतात असेही ऐकले आहे. त्यातही रस आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
जुन्या मायक्रोवेव्हमे रामराम म्हटल्याने नवा मायक्रोवेव्हही घेणे आहे. त्याबाबत मावे डॉक्टरने पॅनासॉनिक, सॅमसंग, एल्जी या क्रमाने कमी आजारी पडणार्या मावेंचे ब्रँड्स सांगितले आहेत. कन्व्हेक्शन मावेमध्ये केलेल्या बेकिंगचा इफेक्ट (केक्स, कुकीज्,इ.साठी) ओटीजीइतका छान नसतो असे ऐकले आहे. आधीचा कॉम्बो (मायक्रो+ ग्रिलिंग + दोन्ही एकदम) होता, त्यातले मायक्रोवेव्हच वापरले. तर 'बेकिंगसाठी गड्या आपला ओटीजीच बरा' (मावेपेक्षा) हे बरोबर आहे का?
या प्रश्नाचे उत्तर नाही असे देऊन मावेसोबत ओटीजीवर पैसे उडवायच्या माझ्या मनसुब्यावर पाणी ओतू नये
तर ओटीजीबाबत : ब्रँड, कपॅसिटी, अॅक्सेसरीज,विक्रीपश्चात सेवेची गरज पडणे,ती मिळणे न मिळणे इ. मुद्द्यांबाबत मार्गदर्शन अपेक्षित.
अभिनंदन...............
अभिनंदन...............
भरत, या धाग्यावरची चर्चा पहा:
भरत, या धाग्यावरची चर्चा पहा: http://www.maayboli.com/node/39287
माझ्याकडे मॉर्फी रिचर्ड्सचा
माझ्याकडे मॉर्फी रिचर्ड्सचा ओटीजी आहे. घेऊन सहा महिने झालेत. यामधे मी आतापर्यंत केक, गार्लिक ब्रेड बनवलेत. मॉडेल मॉर्फी रिचर्ड्स OTG 28 RSS आहे. मॉर्फी रिचर्ड्सचे सर्व्हिसींग बजाजतर्फेच होते. घेतल्यानंतर डेमो करता माणूसही बजाज कंपनीचाच येतो.
अधिक माहिती : http://www.morphyrichardsindia.com/OTG-28-RSS-pc-232-26.aspx
तुम्ही बोरिवलीतच राहता तर शिंपोलीला व्हेज ट्रीट १ च्या समोर एक नवीन वन स्टोप स्टोअर झाले आहे तिथे बरेच मॉडेल्स उपलब्ध आहेत. माझा ओटीजी मी तिथूनच घेतला दिवाळीला तेव्हा मला डीस्काउंटवर मिळाला. आताही तिथे मान्सून सेल चालू आहे. बाभईला ओस्वाल स्टील सेंटर आणि स्टेशनला गोयलमध्ये खिमावत स्टोर हे दोघेही ऑर्डर केल्यास मागवून देतात.
माझ्याकडे मॉर्फी रिचर्ड्सचा
माझ्याकडे मॉर्फी रिचर्ड्सचा ओटीजी आहे.
माझ्याकडेही. फक्त माझा OTG 52 RCSS आहे. काही त्रास देत नाही.
मी सर्विसिंग करुन घेतले नाही अजुन. आज घरी गेल्यावर आठवणीने माहिती काढुन फोन करते.
काही त्रास देत
काही त्रास देत नाही>>>>>>साधना +१११११११
चिन्नु, त्या धाग्यावर फार
चिन्नु, त्या धाग्यावर फार सल्ले मिळालेले दिसत नाहीत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आशिता आणि साधना , कपॅसिटी लिहिणार का?
माझी पहिली पसंती मॉर्फीलाच जातेय. ते नावच आवडतं आहे. नॉट ब्रँड नेम जस्ट नेम.
साधना, सर्विसिंगवाल्यालानाच फोन करणार ना?
माझ्या ओटीजीची कपॅसिटी २८
माझ्या ओटीजीची कपॅसिटी २८ लिटर आणि साधनाच्या ओटीजीची ५२ लिटर.
हो. ओटीजीची सर्विसिंग असते
हो. ओटीजीची सर्विसिंग असते हे माहित नव्हते ना.. याआधी जो ओटीजी मी वापरला तो मला केनस्टारच्या वॉटर प्युरिफायरबरोबर फ्री मिळालेला. त्याने एक्दाही सर्विसिंग न करता निमुट १३-१४ वर्षे काम केले होते. आता वरचे सर्विसिंगचे वाचुन लक्षात आले, आज फोन करुन पाहेन काय ऑप्शन्स आहेत सर्विसिंगचे. माझा घेऊन दिड वर्ष होत आले जवळजवळ.
भरत पर्याय सोपा आहे.. नुसता
भरत पर्याय सोपा आहे.. नुसता मायक्रोव्हेव ओव्हन घ्या (नुसता तेव्हढाच उपयोग असेल तर कॉम्बिनेशन कशाला) आणि ओटीजी पण घ्या..
आयुर्विम्याला पर्याय नाही तसा
आयुर्विम्याला पर्याय नाही तसा मॉर्फी रिचर्डसलाही पर्याय नाही की काय?
हिम्सकूल, तोच विचार आहे.
घेतला का ओटीजी?
घेतला का ओटीजी?
हो, मयेकर, कोणता घेतलात?
हो, मयेकर, कोणता घेतलात?
मॉर्फी रिचर्ड्स चा ओटीजी आणि
मॉर्फी रिचर्ड्स चा ओटीजी आणि panasonic microwave
अच्छा.
अच्छा.
रीव्ह्यू लिहाल का?
रीव्ह्यू लिहाल का?
भरत जी OTG चा रिव्ह्यू लिहाल
भरत जी OTG चा रिव्ह्यू लिहाल का?
माझा ओटीजी लॉकडाउनच्या आधी
माझा ओटीजी लॉकडाउनच्या आधी कधीतरी भंगारात दिला. म्हणजे ४-५ वर्षे चालला असेल. काय बिघडलं ते आठवत नाही.
काही पदार्थ चांगले जमले. बनाना ब्रेड, धोंडस, स्टफ्ड पाव ( मायबोलीवर रेसिपी आणि फोटो दोन्ही दिलेत ) . केक केल्याचं आठवत नाही.
चकली चीझ कुकीज केलेल्या. पहिल्यांदा छान झाल्या. दुसर्यांदा सगळं तसंच करून त्या जळल्या आणि घरात धूर झाला. रस्त्याने जाणारा एक माणूसही आमच्या किचनच्या खिडकीकडे पाहत होता.
आता ओटीजी वापरायची हौस फिटली. अर्धा डझन केक टिन्स माळ्यावर असतील. त्यांना बाहेर काढायला हवं.
आताचा माझा मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन वाला आहे. पण त्यात बेकिंग करून पाहिलं नाही.
अरे बापरे असं झालं होय.
अरे बापरे असं झालं होय. धन्यवाद माहिती बद्दल.