प्रस्तावना :- माझी ही पहीलीच कथा आहे आणि पहीलाच प्रयत्न..काही चूका असल्यास कृपा करुन जरुर कळवा.
.
दोनच दिवसांवर रक्षाबंधन येऊन ठेपलेली.सगळीकडे रक्षाबंधनची लगबग सुरु आहे.नकुलच्या घरातही नकुल वय 24 वर्षे अगदी मनमिळाऊ स्वभावाचा,बोलका मोकळ्या वेळेत काहीना काही करत बसणारा.अगदी चंचल म्हणावा तसा.
नकुलच्या घरात तो आणि त्याची आई एवढेच कुटूंब बहिणीचे लग्न झालेलं.तीही मागच्याच गल्लीत रहायची.
नकुलला आज काहीतरी झालं होतं.नकुल आईशी न बोलता उठला,आवरलं आणि कामावर निघुन गेला.आईला नाही म्हणलं तरी थोडं चुकल्या सारख वाटलं.दररोज ह्याला हाका मारुन उठवायचं,दररोज सकाळी ह्याची आवरताना बडबड ऐकायची.पण आज एक अवाक्षरही नाही.आईला उगाच वाटुन गेलं नकुल प्रेमात वैगैरे तर...आई विचार झटकुन कामाला लागली.
संध्याकाळी नकुल कामावरुन घरी आला आणि येऊन पीसीसमोर किबोर्डवर चाळे करत बसला.
आईने आवरुन सरळ विषयाला हात घातला.
नकुलने शांतपणे आईचे ऐकुन घेतले आणि शुन्यात बघत बसला मग म्हणाला "आई त्या कालीचं बोलण"...
आईला क्षणार्धात उलगडा झाला.आई गर्द भूतकाळात हरवत गेली.दीड वर्षापुर्वी अनघाचं लग्न झालेलं.मुलीचे लग्न लावताना कुठल्याही आईला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद नकुलच्या आईला आणि नकुलला झालेला.अगदी पोलिसाचं स्थळ होतं.नकार द्यायला जागाच नव्हती.छानपैकी धुमधडाक्यात लग्न झालं.नविन नवरा बायको नविन नवलाईसोबत नांदत होते.अनघा आणि तिचे मिस्टर मागच्याच गल्लीत रहात होते.
आणि एक दिवस कुणाची तरी दृष्ट लागावी असे काहीसं घडलं.नियती खूप वाईट गोष्ट.जेव्हा कुणाचं चांगलं सुरु होत असतं ना तेव्हा नियती आपले डाव आखत असते.
एकेदिवशी अनघा घरापाशी गाडी शिकत असताना तिच्या गाडीची जोरदार धडक एका तरुणाला लागली आणि गाडीची चाके त्या तरुणाच्या दोन्ही हातावरुन गेली. त्या तरुणाचा टाहो सगळ्या गल्ल्यांमधे घुमला.अनघा आणि आजुबाजूच्या लोकांनी त्या तरुणाला जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं,उपचार सुरु होऊन संपले.त्या तरुणाचे दोन्ही हात कायमचे निरुपयोगी ठरले,जीवावरचं हातांवर निभावलं.
त्या तरुणाचं नाव होतं सिद्राम पाटील.सिद्रामची बायको स्वत:ला मारुन घेत होती,टाहो फोडत होती.सिद्रामच्या बायकोने अनघावर कारवाईचा बडगा उचलला खरा पण तो क्षणार्धात अनघाच्या नवर्याने फोल ठरवला,हाणुन पाडला.सवर्ण,सधन कुटूंबासमोर सिद्रामच्या बायकोचं काही एक चाललं नाही,कसला न्याय आणि कसलं काय.न्याय मागुन किंवा हिसकावुन मिळत नाही,न्याय तर बाजारात असतो,विकायला.हे सिद्रामच्या बायकोला कदाचित कळलं नसाव.
एवढ्या सगळ्या घटनेत फक्त एकचं अशी व्यक्ती होती जी शांत होती,संयमी होती..सिद्रामची बहीण
" काली ". . . .
क्रमश:
:सुनिल
छान प्रयत्न..., all the best
छान प्रयत्न..., all the best
Thanx..
Thanx..
खुपच लहान भाग
खुपच लहान भाग
पुढचा भाग नक्कीच फुलवून
पुढचा भाग नक्कीच फुलवून टाकण्याचा प्रयत्न करेन..
Good n all the best
Good n all the best
Good n all the best
Good n all the best
एवढं छोटं का लिहिलंय ? जर
एवढं छोटं का लिहिलंय ? जर मोठी ष्टोरी लिहायची कि
सुरुवात छान आहे. पुलेशु
सुरुवात छान आहे. पुलेशु
माबोकरांचे प्रतिसादां बद्दल
माबोकरांचे प्रतिसादां बद्दल धन्यवाद...)
खरच छान आहे.
खरच छान आहे.
छान... आता पुढील भाग लवकर
छान... आता पुढील भाग लवकर टाका
Pudhacha bhag kahi gavala
Pudhacha bhag kahi gavala nahi mala .... Nakki aahe ki post ch kela nahiy ajun ....
छान सुरुवात आहे......पुलेशु
छान सुरुवात आहे......पुलेशु
उत्कंठावर्धक सुरूवात. पुढील
उत्कंठावर्धक सुरूवात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
कथेच्या नावात पौर्णिमा हवं.
केव्ढूस लिहिलंय . जर जास्त
केव्ढूस लिहिलंय . जर जास्त लिवा कि. आणि हो पुढचा भाग पटकन टाका प्लीज
आता पुढचा भाग बहुदा या
आता पुढचा भाग बहुदा या वर्षीच्या राखी पौर्णिमेला येणार. केव्हाची वाचून, पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत एक हि कथा आणि दुसरी ती आधुनिक सीता. (कपाळावर हात घेतलेली बाहुली )
आता पुढचा भाग बहुदा या
आता पुढचा भाग बहुदा या वर्षीच्या राखी पौर्णिमेला येणार.>>>> या वर्षीची भाऊबीज पण गेली आता तरी पुढचा भाग टाका