ओट च्या काही पाकक्रुती सान्गता येतील काय?

Submitted by नाना फडणवीस on 8 August, 2014 - 05:22

मला लोकान्नी सांगितलय की ओट चांगला असतो. काही सोप्या पाकक्रुती देता येतील का? की मी जे ऑफिस मधे पण मायक्रोवेव मधे करू शकीन.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं म्हणजे मला हा धागा पाकक्रुती माहिती आहे का? या सदरात टाकयचा होता...पण मिळाला नाही....:(

मी कांदापोहे करतात त्याप्रमाणे ट्राय केलेत , पोह्यांच्या जागी ओट्स चांगले लागतात.

कविता१९७८ धन्यवाद्.....मला असं हवय की ओट भिजवला...काही भाज्यान्च्या फोडी टाकल्टा...काहीतरी मसाला टाकला त्यात आणि मायक्रोवेव मधे ठेवला....sorry for being specific because mala kharatar cooking yet nahi.....and office madhe karataa aala paahije...

मग ओट्स आधी मायक्रोवेव मधुन काढुन नीधप यांनी हेतेढकल खाकरा भेळ सांगितली आहे तसं करता येईल, खाकर्‍याच्या जागी ओट्स घेता येतील.

नाना ओटस आधी थोडेसे पाण्यात शिजवुन मग त्यात दुध, चमचाभर साखर, ड्राय्फ्रुट्स घालुन खाउ शकता. बरे लागते. दररोज तेच नको, कन्टाळा येईल. त्यापेक्षा वेगवेगळे ट्राय करा.

नाना, ओट्स+दूध+साखर (ऐच्छिक)+फळांचे तुकडे एकत्र करून मायक्रोवेवमधे ३ मिनिटांमध्ये पॉरीज करता येतं. तिखट प्रकरण हवं असेल तर ओट्स+ताक+मिरची कोथिंबीर+मीठ असं एकत्र शिजवून उकड करता येते. त्यात लसूण ऐच्छिक.
शिजलेल्या डाळीत ओट्स+मीठ मसाला+भाज्यांचे तुकडे घालून बिसी बेळे ओट्स होतात. मसाला न घालता वरणओट्सही होतात, मस्त लागतात, मस्त लिंबू मिळून तूप घालून खायचं.
फक्त मायक्रोवेवमधे हे सगळं शिजवताना बाऊल मोठा घ्या, म्हणजे द्रवपदार्थ उतू जाणार नाहीत.

मी एक सोपी पाकृ सांगते.
ओटस भिजत घाला ताकात, २० मिनिटं. त्यात ढबू किसून घाला, हळद, मीठ आणि तव्यावर धिरड्या प्रमाणे ओतून घ्या, भाजून खा.

मसाला ओट्सची पाकिटे मिळतात. मी तेच ऑफिसला घेऊन जाते. कॉफी मशिनमधले उकळते पाणी घालायचं, ढवळायच थोडा वेळ ठेवायचं आणी खायचं. फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. त्यात थोड्या भाज्या सुद्धा असतात. सोपे पडते.

आज त्यातल्याच एका प्रकारात थोडं मीठ आणि चाट मसाला घातला. वेगळी टेस्ट. एकदा टॉमेटो सॉस घातला

प्लेन ऑट्स ऑफिसमध्ये नेलत तर त्यासोबत वेगळ्या डब्यात थोडं गाजर उकडलेले बीट, उकडलेले कॉर्न, ज्यादिवशी डब्यात तोंडली फरसबी इत्यादी भाजी असेल तर थोडी जास्त नेऊन तीसुद्धा घालता येईल.

घरी थोडी तयारी करून घेऊन एका हवाबंद डब्यात घालून आठवड्याभराकरता करून नेता येईल :

तेलावर मोहरी, हिंगाची फोडणी. हव्या असल्यास लाल मिरच्या, कढिपत्ता ही फोडणीत. मग ओटस घाऊन २-३ मिनिटे परतून घ्यायचे. मग त्यात वाटलेली हिरवी मिरची, आलं आणि मीठ घालून थोडे अजून परतून गार करत ठेवायचे.

ऑफिसमध्ये जर शक्य असेल तर यात दही / ताक, कोथिंबीर घालून हवे तेवढे पाणी घालून मावेमधून शिजवायचे. २-३ मिनिटांत तयार होईल.

खूप चविष्ट लागतं.

सफोला मसाला ओटस,

तिन फ्लेवरस मध्ये मिळत, १५ रु एक पाकिट ३ पाकिटावर एक फ्री (सहकार भांडार)

ऑफिस मध्ये सहज बनवता येईल, (वेल ने सांगीतल्या प्रमाणे)

भारताबाहेर अजुन उपल्बध नाही !!

घरी असा स्वाद बनवणे कठीण आहे, अशक्य नाही.

Try this recipe for making a largish batch of oats once a week . Separate into individual servings and refrigerate.

http://www.thekitchn.com/how-to-cook-steelcut-oats-for-134185

Then you can add different flavors to each serving and reheat in the microwave at work.

I like tabasco sauce, habanero sauce, Sri racha sauce, . You can experiment with whatever flavors are available to you.

If you do use milk, please stick with low-fat or non-fat milk.

वर्षा,
१/२ कप ओट्स म्हणजे एक कार्ब सर्विंग.
मंडळी, शक्यतो इंन्स्टंट ओट्स टाळा. अजून एक म्हणजे मसाला ओट्स टाइप प्रकारात पाकिटावर सोडीयम, साखर वगैरे किती ते बघा. मामीने कृती दिली आहे तसे घरगुती रेडी मिक्स बनवून ठेवणे चांगले.

धन्यवाद आया मायान्नो.....खरच दुसर्या साठी काहिही स्वार्थ नसताना...एक एक ओळ का होईना.... लिहिलीत्.....बरं वाटल्>....कोण म्हणतं दिवस वाईट आहेत्.....माझ्या माबो वर नक्कीच नाही....मला इतक्या बहिणी आहेत हे बघून बरं वाटलं.......We all feel like a family............I am overwhelmed by all your responses.....million thanks

रच्याकने स्वाती२ ताई...दिवसाला माझ्या सारख्याने...किती Carbs consume करावेत? माझे Triglycerides 1200 aahet.....

अर्धा कप ओट्स ताकात भिजवून ठेवा, किंवा थोडे दही फेटून ओट्समध्ये घालून आणि पाणी घालून सरसरीत बॅटर बनवा. त्यात कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे घाला. धिरडी काढता येतील.

मिळतं की ताक परदेशात. आणि नाही तर दही आणून त्याचं बनवता येईल. हाकानाका. दही तरी मिळत असेल?
फक्त धिरडी ऑफिसात नाही बनवता येणार. कदाचित घरी करु शकाल कधीतरी. Happy

ताक रेडी मिळत नसलं तरीही दह्यात पाणी घालून घुसळून तर करता येईलच.
तुमच्या डॉक्टरांना दलिया, किन्वा (quinoa) चालेल का विचारून घ्या. ओट्समधून चव बदल म्हणून खाता येईल. मायबोलीवर रेसिपीही आहेत ह्याच्या.

माझी एक प्री डायबेटिक असलेली मैत्रिण भाता ऐवजी ओट्स खाते. तिचं म्हणणं आहे की वरणभात आणि वरण ओट्स मधे चवीत फारसा फरक जाणवत नाही.
मामींची पद्धत मला फार आवडली.

ओव्हरनाईट ओट्स टप्परवेअर मध्ये करून ठेवू शकता. सकाळी तो डबा बरोबर न्यायचा. अनेक रेसिपी आंतरजालावर उपलब्ध आहेत. तुम्हाला पटेल ती करू शकता.

नाना,

साधारण आहारात २५% कार्ब्ज राहातील असे पहा. म्हणजे जर दिवसाचा १६०० कॅलरी प्लॅन असेल तर ४०० कॅलरी कार्ब्जच्या. ४-९-४ हे लक्षात ठेवायचे. १ ग्रॅ प्रोटिन आणि कार्ब्ज च्या प्रत्येकी ४ कॅलरी, १ ग्रॅम फॅटच्या ९. म्हणजे १६०० कॅलरी प्लॅन मधे १०० ग्रॅम कार्ब्ज. दुसरी गोष्ट म्हणजे माय प्लेट गाईडलाईन्स प्रमाणे १ भाग कार्ब्ज, १ भाग प्रोटीन्स आणि २ भाग भाज्या-फळे(यात २ सर्विंग्ज फळे आणि ४-५ सर्विंग्ज भाज्या) जोडीला २ सेर्विन्ग्स लोफॅट डेअरी.

कार्ब्ज बाबत - हिडन शुगर विचारात घ्यावी - केचप, टोमॅटो सॉस, बार्ब्रेक्यु सॉस, मॅरीनेड्स, सॅलद ड्रेसिंग्ज, फ्लेवरवाले दही. तसेच मटार, कॉर्न सारखे कार्ब सोर्सेसही. त्यामुळे स्टार्च नसलेल्या/ कमी असलेल्या भाज्या, होल ग्रेन्स- ओट्स, बार्ली, ब्राऊन राईस, मिलेट्स, दलिया. ड्राय फ्रुट्स आणि ज्युस बंद. ताजी फळे खातानाही विचार पुर्वक पर्याय शोधावेत.
या जोडीला नियमित व्यायाम, प्रमाणात चांगली फॅट, लीन प्रोटिन्स.
साधारणपणे कार्ब बरोबर नॉन स्टार्ची भाज्या, प्रोटिन बरोबर नॉन स्टार्ची भाज्या असे लक्षात ठेवायचे. प्री पॅकेज फूडचे लेबल वाचायचे. बरेचदा मल्टी ग्रेन, ओट्स वगैरे नुसते हेल्दी आहे असा आभास करायला नुसते नावातच असते. आठवड्याचे प्लॅनिंग केलेत तर घरचे सुट्सुटीत पथ्याचे वन डिश मिलही बनवता येइल.

चांगल्या प्रतीचे फुड थर्मॉस गार्/गरम पदार्थांसाठी आणि कॉर्निग वेअर, पायरेक्स टाईप मायक्रोवेव करायला योग्य झाकणाचे मोठे सूपचे मग वापरायचे. ऑफिसमधे फ्रीजची सोय नसल्यास/ जागा कमी असल्यास, एक छोटा कुलर आणि कोल्ड पॅक ठेवायचे.

Pages