पाऊस दाटलेला..माझ्या 'मनामधे' हा..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 1 August, 2014 - 12:33

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा

गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा

झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा

पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
गीतः-सौमित्र
================

आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत.
दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ? करत होतं. पण मी पहिली नवी बाइक घेतली तेंव्हाही प्रथम गेलो,ते माझं जिवापाड प्रेम असलेल्या गावी,म्हणजे माझ्या अजोळीच.हरिहरेश्वरला! तेच मनात आलं आणि आषाढात सुरवातीलाच प्रचंड कोसळत असलेल्या पावसात,नवी गाडी आणि काही महिन्यांपूर्वीच घेतलेला नवा कॅमेरा,आवडत्या मराठी/हिंदी/ऊर्दू गीत गझलांनी भरलेला पेनड्राइव्ह...आणि आतल्या व बाहेरच्या पावसाची भेट घडवायला आसुसलेलं मन घेऊन..एका सकाळी निघालो. ताम्हाणिचा घाट नेहमीप्रमाणे चिंब होताच..
https://lh3.googleusercontent.com/-hobLpAGN7SQ/U9JbafOc49I/AAAAAAAAF5Y/j2QtdaAIdUo/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B300.jpg
पण मला का कोण जाणे त्या ट्रीपमधे ताम्हिणीतलं आकर्षण फार वाटलं नाही. कारण मन कोकणातली लालमातिची भिजून चिंब झालेली घरं..कौलांपुढे लावलेल्या झावळ्यांवरून टपटपणारे पावसाचे चमकदार आणि टप्पोरे थेंब..
https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/t1.0-9/q77/s720x720/999429_498477163571908_762122072_n.jpg
दाट भिजलेली नारळी/पोफळीची झाडं...
https://lh6.googleusercontent.com/-YsJXTIRVGXY/U9umzOXaNKI/AAAAAAAAGN4/T_HIMq8HT1U/w436-h581-no/IMG_20130818_103205.jpg
आणि नारळी पोफळीच्या नाकावर टिच्चून भिजलेली आणि पहिल्यापासून मला मनमोहक वाटणारी
ही केळ...!
https://lh6.googleusercontent.com/-Br26kRAUaBY/U9JkwloEdpI/AAAAAAAAF9E/MBoT87c6la8/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B453.jpg
आणि काहिशी गूढ वाटणारी कोकमाची झाडं! ही पुढची स्वप्न पहात होतं. या आषाढातही हाच सगळा बेत मनात होता,पण...यावेळी त्याच्यासह सारच हुकलं!..आणि अत्ता तो तसाच बरसून माझ्या मनाची वाट लावतोय.म्हणजे मी इथे आहे तो शरिरानी.मनानी गेला अठवडाभर तिकडेच जगतोय! अत्ता अतिबेचैन व्हायला लागलं आणि मग मनात ठरवलं ..हा सगळा पाऊस इथे सगळ्यां बरोबर वाटुन टाकू...आज आभाळ अगदी स्वच्छ झालं पाहिजे.कोरडेपणा येण्यापेक्षा ते बरं अगदी!
कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी!
१)
https://lh5.googleusercontent.com/-Cm3U2CBu5IU/U9uonTxQMhI/AAAAAAAAGOI/Fl7ST6BAoig/w436-h581-no/IMG_20130818_103510.jpghttps://lh3.googleusercontent.com/-Zpr2Wwnh-eM/U9uxdl470SI/AAAAAAAAGRg/yJtUpeCmaks/w436-h581-no/IMG_20130818_063105.jpghttps://lh4.googleusercontent.com/-U1p4m3N4i7A/U9upZm38uII/AAAAAAAAGOQ/bkpoTFvwN0M/w436-h581-no/IMG_20130818_103543.jpg
२)ही पावसानी निवळलेली वाडी..मंजे आमच्या रायगडी बोलीनुसार-
"पावसानी मंजे यंदा शाप धुऊन टाकलान् अग्दी!
https://lh3.googleusercontent.com/-GqXLpD-V_90/U9urYd1CzuI/AAAAAAAAGOw/CVI0ECqEPqE/w436-h581-no/IMG_20130818_103300.jpghttps://lh6.googleusercontent.com/-wzo9GYTlpJ4/U9uvW36ZQ9I/AAAAAAAAGQ8/H1RiAeE2wUs/w436-h581-no/IMG_20130818_103234.jpg
३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!
https://lh6.googleusercontent.com/-ffvfMThVVnY/U9Jefl2geCI/AAAAAAAAF6w/UKACOurCQng/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B305.jpg
४)आणि विहिरी...त्या काय मागे रहाणार होय!?
अंतर्बाह्य खूण पटवतात अगदी!
https://lh3.googleusercontent.com/-jkjjmnmUpdc/U9JcCgmVAmI/AAAAAAAAF54/HrnMcYFgr-k/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B301.jpghttps://lh3.googleusercontent.com/-qXdJWI_Q0VI/U9utM90EtQI/AAAAAAAAGQs/uqKwBYbHc00/w436-h581-no/IMG_20130818_103530.jpghttps://lh3.googleusercontent.com/-f6cqJQybbdA/U9ukKR0FuVI/AAAAAAAAGNg/Tocm_thPNqQ/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B434.jpghttps://lh4.googleusercontent.com/-YDPdgq7-fSg/U9uhUUNWhWI/AAAAAAAAGNU/vik-gCREEI4/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B460.jpghttps://lh6.googleusercontent.com/G2rWUvp4HNHbaJQlLVEOmytvKLpK11AqhSbVJCXOfHk=w774-h581-nohttps://lh4.googleusercontent.com/GskwShwvGiIMmwtCoUu3_Btrne5F14qENJxM-UkH1-s=w774-h581-no
५) ही फुलं ही पावसाळी..? की पावसानी फुललेली..? माहित नाही. पण मन अगदी गा.........र करुन टाकतात.
https://lh3.googleusercontent.com/-2zWc-t6wgYs/U9uv4jyb-mI/AAAAAAAAGRE/9_RLEKNa3mA/w436-h581-no/IMG_20130818_101312.jpghttps://lh3.googleusercontent.com/-lL4n7rziJtQ/U9uwhuJ1J8I/AAAAAAAAGRU/c_vDcv9nTnA/s512/IMG_20130818_083521.jpghttps://lh3.googleusercontent.com/-yuF1eB_sCcE/U9uwJ76ahvI/AAAAAAAAGRM/ySfyLcU5qpc/w436-h581-no/IMG_20130806_134034.jpg
६) अगदी शेतांच्या मधून जाणारी पायवाट सुद्धा ओहोळाचं रूप घेते..
https://lh3.googleusercontent.com/-23H3PUN3yE4/U9JckHv1pnI/AAAAAAAAF6A/ALWU6VC4V3E/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B302.jpg
७) भातशेतं आणि डांबरी रस्त्याच्या मधले हे खळगे..छोट्या मोहक तळ्यात बदलून जातात.
https://lh4.googleusercontent.com/bpYZjoC6o5L4Xl2IHgtgTPgf6nWSA8mEBaIivVFoldA=w774-h581-no
८) आणि नदीबाय तर भलतीच फुगते! एरवी आमच्या इकडे नदी..मंजे.."छ्छे..मेल्या ओहोळ सुद्दा नाय हो तो बारका..सा!
https://lh4.googleusercontent.com/3xil66Izu3PktjLBL85yG4UMtoDq-22Tzyrz5KBJDls=w774-h581-nohttps://lh5.googleusercontent.com/3cto8y1xdssVJKcOD0lZPECEti819MuIZFBxKZwEHC4=w774-h581-no
या नदी तळ्यांसह..नारळपोफळी....आणि माज्या लाडक्या केळीबाय सह
वाडीविहिरीबरोबरचा..घराच्या कौलांवरून सरळ मनात ओघळणारा तो पाऊस..
मी एकट्यानी भरपूर म्हणजे अगदी भरपूर अंगावर घेतला.. २/३ दिवस चिंब होऊन..नंतर माझ्या लाडक्या मामाच्या घराचा आणि विशेषतः माझ्या मनाचा भाग असलेल्या त्या सार्‍या परिसराचा
काहिश्या सुखद आणि जड मनानी निरोप घेऊन मी निघालो...ते पुन्हा माझ्या मूळपदावर.. पुण्याला यायला..
https://lh3.googleusercontent.com/-Ao2-YDsW2Jg/U9up-CJZYaI/AAAAAAAAGOY/fFZaeyEJk6Q/w436-h581-no/IMG_20130818_103729.jpghttps://lh6.googleusercontent.com/-6xzEBlPsRow/U9u6Va0RhPI/AAAAAAAAGSE/xm8rEjC2N0w/w436-h581-no/IMG_20130818_103652.jpghttps://lh3.googleusercontent.com/-HAqv8MFB8f0/U9u6J94s_tI/AAAAAAAAGR8/c-a__GRIWyw/w436-h581-no/IMG_20130818_083559.jpghttps://lh4.googleusercontent.com/-BLCLDiTNJf4/U9uykGYnp2I/AAAAAAAAGRs/0Cwbklzr3gs/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B342.jpg
=======================०००००००००००००००००००००००००००००००००=======================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो दुसराच कोकणातल्या टिपिकल कौलारू घराचा फोटो, पाठोपाठ नारळी पोफळीची झाडे, केळ्याचे घड, हिरवीगारे शेते, एकटीच विहीर आणि तितकेच शांत मंदीर, पायवाटेच्या कडेकडेने डुलणारे एखादे फूल, खळखळत वाहणारे ओढे, तो संथ नदीचा काठ, अंगणातली तुळस आणि ते झाडीत लपलेले घर ... गणपतीचे वेध लावलेत अगदी अगदी .. मानू तुमचे आभार किती Happy

@ मानू तुमचे आभार किती>>> धन्यवाद.. Happy
पण आभार नको. मी अगदी माझं मनातलं बोलून टाकावं अश्या पद्धतिनी केलेलं लेखन आहे हे! तुंम्ही मनानी सहभागी झालात हेच आभार. Happy

कोकणातील पाउस अगदी माझ्या मनातला. पण मी स्वतः कधीच न अनुभवलेला. तुम्ही खरच खूप नशीबवान आहात कोकणात राहून ओटी वरील झोपाळ्यावर बसून असा मनसोक्त पडता पाउस अनुभवायचा. पाउस आणि तो सुद्धा कोकणातील कौलारू घरात बसून पाहायचा........ह्या सगळ्या आठवणी जपून ठेवण्या सारख्या......

फोटो आणि वर्णन अतिशय सुरेख. सुरवातीची कविता सुद्धा अप्रतीम. कोकणातील कौलारू घराचे अजून फोटो असतील तर नक्की टाका.

खुप छान लेखण आणि प्रचि.

गंध चित्रपटात कोकणातील घर दाखवल आहे. पावसाळ्यातील चित्रीकरण खुप छान केलेलं आहे.

छान आहेत चित्र.
पायर्‍यापायर्‍यांची विहीर (की हौद) देवळाच्या आवारातली का?

फारच सुरेख. वरून धबाधब पाऊस कोसळत असताना कोकणातील तळ्यात किंवा विहिरीत पोहायचा मनसोक्त आनंद घेतलाय लहानपणी. तेव्हापासून वार्षिक सुट्टी मे महिन्यात न काढता केवळ पावसासाठी जून जुलैत काढतो. यावर्षी जुलै मध्यापर्यंत पाऊस नव्हता, कोरडेच परत आलो. या अप्रतिम फोटोंनी ती रुखरुख बरीच भरून काढली.

विहीर (की हौद) देवळाच्या आवारातली का?>>> हो.. ते दिवेआगरचं रूपनारायण मंदिर. त्याचीच विहीर ती! Happy

मस्त... बारव कुठल्या गावातली ? फार सुंदर राखलीय !
पिवळे फुल भाजीच्या अळूचे आणि आकाशी रंगाची आहे ती भारंगी.. हिच्या पानांची, फुलांची भाजी करतात. पाळ देखील औषधात वापरतात.

अत्रुप्त आत्मा>> भिजवून टाकला आत्मा अगदी तृप्त झाला फोटोज बघून!! Happy
कोकणातील पाऊस हा कायमच जिव्हाळ्याचा विषय आहे... (खरंतर पाऊस आणि कोंकण हे च दोन्ही फार जिव्हाळ्याचे आहेत Happy ) कोकणातील पाऊस तिथल्या माणसांसारखाच!! अलिप्त अलिप्त वाटेपर्यंत भरभरून देणारा!!! (कोकणात प्रेम अन शिव्यांच्या पावसाबरोबर खर्‍याखुर्‍या पावसाची झडही अनुभवावी किमान एकदा तरी :फिदी:) इथला पाऊस फक्त अनुभवायचा निशब्द पणे!!! प्रचि अत्युच्च!! जागोजागी जिव्हाळा पेरल्याचा भास होतो... आणि नॉस्टॅल्जिक व्हायला होतं...

केळ मलाही फार आवडते. केळीविषयी कायम एक आपुलकी आहे फार पूर्वीपासून.. भिजलेली केळ अगदी गरत्या बाईसारखी लोभस तरीही सोज्वळ सात्वीक आणि समाधानी तृप्त तृप्त वाटते Happy

"पावसानी मंजे यंदा शाप धुऊन टाकलान् अग्दी!>> Happy अगदी अगदी!! Lol

कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी!>> फार आवडलं हे वाक्य.. Happy

@(कोकणात प्रेम अन शिव्यांच्या पावसाबरोबर
खर्‍याखुर्‍या पावसाची झडही अनुभवावी किमान एकदा तरी)>>> येक्झॅक्टली ...दोघेही चींब करतात.आणि कायमचे लक्षात रहातात.

प्रेमः-
"ये हो पुन्हा असाच!" <<< ही पाठवणी...कोकणातल्या हरएक घरातून निघताना केली जाते.
जितके दिवस त्या घराचा सहवास झाला,तो सारा सहवास अश्या साध्या एका वाक्यातून अगदी घरापर्यंत येतो.बरोबर दिलेल्या पोहे आणि पापडांसारखा!

आता शिव्या:- Lol

छ्छे...एकदोन ओळीत* काय लिहिणार..? यथावकाश लेखच येइल एखादा..अशीच कोकणची आठवण आल्यावर.

* आणि समजा लिहिल्या एकदोन वाक्यात शिव्या, तर इथे जो कोणी आमच्या रायगडी मराठीतला असेल..तो मला:- "ह..............ल!..काय लिहून लिहिलिस ती दोनच वाक्य! मंजे बोल्लेला सगळा ऐकू पन येत नाय!? ...भैरा'च मेल्या तू!..इतकी वर्ष कोकणात येऊन ..कुणाची.......... Lol .......इ..इ..इ..! Lol अशी धिंड काढेल.

दिनेश
@बारव कुठल्या गावातली ? फार सुंदर राखलीय !>>> ती दिवेआगरच्या रूपनारयण मंदिराची/समोरची आहे.आणि ती अलिकडेच मंदिराचा जिर्णोद्धार झाला,त्यातलीच आहे. Happy
https://lh5.googleusercontent.com/-xi8RTf3ZogE/U904Z25J58I/AAAAAAAAGSU/4RhZWE9G1lU/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B432.jpghttps://lh4.googleusercontent.com/-LEzHFxd7GhM/U904rajqcsI/AAAAAAAAGSc/8mlZMf5FRoE/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B436.jpghttps://lh4.googleusercontent.com/-ptN5dd4dXXI/U905SJqRDgI/AAAAAAAAGSk/uFg5H5C8ONE/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B439.jpg

देऊळ क्यूट आहे. जीर्णोद्धारात ऑइल पेंट मारलेला नाही हे पाहून बरं वाटलं.
<५. ही फुलं ही पावसाळी> याच्या वरच्या दोन छायाचित्रांत काय आहे? तलावात विहिरी वाटताहेत.

कोकण नेहमीच भूरळ घालतं मनाला.छान फोटोज आणि वर्णनही.
कोकणची व्हर्च्यूअल पण खरी वाटणारी सैर करवून आणलीत की हो!

भरत मयेकर
@ तलावात विहिरी वाटताहेत.>>>. तो तलाव पावसामुळे झालाय! एरवी ती दोन पाड्यांच्या मधे असलेली खोलगट जागा आहे.

ओ हो हो...
अतृप्त आत्म्या (आत्म्याला आमच्यात अहो जाहो करत नाहीत... विशेष्तः ... कोकणी आत्म्याक तर जमुचाच नाय), पार भिजवून टाकलं ह्या सहज शब्दांनी आणि तितक्याच सुरेख छायाचित्रांनी.
गर्द हिरवाईत लपली धुराचं कोंदण ल्यालेली कौलारं...
आकाशाच्या कुंभातून चाललेला अभिषेक अंगांगावर झेलत उभं रूपनारायणाचं मंदीर... वेड लागलं.

छ्छे... आत्ताच्या आत्ता गावी जावू वाटतय.

@दाद >>> आय.डी.नाम सार्थ करणार प्रतिसाद दिलात हो अगदी. Happy

@ कोकणी आत्म्याक तर जमुचाच नाय) >>> Lol

Pages