जया एम..
फार पुर्वी म्हंजे ३/४ वर्शा पुर्वी हीच्या कवीता वाचल्या होत्या.. सुंदर शब्दाची मांडनी.. आशयाने परी पुर्ण अशा ह्या कवीता.. शब्दरचना एवढी मस्त आहे की पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते..भुरळ पाडते....
का कोणास ठावुक पन अचानक मार्च २०११ नंतर कुठलही साहित्य नाही.. कोनालाही उत्तर नाहि.. सगळच शांत....
काही दिवसापुर्वी एक कवीता वाचताना आठ्वन आली.. म्हनुन हीच्या कवीता शोधायच प्रयत्न केला.. पण काही ठाव ठिकाना लागेना. रोज नवीन प्रकारे सर्च, रोज नवीन सर्च की.. बर्याच जनाना संपर्कातसुन विचारना केली पण हाती शुन्य.... पुर्ण पणे विस्म्रुतित गेल्या होत्या ह्या कवीता ..
आज अचानक पुन्हा आठवण झाली आणि पुन्हा मायाजाळा वर शोधायला बसलो.. पुन्हा त्याच कसरती.. तेच सर्च प्रकार आणि अचानक नाव सापडल.. आणि मग मिळालेला हा ठेवा...
का कोणास ठाउक मला ह्या कवीता पुन्हा रसिकांच्या नीदर्शनास आनाव्या अश्या वाट्ल्या.. म्हणुन हा खटाटोप...
आतून जागते कोणी
मधाळ
पथिक
प्रेयस
पखरण
शकुन
आर्जव
रात्र सम्पूर्ण
पाण्यातले काही
पाणी झुंबर मंथर
तिथे तटावर लाटा
इशारा
पान्थस्थ
ऐन प्रवाही
पाखरु
पैल पाऊस
अवेळी
गाभारा
बाधा
कुणी राधिका
वस्तीस उतरले पक्षी
पुन्हा एकदा
यातिल काहि कवीतां वर चर्चा व्हायला पाहीजे अस मना पासुन वाटते, जसे पान्थस्थ ....वस्तीस उतरले पक्षी...
ह्या काहि गुढ कवीता.. गुढ अर्थ .. पुन्हा पुन्हा वाचाव्या आणि प्रत्येक वेळी नवीन काहि तरी सापडते...
मग चला तर करायची काय यावर चर्चा...
पान्थस्थ
दिवसाचे घटिकापात्र
सांजताच स्तब्ध बुडाले
डोहात डहुळले पाणी
धुंदीतच थवे उडाले
कैफात बरळला वारा
बहरून गजबजे राई
अन सुगंधभरली अफवा
गावातून पसरत जाई
दूरच्या प्रवासी वाटा
पांथस्थ चालुनी आला
ती घागर भरून वळता
रानात गवगवा झाला
शतकांची जुनी तहान
अर्ध्यावर राहून गेली
काकणे तिची वाढवली
अन घागर वाहून गेली
जे पापणीत विस्कटले
ते स्वप्न तिच्या गावाचे
जे ओंजळीतुनी सुटले
ते अर्घ्य तिच्या नावाचे
-------------------------------जया एम
वस्तीस उतरले पक्षी
वस्तीस उतरले पक्षी
फांद्या भाराने हलल्या
पानांना फुटले पंख
पंखांतून रात्री फुलल्या
वस्तीत रंगले पक्षी
झाडास सुरांचे घोस
पंखात भरारे वीज
पक्ष्यांना अडवू नकोस
वस्तीस राहिले पक्षी
रानातून हाका उठल्या
चांदण्या खुणावून म्हणती
पंखांवर रेषा कुठल्या
ते उडून गेले पक्षी
पंखातून रात्री झरल्या
मिटलेल्या चोचींमध्ये
कालच्या कहाण्या उरल्या
येतील कशाला पक्षी
झाडाला काळीज नाही
पंखांची ओली माया
पण मुळे शिंपुनी जाई
------------------------------------जया एम
या एकत्र केल्याबद्दल धन्यवाद.
या एकत्र केल्याबद्दल धन्यवाद. मलाही आवडतात त्यांच्या कविता.
अत्यंत सुंदर कविता.. अलिकडेच
अत्यंत सुंदर कविता.. अलिकडेच कोणीतरी वर काढल्या होत्या तेव्हा वाचल्या, पुन: नाव विसरले गेले. बरं झालं तुम्ही या शोधून काढल्यात कोकण्या , आता हरवू देणार नाही.बाई कुठे हरवल्यात कोण जाणे ..
भारती ताई .. तुला मी वि पु
भारती ताई .. तुला मी वि पु करुन विचारले होते.. आणि तु मला बाकीची सतरा से साठ नाव दीलिस... पन बघ.... हे नाव तु पन विसरलिस.. तेच हे नाव...
़kitii apratim kavita aahet
़kitii apratim kavita aahet ya....kharch mohat padley...sarkhya vachtach rahavyasha vatat... Koknya-dhanyavaad asa aprtim khajina shodun kadhlya baddal.... Sorry marathit prtisad deu shakat nahiey...pan pratisad dilyavachun rahaval nahi.
अगदी अहाहा झालं एक एक कविता
अगदी अहाहा झालं एक एक कविता वाचताना! कोकण्या शतशः धन्यवाद ह्या अप्रतिम कविता संग्रहित केल्याबद्दल!
.
.
(No subject)
bobby jasoos काय झाले...
bobby jasoos काय झाले... delete का केले प्रतीसाद?
https://www.facebook.com/jaya
https://www.facebook.com/jayashree.h.joshi?fref=nf&__tn__=C
हा या सुंदर कविता करणार्या कवियत्रीचा फेसबूक पत्ता,कुणीतरी विचारा यांना की अचानक लिहणे बंद का केले म्हणून.
मायबाप, जोहार! परवलीचा शब्द
मायबाप, जोहार!
परवलीचा शब्द विसरले होते. एवढेच कारण. कविता लिहिणे अखंड चालू आहे. पुन्हा मायबोलीवर येते आहे. फेसबुकवर jayashree Hari Joshi असे नाव दिलेत की सापडेन.
स्नेहपूर्वक
जया एम
अरे वा! लवकर लिहा. वाट
अरे वा! लवकर लिहा. वाट बघतेय.