" वाढदिवस "............ भाग १

Submitted by विनित राजाराम ध... on 26 July, 2014 - 08:17

" आई..... मी देवळात जाऊन येतो गं "," थांब रे , मी पण येते ". आईने महेशला हाक मारून थांबवले. आई जवळ आली तसा त्याने लगेच वाकून आईच्या पायाला हात टेकवले."काय रे ? काय झालं ?"," विसरलीस ना तू .... आज माझा वाढदिवस ना ...... काय तू पण ना आई " तशी आई थोडीशी हसली. " आता हसायला काय झालं तुला ? " . " अरे आज तुझा वाढदिवस आहे ते लक्षात आहे माझा आणि तुझ्या बाबांना सुद्धा माहित आहे. म्हणून कालच त्यांनी केक आणून ठेवला आहे. तुला माहीतच नाही." तसा महेश खजील झाला. " Sorry " त्याने कान पकडले, " चल ..... आईला कोणी sorry बोलतं का ? बरं जा तू देवळात . मी ' यांच्या ' बरोबर जाईन नंतर "," ठीक आहे , चल येतो मी . आणि तसाच मग office ला जाईन हा." , " bye . लवकर ये संध्याकाळी." , " Bye.... येतो लवकर. "

महेश देवळात जाण्यासाठी निघाला. तसा तो रोज न चुकता शंकराच्या देवळात जायचा, पण आज त्याचा वाढदिवस होता ना . म्हणून आज तो जरा खूषच होता. देव वेडा होता अगदी. त्यातूनही शंकरावर त्याची जास्तच भक्ती होती. लहानपणापासूनच तो शंकराच्या देवळात जायचा आणि नेहमी काहीतरी मागायचा . ते कधी पूर्ण व्हायचे नाही म्हणा . पण त्याला ती सवयच होती. तसा तो काही गरीब वगैरे नव्हता ,पण तो कामाला लागल्या पासून जरा चांगले दिवस आले होते घराला. एका कंपनीत तो accountant होता , junior accountant. २ वर्षे झाली होती त्याला, पण पगार काय तेवढाच होता आणि आज तो देवाकडे तेच मागायला आला होता . " अरे देवा , दोन वर्ष झाली रे मला , अजून पगार नाही वाढवत माझा . आज चांगला दिवस आहे. आज तरी त्यांना थोडी बुद्धी देशील का ? ".

त्याचदिवशी पहाटे, कैलाश पर्वतावर,............लगबग सुरु होती. पहाटे पहाटेच भगवान विष्णूनी महादेवांची भेट घेण्याचे ठरवले होते आणि विष्णू लक्ष्मी बरोबर कैलाश पर्वतावर आले होते. त्यामुळे धावपळ चालू होती. झोपमोड झाल्याने कार्तिकेय तसाच कूठेतरी भटकायला गेला होता. महादेवाचा " नाग ", गणेशाचा " उंदीर ", लक्ष्मीचा " घुबड " आणि स्वतः " गणेश " पकडापकडी खेळत होते. कार्तिकेयचा " मोर " आणि भगवान विष्णू चा " गरुड " खूप दिवसांनी भेट झाली म्हणून गप्पा मारत बसले होते. महादेवाचा " नंदी " मात्र वयानी आणि आकारानेही मोठा असल्याने त्यांच्यात खेळायला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे उभ्या-उभ्यानेच, पायाने माती उकरत " timepass" करत होता . भगवान महादेव आणि विष्णू काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करत होते. माता लक्ष्मी आणि माता पार्वती थोडंस लांब बसून कसल्याश्या गप्पा मारत होत्या . माता पार्वतीचा " वाघ " कोणाबरोबर पटत नाही म्हणून तिच्याच पायाशी बसला होता. अस सगळ चालू होता. इतक्यात " घंटानाद " झाला. तसे सगळे चमकले. परत पुन्हा सगळे आपापल्या कामात गुंग झाले.

" काय झालं महादेवा ? " ," काही नाही रे , तो माझा एक भक्त आहे. " ," फक्त एक भक्त ?...... खरा आणि सच्चा भक्त. " माता पार्वती महादेवाचे वाक्य मध्येच तोडत बोलली. " अगं लक्ष्मी, तो " महेश " अगदी लहानपणापासून यांची मनोभावे भक्ती करतो. रोज सकाळी सकाळी यांना नमस्कार केल्याशिवाय कोणतेही काम करत नाही आणि " हे " त्याची एकही इच्छा पूर्ण करत नाहीत गं."," हे बरोबर नाही हा महादेवा " भगवान विष्णूनी सांगितले. " अरे, तो रोज काहीना काही मागत असतो माझ्याकडे आता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत राहलो तर कसं होणार ?", "अहो पण सगळ्यांच्या कूठे ? याचीच तर गोष्ट चालू आहे ना... " माता पार्वती मध्येच म्हणाली," हो बाबा, कराना त्याच्या मनातली इच्छा पूर्ण ... " गणेशाने मधेच आपले म्हणणे मांडले. " पण मला कळत नाही आज हा नेहमीपेक्षा लवकर कसा आला आज देवळात ? ", " देवा, आज पृथ्वी वरील नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज त्याचा वाढदिवस ही आहे. " ढगातून कुठूनतरी एकदम आवाज झाला. " नमस्कार ब्रम्हदेव आणि माझ्या वडिलांना आठवण करून दिल्याबद्दल आभारी सुद्धा आहे मी ." गणेशाने हात जोडून आभाळाकडे पाहत म्हटले. " या ब्रम्हदेवांना सगळं माहित असते हा." महादेव कुतूहलाने बोलले.

" तर काय ठरवलं आहात महादेवा ? " भगवान विष्णूनी आठवण करून दिली. " ठिक आहे.ठिक आहे.आता एवढे सगळे माझ्या मागेच लागला आहात तर ठिक आहे. मी त्याची एक इच्छा पूर्ण करतो.", " फक्त एकच ? " गणेश बोलला." मग दोन " ," दोनच ?" माता पार्वती म्हणाली ." मग किती ? तुम्हीच सांगा."," एका दिवसातल्या सगळ्या इच्छा " भगवान विष्णूनी सांगितले. " नाही दोन दिवस." कितीतरी वेळाने नंदी बोलला. आणि अश्याप्रकारे सगळा गोंधळ सुरु झाला. शेवटी महादेवच बोलले ," सगळ्यांनी शांत राहा जरा. सगळ्यांनी देवासारखे शांत बसा. " हे ऐकून सगळेच महादेवाकडे आश्चर्याने बघायला लागले. " अरे हो, विसरलोच मी. आपण " देवच " आहोत ते."," तर मी ठरवल आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे,आणि पुढच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच त्याचा पुढचा वाढदिवस पर्यंत तो जेवढ्या इच्छा मनात मागेल त्या पूर्ण होतील." ," थांबा..... थांबा..... महादेव." भगवान विष्णूनी मध्येच म्हटलं," सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या तर कस होईल , काही वाईट सुद्धा होऊ शकते देवा ." , " हो ते सुद्धा बरोबर आहे.", " ठीक आहे." महादेव विचार करत म्हणाले ." महेशला " असं मला मनापासून वाटते " असे बोलायची सवय आहे. कधीना कधी तो त्याचा वापर वाक्यात करतोच. जर त्याने येत्या वर्षात म्हणजेच त्याच्या पुढच्या वाढदिवसाच्या रात्री १२ पर्यंत तो जे काही मागेल तर ते पूर्ण होईल. पण वाक्याच्या शेवटी , "असं मला मनापासून वाटते " असं म्हटले तरच आणि त्याने ती इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली तरच ती इच्छा पूर्ण होईल. अन्यथा नाही." यावर सगळेच खूष झाले.कोणालाच काही problem नव्हता.

" नारायण.......नारायण......." असे म्हणत नारदमुनी अवतरले. " अगदी perfect timing हा मुनी. " भगवान विष्णूनी लगेच म्हटलं ," तुम्ही कधीपासून इंग्रजीमध्ये बोलायला लागलात." महादेवांनी भगवान विष्णूला विचारले," अहो शिकावं लागते ना. आजकालचे भक्त शिकलेले असतात. बहूतेक जण इंग्लिश मध्येच काहीतरी मागतात. मग ते कळायला नको का ? "," बरं, नारदमुनी, इकडे कसं काय येण केलंत ? " माता पार्वतीने विचारणा केली. " नारायण.......नारायण.......महादेवांनी आत्ताच एक वरदान दिलं आहे एका मनुष्याला. त्या संबंधी विचारणा करण्यासाठी आलो आहे मी. Infact , पिता ब्रम्हदेवांनीच मला पाठवले आहे.", " त्यांनी विचारलं आहे कि त्याच्या नशिबात पुढील वर्षात होणाऱ्या गोष्टी खऱ्या होतील असं वरदान दिलंत ते नक्की का ? तसं त्याच्या नशिबाच्या वहीत ते लिहिता येईल ना."," हो .... हो.... खर आहे ते " , " नारायण.......नारायण.......ठिक आहे. मी सांगतो बरं त्यांना. नारायण.......नारायण....... " ," बरं देवा निघतो मी .... नारायण.......नारायण......", " अहो थांबा मुनीवर " भगवान विष्णूनी नारदमुनीना थांबवत म्हटलं. " माझे सुद्धा बोलणे संपलेच आहे, मी सुद्धा निघतोच आहे. तुम्हाला मी सोडतो घरी माझ्या गरुडावरून. " असे म्हणून सगळे महादेवाचा निरोप घेऊन गेले.

( इकडे पृथ्वीवर............ महादेवाच्या मंदिरात )
महेशने आपली इच्छा मागितली. " देवा माझा पगार वाढू दे." पण महादेवाने सांगितल्याप्रमाणे वाक्याच्या शेवटी " असं मला मनापासून वाटते " हे वाक्यच नाही आलं होतं. मग त्याची इच्छा कशी पूर्ण होणार… ? महेश जायला निघाला. तसं त्याला पुजारींनी थांबवत म्हटलं," अरे प्रसाद तरी घेऊन जा.आणि देवाला सांगतोस .... पण किती पगार पाहिजे तुला कि तुझा समाधान होईल रे. " त्याने प्रसाद घेतला आणि विचार करू लागला. देवळातच होता तो, महादेवाच्या मूर्तीसमोर. " आता मला १८,००० आहे. निदान २२,००० ते ३०,००० तरी व्हावा , असं मला मनापासून वाटते " सगळे योग बरोबर जुळून आले होते. महादेव नेहमी प्रमाणे डोळे मिटून बसले होते. त्यांनी ऐकले ते आणि त्यांनी " तथास्तू " असे म्हटले.

महेश office मध्ये आला. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानी त्याचा PC चालू केला. mail box तर वाढदिवसाच्या शुभेच्छानी भरलेला होता. पण एक E-mail वेगळा होता, बॉसचा mail होता. " काय असेल E-mail मध्ये . " Mail त्याने open केला. आणि त्याला आनंदाचा मोठ्ठा धक्का बसला. Salary वाढल्याचा E-mail होता तो, त्याचा कामामुळे खूष होऊन त्याला आता senior accountant ची Post मिळाली होती आणि salary झाली होती " ३०,०००" . महादेवाने सांगितल्याप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण झाली होती. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. " चला आज बॉसचा मूड चांगला आहे वाटते." इतक्यात त्याला बॉसने केबिनमध्ये बोलावून घेतले. " अभिनंदन महेश, आज तुझा वाढदिवस सुद्धा आहे आणि तुझी post सुद्धा वाढली आहे. पण तुझ्याकडून अजून चांगल्या कामाची अपेक्षा करतो मी ." ," हो सर, नक्कीच. मी माझ्याकडून ११०% प्रयन्त करीन प्रत्येक वेळेस." ," Good ", " सर ,आज जरा लवकर जायला मिळेल का ? " ," अरे जाना, वाढदिवसाची पार्टी आहे वाटते. "," नाही सर, घरीच जाणार आहे." ," ok . पण उद्या वेळेवर ये."

महेश आनंदातच होता आज,बॉस पण खूष झालेला,salary आणि post सुद्धा वाढलेली आणि त्यात घरी लवकर निघायची Permision मिळालेली. सगळं आवरून खुशीतच निघाला तो. बाहेर पडणार इतक्यात समोर दरवाजातून एक सुंदर मुलगी येताना दिसली आणि तो तसाच बघत राहिला तिच्याकडे. किती सुंदर होती ती. straight आणि shining केस आणि तसाच तजेलदार गोरा चेहरा, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर हलकीशी smile. Perfect एकदम. बघतक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. ती तशीच त्याच्या समोरून निघून गेली. पण जाताना एक नजर त्याच्याकडे बघून गेली. तिकडेच त्याची विकेट पडली. नजरेआड होईपर्यंत तो तिच्याकडे बघत होता. " कोण होती ती कोणास ठाऊक ? पहिल्यांदा कधी बघितली नाही हिला... " विचार करतच तो बाहेर पडला . वाटेतच त्याला मंदिर लागलं तर तो पुन्हा महादेवाला " Thank You " म्हणायला गेला. " खूप खूप आभारी आहे देवा , salary वाढली, मोठी Post भेटली , Thank You." जायला वळणार इतक्यात त्याला " ती " आठवली ." देवा, ती कोण होती माहित नाही पण मला खूप आवडली रे ती. तिच्याबरोबर ओळख व्हावी,असं मला मनापासून वाटते " . " तथास्तू " महादेवाने पुन्हा एकदा डोळे न उघडताच म्हटलं.

२ जानेवारी, महेश नेहमीप्रमाणे office मध्ये आला. " कालचा दिवस खूप चांगला होता. " मनातल्या मनात महेश म्हणाला. कामाला सुरुवात करणार इतक्यात " तीच " मुलगी पुन्हा एकदा त्याच्या समोरून गेली. तो तसाच तिला पाहत राहिला अगदी नजरेआड होईपर्यंत." मला भास तर नाही होत ना.ती फक्त मलाच दिसते ,बाकी कोणाला नाही ? " त्याने बाजूला बसणाऱ्या मित्राला विचारले ," ती आता गेली ती कोण होती रे. पहिलं कधी बघितले नाही तिला ." तसा तो बोलला , " ती होय. जास्त बघू नको तिला. नाहीतर job जाईल.", " का रे ?"," अरे boss ची एकूलती एक मुलगी आहे ती. कालच आली दिल्ली वरून, office join करणार आहे बहुतेक.", " काय ? boss ची मुलगी ?" झालं. उगाचच आपण तिला बघत होतो. जाऊदे नाहीतर boss लाथ मारून बाहेर काढेल. आणि तिचा विचार सोडून तो कामाला लागला. १५ - २० मिनिटे झाली असतील. इतक्यात boss ने त्याला केबिन मध्ये बोलावून घेतले. तसा महेश घाबरला. " आपण तिच्याकडे बघत होतो,त्याची complaint केली असेल तिने, गेला job,काल post वाढली आणि आज office च्या बाहेर." तो स्वतःच्याच विचारात गुंतला होता. पुन्हा एकदा boss ने त्याला बोलावले. "आता तर जावेच लागणार". म्हणत तो केबिन मध्ये गेला .

" बस. महेश बस " तसा महेश बसला. " meet my daughter उमा "असे म्हणत boss नी त्याची आणि तिची ओळख करून दिली. तसा त्याला सुखद धक्का बसला. तिनेही त्याला " Hi " केलं. "बरं.... तुमची ओळख झाली असेल तर मी पुढे बोलतो. " ," उमा आताच " दिल्ली " तून तिचा graduation पूर्ण करून आली आहे. आणि तिला आपली कंपनी join करायची होती. नुकतीच junior accountant ची post रिकामी झाली आहे. आणि तिला accounts मधले काही बारकावे शिकायचे आहेत. तर तुझ्या हाताखाली ती चांगली शिकेल असं मला वाटते. आज पासून उमा तुझ्या हाताखाली "training" घेईल. " केवढा मोठा सुखद धक्का. महादेवाने त्याची अजून एक इच्छा पूर्ण केली. " हर हर महादेव..... "

............................to be continued

Group content visibility: 
Public - accessible to all site users