Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रिन्सेस, रबडी अजिबात नको.
प्रिन्सेस, रबडी अजिबात नको. रबडी + मिसळ कॉम्बो पोटात गेल्यावर काय होईल?
गाजरहलवा किंवा गुलाबजाम छान लागतील. आवडत असेल तर तू साखरभात/ नारळीभाताचा विचार करू शकतेस.
खोबर्याची वडी, शेवयाची खिर,
खोबर्याची वडी, शेवयाची खिर, दुधी हलवा, तांदुळाची खिर.
मिसळ सोबत मसाला ताक नक्की ठेवा.
डी गँगचे (आशुडी, मंजुडी)
डी गँगचे (आशुडी, मंजुडी) धन्यवाद
आशुडे, मिसळ कमी तेलकट बनवणार आहे. मुगाचा शिरा खूप तुपकट होतो म्हणुन बाद.
अळुवडी/ पालकवडी/ कोंथिबिर वडी ची फर्माईश आलीये. शॅलो फ्राय करेन. खूप तेलकट बनवणार नाहीये.
मंजुडे, हो रबडी जड होईल हे खरेच. गाजरहलवा फायनल करते. गुजा इतर वेळी पार्ट्यात होत असतातच.
गाजर हलवा +आईस्क्रीम असेही करता येईल.
योकु आणि आरती, ताकाच्या सजेशन बद्दल धन्यवाद. रात्रीचे मिसळीचे तिखट जेवण खाऊन लोकांना त्रास नको. ताकाने जरा बरे वाटेल.
धन्यवाद.
<मला मराठी गोड पदार्थ हवा
<मला मराठी गोड पदार्थ हवा आहे. हेसांगायचे विसर्ले >
<गुलाबजामुन, रबडी किंवा गाजरहलवा यातले काय जास्त योग्य होईल मिसळीसोबत ?>
हे तिन्ही गोड पदार्थ मराठी आहेत का?
बालाजीचीसासूतली बा चालेल का?
गाजरहलवा - मराठीच पदार्थ
गाजरहलवा - मराठीच पदार्थ झालाये हो हल्ली
मराठी थाळीत गुलाब जामुन खाल्लेत पुण्याच्या एका रेस्टॉरंट मध्ये. गुलाब जामुन मराठीच पदार्थ समजुन चालतेय मी तरी आता पर्यन्त. माझी श्रीलंकन मैत्रिण मात्र गुजा आमच्या देशाचा म्हणते. मूळचा कुठला कुणी सांगु शकेल काय ?
रबडी बद्दल मात्र अनुमोदन.
अगदी ऑथेंटिक मराठी पदार्थ पुपो आणि शिरा सोडल्यास कुठलेच आठवत नाहीत.
बालुशाही सुचवताय का , मयेकर ? पुपो न जमणार्या व्यक्तिला पीएच्डी ला बसवलत की हो तुम्ही
अहो मयेकर, गाजरहलवा
अहो मयेकर, गाजरहलवा मराठीच.
तिने 'गाजर का हलवा' लिहिलं असतं तर तुमची शंका रास्त होती
काय प्रिन्सेस, श्रीखंड विसरलीस.
मयेकर श्रीखंडातला श्री घालायला विसरले. 'श्रीबालाजिचिसासू' असम आहे ते.
करंजी करंजी..
करंजी करंजी..
अरे देवा! बालाजिचिसासु म्हणजे
अरे देवा! बालाजिचिसासु म्हणजे बासुंदी, लाडू, जिलबी, चिरोटे, साखरभात आणि सुधारस
प्रिंसेस, दुधी हलवा मस्त
प्रिंसेस, दुधी हलवा मस्त दिसेल मिपाबरोबर आणि टेस्टी ही.
श्रीबालाजिचिसासु करंजी,
श्रीबालाजिचिसासु करंजी, अनारसे, शिकरण, खिरींवर अन्याय करते.
हो. हो श्री राहिलं. (सध्या
हो. हो श्री राहिलं. (सध्या होसूमीयाघ पाहत नाही ना
)
बालाजिचिसासु, बासुंदी, लाडू,
बालाजिचिसासु, बासुंदी, लाडू, जिलबी, चिरोटे, साखरभात आणि सुधारस<<<<< मयेकर, हे अगोदर लिहायला काय झाले. मी बालजीच्या सिरीअलमधली सासु आणि त्याच सिरीअलमधली बा अस समज करून घेतला. पुन्हा त्याचा ईथे काय संबंध हा ही विचार करत बसली.
नंतर असेल त्यांची स्पेशल डीश गाजर का हलवा असा समज केला. कारण मी सिरीअल नाही बघत. 
श्रीबालाजिचिसासु करंजी,
श्रीबालाजिचिसासु करंजी, अनारसे, शिकरण, खिरींवर अन्याय करते.
मराठी संस्कृती पार रसातळाला
मराठी संस्कृती पार रसातळाला गेली आहे या मालिकांमुळे. गोखल्यांकडे कधीही गोडाचा शिराच करतात. त्यांना नारळीभात लाभत नाही ना!
दुधी हलवा मस्त.
तसा गाजर +बीट हलवाही मस्त लागतो.
अरे व्वा !!!... किती सारे
अरे व्वा !!!... किती सारे पर्याय मिळालेत.
आता पाहुण्यांना मिसळ बिसळ रद्द करुन नुसतेच गोड पदार्थ बनवुन खावु घालावे वाटतय

दुधी हलवा की गाजर हलवा, बासुंदी की श्रीखण्ड अशा चिठ्ठ्या टाकुन ठरवेन
करंजी बनवणे थोडे कठिण आहे. कारण एवढ्या लोकांसाठी एकटीने बनवणे वेळेअभावी अशक्य वाटतय.
श्रीबालाजिचिसासु करंजी, अनारसे, शिकरण, खिरींवर अन्याय करते.>>>> अगदी अगदी
पीचडी नको तर मग अस्सल मराठी
पीचडी नको तर मग अस्सल मराठी पदार्थ म्हणु शकु अशा पाकातल्या पुर्या हा ही ऑप्शन आहे की!
कुठला ही गोड पदार्थ हलका कुठे
कुठला ही गोड पदार्थ हलका कुठे असतो??
पिठीसाखर.
पिठीसाखर.
बासुंदी, शेवयाची खीर, श्रीखंड
बासुंदी, शेवयाची खीर, श्रीखंड पुरी.
कसलीही गोड खीर
पाकातले चिरोटे
आंब्याच्या रसात बनवलेले पाकातले चिरोटे(हे मिपावर आहेत. अप्रतिम)
आंब्याचा शिरा, खरवस, कुल्फी.
आंब्याचा शिरा, खरवस, कुल्फी.
मिसळ कमी तेलकट बनवणार आहे >>>
मिसळ कमी तेलकट बनवणार आहे >>> प्रिंसेस!!!!
मिसळ हा जर मुख्य प्रकार असेल तर तो झक्क जमला पाहीजे. अरमानानं तेल, तिखट, मसाल्या शिवाय मिसळ जमत नाही. कटही कसा, भांड्यावरचं झाकण काढलं की स्वतःहून बोंबलला पाहीजे, मी ईथे आहे म्हणून!
तर मजा मिसळीची...
मला तर आत्ता चापावीशी वाटतेय मामलेदाराकडे जाऊन.
मला तर आत्ता चापावीशी वाटतेय
मला तर आत्ता चापावीशी वाटतेय मामलेदाराकडे जाऊन.>>>>>>>>>>> योकु मी पण येणार.....
धन्यवाद
धन्यवाद
चल, ठाण्यात मिसळ गटग करू.
चल, ठाण्यात मिसळ गटग करू.
हो... नक्की!
हो... नक्की!
साती मिपा काय ? रेसिपीची
साती मिपा काय ? रेसिपीची लिंक मिळेल का ?

योकु कट बोंबलला तर आमचं डाएट पण बोंबलणार की
अकु आंब्यचा शिरा - शिरा रिपिट होइल.
खरवस साठी दूध कुठुन आणु इथे ?
कुल्फि / आइस्क्रीम हे नक्की असणार
चल, ठाण्यात मिसळ गटग
चल, ठाण्यात मिसळ गटग करू.>>>>>>>>>>>>>>> चला...मी रेडी आहे
चल योकु.... आलेच
चल योकु.... आलेच
ए काय नुसतेच सगळे चल चल
ए काय नुसतेच सगळे चल चल करताहेत....कोणीतरी वेळवार ठरवा बघू.
हा आणि या पुढचा विकांत मी
हा आणि या पुढचा विकांत मी नाही
Pages