Submitted by रेकु on 21 July, 2014 - 01:38
सायीचे दही लावून घरच्या घरी तूप कसे बनवावे? माझे काही प्रश्न खालील प्रमाणे -
१)चांगले तूप बनविण्याकरिता सायीला विरजण म्हणून लागणार्या दह्याचे प्रमाण किती असावे?
२) सायीला विरजण आधी लावून ठेवावे की ताक घुसळण्याच्या आदल्या रात्री लावावे?
३) कमीत कमी बेरी निघावी यासाठी काय करावे?
४) तूप चांगले कढले आहे ते कसे ओळखावे?
५) रवाळ तूप चांगले की प्लेन?
६)कढवताना तूप उतू जाऊ नये म्हणून काय करावे?
कृपया माहीतगारांनी माहीती द्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीवर आधी भरपूर चर्चा
मायबोलीवर आधी भरपूर चर्चा झाली आहे या विषयावर. ती शोधा.
हेही वाचा: तूप आणि त्यातील घटक
१)चांगले तूप बनविण्याकरिता
१)चांगले तूप बनविण्याकरिता सायीला विरजण म्हणून लागणार्या दह्याचे प्रमाण किती असावे?
हवामानाप्रमाणे विरजणाचे प्रमाण बदलते. उन्हाळ्यात कमी विरजण पुरते तर हिवाळ्यात थोडे जास्त लागते.
आपण हे रोज करायला लागलात म्हणजे विरजणाच्या गुणवत्तेनुसार हे सहज जमेल
२) सायीला विरजण आधी लावून ठेवावे की ताक घुसळण्याच्या आदल्या रात्री लावावे?
आदल्या दिवशी लावावे किंवा वातावरणानुसार.
३) कमीत कमी बेरी निघावी यासाठी काय करावे?
लोणी मंद आचेवर कढवावे. साय बाजुला काढताना पातेल्याला लागलेले क्रीम खरवडुन त्यात टाकु नये.
४) तूप चांगले कढले आहे ते कसे ओळखावे?
त्याचा रंग व येणार सुवास यावरुन
५) रवाळ तूप चांगले की प्लेन?
याबद्दल तसेच तुपाच्या रंगाबद्दल अनेक मते आहेत. आपल्याला काय आवडते ते महत्वाचे. दुध गायीचे की म्हशीचे यावर सुध्दा अवलंबुन आहे. गायीत सुध्दा देशी गाय, ठाणबंद देशी गाय आणि रानात चरुन येणारी गाय असे फरक पडतात. यावर तुपाचे गुण अवलंबुन असतात.
देशी गाईचे तुप प्रकृतीला प्रमाणात खाल्ले असता उत्तम हे लक्षात ठेवणे. देशी गाईचे उत्तम तुप शरीराच्या तपमानाला वितळते आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे न आणता उत्तम कार्य करते.
६)कढवताना तूप उतू जाऊ नये म्हणून काय करावे?
विविध प्रकारचे लोणी एकत्र करुन कढवु नये. मंद आचेवर ठेवावे. तुप कढवण्याचे पातेले कॉपर बॉटम असल्यास उत्तम. पाव किलो लोणी कढवायचे असल्यास एक किलो लोणी बसेल अश्या मापाचे पातेले घ्यावे.
चार्वाकाचे कर्ज करावे पण तुप प्यावे असे म्हणले आहे. परमेश्वराच्या अस्तीत्वाबाबत मतांतरे असली तरी तुपाच्या उपयुक्ततेबाबत एकमत आहे.
नितीनचंद्र माहिती दिल्याबद्दल
नितीनचंद्र माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
<<तूप चांगले कढले आहे ते कसे ओळखावे?
त्याचा रंग व येणार सुवास यावरुन >>
पण तुपाचा रंग कढल्यावर काळसर असावा की पिवळसर? (गायीचे तूप)