वाशी ग. ट. ग. २०१४

Submitted by kamini8 on 20 July, 2014 - 09:35

१९ तारखेला वाशीमध्ये नि. ग्.ट्.ग झाले. मी आधीपासुनच ओळखत होती म्हणुन माझ्या मनावर काहीही दडपन नव्हते. सर्वाना भेटायचं होतचं. सगळे आल्यावर ओळखा पाहु कामे पार पडली.

दिनेशदा आले, त्याची पिशवी पाहुनच मला ते निसरगावर किती प्रेम करत आहेत हे दिसले. त्यानी जादुचा पेठारा आणला होता. त्यातुन एक एक छान छान वस्तु बाहेर येत. मी ९०% वस्तु प्रथमच पहात होती.
दिनेशदा जादुगारासारखे एक एक छान जादु दाखवत होते. ते फार प्रेमळ आणि उत्साही होते. खुप ठीकाणी ते फिरले पण त्याच्या चेहरा फ्रेश आणि मनावर थकवा जाणवत नव्हता. ते ग्रेटच आहेत त्याना सा. दंडवत. त्याना सुख आणि छान आरोग्य जीवन मिळावे अशी देवाकडे प्राथना. त्याची पिशवी हातात घेवुन पाहावी असा मोह झाला पण तो मान साधनाला मिळाला. त्यावरची सफेद जास्वदाची फुले छान दिसत होती.
जागुचा परीवार जागुप्रमाणेच सगळ्यात मिसळणारा आहे. तिच्या दोन्ही मुली किती शांत आहेत. तिला त्रास बिलकुल देत नव्हत्या, छोटी राधा तर किती गोड . सगळे असतानाही रडली नाही तिच्याजागी दुसरी कुणी असती तर भोंगाच वाजवला असता. दिनेशदानी आणलेला खाउ तीला फार आवडला होता. दुसरी खाण्याच्या सवइ बाबत आई बाबांवर गेलेली दिसत नव्हती.
जिप्सीला लवकर जायचे नव्ह्ते पण इंद्रा थांबायला तयार नव्ह्ता इंद्राचा दरबार होताना म्हणुन इंद्राला जावेच लागले.
बिच्यारा जिप्सी त्याने खडतर प्रवास करुन इन मिन तीन साठी सफरचंद आणले होते पण इन मिन तीन ने पिशवीच आणली नव्हती त्याला तिथे विकतही पिशवी मिळाली नाही म्हणुन जिप्सीने ते सफरचंद आम्हाला वाटुन दिले. इन मिन तीन तसाच रिकामा घरी गेला. आम्हाला एकच सफरचंद दिला होता पण तो प्रत्येकाला किती जड वाटत होता. सफरचंद पेक्षा चेरी जड ना म्हणुन त्याने सफरचंद आणली होती. चेरी घरी लगेच संपली पण सफरचंद काही केल्या संपतच नव्हती त्याने म्हणुन ग ट ग ला आणली वाटायला.
जागु इंद्रा आणि इन मिन तीन साठी मासे तळुन आणनार होती ती मासे घेण्यासाठी समुद्रावर गेली होती पण तिला पाहताच मासे पाण्यात पळाले ती तरी काय करणार ?
साधना एशुला घेउन आली नव्हती कारण तिला खुप वेळा घरचा आहेर मिळतो म्हणुन असेल कदाचीत. थोडी गंमत आली असती. त्या दोघी छान संभाषण करत असतात नेहमी.
साधना म्हणाली होती येताना लाल गुलाबाचे फुल घेउन या ओळखण्यासाठी तर सामी आणि पलक परीधान करुन आल्या होत्या.
गोव्याच्या अंजली चितळे आल्या होत्या त्याच्या कविता बद्दल दिनेशदा लिहतीच.
जिप्सी आणि उजु किती तिखट खातात. तरीही ते गोड कसे ?
कांचन आणि मनीमोहर आल्या होत्या, त्याच्याशी बोलुन छान वाटले.
आम्ही छान गप्पा मारल्या. नि.ग. कमी झाल्या पण त्यासाठी राणी बागेत जाणार आहोत. दिनेशदा असतील तर बहरच येइल्. झाडे त्याना पाहुन आनंदुन जातील म्हणतील की आमचा जीवलग सखा आला आहे. त्याच्यावर फुलांचा सडा शिंपडुन देतील.

मला सगळ्यात आवडली गोष्ट म्हणजे सगळे साधे होते. कोणीही हवेत तरंगणारे नव्हते. सगळे मातीशी अतुट नातं धरुन होते. जिप्सीतर किती फेमस आहे तरीही त्याचे पाय जमिनीवर होते. त्याच्या डोक्यात इतरांसारखी हवा गेली नव्हती.
खुप लिहु शकते पण आता वेळ नाहीं. नंतर लिहीन म्हटले तर राहुनच जाइल म्हणुन कसेतरी लिहीत आहे. गोड मानुन घ्या. काही चुकले तर सांगा.
फोटो देत नाही कारण जिप्सी रागवेल आणि पुन्हा फोटो द्यायचा बंद होइल. मग नि.ग. धागा चुकल्यासारखा होइल.
जाणकार लेखक / लेखिका फोटोसहीत लेख लिहतीलच माझे आपले पालखी आधी रांगोळी.

काहि घटणा अश्या असतात की त्या कधीही विसरता येत नाही त्यातली ही एक.
DSC00842.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला आहे वृत्तांत.
तिला पाहताच मासे पाण्यात पळाले ती तरी काय करणार ?> मासे बीचवर सनबाथ घेत पहुडले होते का , जागूला पाहताच पळाले ? Lol
जिप्सीतर किती फेमस आहे तरीही त्याचे पाय जमिनीवर होते. > अहो उडीबाबाचे पाय जमीनीवर नसतात , जिप्सी जमीनीवरच असतो Proud

sho shweet varnan... chan aahe kamini Happy

जिप्स्या कॉलरी चे शर्ट्स घालत जा रे आतापासुन Wink Proud

मस्तंच झालेलं दिसतंय हे ग ट ग ..... Happy

जिप्स्या कॉलरी चे शर्ट्स घालत जा रे आतापासुन >>>> हा हा हा

दिनेशदा जादुगारासारखे एक एक छान जादु दाखवत होते. >>>> येस्स - ते नेहमीच काहीतरी नवनवीन आणत असतात ...

छान लिहिलंय कामिनी..... >>> अगदी हजर राहिल्यासारखे वाटले.

दिनेशदा आले, त्याची पिशवी पाहुनच मला ते निसरगावर किती प्रेम करत आहेत हे दिसले. त्यानी जादुचा पेठारा आणला होता. त्यातुन एक एक छान छान वस्तु बाहेर येत. मी ९०% वस्तु प्रथमच पहात होती. >>>> याबद्दल थोडे लिहाना....

खरेच खुप मज्जा आली शनीवारी. सग़ळ्यांना इतके बोलायचे होते की शेवटी दोघे तिघे एकदम बोलताहेत आणि एलेकजण तिघा तिघांचे बोलणे एकदम ऐकतोय असे झाले. आता ऑगस्ट मध्ये राणिबाग गाठुया, तिथे निवांत गप्पा होतील १५-१६-१७ तिन दिवस सुट्टि आहे तेव्हा बेत ठरवा. त्याच्या पुढच्या आठवड्यानंतर गणपतीची धमाल उडेल आणि मग वेळ मिळायचा नाही कोणाला.

हे शेत वाशीचे आहे ?
वाशी म्हणजे आपले नवी मुंबई चे वाशी स्थानक तिथले ?

हे शेत एक प्रतिक आहे. निसर्गाच्या गप्पा या पावसाळ्यात कशा बहरताहेत ते दाखवणारे Happy

जाहीर णिषेद! नवी मुंबईच्या एकाही मित्र -मैत्रिण म्हणविणार्‍याने मला सांगितले नाही दिनेशदा गट्ग आहे ते.

अरे मस्त. Happy
मी शेवटी मिसलेच हे सगळे. तो दिवस अगदीच धावपळीत गेला. अगदी फोन करायला पण जमले नाही. असो.
दिनेशदा पुढच्या वेळी भेटुयात नक्की. Happy

कामिनी छान लिहिलेयस.

कामिनीही अगदी शांत आहे. बर्‍याच नविन नि.ग. करांची ओळख झाली फार चांगले वाटले. न विसरणारा दिवस ठरला तो.

सगळ्यांना माझ्या कडे पाहुन माश्यांचेच विचार येतात. कामिनी अग माझ्या अळूवड्या विसरलीस Lol

नि.ग. गटग म्हणून आम्ही रोपांची देवाण्-घेवाण पण केली.

बिच्यारा जिप्सी त्याने खडतर प्रवास करुन इन मिन तीन साठी सफरचंद आणले होते पण इन मिन तीन ने पिशवीच आणली नव्हती त्याला तिथे विकतही पिशवी मिळाली नाही म्हणुन जिप्सीने ते सफरचंद आम्हाला वाटुन दिले. >>
बिच्चारा जिप्सी Proud

इन मिन तीन तसाच रिकामा घरी गेला. >> रिकामा नाही गेला अळुवड्या, जिलेब्या, पातोळ्या,फणसपोळी, सफरचंद वडी, मिठाई खाऊन वर गोरखचिंचेचे सरबत पिऊन,गटगच्या तुम्हा सर्वांच्या गोड सुंदर सुगंधी आठवणी घेऊन Happy

छान लेख. Happy

व्वा! छान वृतांत. Happy
त्यानी जादुचा पेठारा आणला होता. त्यातुन एक एक छान छान वस्तु बाहेर येत.>>>>>.पुण्यातही आणला होता बरं का! Proud

रिकामा नाही गेला अळुवड्या, जिलेब्या, पातोळ्या,फणसपोळी, सफरचंद वडी, मिठाई खाऊन वर गोरखचिंचेचे सरबत पिऊन,गटगच्या तुम्हा सर्वांच्या गोड सुंदर सुगंधी आठवणी घेऊन स्मित>>>>>>>>>>>>गोरखचिंचेचे सरबत छान होत. मला पण आवडलं. Happy

छान लिहिलंय, कामिनी. Happy

हळदीच्या पानातल्या पातोळ्या खरंच अप्रतिम होत्या. Happy (उशीरा लक्ष गेल्याने फक्त एकच मिळाली :फिदी:), जागूने आणलेल्या अळुवड्या, सामीने आणलेले मोहनथाळ, जिलेबी, गोव्याचे काजू, फणसाचे चीप्स, दिनेशदांनी आणलेले चॉकलेट्स, बिस्किटस, गोरखचिंचेचे सरबत आणि मॉरीशसचा ठेचा पण बेस्ट ;-).

मनीमोहर, कामिनी, पलक, कांचन, अंजलीताई चितळे यांना प्रथमच भेटलो.

खरंतर निसर्गगटग कि खादाडी गटग असा प्रश्न पडलेला. Wink आणि म्हणुनच ईनमिनतीनने सर्वांना सोनचाफ्याची फुले वाटली. Happy

आणि म्हणुनच ईनमिनतीनने सर्वांना सोनचाफ्याची फुले वाटली.

मला काल रात्री ईनमिनची आठवण परत आली Happy मला तिन फुले मिळालेली आणि गेल्यागेल्या मी ती उशीवर ठेवली. बहुतेक चादरी झाडताना ती फुले उशीखाली गेली. काल रात्रीही सुवास येत होता.....

साधना माझ्याकडची दोन म्हणजे माझे आणि श्रावणीचे अशी दोन फुले मी पिशवीत ठेवलेली तिच पिशवी मी तुला दिली पण फुले काढली नाही. बघ सुगंध दरवळला की नाही जास्तीचा. Happy

Pages