अहिंसा म्हणजे काय?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अहिंसा म्हणजे काय?
अहिंसावादी म्हणजे काय?

हे प्रश्न मला आजकाल पडले आहेत. "मी अहिंसावादी आहे" असे जेंव्हा कोणी म्हणतो तेंव्हा त्याला नक्की काय अभिप्रेत असते हे मला अजुनही कळत नाही त्यामूळे हा प्रपंच.

तूम्हाला अभिप्रेत असलेली अहिंसा आणी अंहीसावाद इथे लिहाल का? म्हणजे मलाही काही नविन विचार कळतील. Happy

मला अभिप्रेत असलेला अर्थ.

अहिंसा व अहिंसावाद- मी कोणाचीही कारण नसताना हिंसा करनार नाही. पण कोणी माझी किंवा माझ्या स्वकियांची (इथे देशपण) विनाकारण हत्या करत असेल तर माझ्या अहिंसावादात त्याची हत्या करणे वा त्याला प्रतिरोध करने येतेच. स्वरक्षण म्हणजे हत्या असे मी समजत नाही पण त्याच वेळेस मी दुसर्‍याची विनाकारण हिंसाही करनार नाही.

उदा. द्यायचे झाले तर शिवाजी महाराजांनी राज्य स्थापण केले ते काही अहिंसेच्या बळावर नाही तर स्वकियांचे रक्षण करन्याकरता हिंसाही केली. मग त्याला तूम्ही काय म्हणाल? ते हिंसक होते हे लेबल तूम्ही लावाल काय? की त्या काळात हे मान्य होते असे पळ्पुटे विचार सांगून पुढे जाल? अहिंसा आणी स्वरक्षनवादी Happy ह्याचात हे युध्द गेले २००० वर्ष चालू आहे त्यामूळे "तो काळ" हे उत्तर जो पर्यंत मानव जिंवत आहे तो पर्यंत होउ शकनार नाही. कारण हा वाद नंतरही चालू राहनारच.

इतिहास पाहील्यास सम्राट अशोक व सम्राट हर्षवर्धण हे बुध्द सम्राट हिंसेच्या जोरावर अहिंसा लादत होते. त्या १५० वर्षात भारताची उत्तर बाजू अहिंसेच्या पगड्याखाली आली व कित्येक छोट्या देशांनी त्यांचा असलेल्या सैन्याचा त्याग केला. परिनामी हूण, कुशान, शकांचे आक्रमन व त्यांचे राज्य उत्तर भारतावर आले. त्याही नंतर भारतावर मुस्लीम राज्य आले कारण त्याला आपण निट विरोध करु शकलो नाही. इथे डिटेलात देत नाही कारण हा विषय नाही. थोडक्यात स्वरक्षन आणी मुद्दाम केलेली हिंसा हा फरक तेंव्हाही समजला नाही. व तो आजही लोक समजत नाहीत. मग ह्यावर तूम्ही काय विचार करता?

आजकाल मुंबईच्या पार्श्वभूमीवर अनेक ब्लॉग व लेख वाचले त्यात काही जणांनी अहिंसेने हा प्रश्न सोडवावा असे लिहीलेले आहे. आपल्यापैकी बरेचजण मी अहिंसावादी आहे असे म्हणतात तर त्यांना हे म्हणन्यापाठीमागे काय अभिप्रेत आहे हे लिहाल का?

इथे विनाकारण हिंदू मुस्लीम वाद नको. उदा म्हणूण ठिक पण तो वादाचा विषय नाही हे लक्षात घ्या.

प्रकार: 

केदार डॉ. धनंजय वैद्य यांचा 'अ-हिंसा' असा एक लेख मी तुला इथे देतो आहे वाचायला. तो वाच. हा विषय छान आहे आणि तुझेही विचार आवडलेत.

http://ajunek.blogspot.com/2008/12/blog-post.html

की हे शब्दरत्नाचे सागर ! की हे मुक्तांचे मुक्त सरोवर !
नाना बुध्दीचे वैरागर ! निर्माण जाले !!
दासबोध..........

माझे याबद्दलचे विचार इथे वाचा-
http://www.maayboli.com/node/5137
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

He termed terrorism as the worst kind of violence which is not carried by a few mad people but by those who are very brilliant and educated.

"They (terrorists) are very brilliant and educated...but a strong ill feeling is bred in them. Their minds are closed," the Dalai Lama said

धन्यवाद उदय. चांगली लिंक.

आपले माननिय पंतप्रधाण ह्यातुन काहीतरी धडा शिकतील.

केदू तुला हिमेसरेशमियारिया हा रोग झाला आहे का?
करने, करनार, स्थापण, हर्षवर्धण..??????? ही वाईट्ट लक्षणे आहेत, आताच उपचार करुन घे!!!